पाऊस...
मला पाऊस आवडतो,
मला पाऊस आवडत नाही...
मी शांत आहे, संयमी आहे...
पण तो अंत बघतो माझा...
वाट बघायला लावतो...
आला नाही तो की बिथरत जाते मी..
माझ्याही नकळत..
अवचित येतो मग तो.. कोसळतो...
मी भानावर येईतो
कोसळून झालेलं असतं त्याचं...
निथळत राहतो मग तो, पागोळ्यांमधून..
आर्त बघतो...
मी तुटून जाते... हरवते धुक्यात..
आणि तो पुन्हा बरसतो, चिंब भिजवतो, कुशीत घेतो अलगद..
मी विरघळत राहते..
संयमाचं बोट सुटलेलं...