जीवनमान

या नालायकांना अटकाव कसा करायचा

रायगडाला जेव्हा लाज येते...
महराष्ट्र टाइम्स मधली ही बातमी वाचुन डोके तापले. ह्या नालायकांना अटकाव कसा करायचा?
दोन वर्षांपुर्वी मला राजगड्लाही हाच अनिभव आला होता.

उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, तोंडात रंगलेलं पान, आणि "अमां मियां, ये गाना वाना तुम्हारे पंडतोंके बसकी चीज नहीं. हमारे बडे अब्बू का गाना सुनो, वो पंडत सब पैर छूते थे उनके." हे पेटंट वाक्य.

मंडळी, गोंधळलात ना ? पेट्रोलपंपाच्या संपातून हे संगीत वगैरे कसे काय आठवले बुवा ? हा तुम्हाला भेडसावणारा प्रश्न तुमच्या बावळट चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय मला. मंडळी, आपली अभिजात संगीताची परंपरा आहेच तशी थोर. पण उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन, हे ह्या परंपरेचे एक शापित पाईक होते, आणि तसंच अजब रसायन होतं. त्याचं काय आहे, की पेट्रोलंपंप, ग्यास सिलिंडरे, वगैरे आम्हा खेड्यातल्या लोकांनी जेव्हा पाहिली देखील नव्हती, तेव्हा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर "ग्यास एंड ष्टो रिपेर शाप, ७८६" असा हस्तलिखित बोर्ड असलेली एक टपरी होती. त्याखाली "प्रोप्रा. ग्यासुद्दिन शमसुद्दिन" असे खरडलेले होते. आमच्या घरी दोन रॉकेलचे ष्टोव्ह होते. त्यातला एकतरी नेहमीच बिघडलेला असायचा. पण आम्हाला ग्यासुची आठवण यायची, ती दुसराही ष्टो बिघडल्यावर.

"सर्क्या, जा त्या ग्यासूकडून आण ष्टोला पीन मारून, नायतर आज गिळायला काय नाय तुला." आमची म्हातारी तशी सुगरण. तिच्या हातचा अर्धाकच्चा भात आणि घासलेटचा सुगंध येणारी कढी पिऊन येणाऱ्या ढेकरेची आठवण मला आजही प्रत्येकवेळी पेट्रोल भरताना येते. (ही ढेकर देताना, मी नेहमीच आजूबाजूला विस्तव नाही, ह्याची खात्री करून घेतो.) ष्टोचा पंप आणि माझी पाठ ह्या दोन्ही भगवंताने तिला खास बडवण्यासाठी बहाल केलेल्या वस्तू आहेत, अशी तिची अमाप श्रद्धा होती. त्यामुळे ष्टो दुरुस्ती ताबडतोब व्हावी, म्हणून ग्यासूकडे मी पूर्ण सकाळ घालवत असे.

पण संपाचा काय संबंध ? अजूनही तुमचा चेहरा तसाच बावळट आहे, मंडळी !

अहो, सोपे आहे. घासलेट-पंपांचा संप दर दोन दिवसांतून एकदा असायचा, तेव्हा हमखास घासलेट मिळण्याचे स्थान, म्हणजे ग्यासुद्दिन. दुरुस्तीला आलेल्या ष्टोमधून थोडे थोडे घासलेट ग्यासू बाजूला काढतो, असा एक प्रवाद होता. आणि संप असला, की डब्बल किमतीला विकायचा. काही लोक चांदीचा चमचा चोखत जन्माला येतात, त्यांच्या घरी रॉकेलचे पंपवाले रोज चक्कर मरतात. पण आमचे नशीब असे, की आमच्या ष्टोमधले घासलेट संपायचे, ते नेमक्या संपाच्या दिवशी. आणि मग छोटेसे पात्र घेऊन आम्ही पुन्हा ग्यासूला शरण जात असू.

ग्यासूला ष्टो रिपेर करताना बघणे, किंवा "मियां रुको, अब्बी लाता हूं घासलेट" म्हणून लगबगीने टपरीमागे जाताना बघणे, हे माझ्या बालपणी माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. पण त्यापेक्षाही खोल परिणाम म्हणजे, ष्टो रिपेर करताना ग्यासूचे तत्वज्ञान ऐकण्यामुळे झाले. त्याच्या नावापुढे "प्रोप्रा" असल्याने, मला तो प्रोफेसर, प्राध्यापकांपेक्षा काही वेगळा नव्हता. तसे त्याचे खरे नावही ग्यासुद्दिन नव्हते. त्याचे खरे नाव होते "शरीफुद्दिन वल्द शमसुद्दिन वल्द अल्लाउद्दिन वल्द करीमुद्दिन वल्द रहीमुद्दिन." पण हे सर्व लिहिणे त्या छोट्याशा बोर्डावर शक्य नव्हते. परिस्थितीप्रमाणे आपली जनमानसातली प्रतिमा आपल्याला आपल्या खऱ्या ओळखीपेक्षा वेगळी ठेवावी लागते, हा माझ्या बालपणात मी ग्यासूकडून घेतलेला पहिला धडा. आमच्या छोट्याशा गावात धनिकांकडे नुकत्याच ग्यासच्या शेगड्या येऊ घातल्यावर, त्याचेही रिपेर काम स्वत:ला मिळावे म्हणून शरीफुद्दिनचा ग्यासुद्दिन झाला.

पण ते होणे नव्हते. त्या ग्यासच्या शेगड्या ग्यासूपर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. ग्यासबत्त्या मात्र चिक्कार पोहोचल्या. म्यांटल जळले, की ग्यासूची सर्वांना आठवण यायची. आमची आजी तर त्यांना ग्यासूद्दिवेच म्हणायची. पण असे असले, तरी ग्यासूच्या चेहऱ्यावर मला कधी विषाद दिसला नाही. शिलिंडरातला ग्यास चोरून वेगळा काढता येत नाही, हे कळल्यावर त्याने ग्यास रिपेरिंगकडे ढुंकूनही बघितले नाही. उलट तोंडातील पानाची भरभक्कम पिंक टपरीपासून रस्त्यावर उडवून ते प्रकरण त्याने कधीच निकालात काढले होते.

ग्यासबत्तीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात टपरीसमोर बसून ग्यासूचे रिपेरकाम बघत, त्याच्याकडून आजवर मी जे काही शिकलो आहे, ते कुठल्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात शिकवले, तर आज तरुणांना बेकारीची समस्या भेडसावणार नाही. ग्यासूचे जीवनविषयक तत्वज्ञान, गीत, संगीत, कविता, गझला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सर्व विषयातले ज्ञान, आणि ष्टो रिपेर, हे सर्व शिकताना कृष्णाला सांदीपनीच्या आश्रमातदेखील इतके चौफेर ज्ञान मिळाले नसेल, ह्याची मला खात्री आहे. ष्टोला वाती चढवताना, यमन आणि शुद्धकल्याण ह्यातला फरक समजवून देताना, ग्यासुद्दिन चा संगीतशिक्षणविषयक दृष्टिकोण किती व्यापक आहे, ह्याची खात्री पटते.

"अब ऐसा देखो मियां, ये तुम्हारे ष्टोमें कितनी वात हय ?"

"१२" मी.

"तो ऐसा समझो, की हमने उनमेसे सिरफ ७ ही वात उपर की, बाकी सब निकाल दी. अब ये वातको सा बोलो. तो ये जलाई, तो बाकी एक के बाद एक जलेगी के नही ? अब जो वात ऊपर है, वोईच जलेगी. बस ऐसेहि है अपना आयमान. अब ये बीच वाली वात को ले जाव नीचे, और उस्के बाजूवाली को करो ऊपर. तो ये कैसे जलेगी. बस वैसे सुदकलियान. दोनो एकही ष्टो की वाती, लेकिन जलनेका आर्डर अलग है."

मंडळी, भातखंडे पलुस्करांपासून आपल्या संगीतशिक्षणाच्या क्षेत्रातील मोठी परंपरा अशी ष्टोमधून जळणाऱ्या वातींतून पुढे चालू ठेवणारे ग्यासुद्दिन सारखे संगीतशिक्षक मला लाभले, हा मी माझा बहुमान समजतो.

कधीकधी ग्यासूच्या दुकानात ममद्या नावाचा एक दहा-बारा वर्षाचा पोर असतो. "हमारे चच्चीजान के बुवाजानका नाती." अशी ममद्या ची ओळख ग्यासूने करून दिली असते. ममद्याला आपले अभिजात संगीत आवडत नाही, ही ग्यासूची मुख्य तक्रार. ग्यासूची तोडी सुरू असते, तेव्हा हा पोऱ्या नवीनच कुठलेतरी रफीबिफीचे गाणे गुणगुणत असतो, तेव्हा चिडून एक ष्टो ममद्याच्या अंगावर फेकलेला मी स्वत: पाहिला आहे.

"अमा, ठीक है के गा नही सकते. लेकिन थोडा सुन तो लो ! ये आजके लडके."

तसे ग्यासुला कौटुंबिक सुख वगैरे मिळत असावे. पण पोटचे पोर नाही, म्हणून कधी कधी ग्यासू खिन्न असायचा. एकदा भलताच खूष दिसला. "शिरनी लो मियां." मी प्रसाद खाऊन चच्चीजान चे अभिनंदन करायला निघालो. "अरे उस्को मत बोलो, मियां. उधर गावबाहार ग्यासूका चिमत्कार है. अल्लाउद्दिन के जमानेसे हमारी लैन ऐसी टूटी नही थी कब्बी, अब कैसे टूटेगी?" पुढे त्या "चिमत्काराने" गावातील एका धनिकाशी सूत जमवले, आणि लैन तुटलीच.

तसे ग्यासुद्दिनचे दादे परदादे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात आहेत. पण आजही हैदराबादेचे नाव निघाले, की चारमिनारच्या मागे सलीमभाईच्या दम बिर्याणीच्या आठवणीने ग्यासू कळवळतो.

"क्या बताऊ मियां, वो हड्डीभी ऐसी पकती थी, की उस्को चूसते वक्त जैसे वो पंडत चौरासिया की बासुरी के सुर निकलते थे. हमारी बेगम तो छोडो, बडी अम्मीभी ऐसी बिरयानी कब्बी बना नही सकती."

एकदा मी ग्यासूला भाईकाकांचे "माझे खाद्यजीवन" वाचून दाखवले.

"अमां मियां, ये बम्मन लिखता अच्छा है. ये खाने खिलाने के बजाय और क्या करता है?"

मग मी त्याला "व्यक्ती आणि वल्ली" वाचून दाखवले.

"मियां, बडे होने पर तुम भी ऐसेच हमारे उप्पर लिखना."

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

बत्तीस शिराळा - नागपंचमी

बत्तीस शिराळा

सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.

पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे. अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेले हे बत्तीस शिराळा गाव

जेंव्हा पुर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेंव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत असत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेउन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे.. पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई

नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणुक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजीत केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत. यातील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासुन ते म्हातार्‍या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालुन फोटो काठत असत

शिराळ्याची नागपंचमी पूवीर् देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूवीर् लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली.

त्यामुळे काही वर्षांपासुन इथे आता प्रतिकात्मक मिरवणुक काढली जाते.

आंबट-गोड नाती

आंबट-गोड नाती
.

चिंचेचा आकडा गं..
शेपटावाणी वाकडा गं..
चिंचेचा आकडा.. वाकडा गं..

पेरा-पेरात गाठी गं..
चिंचोक्या बाटी गं..
पेरा-पेरात गाठी.. बाटी गं..

आकड्याची गोडी गं..
पोरं यडी-खुळी गं..
आकड्याची गोडी.. खुळी गं..

जिभेला हुळहूळ गं..
खाताना कळ गं..
जिभेला हुळहूळ.. कळ गं..

चिंच आंबट-गोड गं..
भली-बुरी चव गं..
चिंच आंबट-गोड.. चवीला गं..

चिंचेचा आकडा.. वाकडा गं..
पेरा-पेरात गाठी.. बाटी गं..
चिंचजशी आंबट-गोड नाती गं..

=====================
स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९

मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!

मागील भाग - १८

आईच्या ईच्छेप्रमाणे गाव जेवण घातलं .. ! पण टिकीटे बुक असल्यामुळे मी परत निघालो होतो दिल्ली साठी.

कारण संजना बरोबर जे काम हाती घेतले ते पुर्ण करणे देखील गरजेचे होते... मी तेथे पोहचल्यावर कंपनीचे नाव ते प्रवास सर्व तयारी करुन झालेली होती.. फक्त नजर मारणे इतकेच काम राहीले होते.. ते देखील पुर्ण करुन मी आपल्या पहील्या परदेस वारी साठी तयार झालो, Guangdong China, येथे काही सप्लायर होते त्यांच्या जवळून आम्हाला सामान खरेदी करणे व शिपींग ईत्यादीची व्यवस्था करुन परत येणे हेच कार्य होते. २० दिवसामध्ये आम्ही परत आलो व लोकल मार्केट मध्ये जाहीरात चालू केली.... दोन एक महीन्यात सर्व माल पोहचणार होता तो पर्यंत कमीत कमी ७५% माल संपवणे ह्यातच आमचा फायदा होता.... त्यामुळे मी दिवस रात्र एक करुन काहीजणांना हाती घेऊन मार्केट पर्यंत जम बसवला व जशी ईच्छा होती तसाच खफ देखील झाला, प्रथम फेरी मध्येच आमचा झालेला नफा पाहून आमचा उत्साह डब्बल झाला... आम्ही पुन्हा जाणे नक्की केले !

क्रिसमस च्या आदल्या रात्री आम्ही पार्टीची योजना तयार केली होती त्या नूसार सर्वांना बोलवलं ! संजना च्या घरची मंडळी व माझे काही मित्र व विभा ! ... सर्वांच्या समोर संजनाने ठरलेल्या रक्कमेचा चेक माझ्या हाती दिला व म्हणाली.... " देव करो... आपण असेच अनेकानेक चेक आपापसात वाटून घेऊ जिवन भर... " मी हसत... तीला म्हणालो.. "आमिन!" सगळेच हसले. पार्टी व्यवस्थीत झाली व मी, संजना विभा वर टेरेस वर जाऊन बसलो ... सर्व कामाच्या धावपळीमध्ये मी व विभा व्यवस्थीत पणे भेटू देखील शकलो नव्हतो तेव्हा तीच्याशी काही बोलावं काही काळ तीच्या संगे देखील व्यतीत करावा हा विचार करुन मी एक छोट्या ट्रीप ची योजना तीच्या समोर मांडली , ती ,मी संजना व तीची फॅमेली गाडी घेऊन मनालीला जाणे ठरले.

मस्त पैकी रविवार होता.... सकाळ सकाळीच निघालो होतो आम्ही.. तीच्या घरी आईला सांगून आम्ही चार दिवसासाठी चाललो होतो... खात-पीत मजे मध्ये प्रवास चालू होता... मध्येच बोलता बोलता विभा म्हणाली... " तु आपल्या आईला विचारले का ? लग्ना बद्दल? " मी म्हणालो " नाही यार... अजून योग्य अशी वेळ भेटली नाही... तशी माझी आई नाही म्हणले असे तुला का वाटले ?" मी म्हणाली " तुझ्या कडील समाज धर्मजात वैगरा जास्तच पाहतो रे म्हणून विचारलं " मी हसलो व म्हणालो " मी मानत नाही ह्यातच सर्व काही आहे.. माझ्या कडील व्यक्तींची चिंता सोड... तु आपल्या वडीलांना विचारलं का ? " म्हणाली " एकदाच.. विचारलं होतं... तेव्हा म्हणाले होते... बघेन .. भेटेन तुला बस !" मी म्हणालो " चल. मी देखील लवकरच भेटेन त्यांना" , संजना मध्येच म्हणाली... " अरे कोणी तयार नाही झालं की सरळ कोर्ट मॅरेज करणे हाच उपाय त्यात काय नवीन " दोन एक तासाचा प्रवास करुन आम्ही एके जागी जेवण करण्यासाठी थांबलो. तीने नॉनव्हेज तर मी व्हेज ऑर्डर दिली.... फुसनॉनव्हेज.. कधीतरी ट्राय करुन बघ.. कसे मस्त लागते चिकन" मी म्हणालो " नको यार.. मला नाही आवडत.. असे नाही की मी कधीच खालं नाही.. पण मला पसंद नाही ते... गरज म्हणून खाईन पण टेस्ट साठी.. नो वे ! " तीने आपले नाक मुरडले व गप्प खाऊ लागली... तेव्हा मीच एक पीस तीच्या प्लेट मधून घेतला.... तेव्हा कुठे हसली.. ! आम्ही.. कुलू मनाली मध्ये पोहचलो... हॉटेल बुक करुन फिरण्यासाटी बाहेर जावे म्हणून बाहेर आलो तर बाहेर बर्फ पडू लागला होता.. मी म्हणालो...""चलो रुम में "

रुम मध्ये टिव्ही बघत असताना मी फोन वरुन एक रमचा पॅग व काही सिगरेट मागवली.... ती देखील समोर बसून चिप्स खात खात मला म्हणाली... " राज, यार तुम्ही पुरुष लोक ही कडू दारु का पिता ? " मी हसलो व म्हणलो " येथे बाहेर बर्फ पडत आहे.... व मी बाहेर फिरण्याचा मुड तयार करत आहे.. तु येथेच बसून टीव्ही पहा.... " ती म्हणाली " अरे मी ह्या पॅग बद्दल विचारतं आहे..." मी" ह्म्म... माझ्या कडे कारण नाही... हा एक मात्र गोष्ट आहे मला हे पेय शरीराला आवश्यक ती उर्जा व गरमी देते म्हणून सध्या मी घेत आहे " ती म्हणाली..." मी पण एक ट्राय करु ? " मला एकदम ठस्सका लागला व हातातला पॅग सांडता सांडता वाचला.... मी हसलो व म्हणालो..." नको डीयर... संभाळणे अवघड होऊन जाईल मला " मी संजना ला आवाज दिला व म्हणालो... " अरे , हिला घेऊन जा यार... कुठे एखादा पॅग घेऊन मस्त झाली तर मला अवघड होऊन बसेल Wink " आमची गडबड पाहून संजनाचा नवरा देखील माझ्या रुम मध्ये आला व म्हणाला " अरे , एकटाच बसून का पितो आहेस... मी आहे ना सोबतीला " संजना म्हणाली.. चलो विभा.... आता ह्यांना कोणाची गरज नाही... दोन एक तास तरी " दरवाजा जरा जोरातच बंद झाला... मी डोळे मिचकावत म्हणालो " जिजाजी... तुफान की भारी आशंका है " व आम्ही जोर जोरात हसलो..... व फोन वरुन पुन्हा पॅगची ऑर्डर दिली व थोडी ट्टर होऊन आमची जोडी हॉटेल च्या बाहेर आली... पण बाहेर बर्फ अजून पडतच होता... आम्ही खाली बार मध्ये बसूनच एक एक पॅग घेऊन पुन्हा वर आलो ! Smile

विभा ही आपली वैतागून टिव्हीवर चॅनेल बदलत बसली होती.... मी टिव्ही बंद केला व तीच्या समोर जाऊन बसलो व म्हणालो " विभा... टिव्ही तेरे घर पें भी है... तु व मी काही बोलू शकत नाही का ?... ईतक्या दुर आपण टिव्ही पाहण्यासाठी तर आलो नाही आहोत ना... मला तुझ्याशी बोलायचं आहे... खुप काही " ती म्हणाली... " ठीक आहे.... बोल..." " मी म्हणत आहे आपण लग्न करणार आहोत... आज ना उद्या ... म्हणजेच लवकरच... पण त्या आधी तुला माझा स्वभाव, माझे राहणे वागणे... खाणे पीणे... हे सर्व माहीत असावे ... माझ्या जिवनाचा पुर्वार्ध देखील ! " मी सर्व राम कहानी पुन्हा तीला संमजावून सांगितली... व म्हणालो " जो आहे तो मी असाच तुझ्या समोर आहे.... उद्या कसा असेन हे माहीत नाही... पण आज संपर्ण आहे... स्वतःच घर नाही आहे... लवकरच होईल ही आशा... तु जे शिक्षण खुप जास्त आहे माझ्या पेक्षा... मी आठवी नववी... पास... फक्त बुध्दीच्या जोरावर येथे आहे.... " विभा माझा हात हाती घेऊन म्हणाली... " अरे, विसर सगळं.... मला सर्व माहीत आहे... नवीन काही नाही ह्यात... तु जसा आहेस तसाच आवडतोस मला... तुझे स्पष्ट बोलणे पसंद आहे मला.... फक्त आपल्या कामालाच तु जास्त वेळ देतोस हेच खटकतं पण सध्या तुला तेच महत्वाचे आहे हे देखील मी जानून आहे तेव्हा काही काळजी करु नकोस... काम करत रहा... देव पाहतच आहे... चल आता झोपी जा मी पण संजनाच्या रुम मध्ये जात आहे ठीक आहे... " व ती संजनाच्या रुम मध्ये जाऊन झोपी गेली... !

माझी सकाळ जरा जास्त वेळाने झाली... ही सर्व मंडळी तयार होऊन बसलेली होती... मी आपला फटाफट तयार होऊन त्यांच्या बरोबर फिरण्यासाठी निघालो.... मनु मंदीर... अर्जुन गुफा... धबदबा.. पाहून आम्ही.. सलोंग घाटी वर येऊन तेथील मस्त निसर्गाचा आनंद घेऊन परत हॉटेल वर आलो... एक दिवस आधीच बर्फ पडल्यामुळे थंडी जास्त जाणवत होती व लहान मुलींना त्रास होत होता तेव्हा आम्ही परत निघण्याचा निर्णय घेतला... !

दोन तास मी... दोन तास जिजाजी... आधी मधे संजना असे गाडी चालवत आम्ही प्रवास करत होतो... दिल्ली तासात पोहचणार होतो आम्ही...... संजना गाडी चालवत होती... जिजाजी तीच्या बरोबरच्या सिट वर व मी विभा व मुली मागे बसलो होतो... विभा मला म्हणाली... "राज "तु ड्राव्हींग कर आता... ती थकली असेल.... दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला... तीला... " मी हो म्हणालो... तेव्हा संजना म्हणाली... " आगे, रिमझिम पें.... चेंज करेंगे " टेप वर मस्त पैकी...." मैया मोरी... " चालू होतं... व मागे मी विभा व मुली ह्यांचे पत्याचे खेळ बघत होतो.... संध्याकाळचा वेळ... पण पुर्ण अंधार झालेला नव्हता... संधी प्रकाश असावा... अचानक गाडी वळली... जिजाजी.. जोरात ओरडले...."" संजना ब्रेक " पण तो पर्यंत रोडच्या मधल्या डिवाडर ला जाऊन भीडली... व त्याच वेगाने पलटली.... !... विभाने मुलींना गच्च पकडले आहे हेच दृष्य मला दिसले व अचानक डोके बाजूच्या खिडकीवर आपटले ....डोळ्या समोर अंधेरी आली... काही कळालेच नाही... !

कोणीतरी हात घेचून मला बाहेर काढत होते... पोलिस गाडीचा सायरन कानावर आदळत होता... अचानक पायातून प्रचंड कळ आली व पुन्हा मी बेहोष झालो... ! दिल्ली मधील गंगाराम हॉस्पीटल मध्ये आम्हाला भरती केले होते... माझ्या पायावर फॅक्चर व हातावर देखील... डोक्याच्या मध्ये भागी.. जख्म... !

मी बाजूला असलेल्या नर्सला विचारले.. " मेरे साथी ?" .. ती माझ्या कडे पाहत म्हणाली.. " सब ठीक है... तुम आराम करो"
माझे मित्र काही बाहेर बसले होते.. एक एक करुन आत आले व मला म्हणाले " ठीक है तू " मी त्यांना विचारलं " अरे यार.. संजना.. विभा..बच्चे ? सारे ठीक है ना..." विनोद म्हणाला.. " अरे सब ठीक है.... तु आराम कर" पण त्याच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळचं सांगून गेलं...... मी पाणावलेल्या डोळ्याने दरवाज्याकडे हताश पाहात काय झालं असे ह्याची कल्पना करत पडून राहीली होतो.....

क्रमशः

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!!




(आभार : चारोळी मराठीवर्ल्ड्.कॉम वरील एका ई-शुभेच्छा पत्रावरून घेतली आहे)

आपलाच मित्र,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गाव आणि शहर ख्रर काय आणि खोट काय

भलतच निराळ जीवनमान, आहे शहरातलं आणी खेड्यातलं आज मी दोन वर्ष झाली सागलीतल्या एका छोट्या खेड्या तुन पुन्या ला आलो आहे, जवा इथलं जीवनमान पहिलं तेव्हा गावा विषयी फारच किव वटु लागलीय पर्याय सापडेना झालाय की ही दरी कशी बुजवायचि .मग तो प्रश्न कोणता ही असो ,

एक चांगला पायंडा

प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं.

आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत. या सर्व खगोलशास्त्रज्ञांसाठी शुक्रवारी संध्याकाळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. कालच श्रीमती प्राची (आडनाव विसरले, ढोबळे का काहीतरी) यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम झाला. माझ्यासारख्या औरंगजेबांना विचाराल तर कार्यक्रम उत्तम झाला. पण विषेश सांगण्यासारखी गोष्ट ही की श्रीमती प्राची आणि त्यांचे तबला आणि पेटी वाजवणारे दोन साथीदार यांना पुष्पगुच्छ दिला नाही तर एक-एक छोटं रोपटं देण्यात आलं. "झाडे लावा, झाडे जगवा" असे बोर्ड्स कितीतरी ठिकाणी दिसतात. पण अशा पद्धतीनं त्याचं आचरण फार वेळा दिसत नाही. फुलं काय आत्तापर्यंत कोमेजलीही असती, पण ती रोपटी या कलाकारांना खगोलशास्त्राची आणि शास्त्रज्ञांची आठवण नक्की देतील ... आम्ही विश्वाच्या पसाय्राचा, उत्पत्तीचा अभ्यास करत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगणारी ती रोपं.

ही कल्पना कोणाची ते विचारायचं मला तेव्हा सुचलं नाही, पण ज्यांनी कोणी ही कल्पना सुचवली, आणि अंमलातही आणली त्यांचं मला फार कौतुक वाटलं. आणि त्यांचं जाहीर अभिनंदन करावंसं वाटलं म्हणून हा उद्योग!

(वसुंधराप्रेमी) यमी

दहशत वाद्यान्चे उपकार (?)

दहशतवादि निर निरळ्या मार्गाने जिवित हानि करतात,कधि हे कधि ते !
पण हे उपकारकच वाटावे अशि परिस्थिति आहे !

आजुबाजुला पाहिल कि हे जानवते

सन्जय दत्तला पाहन्यासाठि ५००० गर्दि जमते,फाल्तु नाच गान्यान्च्या कार्यक्रमाला लाखाने एसएमएस जातात्,पानि मिळत नाहि पन गल्लो गल्लि वाइन शोप उघडलि जात आहेत्,सरकार वाचवल्याबद्दल पन्तप्रधान गुन्डाना नमस्कार घालतात्,आम्च्या सारखे पुने मुम्बैकर हा एव्ढाच भारत आहे अस समजतात ! आनि भारताने प्रगति केलि अस सानगतात !

आमच्या कितितरि बहिणि अजुन त्यान्च आयुष्य चुलिपुढेच घालवत आहेत,मोकळा श्वास कशाला म्हनतात त्याना माहित नाहि

ति गान्धि ,फुले ,आम्बेडकर्,टिळक सारखि मन्डळी जन्मायचिच बन्द झालि का हो?

आता उरलेत आमच्यासारखे भुक्कड !

मग हे मेले काय आनि जगले काय ? काय फरक पडतो ?

उलट हे दहशतवादि या भारतावर उपकारच करत आहेत हि पिलावळ समपवुन
हे लिहिन्याचि वेळ माझ्यावर यावि यातच माझा पराभव आहे एक भारतिय म्हनुन

ग्रहण

ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ?

आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ?

नावाउलट वागणारा
- पार्टनर