बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास
सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.