चित्रपट परिक्षण : डंकर्क

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 4:38 pm

शक्यतो मी इंगजी चित्रपट कमी पाहातो. पण तोच जर ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक असेल तर मी जरुर पाहातो.

असाच मागच्या आठवड्यात डंकर्क चित्रपट पाहाण्याचा योग आला आणि माझा वेळ आणि पैसा वसुल!

हा चित्रपट दुसर्‍या महायुध्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे. जर्मनी च्या नाझी फौजानी फ्रान्सच्या समुद्र किनार्‍यावर ब्रिटिश आणि फ्रेन्च फौजांना जमीन , वायु आणि समुद्र या सर्व ठिकाणाहुन प्रचंड हल्ले करुन सळो की पळो करुन सोडले असताना हे मित्र देश कसे आक्रमणातुन वाचतात आणि हजारो सैनिकांचे जीव कसे वाचवले जातात याचे सुन्दर चित्रण या चित्रपटात आहे.

चित्रपट सुरु होतो तो समुद्र किनार्‍यावर होणार्‍या बेछुट गोळिबाराच्या द्रुश्याने. अत्यन्त थरारक असे हे द्रुश्य. त्यात अनेक ब्रिटिश आणि फ्रेन्च सैनिक म्हणजे अगदी
१४ ते १७ वयोगटातील कोवळे सैनिक मारले जातात पण मित्र फौजा जास्तीत जास्त सैनिकाना वाचवण्यासाठी एका मोठया बोटिची व्यवस्था करतात! चित्रपटाचा नायक या बोटीत जखमी सैनिक सहकार्‍याला घेऊन कसे चढतो ते द्रुश्य अतिशय वास्तववादी वाटते. याच बोटीत चढण्यासाठी जीव वाचवण्यासाठी चालेलेली चढाओढ
आणि ब्रिटिश सैनिक फ्रेन्च सैनिकाना त्यात येण्यासाठी करत असलेला विरोध पाहुन मानवी स्वभावाची "मी ..... माझे लोक " अशी मनोव्रुती पाहावयास मिळते.

ही बोट किनार्‍याच्या शोधात जात असताना भयंकर हवाई हल्ले चालुच असतात. पण ब्रिटिश एअर फोर्स विमानातील शेवटच्या इन्धनाच्या थेम्बा पर्यन्त कसा प्रतिकार
करतात याचे सुन्दर चित्रण यात आहे. याशिवाय दुसर्‍या एका लहान बोटीतुन प्रतिकार केला जातो व प्रसंगी या बोटीतुन हल्ले करुन शत्रुचा प्रतिकार केला जातो.

सतत होणार्‍या हवाई हल्ल्यामुळे मोडकळीस आलेल्या व बुड्त चाललेल्या जहाजातुन सैनिक इतर छोट्या नावेत ऊडी मारुन प्राण कसे वाचवतात हे अतिशय सुन्दर रीत्या चित्रीत केले आहे. एकन्दरीतच हा चित्रपट खुर्चीला खिळवणारा आहे. फेसाळलेला समुद्र किनारा, जखमी सैनिक आणि किनारा व आपले देशबंधू दिसल्यावर
सैनिकांच्या डोळ्यातील आनन्द पाहाण्यासारखाच!

हा चित्रपट फ्रान्सच्या वास्तविक स्थानी डन्कर्क येथे चित्रीत झाला आहे.

या ऐतिहासिक ऑपरेशन मध्ये ६०००० पेक्षा जास्त सैनिकांना सुरक्षित हलवण्यात आले होते.

एक अतिशय वास्तववादी समरपट !

चित्रपट संपल्यानन्तर "युध्ध म्हणजे अनाठायी रक्तपात असला तरी प्रत्येक देशाने युध्धासाठी सदैव सज्ज असलेच पाहिजे असे परस्परविरोधी विचार मनात घोळत
रहातात".

दिग्दर्शक - ख्रिस्तोफर लोहन

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 5:00 pm | पिशी अबोली

दिग्दर्शक - ख्रिस्तोफर लोहन

या चित्रपटात टिपिकल नोलन टाईप गूढ काही नाही असं ऐकलं होतं. पण हा लोहन कोण, हे मात्र गूढ आता निर्माण झालंय. ;)

अजून चित्रपट पहायला जाणं झालं नाही. पण परीक्षण अजून बरंच खुलवता आलं असतं असं वाटलं..

एस's picture

24 Jul 2017 - 5:07 pm | एस

चित्रपट परीक्षण म्हणण्यापेक्षा चित्रपटाची ओळख म्हणता येईल. अजून तांत्रिक व इतर बाबींवर लिहिता आले असते असे वाटले.

उगा काहितरीच's picture

24 Jul 2017 - 8:25 pm | उगा काहितरीच

मला रविवारी हा चित्रपट पहायचा योग आला. शाळेत असताना "डंकर्कची यशस्वी माघार" अभ्यासक्रमात होतं त्याची आठवण आली. ज्याला इतिहास माहीत आहे त्याच्यासाठी खूप छान अनुभव ! अन् ज्याला माहित नाही त्याच्यासाठी नुसतं धडामsधूडss !!! काल परवाच खफवर http://www.misalpav.com/node/12605 ही लिंक दिली होती. ती वाचून गेलो होतो. शिवाय दुसरं महायुद्ध म्हणजे माझ्या आवडीचा विषय , त्यामुळे अगदी मनापासून आवडला चित्रपट . त्या काळातलं युद्धतंत्र वगैरे खूपच प्रभावीपणे चित्रीत केलंय. विमानांची लढाई (dog fight) तर क्याच केहने ! (3D बघायला अजून आवडलं असतं) . प्रत्यक्ष डंकर्कच्या किनाऱ्यावर चित्रीत केलंय हे माहीत नव्हत. चित्रपट चांगला आहे पण काही गोष्टी अजून चांगल्या करता आल्या असत्या . जसे युद्धाची थोडी पार्श्वभूमी दाखवायला हवी होती. जर्मन सैन्य , त्यांच्या हालचाली खूप कमी दाखवल्या आहेत , ते पण वाढवता आलं असतं. जर्मन सैन्य डंकर्क वर वेळेवर का पोहोचू शकलं नाही हे पण दाखवता आलं असतं. असो ! एकंदरीत चांगला चित्रपट आहे.

रघुनाथ.केरकर's picture

25 Jul 2017 - 12:40 pm | रघुनाथ.केरकर

विवीयाना ला ४डी आहे पण ४५० रुपये मोजावे लागतील. त्यामुळे प्ल्यान ड्रॉप. पण २डी तरी पहाणारच.

अभिदेश's picture

26 Jul 2017 - 11:55 pm | अभिदेश

एकदा पाहण्याजोगा आहे , पण खरं तर जास्तच अपेक्षा ठेऊन गेलो होतो. Saving Private Ryan सारखा असेल , म्हणजे तेवढा परिणामकारक असेल अशी अपेक्षा होती कारण ख्रिस्तोफर लोहन . पण तेवढी मजा नाही आली. हे म्हणजे नुसती documentary साऱखा वाटला.

सिनेमा खूपच भारी आहे. जेट्टी (१ आठवडा), समुद्र (१दिवस)आणि आकाश (१ तास) ह्या तीन स्थळांवर वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या घटना खुबीने एकत्र आल्या आहेत. हान्स झिमरचं पार्श्वसंगीत अतिशय प्रभावी. ब्रिज ऑफ स्पाईसमध्ये जर्मन हेराची भूमिका बजावलेला मार्क रायलन्स येथे ब्रिटिश देशभक्त नागरिकाची भूमिका बजावतो. त्याची देहबोली अफाट भारी आहे. टॉम हार्डीचा चेहरा अगदी शेवटी दिसतो.
पूर्ण चित्रपटभर जर्मन सैनिक कुठेच दिसत नाही, ऐकू येतो तो फक्त त्यांनी केलेल्या गोळीबाराचा आवाज, लढावू विमानातून टाकलेले बॉम्ब.

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2017 - 2:38 am | पिलीयन रायडर

+ १

हन्स झिमरचं संगीत हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल धाग्याचा इतकं प्रभावी आहे.

जेट्टी (१ आठवडा), समुद्र (१दिवस)आणि आकाश (१ तास)

हे माहिती नसेल तर बराच गोंधळ होऊ शकतो.

उपेक्षित's picture

31 Jul 2017 - 1:05 pm | उपेक्षित

कालच पहिला आणि आवडला,

पार्श्वसंगीत अतिशय प्रभावी झाले आहे अगदी खिळवून ठेवते काही प्रसंगात. शिवाय चित्रपटात चित्रभाषा प्रभावी पणे वापरली आहे संवाद अतिशय कमी आहेत.