बालम केतकर : अ-भंग
- डॉ. सुधीर रा. देवरे
- डॉ. सुधीर रा. देवरे
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची.
सुरवात अशी काही नाहीच मधेच हे रस्त्याच्या कडेला उगवलेलं आहे झाडासारखं! त्याला भिकारी पण म्हणता येत नाही कारण त्याचं ते स्वतंत्र पणे कमावून खात आहे.
त्याला फ्रीजमध्ये ठेवलेले नंतर खाऊ म्हणून ठेवलेले शिळे पदार्थ ठाऊक नाहीत!
आवडीने चवीने खाईल असा पदार्थ आहारात नाही की चार पैसे गाठीला बांधून ठेवावेत अशी मध्यमवर्गीय की काय असते ती बैठक त्याच्या विचारात नाही!
मग का जगत सुटलंय हे खाजेसारखं? माहीत नाही!
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ?
मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले..
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..
अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे..
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी****
निशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे .
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी****
“मैत्री अलवार नात
चालत राहील पाहिजे
निरंतर...”
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द.
डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .
आडनावाचा प्रभाव असेल कदाचित, पण रंगांच obsession लहानपणापासनंच. वडील चित्रकला शिक्षक असल्यानं घरात कायमचीच रंगपंचमी असायची. पुण्याजवळ थेऊरला राहायचो तेव्हा. . त्याकाळातला मास्तरांचा पगार वैग्रेचं गणित जुळवायला बोर्डस् रंगविणे, घरांचे रंगकाम देखिल करायचे. आईचाही सहभाग असायचा यात. . त्याकाळी लाकडाची चौकट बनवुन त्यावर पत्रा ठोकुन बोर्ड बनवले जायचे. पुण्यात पेठेत कुठे साहीत्य खरेदी करुन पुलगेटपर्यंत पायी यायचं अन् तिथुन थेऊरसाठी गाडी पकडायची. कारण सिटीबसमध्ये साहीत्य घेवुन जावु देत नसतं. कापडी बोर्ड रंगविण्याअगोदर "सरस" नावाचा प्राणिज डिंक उकळुन त्यात कापड भिजवायचे.