विरंगुळा

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

(पात्र आणि घटना काल्पनीक.)

योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली.
मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता. आई शप्पथ !!) मधुन जणू त्यांच्या स्वागतासाठी १०० पत्रकार camera घेउन वाट बघत आहेत अशा थाटात अवतरले. एकदम रिन सफ़ेदी वाल्या कुर्त्या पायजम्यात. पन स्वागतासठी पिच्या शिवाय कोनीच नस्ल्याने थोडे हिरमुसले. त्यांचा हा चेहेरा पिच्याच्याने बघवला नाही. पिच्याने शिट्टीमारली आनि नव-तरून मंडलाचे कार्यकर्ते जे रंगपंचमी च्या तयारीत गुंतले होते ते हजर झाले. आन्नाचा चेहेरा खुलला. थोडा लाल पन झाला.आन्नाने अपुलकी ने पिचु आनि विकि ला मिठी मारली. त्यांना पन थ्वडा भाव वाढल्या सारखं वाटल. मग चालताना त्यांची कोपरं मागे गेली आणिछाती २ इंच पुढे आली आणि ती झुलवत ते रंगपंचमीच्या set वर गेले. चालतानी आन्ना ने खांद्यावर हात ठेवल्याने सत्या पन थ्वडा लाडातआला.

हळु हळु गर्दी वाढू लागली. "ऒ अंत्या .... हिकड कसा काय !!! अ गन्या ... यड्या ... हा हा हा ... लय भारी यड्याआ.... फ़ुल्ल खेळ्नार यड्या .... आयला ह्यो बघ .... ह्या ह्या ह्या" अशा संवादांनी गल्ली गजबजू लागली. पांडरा शर्ट-प्यांट, काळे चकचकीत बूट,लठ्ठ बोटांमधे जाड अंगठ्या, गळ्यात "पच्चास तोला" माळा, काळा ग्वागल, भारदस्त काळ्या जाड मिशा अशा वेशात राजू शेट्टी (काळा कभिन्न रंग, ४'९" उंची, पोट पुढे, बायको मात्र त्यामनाने ... असो ... ) हे व्यक्तिमत्व फोन वर बोलत प्रकट झालं. गर्दितुन मग तो मुद्दाम गर्दिपासून लांब गेला. फोन वर कोनाला तरी ४ शब्द (!@@#%#**$@) सुनावले आनि गर्दित परत आला. त्याचे ४ शब्द ऐकून सत्या आनी आंत्या ला ल्हई कवतीक वाटलं.

तेवढ्यात रफ़ीक शेख आले आनि लोकांना सर्व-धर्म-समभावाच्या ओका-या होऊ लागल्या. क्वांग्रेस मधून मनसेत जाणार होते पन अन्ना ने ओढून आनलं त्यांना हिकडं. काही दिवसांपुर्वीच शिवसेनेतुन switch मारलेल्यांना काही हे पटल नाही. पन पक्शशिस्तिपरमाने त्यांने शेखांना मिठी मारली आनी रंगपंचमी + ईद च्या शुभेच्छा दिल्या. शेखांनी पेशल मटन बिर्यानी चं अश्वासन दिल्यावर मात्र त्यन्च्या तोंडाला पानी सुटलं आनि त्यांनी एक आवंढा गिळला.

(क्रमशः)

हा लेख/या पुढील लेख आमच्या अनुदिनी वर देखील वाचू शकता.

http://koustubhkulkarni.blogspot.com/

(पुढील आणि इतर लेख लवकरच इथे देखील प्रसिद्ध केले जातील.)

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.

म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला. मुंबैहून बारक्या आलावता गांवाकडं, त्याला म्हन्ला, याला चिटकव गड्या कुठतरी तिकडच, आता शेतीतबी काय र्‍हायलेलं न्हाई.
म्या आलो मंग हिकडच् बारक्यासंगट. बारक्याच्याच हापिसात लागलो. हापिस येकदम् झ्यॅक बगा. निसत्या चौकोनी छोट्या छोट्या उघड्या खोल्या येका साईडीला अन् दूसरीकडं ही केबिनांची रांग. खोल्यांमदी बसल्येली मानसं उबी र्‍हायली तरच दिसायची. हापिस येकदम आरश्यावानी चकाचक, अन् बाप्ये पन. बाया तर हिरवीनीसारकी कापडं घालून टकाटका चालायच्या. माजं काम सक्काळी साफसफाई, पानी भरनं आन् समद्या काचा पुसनं. सायेब लोकंबी चांगली. म्हंजी दुपारी थोडी डुलकी लागली तरी बोलायची न्हाईत. फायली येळच्यावेळेत नेउन दिल्या की जालं. माजी सपानं बगन्याची संवय चालूच व्हती. पन् सांगनार कुनाला अन् आईकनार कोन् ? बारक्या तर मला येडाच म्हनायचा.
येक दिवस बारक्या म्हनला, ये सद्या, लेका तुला म्यॅट्रिक व्हतां आलं न्हाइ कंदी. आता म्यॅट्रिक नांवाचा पिक्चर आलाय् आन् समदी लोकं खुळी जालीत त्याच्यापायीं. आपल्या सायबाची टायपिस एन वक्ताला रुसली म्हनून मला दोन तिकटं दिलीत त्यानं. तर येनार का बगायला फुकटात ? तो बगितल्यावर तरी म्यॅट्रिक व्हशील लेका. म्या म्हनालो, जाऊ की, काय नाय तर थंडगार हवेत झ्वाप तरी मिळंल निवांत.
थेटर बगूनच गपगार झालतो, पिक्चर तर काय जबरी व्हतं राव माला जे समजलं तसं सांगतो तुमास्नी. पैल्याछूट येका बिल्डिंगीवर पोलिस आन् काळ्या गोगल घातलेल्या मानसांचा वेढा, मंग गोळीबार. येक काळ्या कापडांतली बया कांपुटरवर, काळे चष्मेवाले तिला पकडायला बगतात. त्येच्या मायला, ती बया पळाया लागते, येका बिल्डिंगीवरुन दुसरीवर. गावंतच न्हाइ, जाते पळून. मंग येक पोरगा दिसतो, त्येला कांपुटर उठवतोय्, ते मंग हापिसात जाताय तेच्या. थितं फोनवर येक बाप्या सांगतो, तुज्या मागावर मानसं लागलीयात् तंवा पळ काढ लेकां. त्ये खाली वाकून पळतंय येका केबिनमंदी. थितं फोनवाला बाप्या तयाला खिडकीभाईर जायला सांगतो. ह्ये जातंय् पन् मोबाईल पाडतंय् खाली. मंग घाबरुन आंत येतं. काळे चष्मेवाले पकडतात आन् आडवा करुन येक र्‍हइमानी किडा त्याच्या प्वाटांत घालतात. त्ये बोंबलू पाहतं तर व्होठ शिवलेलं. जागं हुतं तर घरात खाटल्यावर. मायला, म्हंजी हा माज्यासारकाच दिसतुय, सपान बगनारा.

पन् त्ये फोनवालं ब्येनं काइ पाठ सोडत न्हाई. परत फोन यितु. हा जातोय रस्त्यावर. येक गाडी येते आन् हा बसतोय आंत. तर आतल्या दोन बया त्याचं जबरी आप्रेशनच करुन टाकतात. र्‍हईमानी किडा भाईर ! तेला नेतात येका हबशाकडं. त्ये तर लई भारी असतंय. त्ये म्हनताय कसं, मजा बगायची असल तर गुलाबी गोळी गिळायची, न्हाईतर निळी गोळी गिळून गपगुमान् वापस. पन् पोरगं डेरिंगबाज निघतं. ते बिनधास गुलाबी गोळी गिळतय.

हबशा त्याला कांपुटर रुममधी बशिवतं. येक बया मशिनच्या वायरी चिटकवते. उजवीकडं आरसा असतोय. हा आरशाला हात लावतो तर ते चिटकूनच येतंय हाताबरुबर. गळ्यापर्यंत पसरताय. मंग बगतो तर येका चिकाट घानींत बुडाल्येला. आजुबाजुला छोटी बाळं पन् तशीच बरबटल्येली. येक मोठ्ठा कोळी येऊन तेचं डोस्कंच खातं. हा येकदम पान्यात. जागा होतो, हबशी विचारतो, मजा वाटतीं का? डोकीवर हात फिरवतो तर मागं ह्ये टेंगुळ ! हबशी म्हनतो तुला आता कोंतीबी वायर जोडता येईल. मंग हबशी तेच्याबरुबर लई खेळ खेळतंय. ज्युडो कराटे असं कायबीं. हेला काईच सुदरत नसतं. हबशी सांगतो आपुन जे खातो पितो ते कायबी खरं नसतं. ना वास ना चव ना पर्श.

ह्येच्या म्होरं जे सांगितलं ते डोसक्यांत शिरंना. मंग सपानात सपान असं सर्व फास्टमफास्ट फिराया लागलं. कोन कोनाच्या इरुध हाय त्येच कळंनासं जालं. येवडंच कळलं की त्यो पोरगा हिरो व्हता आन् त्याकडं टक लावून पहानारी ती हिरवीन्. शेवटी तिनं तेचा मुका घेतला तवा तर नक्कीच जालं. शेवटी भन्नाट जादू असलेली फायटिंग! त्यात काळं चष्मेवाले हरले आनि पोरग्याचा दनदनीत विजय!
लास्टला म्यां उबं र्‍हाउन येक सनसनीत शिट्टी हानली तर सर्व्या थेटरातली मानसं माज्याकडं भूत बगितल्यागत बगाया लागली. बारक्या उगा माज्यावर कावला. आयला, म्यॅट्रिक होवून फुडं शिकलो असतो तर पिक्चरमंदी काय बोलत होते तेबी समजलं नसतं का ??

मी जर हा असतो तर : भाग २

ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...

मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो ....

मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता.
झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते.

मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...

मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती.

मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेता येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....

मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते.
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते.

मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता. कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.

मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता येईल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते.

मी जर देवेगौडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले असते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.

मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.

मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....

मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...

संगणक उद् बोध

श्री गणेशायः नमः

नारद म्हणे नर्ड मुनीवर
शंका अजाणांच्या करा दूर
सोपे करून सांगा सत्वर
संगणकाचे गूढ

नारदा भक्तीभावे श्रवण कर
संगणक महान अवतार
आला कराया जगाचा उद्धार
नर्ड म्हणे सांगी जनास रे

वसतो साता समुद्रापार
बाल फाटक ऋषी थोर
उघडली विश्वात घरोघर
सुक्षमृदू गवाक्षे

संगणकी गवाक्षामधून
घडते विश्वाचे दर्शन
शोधुन काढी महाज्ञान
गुगल ऋषींच्या कृपेने

उघडी गवाक्षे एकामागे एक
वेगळे रूप धरी प्रत्येक
करी कामे झणी कित्येक
मानव जणू बहुमेंदूंचा

जे मूढ आधाशी होती
अमाप खिडक्या उघडती
खचीत संगणका लोळवती
कोसती फाटक ऋषीला फुका

जगी पसरले संगणक जाल
जोडून महामार्ग विशाल
ज्ञानसरीता वाहे खळखळ
माहीतीचा महापूर

जालात वेचीता ज्ञानकणांते
भेट देता अनोळखी स्थळाते
राही सदैव सावधान चित्ते
विषाणू कवच घालोनी

जालात माजले विषकांड
किडे विषाणू अंदाधुंद
करीती संगणका जेरबंद
कवचास छेद पाडोनी

जरी कधी विषाणू अघोर
संगणका करीती बेजार
विषाणू मारक मात्रा तत्पर
तव मेंदूत भरावी

नारद म्हणे नर्ड मुनीवर
ऐकोनी संगणक विचार
प्रश्न छळती मजला फार
संगणकाचे गूढ कैसे?

नर्डमुनी करीती विवेचन
संगणक तर्कशक्ती महान
आत्मा करी तार्कीक विवेचन
अब्ज अब्ज कार्ये पळभरी

स्मरणकेंद्रे सक्षम फार
तर्ककेंद्रा पुरविती तत्पर
माहितीचा प्रवाह घनघोर
विसरती ना कधी

चक्र फिरे संगणक अंतरी
लिहीलेले तयाच्या कायेवरी
वाचती अंगुली झरझरी
महाज्ञान साचवले

विचार मांडतो पटलावर
वाचितो मुद्रीते भरभर
पाहतो टंकलिखीत अक्षर
उंदराने चुचकारीता Laughing

मिसळपाव भक्षीती
आपसात वाटीती
कोणा मिरच्याही झोंबीती
जालात चरता चरता

ऐसा संगणक महाज्ञानी
कथीयले नारदा नर्ड मुनी
विश्वक्रांती आणि घडवुनी
समजोनी घे रहस्य पै

ॐ शांती: शांती: शांती:

दह्या वर भागवावे ते असे !

एक दूधवाला भय्या दही घेउन बेस्ट बस मधे चढ्तो (त्याच्या साइकली ची कुणितरी अगदी 'मनसे' लावलेली असते)
बस मधे खुप गर्दी असते पण पुढे एक जागा रिकामी दिसते , तर तो तिथे जाउन बसतो , त्याला माहीत नसते कि ती ज़ागा महिलांसाठी राखीव आहे .
पुढ्च्या स्टाप ला काही बायका बस पकडतात , पुढे येतात अन त्याला म्ह्ण्तात -

बाई : " ओ भय्या उठो , ये ज़ागा हमारी है , हम महिलाए हैं "
भय्या : " अरे बेहेनजी , ठीक है आप महिलाए हैं लेकिन हम भी तो दही लाये हैं "

At Wits End

डोझम्माचे बारसे

बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच!! वैताग यायचा अगदी!! इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...

... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच!! पुणेरीपणा कामी येतो तो असा!! ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल!! ते नंतर.

तर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय!! घरच्या जेवणाची खूप आठवण यायची! इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्‍याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.

एव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता. लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खरं तर घर बघितल आणि एकदम आवडलच!! अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही!! पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता.

एके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत!! मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू!! मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या!! अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत!! हिला मराठी समजेल का??

तरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग? आणि चक्क आली की बया शेपटी हलवत!! मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर? पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार? सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया!! मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी! बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या. परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा?? काय पण लोक असतात!! असो.

आणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की!! तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर. अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.

आणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन!! भलतीच धमाल मग!! बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत!! दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने!! ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम! तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते!! इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त. पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती, मग तसेच साजरे नाव नको का? आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा!!

आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!

आहे की नाही गंम्मत??

आता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.

एक कोड्न

एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्‍या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक
पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ?

- कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !

नमस्कार !!

नमस्कार मंडळी ! मी पल्लवी..
मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. Smile
म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा..
खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. Smile
आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (Wink) लोकांबद्दल.
सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. :< पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही.. Sad ) जाउ द्या झालं .. धमुदादा, ही "तैलबुद्धी "कुठुन मिळवलीस बुवा !? इथे आम्ही तुझ्या जोक्स वर फिदीफिदी हसतो आणि लोक आम्हावर हसतात. इथे लांबट चेहरे बघुन काव आलेला असताना तुझे एक-एक विनोद ऐकुन लै लै फरेश वाटतं बघ !
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो ! Rolling Eyes काय सुरेख लिहिता तुम्ही. विशेष करुन "अब्दुल खान्"..अप्रतिम ! केवळ अप्रतिम !! तुमच्याकडून अजुन खुप खुप वाचायला मिळेल ही आशा.. पण खर सांगा, अब्दुल खान काल्पनिक वगैरे नाहिये ना??:>
पेठेकर काका-तुमच्या पाककृती आणि वन लायनर्स. व्वा.. सगळंच लै भारी.
मला खरंतर इनोबा म्हने, प्राजुताई,चतुरंग, छोटा डॉन,केशवसुमार,विजुभाउ,आनंदयात्री इ.इ. बद्दल लिहायचं होतं. पण माझा म्यानेजर बघतोय मेला डोम्-कावळ्यासारखा. आता जरा काम करत असल्याचं नाटक करत बसावं लागणार.. Angry Yawn
असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !! Smile मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !!
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे. Batting Eyelashes Smile:)

ता.क. : काही आदरणीय अपवाद सोडता,मी इथे 'डायरेक' अरे-तुरे केलंय. चालेल ना ?

माझा सगळ्यात मोठा वाह्यात विनोद

आपण आयुष्यात खुप वेळा इतरान्ची खेचतो. बरयाच वेळा तो वाह्यात विनोद असतो.
हा मी आता पर्यत केलेला सगळ्यात वाह्यात विनोद आहे.

२००६ मध्ये फ्रान्स ला जावे लागले, काही कार्यलयीन कामा साठी. आता फ्रान्स मध्ये गेलो म्हट्ल्यावर Eiffel मनोरा बघितलाच पाहिजे. आणी फोटो पण पाहीजेत, नाही तर लोकान्ना शन्का वाटते, हा फ्रान्स ला गेला होता कि नाही.
आमचा सहकारी पण आमच्या साऱखाच होता. त्या मुळे काय, मजाच मजा.
Eiffel मनोरा बघायला गेल्यावर थोडेशी मजा करावी असे मनात आले. तेच सहकारी ला सन्गितले.
ऐक फ्रान्स वाला बघिताला. उगाच च त्याचा मित्र परीवार नको, नाही तर मार पडायचा.
आम्ही सरळ त्या फ्रान्स वाल्या कडे गेलो. मनोरा कडे बोट दा़खवले आणि म्हणालो,
'is it for sell?
त्याला सुरवातिला काही समजले नाही, पुन्हा विचारले. 'is it for sell?
'We are scrap merchant from India. We can give good price for it.

त्याचा चेहरा बघाण्या सारखा झाला होता.

तुम्ही कधि असे विनोद केले आहेत काय?

एक स्वप्न प्रवास.(२)

या पूर्वीचा दुवा http://misalpav.com/node/1699
प्रिय ऍन
मागचा अनुभव जमेस धरुन यावेळी समुद्र मार्गेच् प्रवास करावा असे ठरवले.
जरा लवकरच् संध्याकाळी झोपलो. "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक सोबत होतेच्. औषधाच्या दुकानातुन प्रिस्क्रिशनवर खप होणारे हे एकमेव बिगर वैद्यकिय पुस्तक. बहुतेक डॉक्टर हे पुस्तक रोग्याना भूल देण्यासाठी चांगले भूलक( ट्रन्क्विलायझर)म्हणुन वापरतात. मला ते माझ्या सहकार्यांकडुन वाढदिवस नसतानाही वाढदिवसाची सप्रेम भेट् असे स्केचपेनने लिहुन दिले गेले होते. "त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही." हे वाक्य मात्र पेन्सिलीने लिहुन खोडले होते..
असो. काय म्हणत होतो मी .हां संध्याकाळी जरा लवकरच् झोपलो . "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" पुस्तकाच्या पहिल्या पानावरच्या तिस-या ओळीतच् मी गारद झालो आणि गाढ झोपलो.
हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते.
मी ऐकले की हल्ली या ट्रॆफ़िक ज्याम मुळे लोक मुम्बई विमानतळावर हवेतच् ऑफ़िसच्या मिटींग्स् घेतात.मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती. वेगवेगळ्या देशांत काम करणारे अधिकारी एका विमानातच चक्क त्यांची विमाने ; पंखावरुन चालुन जाउन ओलांडुन एकत्र आले होते. खरे खोटे कोण जाणे.पण सबसे तेज बातमी होती त्या दिवशी मुम्बई विमानतळावर ट्रॆफ़िक होताच एवढा ज्याम.जिकडे तिकडे विमानेच् विमाने होती. जमिनीवर हवेत विमानेच् विमाने होती. इन्डीगो , गो एअर वेज आणि स्पाईस जेट या तीन विमान कम्पन्यानी हवेत विमाने हवेत पंख एकमेकाना जोडुन पंखावरुन प्रवाशाना चालत हवेतच इतर विमानात जाता येईल अशी सेवा देउ केली.अशा रीतीने जर्मनी जपान आणि अमेरिका येथील अधिकारी भारतातल्या अधिकार्‍याना भेटले.मिटींग्स् घेतल्या. चर्चा केल्या आणि विमानांच्या पंखावरुन पुन्हा एकदा चालत जाउन स्वत:चे विमान गाठले.
भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे.
असो तर काय म्हणत होतो मी. हां थंड हवेत कुडकुडत पंखावरुन चालण्याची कोणतीही जोखीम मी घेणार नव्हतो.मी समुद्र मार्गे जायचे ठरवले.
खवळलेल्या समुद्रातुन आगबोटीने प्रवास करणे हे ही काही कमी जोखमीचे नसते. म्हणुन मी सरळ पाणबुडीचे तिकीट बूक केले.
पाणबुडी गेट वे ऒफ़ इंडीया पासुन निघणार होणार होती.पाणबुडी थोड्या खोल पाण्यात उभी केली होती. आम्हाला पाणबूडी पर्यन्त् पोहुन जावे लागेल असे सांगण्यात आले.
काही उत्साही विरानी तेथे जाण्यासाठी अक्कल चालवुन एक नवी शक्कल शोधुन काढली. त्यानी त्यांच्या ब्यागा पाण्यावर टाकल्या आणि ब्यागांवर बसुन तरंगतच ते तेथे पोहोचले खरे .पण पाणबूडी समुद्रतळावर उभी होती. पाण्यावरुन ती दिसत नव्हती.
जहाज कम्पनीने त्या लोकाना पाण्यात बुडण्यासाठी मदत केली.मी पाणबूडी उभी होती तेथे गेलो.पाणबूडीत बसलो. सगळ्या सीट भरल्या होत्या. मला खीडकी जवळची जागा मिळाली. सगळे लोक व्यस्थीत बसले हे पाहिल्यावर पायलट ने पाणबूडी सुरु केली. एक छोटासा धक्का बसला आणि पाणबोडीने वेग घेतला.
ती आता मुम्बै कोचीन दक्शिण श्रीलंका कलकत्ता म्यानमार, जावा( खुर्द आणि बुद्रुक) सुमात्रा मार्गे मलशिया ला जाणार होती.
पाणबुडी आता ताशी ४० समुद्री मैल अशा स्थिर वेगाने जात होती.भोवतलचे पाणी स्थिर होते. आणि आसपास समुद्रात झाडी दाट होती..अनेक प्रकारच्या पाणवनस्पती आणि मासे दिसत होते.देवमासे, ऒक्टोपस वगैरे येताना जाताना दिसत होते.पायलट नकशा बरहुकुम चालला होता. रस्त्यात दिशा/ अंतर दर्शक् खुणा होत्या त्यामुळे आम्हाला अंतर कळत होते. अचानक एक जोरदार धक्का बसला. माझ्या हातातली कॊफ़ी ;कप हेंदकळल्यामुळे शर्टावर सांडली. समुद्रात एक मोठा खड्डा होता. खड्डा कसला दरीच म्हणाना.. पाणबुडी त्यावर तरंगायला हवी होती पण बसलेल्या जोरदार धक्क्याने पाणबूडीचे एक इन्जीन बिघडले.सर्वानाच काळजी वाटु लागली.
पायलट ने दुसरे इन्जीन चालु करायाचा बराच प्रयत्न केला.पण ते शांतच राहीले. आता पाणबुडी केवळ एकाच इन्जीनावर धावत होती.
आम्ही कोठेतरी म्यानम्यारच्या आसपास असु. पाणबूडी आता खोल पाण्यात होती.आम्हाला स्पॆनिश पद्धतीचे जेवण देण्यात आले. चिज पिझ्झा,आणि डेझर्ट्स्.
खिडकी बाहेर ची दुनिया आता बदलली होती. पिर्‍हाना, छोटे शार्क समुद्री, कासवे अवती भोवती दिसत होते.तुमच्या डोक्यावरुन मासे पोहोताना पाहणे हा अनुभव काही वेगळाच असतो.
पाणबूडी आनखी काही वेळ अशीच जात राहीली.काहीतरी कारण झाले आणि दुसरे इन्जीनही बंद पडले.पाणबूडी थोडावेळ तशीच पुढे जात राहीली आणि थोड्या वेलानन्तर तीची गती पूर्ण थांबली.
पायलट् ने इन्जीन दुरुस्तीसाठी खोलले. एव्हाना पाणबूडी पुढे जायची थांबली आणि ती आता पुढे जाण्याऐवजी खाली खाली जाउ लागली.समुद्रतळावर जाउन ती स्थिरावाली.
सगळ्यांनाच खूप काळजी वाटु लागली थोडे खाट खूट् करुन झाल्यावर पायलट ने कोणी चांगला मेक्यानीक आहे का इथे अशी विचारणा केली.
आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता.गाडीत पेट्रोलकुठे भरायचे याउपर कोणाचा इन्जीनाशी दूरान्वये ही संबंध आला नव्हता. पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही एक सूचना पुढे आली.बस असती तर ही सूचन योग्य होती पण पाणबूडी साठी अयोग्य होती.
काहीनी दुसरे वाहन बोलावुन आपली पाणबूडी त्याने ओढुन न्यावी अशी सूचना केली. पण आसपास समुद्रात कोणतेच वाहन बोट दिसेना.....
मी माझी केबिन ब्याग उघडली. प्रवासत काहीतरी चाळा असावा म्हणुन घेतलेल्या बबल गम च्या पाकिटावर माझी नजर पडली. एक कल्पना सुचली.
प्रत्येकाने बबलगम चे फ़ुगे करावेत मी सूचना केली.भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. लोकाना बबल गमचे फ़ुगे कसे करावे ते शिकवले..
प्रत्येकाने माझ्या सूचनेवर विश्वास ठेउन बबलगम चे फ़ुगे फ़ुगवायला सुरुवात केली. साधारण ३०० फ़ुगे झाले. लोक थकले . गाल दुखताहेत अशी तक्रार करु लागले.त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले. लोकानी बबलगम चे फ़ुगे फ़ुगवणे चालुच ठेवले. ३५० वा फ़ुगा फ़ुगवला गेला आणि पाणबूडी जराशी हलली. ४००व्या फ़ुग्यानन्तर आता वरवर येऊ लागली. फ़ुगे फ़ुगवणे चालुच् ठेवले.पाणबूडी आता पूर्ण समुद्रसपाटीवर तरंगु लागली. एक भलेमोठे व्यापारी जहाज आमच्याच दिशेने येत होते.आम्ही त्याच्या मार्गात होतो.व्यापारी जहाजाने आम्हाला इशारा देण्यासाठी भोंगा वाजवला.जहाज जवळ येत चालले .भोंग्याचा आवज जवळ येउ लागला......पों...........पों....... पों.........

.पों...........पों....... पों...पों...........पों....... पों..पीप् पीप् क्रॆम्....ढिं..ठाण.ट्रीट् ट्रीट् बिल्डींसमोरचा रस्ता ट्रॆफ़िक तुम्बला होता. रिक्शा ट्रक टेम्पो बस बैल गाड्या जीप. बहुतेक सगल्या प्रकारच्या गाड्या त्यात होत्या.प्रयेक् वाहन पूर्ण ताकदीनिशी हॊर्न वाजवत होते.त्या गोंगाटाने मी खडबडुन जागा झालो.........
पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.

तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......

(इथे क्रमश: संपले)........