नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.