तंत्र
तोडगा माहीती असेल तर सांगा
प्रेषक शानबा५१२ ( शुक्र, 03/12/2010 - 00:41) .'गमभन' वापरुन जसे आपण मिपावर लिहतो तसे एखाद्या ब्लॉगवर वाचकांना प्रतिक्रिया लिहण्यासाठी हेच सॉफ्टवेअर कसे वापरावे?
जमल्यास सविस्तर उत्तर द्यावे ही विनंती.........
उपकरणे भाग - ३
प्रेषक विनायक रानडे ( गुरू, 03/11/2010 - 08:45) .द्रव स्फटिकाचा दर्शक (एल्सीडी डिस्प्ले) किंवा “दसद”
प्रत्येक अस्थप्रग्राला एक द्रव स्फटिकाचा दर्शक असणे अत्यंत सामान्य झाले आहे. फक्त आकार व दर्जा किमतीच्या प्रमाणात बदलतो. ह्या दर्शकाच्या आत काय असते ते पाहू.

प्रकाशीत काच व पारदर्शी काचेच्या मध्ये द्रव स्फटिकांच्या निळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या पेशी घट्ट दाबून बसवलेल्या असतात. ह्या पेशी मुलत: पारदर्शी असतात. ह्यांना विद्युत भार जोडला असता अपारदर्शी होतात. पुढील चित्रातून हे समजणे जास्त स्पष्ट होईल. तुमच्या दसद वर जिथे पांढरा भाग आहे त्या सगळ्या स्फटिक पेशींचा विद्युत भार शून्य आहे व ज्या ठिकाणी कोणताही रंग डोळ्यांना दिसतो आहे त्या रंगपेशीना विद्युत भार दिलेला आहे.

ह्या दसद (एलसीडी) चा आकार अस्थप्रग्रात १ ते ३.५ इंच रुंद असतो. दसदचा आकार हा प्रग्राच्या आकाराला सांजेसाच असतो. दसद आकार संवेदकापेक्षा मोठा असल्याने छायाचित्रातील बारकावे नीट समजू शकतात. तसेच काही विशेष प्रग्रात हा दसद खाली वर किंवा गोल फिरवण्याची व्यवस्था असते त्याने अवघड जागेत छायाचित्र घेण्यास मदत होते.

निकॉन पी ९० चा दसद खाली वर करता येणे शक्य आहे. प्रग्रा पायाशी किंवा डोक्याच्या वर धरून छायाचित्र घेणे सुलभ होते.

सोनी प्रग्राचे भिंग एका हाताने धरून दसद (एलसीडी) चा भाग खाली वर फिरवता येणे शक्य असते.
प्रकाश - प्रकाश हा छायाचित्राचा आत्मा कसा ते समजणे सोपे करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रकाश किरणे पावसाच्या, कारंज्याच्या, पाण्याच्या थेंबावरून परावर्तित झाल्याने डोळ्याला दिसणाऱ्या त्या पांढऱ्या प्रकाशात सप्त रंग आहेत हे आपण पाहतो. परंतु एका ठरावीक अंशातच हा रंगीत इंद्रधनुष्य दिसतो. प्रकाश असेल तरच डोळ्याच्या माध्यमाने आपण वस्तू बघू शकतो. प्रकाशात दडलेले हे रंग पारदर्शी गणले जातात.

संशोधकांना लाल – हिरवा – निळा “लहिनि” (आर जी बी) हे तीन मूळ रंग असल्याचा उलगडा झाला. ह्या तीन रंगांच्या कमी जास्त मिश्रणाने इतर पारदर्शी रंगा छटा तयार होतात. म्हणून रंगीत प्रतिमा संवेदक व दर्शकात “लहिनि” हेच मुख्य रंग असतात. ह्या आकृतीत लाल + निळा = गुलाबी (मजेन्टा), निळा + हिरवा = सिआन, हिरवा + लाल = पिवळा तर मध्य भागात पांढरा तयार होतो. वस्तूच्या परावर्तित प्रकाशाचा उजेड म्हणजे ब्राईटनेस तर काळपट किंवा पांढरे असण्यातील जाणवणारा फरक “काप” (कॉन्ट्रास्ट) म्हटले जाते. (मला असे म्हणावेसे वाटते. मतभेद असणारच).

प्रकाश नसल्याने अंधार म्हणजे काळा रंग हे ठरले. अंधारापासून प्रकाशा पर्यंतचा फरक राखाडी रंग पट्टीच्या (ग्रे स्केल) साह्याने मोजतात. कोणत्याही प्रकाशाचा पांढरा रंग किती पांढरा आहे हे ठरवण्याचे माप केलव्हीन अंश (के डिग्री) तपमान असे आहे. संगणकाच्या प्रतिमा दर्शकाचा पांढरा रंग ५५०० ते ९३०० के अंश असतो. छाया व चल चित्रण व्यवसायात प्रकाश किती के अंश पांढरा आहे हे निश्चित करणे फार महत्त्वाचे मानले जाते. तसेच प्रकाशाचा उजेड (इंटेन्सीटी) एखाद्या पृष्ठभागावर किती आहे हे मोजण्याचे माप लक्स (एल एक्स) आहे. प्रकाश निर्माण करणाऱ्या साधनाची प्रकाश निर्माण क्षमता मोजण्याचे माप ल्युमेन (एल एम) आहे.
सूर्य प्रकाशाचे रंग तपमान सूर्योदयास १५०० के अंश तर भर दुपारी सूर्य डोक्यावर असताना ६५०० के अंश असते. ते सूर्यास्त पर्यंत पुन्हा १५०० के अंश होते. सूर्य प्रकाशाचे रंग तपमान असे दर तासाला वेगळे असते.
काही प्रकाश साधनांचे रंग तपमान समजणे आवश्यक आहे.
९३०० के अंश - संगणक दर्शक
६५०० के अंश - दुपारचा सूर्य प्रकाश
५५०० के अंश - क्षणिक प्रकाश “क्षप्र” (फ्लॅश)
३४०० के अंश – विजेचे दिवे
१८५० के अंश – मेणबत्तीची ज्योत

ह्या चित्रातून टोपीचे चित्र चार वेगळी प्रकाश योजना असताना चित्राचे रंग किती बदलतात हे समजते. रंग बदल दिसू नये म्हणून प्रत्येक अस्थप्रग्रात पांढरा रंग पांढराच दिसावा म्हणून निवड (मॅन्युअल) व स्वयंचलित क्रिया (ऑटोमॅटिक) पद्धतीची सोय दिलेली असते. त्याला पांढऱ्या रंगाशी समतोल साधणे “पासम” (व्हाईट बॅलन्स) म्हणतात. (मी म्हणायचे ठरवले आहे).
झरोका, पडदा व उजेड क्षमता गुणांक (एक्स्पोजर व्हॅल्यू) –
मराठी भाषेत हा शब्द “उक्षग” (ईव्ही) अशा नावाने मी देत आहे. प्रत्येक संवेदकाची सुबक विजक प्रतिमा (इलेक्ट्रॉनिक इमेज) तयार करण्या करता कमीत कमी उजेडाची क्षमता असते. तसेच जास्तीतजास्त उजेड सुबक प्रतिमा घडवण्याची क्षमता पण असते. त्यास संवेदकाचा कमी किंवा अधिक “उक्षग”(ईव्ही) म्हणतात. ही “उक्षग” संख्या प्रत्येक प्रग्रा उत्पादक किमती प्रमाणे वेगळी ठरवतो.
संवेदकाची “उक्षग” (ईव्ही / आय एस ओ) संख्या “दसद” वर दिसते. उजेडाच्या अंदाजाने आय एस ओ संखेची निवड करता येते. उदा. १००, २००, ४००. ८००, १६००, ३२०० व ६४०० आंतर्राष्ट्रीय मापन संस्था (आय एस ओ). विजक प्रतिमेचा उजेड व “काप” (कॉन्ट्रास्ट) यांचे नियंत्रण दोन भागांच्या मदतीने होते. एक भाग पडदा उघड / झाप होणारा वेळ (शटर स्पीड) व दुसरा भाग भिंगाच्या (लेन्स) आत असलेल्या झरोक्याचे सुनिश्चित क्षेत्र (ऍपर्चर एफ स्टॉप) कमी जास्त केल्याने नियंत्रण होते.

पडद्याची उघड / झाप वेळ “पवे” (शटर स्पीड) जास्त ३०, १६, ८, ४, २, १, १/२, १/४, १/८, १/१५, १/३०, १/६०, १/१२५, १/५००, १/१०००, १/२००० कमी सेकंद असतो. ३० सेकंद “पवे” म्हणजे जास्तीतजास्त प्रकाश संवेदकाला मिळणार. १/२००० सेकंद “पवे” म्हणजे अत्यंत कमी प्रकाश संवेदकाला मिळणार.


चित्रातील भिंगाचा झरोका (ऍपर्चर) क्षेत्र “क्ष” २ ते २२ आहे. झरोका क्ष २ भिंगाचा झरोका पूर्ण उघडा असल्याने जास्तीतजास्त प्रकाश संवेदकाला मिळणार ह्या उलट “क्ष” २२ भिंगाचा झरोका खूप बारीक सुनिश्चित आकाराचा असल्याने फार कमी प्रकाश संवेदकाला मिळेल. अशा प्रकारे संवेदकाचा “उक्षग”, “पवे” आणि झरोका क्ष ने कमी प्रकाशापासून ते प्रखर प्रकाशा पर्यंत सुबक प्रतिमा मिळवण्याची सोय निवड (मॅन्युअल) पद्धतीने किंवा स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने साध्य होते.

सामान्यतः: प्रत्येक प्रग्रात अशी चिन्हे असतात. ह्या चिन्हाची निवड केल्यास झरोका व पवे च्या सुनिश्चित संखेची निवड होते. ओळखपत्र म्हणजेच वस्तूच्या जवळ जाऊन घेतलेले चित्र. विस्तृत म्हणजे वस्तूच्या भोवतालच्या प्रदेशाचे चित्र. अंधाऱ्या. जागेत घेतलेले चित्र प्रकारात क्षप्र (फ्लॅश) चा उजेड देखील नियंत्रित होतो.. धावती वस्तू ह्या प्रकारात पायी चालणारी व्यक्ती, खेळ, धावते वाहन वगैरे प्रकारांचे घेतलेले चित्र.

विजक क्षणिक प्रकाश “क्षप्र” (फ्लॅश) – प्रत्येक अस्थप्रगात क्षप्र हा असतोच त्याला नियंत्रणाचे दोन प्रकार आहेत. डोळ्याचे चिन्ह असलेला स्वयंचलित, ज्याने क्षप्रची क्षमता वातावरणातील उजेडाला अनुसरून नियंत्रित केली जाते. पूर्ण क्षमता चिन्ह नियंत्रण न करता क्षप्रच्या पूर्ण क्षमतेचा उजेड मिळतो.

अस्थप्रग्राने घेतलेल्या प्रतिमेचा साठा करणारी पट्टी (मेमरी कार्ड) ला मी साधे वापरता येईल असे “साठा” हे नाव सुचवीत आहे व वापरणार आहे. साठा पट्टीची क्षमता १ ते ८ जीबी (गीगा बाईटस) च्या छोट्या आकारात उपलब्ध आहेत. ह्यात प्रतिमा साठवण्याचा वेग व त्याचे प्रकार आहेत. ६०एक्स ते ३०० एक्स वेग असतो. कोणती साठा पट्टी वापरणे योग्य हे त्या प्रग्राच्या माहिती पुस्तिकेत दिलेले असते. कोणत्याही वेगाची पट्टी कोणत्याही प्रग्रात वापरता येत नाही.
विद्युत घट - "विघ" (बॅटरी) – विजेरी चा प्रकार प्रग्रा उत्पादकाने योग्य ठरवलेला असावा. थोडे रुपये वाचवण्या करता काही हजार रुपये मोजलेल्या वस्तू खराब होण्यात कोणता व कोणाचा फायदा असणार? मी स्वत: ४० हजार मोजलेल्या प्रग्रात एका अडलेल्या वेळी पानाच्या दुकानात मिळणारी साधी "विघ" वापरला व नंतर प्रग्रातील खराब झालेले भाग दुरुस्त करून घेण्यात १५०० रुपये गमवले होते.
वाचकहो प्रग्रा विकत घेताना साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. १ – प्रग्रा घ्यायची हौस आहे? का शेजाऱ्या जवळ आहे मग माझा का नसावा? २ – खिसा किती जड झाला आहे व किती रिकामा करू शकणार? ३ – निर्णय कोण घेणार? ४ – ऐकैव माहिती आहे की नातेवाईक / मित्राने सांगितले? ५ – प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का? ६ – छाया चित्रकारी व्यवसाय करणार का? उत्तरे शोधण्यास समर्थ असला तर फार चांगले, नसल्यास मी स्काईप मार्फत आयडी स्कीलसव्हीके मदत करण्यास तयार आहे.
उपकरणे भाग – २ - भिंग संच (काम्पौंड लेन्स)
प्रेषक विनायक रानडे ( रवी, 03/07/2010 - 01:40) .मागे < उपकरणे भाग १ - अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)
पुढे > उपकरणे भाग - ३
पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग एकमेकास समांतर असतील तर एका बाजूला असलेली वस्तू काचेच्या दुसर्या बाजूने आकारमान न बदलता दिसते. जर पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग किंवा कोणताही एक पृष्ठभाग गोलाकार फुगलेला असल्यास काचेच्या दुसर्या बाजूने वस्तूचे आकारमान मोठे झालेले दिसते. अशा काच पट्टीस "बहिरगोल भिंग" म्हणतात. ह्या उलट पारदरशी काचेचे दोन्ही पृष्ठभाग किंवा कोणताही एक पृष्ठभाग निमुळता गोलाकार असल्यास काचेच्या दुसर्या बाजूने वस्तूचे आकारमान कमी झालेले दिसते. अशा काच पट्टीस "अंतरगोल भिंग" म्हणतात.
छाया चित्रकारितेत वापरात येणारे भिंग म्हणजे एक काचेची पट्टी नसून बर्याच "बहिरगोल भिंग" व "अंतरगोल भिंग" काच पट्ट्यांचा एक संच असतो म्हणून ते भिंगसंच (कम्पौन्ड लेन्स) आहे.
वरील आकृतीत एका भिंगसंच्याचा "छ" हा छेद बिंदू (फोकल पॉइंट) आहे. भिंग आणि "छ" बिंदूतील "अ१" ह्या अंतराला "सुस्पष्ट रेखीव अंतर" (फोकल लेंगथ) म्हणतात. "छ" ह्या जागेवर भिंगातून येणारी प्रकाश किरणे एकमेकास छेदून प्रतिमा संवेदकावर वस्तूच्या प्रतिमेला उलट झालेली दाखवतात. प्रतिमा पटलावर प्रतिमा संवेदक असतो. संवेदकाच्या आकारमानाशी संबंधित कोणत्याही भिंगाचे "सुस्पष्ट रेखीव अंतर" निश्चित केलेले असते. हे अंतर नेहमी मिली मीटर मापकाने मोजतात. उदा. १०, २५, ५०, ८०, १३५, १२०० मी.मी. "सुस्पष्ट रेखीव अंतराचे" (फोकल लेंगथ) भिंग असे असते. "अ१" व "अ२" हे अंतर जेव्हा तंतोतंत एक असते तेव्हा वस्तूची प्रतिमा जास्तीतजास्त सुस्पष्ट व रेखीव असते. ह्या दोन अंतरांना समान करण्याच्या क्रियेला "सुस्पष्ट करणे (फोकसींग)" असे म्हणतात. आधुनिक भिंगात सुस्पष्ट करणारी स्वयंचलित (ऑटिमॅटीक) सोय असते. "अ३" हे अंतर वस्तूची भिंगा जवळ असण्याची मर्यादा आहे. ही अंतराची मर्यादा सुस्पष्ट प्रतिमा दिसण्या करता आहे. मॅक्रो (मायक्रो नव्हे) पद्धतीने हे मर्यादा अंतर कमी करता येते. मर्यादा अंतर १ मीटर असल्यास मॅक्रो पद्धतीने ते २० सेंटिमीटर इतके कमी करणे शक्य असते.
भिंगाचे दोन प्रकार आहेत एक ठरावीक सुस्पष्ट अंतर (फिक्स फोकल लेन्गथ) व दुसरे सुस्पष्ट अंतराचा फेर बदल करू शकणारे(झूम फोकल लेन्गथ). मराठीतून मी ह्या प्रकाराला फेर भिंग असे नाव दिले आहे. बाजारात भिंगाच्या किमती प्रमाणे फेर मर्यादा उपलब्ध आहेत. उदा. ११ – ५५ मी.मी. किंवा ५ X, १० X, २४ X वगैरे फेर भिंग.

वर दाखवलेल्या बाणाच्या दिशेने भिंगसंचातिल विविध गटांचे अंतर बदलल्याने फेरभिंगाचा दृश्यकोन बदल साधता येतो.
प्रग्रातील म्हणजेच कॅमेऱ्यातील प्रतिमेचा आकार भिंगाच्या दृश्य कोनाशी (व्ह्युइंग ऍन्गल) संबंधीत आहे. मनुष्य आपल्या दोन डोळ्याने कोणत्याही दृश्याची आयताकृती प्रतिमा बघतो म्हणजेच दृश्य कोन ४० अंश रुंद व २७ अंश उंच असतो. ह्याला सामान्य दृश्य कोन समजले जाते. प्रतिमा ग्राहकातील संवेदक सुद्धा आयताकृतीच असतो. ज्या भिंगाचा ४० ते ४२ अंश रुंद असा सामान्य दृश्य कोन असतो त्या भिंगाला सामान्य भिंग (नॉर्मल लेन्स) म्हणतात. ह्या आकृतीत ठरावीक अंतरावर असणार्या वस्तूच्या प्रतिमेची उंची व संवेदकाची उंची सारखी असताना जर भिंगाचा दृश्य कोन ४० अंश रुंद व २७ अंश उंच असेल तर ते सामान्य दृश्य कोन भिंग गणले जाते. त्या दृश्यकोना पेक्षा जास्त अंशाचा कोन असलेल्या भिंगाला विस्तृत भिंग (वाईड लेन्स) तसेच सामान्य दृश्यकोना पेक्षा कमी अंशाचा कोन असलेल्या भिंगाला दूर भिंग (टेली लेन्स) म्हटले जाते.
महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा की दृश्य कोन जास्त अंशाचा असला तर रेखीव प्रतिमा अंतर कमी असते त्या उलट दृश्य कोन कमी अंशाचा असला तर रेखीव प्रतिमा अंतर जास्त असते. उदाहरणार्थ ४.८ X ३.६ मी.मी. आकाराचा संवेदक असेल तर ६० अंश दृश्य कोन असणार्या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) ६.३ मी.मी. असेल आणि २३ अंश दृश्य कोन असणार्या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) १८.९ असेल. तसेच २३.६ X १५.८ मी.मी. आकाराचा संवेदक असेल तर ६० ते २३ अंश दृश्य कोन असणार्या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) १८ ते ५५ मी.मी. असेल. ह्याच कायद्याने संवेदक ३६ X २४ मी.मी. आकाराचा असल्यास ६० ते २३ अंश दृश्य कोन असणार्या भिंगाचे सुस्पष्ट अंतर (फोकल लेन्गथ) ३५ – १०५ मी.मी. असेल.
म्हणजेच तुमच्या अस्थप्रग्राचा संवेदक ज्या आकाराचा असेल त्यावर ठरावीक अंतरावर असणार्या वस्तूचा अपेक्षित प्रतिमा आकार साध्य करण्या करता संबंधित दृश्य कोनाची निवड करणे आवश्यक आहे. हे पुढील चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. २४ मी.मी भिंगाने त्या जागेची भव्यता जाणवते तर ७२ मी.मी भिंगाने झुंबराला महत्त्व दिले असून ति जागा गौण झाली आहे.
पुढच्या भागात द्रव स्फटीकाचा दर्शक (एल्सीडी डीस्प्ले) किंवा “दसद” माहिती मिळवा.
उपकरणे भाग १ - अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)
प्रेषक विनायक रानडे ( गुरू, 03/04/2010 - 19:24) .ह्या सदरात तुम्हाला आवडणाऱ्या उपकरणांची अनुभवलेली माहिती मी मराठी भाषेतून लिहिण्याचा हा प्रयत्न करीत आहे. मराठीतून तंत्रज्ञान माहिती असावी हाच एक उद्देश आहे. इथे वापरलेले शब्द शक्यतितके कार्य दर्शविणारे असावेत हा प्रयत्न मी केला आहे. दुमत असू शकेल.
अंकित स्थिर प्रतिमा ग्राहक म्हणजेच "अस्थप्रग्रा" (डिजीटल स्टिल कॅमेरा). मी हा विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बाजारात पुढील तीन प्रकारच्या प्रतिमा ग्राहकाच्या जाहिराती तुम्ही बघता. १ - पंज्यात मावणारा (पॉकेट कॅमेरा), २ - एक संध (ऑल इन वन कॅमेरा) आणि ३ - भिंग बदलता येणारा डीएसेलार. जाहिरातीत दिलेली माहिती वाचून मदत होण्याऐवजी जास्त गोंधळ होतो. पण मग एक प्रतिमा ग्राहक "प्रग्रा"(कॅमेरा)तुम्ही विकत घेता.



अस्थप्रग्रा हा बर्याच सुट्या भागांचा एक संच आहे. ह्यातील काही भागांच्या मर्यादा व क्षमतेचा छापील छायाचित्राशी संबंध आहे. बघूया पहिला महत्त्वाचा भाग प्रतिमा संवेदक (इमेज सेन्सर) व त्यात असणार्या चित्रपेशी म्हणजे काय?

चित्रात दिसणारा कृष्ण-धवल चौकोनांचा संच हा एक सामान्य कृष्ण-धवल प्रतिमा संवेदक असून कोणत्याही वस्तूची प्रतिमा प्रत्येक छोट्या चौकोनात विभागली जाते. ह्या प्रत्येक चौकोनाला मराठीत चित्रपेशी (पिक्सेल) म्हणतात. निळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या काचेच्या चौकोनातून संबंधीत रंगाचा विद्युत भार संबंधीत चित्रपेशी तयार करतात. ह्या विद्युत भाराने प्रतिमा निर्मिती प्रक्रियेतून रंगीत दृश्य प्रतिमा तयार होते.
१ - सीसीडी, २ - सीमॉस आणि ३ - प्रत्यक्षात एखादा संवेदक प्रतिमा ग्राहकात नाण्याच्या तुलनेत केवढा असतो हे समजू शकते. प्रतिमा संवेदकाचे दोन प्रकार आहेत. सीसीडी व सीमॉस. सीसीडी म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइस ह्याचा मराठीत अर्थ प्रतिमा प्रकाशाचा विद्युत भार निर्माण करणारे उपकरण. तसेच सीमॉस म्हणजे कॉम्प्लीमेंट्री मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर ह्याचा अर्थ असा की प्रतिमा प्रकाशाने निर्मीत विद्युत भार नियंत्रण करणारी पद्धत ज्यात सीमॉस फेट (फील्ड इफेक्ट ट्रान्झीस्टर) वापरतात. ह्याचे फायदे तोटे हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. सीसीडी संवेदक प्रकारात गेली २० वर्ष सतत शोध होत आहेत तरीही उत्पादन किंमत जास्त आहे. पण सीमॉस संवेदकाचे उत्पादन सोपे व कमी किमतीत होते. दोन संवेदकातील फरक पुढील चित्रात दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. चित्र ४०१ सीसीडी संवेदकाने काढले आहे व चित्र ९११ सीमॉस संवेदकाने काढलेले असून २०० टक्के मोठे करून तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनीक कॅमेऱ्यात ३.३ ते ५६ दशलक्ष चित्रपेशींचे संवेदक उपलब्ध आहेत. जितक्या जास्त चित्रपेशी तितकी जास्त प्रतिमेची माहिती मिळते, व म्हणूनच मोठे छाया चित्र छापणे शक्य होते. छायाचित्राचे दोन प्रकार आहेत एक निव्वळ अंकित माहिती (सॉफ्ट) ज्याचा उपयोग फक्त संगणकाच्या दर्शकावर (मॉनिटर) दिसण्यासाठी तर दुसरा प्रकार कागदावर छापलेले चित्र (हार्ड कॉपी). चित्राचा दर्जा चित्रपेशींच्या तपशिलाने (रिझोल्युशन) ठरतो. संगणक दर्शक सामान्यतः: १०२४ पिक्सेल लांबी व ७६८ पिक्सेल रुंदीचा असतो त्यावर दर इंचाला ७२ ते ९६ चित्रपेशी (रिझोल्युशन) दिसण्याची सोय असते. ह्याचाच अर्थ ९६ चित्रपेशी दर इंचाला (पिक्सेल पर इंच) किंवा बिंदू दर इंचाला (डॉट पर इंच) ह्या तपशिलाने १० इंच लांब ७ इंच उंच रेखीव प्रतिमा दिसू शकते. अशा प्रतिमेचे १०२४ X ७६८ = ७८६४३२ चित्रपेशी असतात. परंतु कागदावर छपाई करताना ३०० चित्रपेशी दर इंचाला / बिंदू दर इंचाला तपशिल असणार्या प्रतिमेचा दर्जा चांगला असतो. त्यापेक्षा कमी तपशिलाच्या प्रतिमेतील रंग, रेखीवपणा कमी असतो व नको असलेल्या डागांची संख्या वाढते. पुढील चित्रातून हा फरक जाणवेल.
पहिल्या चित्रात संत्र्याच्या आजूबाजूला व मागे काळे डाग दिसतात तसेच प्रतिमेचा रेखीवपणा कमी झालेला दिसतो. हे छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद व ७२पेशी दर इंचाच्या तपशिलाचे आहे. तर दुसर्या छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद पण ३०० चित्रपेशी दर इंचाला तपशिलाचे आहे. नको असलेले काळे डाग बाजूच्या चित्रापेक्षा कमी असून प्रतिमा जास्त रेखीव व सुबक दिसते आहे. म्हणूनच जास्त चित्रपेशी (पिक्सेल) प्रग्राने (कॅमेरा) घेतलेल्या प्रतिमेचे सुबक, रेखी मोठे चित्र छापता येते.
पुढील तक्त्याने अस्थप्रग्रातील संवेदकाच्या चित्रपेशी संखेने कोणत्या आकाराची छापील प्रतिमा तयार होते हे समजेल.
पुढील भागात प्रतिमा भिंगसंचा विषयी (काम्पौंड लेन्स) माहिती मिळेल. आजच माझा "उपकरणे" हा ब्लॉग मी सुरु केला आहे. http://skillsvap2.blogspot.com/
जरा मदत करा हो.....
प्रेषक अनंत छंदी ( शनी, 02/27/2010 - 13:07) .मित्रहो...
गेले काही दिवस मी एका समस्येने त्रस्त झालो आहे. माझ्या संगणकात smitfraud-c.gp
हा विषाणू एसव्हीसीहोस्ट.एक्सई ह्या फाईलला चिकटला आहे, अनेक उपाय केले पण तो जात नाही. स्पायबॉटने काढून टाकला तरी पुन्हा येतो आणि इतर फाईल्सना चिकटायला सुरुवात करतो. काय करावे. जरा मदत करा! 
आमच्या शाळेत भरविलेले सायन्स प्रदर्शन
प्रेषक शनआत्तार ( मंगळ, 02/16/2010 - 19:12) .
नमस्कार
आपणास मी एक आज गम्मत सांगणार आहे. आपण सगळे जण लहान मुलांना अल्लड समजतो. त्याना काही कळत नाही त्याना सगळ्या गोष्टी समजाव्याला लागतात मात्र हे सर्व साफ खोटे.आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे. आमच्या शाळेत इंग्लंड च्या न्यु कासल विश्वविद्यापीठातर्फे अनुदान मिळाले असून त्या अनुदानावर आम्ही संगण्क शिक्षण मुलांना देतो. आम्ही संगणक शिक्षण देत नसून ती मुले आपोआप आपणच त्या संगणक प्रयोगशालेत स्वःता शिकत असतात. त्याना तेथे सकाळी ७.०० वाजल्या पासून संद्याकाळी ८.०० वाजे पर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा उपयोग करून शाळेतील मुले मेल पाठवणे, चाट करणे गेम खेळणे अशा गोष्टी सहजच करायला शिकली आहेत. त्याना कोणिही मार्गदर्शन करत नाही मात्र ते काय करतात या वर माझे बारकाईने निरीक्षण असते त्यांच्यात होणारे बारीक सारीक बदल मी नोंदवत असतो तसेच ते बदल अनुभवत असतो.
असे हे गेले वर्षभर चालू आहे . आत्ता मुले चांगल्या प्रकारे संगण्कावर काम करतात ,आत्ता तर ती परदेशातील शिक्षंकाशी स्काईप वर संपर्क साधून आपल्या अभ्यासातल्या शंका दूर करत आहेत. आज आमच्या शालेतील २०० विद्यार्थांचे इमेल पत्ते आहेत . हेसर मी त्या मुलांच्या प्रगती बाबत बोलत होतो.
हे सर्व पहात असताना मला स असे वाटलेकी या ईंटरनेट चा वापर करून विद्यार्थ्याचईची सायन्स विषयात आवड निर्माण करता येईल का? याचा मी विचार केला व अरविंद गुप्ता ( जे पुण्यात आयुका चालवतात ) त्याच्या वेबसाईटचा पत्ता टाईप करून संगणक प्रयोगशाळेतील नोटीस बोर्डाबर लावला आणी एक स्पर्धा घोषित केली की विद्यार्थ्यानी या वेब साईट ला बेट द्यावी व तेथील माहीती वाचून पाहून सायन्स वर आधारीत खेळणी व प्रतीक्रुती तयार कराव्यात आपण तयार केलेल्या साहित्यांचे एक प्रदर्शन २६ जानेवारीला भरवण्यात येईल. आणि या माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला मुले शाळा सुटल्यावर, शाळा भरण्याच्या , पूर्वी मधल्या सुट्टीत इंटारनेट वर जाऊन त्या वेब असाईट वरील माहीती पहात होते आणि आपल्या प्रतीक्रुती तयार करत होते . जेव्हा २६ जानेवारीस प्रदर्शन भरले तेव्हा १३४ मुलानी सहभाग घेतला होता. त्यात मुलींचा सहभाग हा जास्त म्हणजेच होता म्हणजेच ७७ प्रतीक्रुती ह्या मुलींनी सादर केल्या होत्या. फक्त प्रतीक्रुती सादर केल्या नाहीत तर त्याची तत्वे , माहीती, त्या कशा तयार केल्या का केल्या या सवा सर्वांची माहीती त्यानी प्रदर्शनात करून दीली . प्रदर्शन नेटनेटके व फार चांगले भरले होते. त्यातून मी प्रथम ५ क्रमांक काढले व त्याना रोख अरक्कम व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दीली तर सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाण पत्र दिले
सागंण्याची बाब ही की मुलाना अभ्यासात आवड निर्माण करण्यासाठी अशा योजना राबवणे गरजेचे आहे. त्याना फक्त पुस्तकी शिक्षण देण्या पेक्षा अनुभवातील शि़षण दिल्यास ते फार मोलाचे व बराच वेळ ठीकणारे असते. या प्रदर्शनातील काही फोटो पण आपल्याला पाहण्यासाठी देत आहे.
मक मला मराठी चांगले टाईप करता येत नाही त्या मुळे ब-याच चूका आहेत समजी समजून घ्या
आपणाकडेही असे काही उपाय असतील तर मला सुचवा मी माझ्या शालेतील विद्यार्थांसाठी निश्चित राबवीन
धन्यवाद !!!!!
श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 02/08/2010 - 17:46) .श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद.
- चिंतातुर जंतू 
PEGA म्हणजे काय?
प्रेषक गणा मास्तर ( शुक्र, 02/05/2010 - 15:31) .नमस्कार मंडळी,
फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे.
आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत.
तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही. मला सापडलेले २ दुवे खाली दिले आहेत.
आपल्या मिपाकरांपैकी कोणी मला PEGA विषयी माहिती देउ शकतील काय? विशेषकरुन खालील २ प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे.
१. आजनंतर ४-५ वर्षांनी PEGA चे भविष्य काय?
२. PEGA ही C,C++,Java,。NET या पारंपारीक Languages पेक्षा कशा रोतीने वेगळी आहे.
धन्यवाद,
आपला गणा मास्तर,
(भोकरवाडी बुद्रुक)
गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही
प्रेषक बट्ट्याबोळ ( शनी, 01/23/2010 - 23:15) .गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही
कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर!
तुमचा काय अनुभव?
काही वर्क अराउन्ड ??
संबंधीत व्यक्ती अॅक्शन घेऊ शकतील का ??
सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
प्रेषक पाषाणभेद ( शुक्र, 01/15/2010 - 08:05) .सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?
आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर 
माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय? आदीती बै काय म्हणतात.
कृपया अवांतर चर्चा न करता वेगवान, सुयोग्य, उद्बोधक उत्तर अपेक्षीत.

















