अंधारक्षण - प्रास्ताविक

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
29 Sep 2014 - 12:24 pm

अंधारक्षण - प्रास्ताविक

देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय करतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं.
दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले. त्याआधीचे इतर सर्व संघर्ष सामान्य लोकांच्या आयुष्याशी खेळले नाहीत असं नाही पण दुस-या महायुद्धात दोन्हीही बाजूंनी सामान्य माणसांचा ज्या निर्घृणपणे आणि थंडपणे वापर केला, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
लाॅरेन्स रीज या विख्यात वृत्तचित्रकार आणि लेखकाने याच विषयावर प्रचंड काम केलं आहे. साधारणपणे कुठल्याही युद्धाचा इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.
रीजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने निव्वळ ज्यांनी हे सगळं भोगलं त्यांचाच नाही तर ज्यांचा अत्याचारांमध्ये सहभाग होता अशा लोकांनाही बोलतं केलं आहे. ज्या ३५ जणांच्या मुलाखतींचा हा स्वैर अनुवाद आहे त्या प्रत्येकाने हा अंधारक्षण अनुभवलेला आहे.
भारतीय सैनिक ब्रिटिश साम्राज्याचा भाग म्हणून दुस-या महायुद्धात लढले होते. इंफाळ-कोहिमापर्यंत जपानी सैन्याने धडक मारली होती. स्वातंत्र्यानंतरही चीनविरुद्ध एक आणि पाकिस्तानविरुद्ध चार युद्धे झाली आहेत. असं जरी असलं तरी सीमेवरचे नागरिक सोडले तर युद्धाच्या दाहकतेचा, बीभत्सतेचा आणि संहारकतेचा आपल्याला अनुभव नाही. युध्दस्य कथाः रम्याः असं आपण म्हणतो पण युद्धस्य कथाः भयंकराः कशा असतात त्याचं प्रत्यंतर आणून देणा-या या सत्यकथा आहेत.
रीजच्या या पुस्तकाचा स्वैर अनुवाद
करण्यामागे अनेक कारणे आहेत. पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रीजची वस्तुनिष्ठ, तटस्थ आणि कुठलाही नैतिक अभिनिवेश नसलेली विषयाची मांडणी आणि या कथनातून जाणवणारा त्याचा प्रामाणिकपणा!

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

29 Sep 2014 - 12:35 pm | आदूबाळ

वाचतो आहे. शुभेच्छा.

(अवांतर - आयडी एक नंबर आहे.)

एस's picture

29 Sep 2014 - 12:41 pm | एस

पुभाप्र

जेपी's picture

29 Sep 2014 - 12:45 pm | जेपी

+2

पुभाप्र

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :

इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस's picture

29 Sep 2014 - 1:09 pm | एस

तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

आदूबाळ's picture

29 Sep 2014 - 2:42 pm | आदूबाळ
एस's picture

29 Sep 2014 - 3:04 pm | एस

Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

ही मालिका सुरू होतेय की हा अनुवादित पुस्तकाचा परिचय आहे? क्रमशः हवे होते का?

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 1:19 pm | प्यारे१

+१ असेच विचारतो.

आयडी बघून शिष्यत्व घेण्याची इच्छा होत आहे.
-प्यारेबोका :)

@इनि,अनुवादित कथांची मालिका सुरु होते आहे,त्याचे प्रास्ताविक अाहे.पण भाग सुरु झालेले नाहीत म्हणून अात्ता क्रमशः नाही!

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 1:26 pm | प्यारे१

तुम्हाला कसं बरं ठाऊक? वर काहीही बोध होत नाही.
मांजर ए मल्लिका तुमचा ड्यु आयडी आहे का काय? ;)

निरोप अालेला लेखकाचा!अाम्ही आमच्याच आय डीने लिहितो,ड्यु आय डी घ्यायची वेळ नाही आली अजुन!

कधी बरं येते अशी वेळ? ;-)

घेणार्यानाच विचारायला हवं!!

सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार.

संजय क्षीरसागर's picture

29 Sep 2014 - 4:11 pm | संजय क्षीरसागर

चुकून हा आयडी वापरला गेला का?

गवि's picture

29 Sep 2014 - 4:14 pm | गवि

खिक्क.. :-)

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 3:44 pm | काउबॉय

प्रास्ताविक असे स्पष्ट शब्दात लिहले असताना टैग-इ-क्रमश्या अपेक्षा लोक का करतात हो?

उमा @ मिपा's picture

29 Sep 2014 - 1:39 pm | उमा @ मिपा

स्वागत! वाचण्यासाठी उत्सुक आहे.

काळा पहाड's picture

29 Sep 2014 - 3:22 pm | काळा पहाड

मग्गाच पासून मी अंधा-रक्षण असं वाचतोय. ते अंधार-क्षण आहे असं नंतर लक्षात आलं.

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 3:24 pm | प्यारे१

डिट्टो.

अंध आरक्षण वाचत होतो.
मला वाटलं असेल ब्वा काही!

हाडक्या's picture

29 Sep 2014 - 6:36 pm | हाडक्या

अगदी अगदी .. मला वाटलं मीच एकटा गंडलो की काय.. ;)

असंय होय!! हां मग अर्थ लागतोय! ठ्यांक्यू ओ दादा!!

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 3:36 pm | काउबॉय

चुन्लाय.

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 3:39 pm | काउबॉय

अंधारक्षण नाव वाचुन हां आरक्षणा संबंधी धागा आहे की काय असे वाटू लागले होते :)

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 6:20 pm | उगा काहितरीच

पहिले वाटले अंधा -रक्षण,(आंधळा या अर्थाने ) नंतर वाटले अंध -आरक्षण, येउन पहाता अंधार-क्षण.

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 6:23 pm | उगा काहितरीच

पहिले वाटले अंधा -रक्षण,(आंधळा या अर्थाने ) नंतर वाटले अंध -आरक्षण, येउन पहाता अंधार-क्षण.

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 6:30 pm | प्रसाद१९७१

मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू.
पण नशिबाने काहीतरी नविन आहे.

येउन देत पुढचे भाग लवकर.

संपादक ( मल्लीका-ए-मांजर )
असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

काळा पहाड's picture

29 Sep 2014 - 11:20 pm | काळा पहाड

लॉरेन्स रिज ला कुठं मराठी येतंय?

मुक्त विहारि's picture

29 Sep 2014 - 11:10 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

खटपट्या's picture

30 Sep 2014 - 12:53 am | खटपट्या

लवकर कायते येवद्या !!

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 10:19 am | ऋषिकेश

किती जुनं पुस्तक आहे? लेखक हयात आहे का?
कॉपीराईट इश्श्युज येऊ नयेत ही सदिच्छा!

२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.