वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

गार्‍हाणी

गार्‍हाणी:


१. पुर्वी मागील लेखांचे पान क्रमांक खाली "१ २ ३ .... पुढील" अश्या स्वरूपात होते, ते आता "अधीक" खाली ढकलले गेले आहेत. हे गैरसोईचे आहे.


२. प्रतिक्रीया लिहायचा चौकोन मोठ्ठा होता तो बरा होता. हा अतीसुक्ष्म आहे.


पुर्ववत केल्यास उत्तम न केल्यास जशी आपली इच्छा.

अतिसूक्ष्म?

प्रतिक्रीया लिहायचा चौकोन मोठ्ठा होता तो बरा होता. हा अतीसुक्ष्म आहे.


अतिसूक्ष्म? बरं! Smile


मला व्यक्तिश: तरी तो अतिसूक्ष्म आहे असं वाटत नाही!


असो..


अरे नीलकांता, हे व्यंकटराव काय म्हणताहेत त्याकडे प्लीज लक्ष दे अशी तुला विनंती.. 


अवांतर - तक्रार करताना किंवा गार्‍हाणी मांडताना कृपया ती योग्य व नेटक्या शब्दात मांडली जावी, तसेच अतिशोयोक्ती किंवा इतरही कोणत्या अलंकारांचा वापर होऊ नये असे वाटते! Laughing


तात्या.

हा भाग खुप

हा भाग खुप चाग्न्ल

अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल?

तात्या साहेब,
आज शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी , त्यानिमित्त मी सकाळ्पासून खपून काहे लेहन केले होते ते टाईप केले व सूचनेप्रमाणे "प्रकाशित करू नये" येथे टिच्की मारुन ठेवले होते , ते मला कसे दिसेल ते जरा लवकर सांगाल काय प्लीज? माझा जीव वरखाली होतो आहे.....

चूक..?

ते मला कसे दिसेल ते जरा लवकर सांगाल काय प्लीज?

ते तुम्हाला दिसलेच पाहिजे आणि मलाही दिसले पहिजे! इतर काही लोकांचे जे अर्धवट लेखन आहे ते जसे मला दिसते, तसेच तुमचेही दिसायला हवे. परंतु ज्या अर्थी ते तुम्हाला आणि मलाही दिसत नाहीये त्या अर्थी तुम्ही ते मिपावर चढवताना घाईगर्दीत काहीतरी चूक केलेली दिसते. नाहीतर असे होणार नाही!

कारण आत्ताही मला इतर काही लोकांचे अप्रकाशित लेखन दिसते आहे. परंतु त्यावर चावीचे चित्र असल्यामुळे अद्याप ते प्रकाशित व्हायचे आहे असे मी समजतो... परंतु तूर्तास तरी मला तुमचे कुठलेच असे अप्रकाशित अवस्थेतले लेखन दिसत नाहीये! बहुधा सुपूर्द करताना काहीतरी चूक झाली असावी बहुतेक!

माझा जीव वरखाली होतो आहे.....

हे मी समजू शकतो परंतु आता मी तरी तुम्हाला काय मदत करू शकतो? तुम्हीच सांगा!

असो..

तात्या.

लेखन माझे सुधा माला दिसत नाहि

मिपा आर्ध्वट लिखाण खाऊं टाकतो काय ?

लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय?

अंगठाबहाद्दर

कल्पना नाही!

एकलव्या,

लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय?

काय कल्पना नाय बा! नीलकांतशी बोलून घेतो एकदा. तूही लिही त्याला...

तात्या.

धन्यवाद!

तात्या - बहुतेक उत्तर मिळाले आहे असे वाटते@@... त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच.

(विद्यार्थी) एकलव्य

ओक्के..

त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच.

हेच म्हणतो! अरे मेल्या तुझंच संस्थळ आहे हे! कंप्लेन्टी कसल्या रे करतोस? काय हवं नको ते नीलशी बोलत जा बिनधास्त! Smile

तो जेवढं जमेल तेवढं करतोच आहे रे! बाकी अडचणी या यायच्याच! तेव्हा जरा सांभाळून घ्या लेको! Smile

आपला,
(मास्तर) तात्या.

Smile

मी पण लिखाण अर्धवट ठेवलं आहे...

माझं लिखाण अप्रकाशित वर टिचकी मारुन ठेवले आहे. आता मी त्याला कसं शोधु???

टीचकि

तात्या / नीलाकान्त,

मिपा वर लेखन करताना जे दुवे दिले जातात त्यावर टीचकी मारल्यास वेब ब्राउझर समबन्धित सन्केतस्थळावर पोहोचतो. वेब ब्राउझर नव्या सन्केतस्थळावर गेल्याने मिपाशी असलेला सम्पर्क तुटतो. हाच दुवा जर नवीन ब्राउझर मधे पॉप अप झाला तर मिपाशी असलेला सम्पर्क तुटणार नाही अणि मिपा चा विरह सहन करावा लाग्नार नाही. उदाहरणा दाखल महाराष्ट्र टाईम्स चे स्थळ पहावे. ईथे एखाद्या बातमि वर टीचकी मारल्यास ब्राउझर त्या बातमी मध्ये जातो आणि मूळ पानाशी आपला सम्पर्क रहात नाही. हेच जर सकाळ च्या स्थळा वर पाहीले तर कोणत्याही बातमी साठी एक नवीन ब्राउझर पॉप अप होतो.

टिचकी देताना..

टिचकी देताना शिफ्ट दाबल्यास तो दुवा नव्या पानावर उघडतो.

अप्रकाशित ठेवलेले लेखन तुम्हाला दिसेल आणि संपादकांना दिसेल अशी सोय आहे.

माझी अशी शंका आहे की लोक त्या अप्रकाशीत ठेवा वर क्लिक करतात व नंतर प्रकाशित करायचे विसरतात. म्हणजेच लेखन साठवल्या जात नाही तर ते नाहिसे होते. अप्रकाशित करावर टिचकी दिल्यानंतर ते पान डेटाबेसमधे साठवल्या जाण्यासाठी प्रकाशित करने गरजेचे आहे. ते पान फक्त तुम्हाला व सरपंचांना दिसेन.

जेव्हा लेखन पुर्ण झालं असं वाटतं तेव्हा त्या अप्रकाशित कराच्या चौकटीत पुन्हा टिचकी देऊन तो पर्याय काढून टाका, व पुन्हा प्रकाशित करा, म्हणजे ते लेखन आता सर्वांना दिसेल.

आपलं लेखन अप्रकाशित आहे हे ओळखण्याची एक युक्ती आहे. ती म्हणजे अप्रकाशित लेखनाच्या पानावर खाली एक पिवळया रंगाची चावी दिसते.

वाचनखुणा कशा साठवायच्या?

तळाशीच,

आपण जे लेखन वाचत असाल, त्याच्या तळाशीच 'वाचनखूण साठवा' असा पर्याय दिसेल. त्यावर टिचकी मारून संबंधित लेखन 'वाचनखूण' म्हणून साठवता येईल..

तात्या.

माहिती अप्रकाशीत ठेवण्याबाबत.

माझी व्यक्तीगत माहीती जर अर्धवट राहीली तर अप्रकाशीत ठेवायची काही सुविधा आहे का?

नाही

नाही..!