टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
कृष्णमुर्ती
मिपा ओळख २
प्रेषक चेतन ( सोम, 11/03/2008 - 12:16) .प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत.
भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना! माहिते मला ते, बोलायला तर आहे ना. ते जाउ दे मग काय लिहणार? तोच विचार करतोय हे बघ एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय. मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं. खाली एक ठळक अक्षरात टिप होती प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा. आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता)
हा सांगु लागला तसं बघ मी कधी कविता केलीली मला तरी आठ्वत नाही त्यामुळे ते बाद. तसही मला रिक्श्यातुन उतरल्यावर मिटर बघुन किती पैसे झाले ते कळत नाही तर कवितेतला मिटर काय झा* कळणार. त्याचं निरिक्षण आणि शब्द ऐकुन हे नक्की कळल की हा रांत्रदिवस मिपावर पडिक असणारे. मि आपलं उगाचचं बोलायचं म्हणुन म्हणलो बरोबर आहे तु म्हणतोस ते. पण मग चारोळी तर कर आहे काय त्यात? मला मात्र मनात चुपके चुपके मधली जुलाब जोडुन केलेली चारोळि आठ्वली. म्हणला प्रयत्न चालु आहे. मी त्याला फटु साहेबांच नाव सांगणार होतो की मदत घे म्हणुन (ट ला ट आणि र ला र जोडण्यात डॉक्टरेट केली आहे यांनी) पण भकारान्त शब्दांची चारोळी करायचा प्रयत्न चालु आहे हे पुढ्चं वाक्य ऐकुन मनातं म्हणलं बर झालं फटुचं नाव नाही सांगितलं नाहितर उगाच फाट्यावर मार पडला असता. मी आपली मौनं सर्वाथ साधयेत हे जाणुन त्याच्या बोलण्याची वाट पाहु लागलो. स्वतः बनवलेल्या एक्सेल शीटमध्ये बघुन तोच म्हणाला लिहणाच्या द्रुष्टिने दुसरा सोपा प्रकार म्हणजे विडंबन त्यातही गझल व्रुत्त यमक नसलेली कविता किंवा त्रिवेणि उचलायची हा पण एक प्रयत्न करतोय मी. म्हणतो कसा केसुसरांच्या नंतर एकच नामचिन विडंबनकार राहिल्याने कॉम्पिटिशन कमी आहे. मग मात्र मला गप नाही रहावलं म्हणलं बर्याच लोकांनी आम्हाला गझलाच जास्त आवडतात विडंबन म्हणजे दुसर्याच्या प्रतिभेवर एक परप्रकाशी बांडगुळ असे केसुपंथाच्या गुरुजींच्या बहुतेक विडंबनावर प्रतिसाद देउन गांगुलीसारखी त्यांना निव्रुत्ती घ्यायला लावली. त्याचा विरोध आणि त्यामुळे निर्माण झालेली संधी पाहुन बर्याच नवोदितांनी प्रयत्नांची शर्थ केली पण डावखुरा फलंदाज निव्रुत्त झाल्याने डावखुर्या फलंदाजाचीच नेमणुक होइल या नियमाप्रमाणे रंगनाथन आनंद या अतिशय प्रतिभावंत बुध्दीबळ्पटुची निवड झाली. केसुपंथाची दिक्षाघेतलेले लोक पंथाला विसरले आणि रंगनाथन यांची एकछ्त्री सत्ता प्रस्थापीत झाली. बुध्दीबळाची उत्तम जाण असल्याने या मधुशालेचा हा भाग कधी येणार असे विचारुनही यांनी वेळोवेळि कॅसलींग करुन आपली विडंबनाची सेवा अबाधित ठेवली आहे. हा जाज्वल्ल्य इतिहास सांगित्ल्याने मला जर बर वाटलं तर म्हणतो कसा बर झालं सांगितलस ते विडंबन टाकण्याआधी बुध्दीबळ शिकाव म्हणतो. मी पुढे टाकलेल्या प्याद्याला त्याने एन् पास करुन मलाच मात दिली होती.
आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती मग मीच विचारलं अजुन काही लिहण्याचा प्रयत्न चालु आहे का? तर मुखातुन अम्रुत पाझरावे तसे स्व्रर्गीय स्वर (जे डोक्यावरुन जातात ते ) बाहेर पडले म्हणलं हे काय? प्.पू तात्यामहाराजांचे लेख वाचुन किर्तनकलेत शास्त्रीय संगिताचा वापर कसा शक्या असे आहे आणि रॉक आन सारख्या चित्रपटात एखादं शास्त्रीय संगितावर आधारित गाणं टाकल्याने मास्तरांच्या चित्रपट्परिक्षणामध्ये काय फरक पडला असता यावर लेख चालु आहे म्हणाला. ते ऐकुन फीट यायच्या अवस्थेतही मी विचारलं ते खर आहे रे पण मगाशी जो काही आवाज काढलास तो काय होता? सात स्वरांनी मिळुन तयार होणारा सप्तक आणि त्यात थोडिशी हिमेशबाबाच्या आठव्या स्वराचं हे मिक्श्चर आहे म्हणाला तुला नाही कळायचं ते. लेख वास्तव्वादी होण्यासाठी जी काही ग्रुहीतके, अनुभुती लागते ती फील करायचा प्रयत्न करतोय. त्याचं ते विदवत्तापुर्ण विचार ऐकुन मनातच म्हणलं एकतर याची नाडी शोधायला दिली पाहिजे हा बहुतेक बर्याच जणांची नाडी सोडणारे. (कोणाशी पंगा घ्यायचा झाल्यास त्याचावर सोडायला उपयोगी पडेल.) पुढे तोच म्हणाला खमंग पाककृतींसाठी कोणाकडुन मदत घेउ आणि माझ्यापुढे उस्ताद ग्यानसुद्दीनचे जनक सम्राट सर्कीट ओमप्रकाश आणि हा धर्मेंद्रच्या रुपात साक्षात उभे राहिले. म्हणलं चांगला चान्स आहे एकतर हा तरी स्रर्कीट होइल नाहितर स्रर्कीट तरी अनबॅलन्स होइल. पण म्हणलं तुला कशाला हवे रे पाककॄती? इकडेतिकडे बघितल आणि म्हणाला कांदापोहे खातोय सद्ध्या अरे नको नको ते प्रश्न विचारतात रे. हे करायला येत का ते करायला येत का लय टेन्शन आलयं. म्हणलं इथे मिपावर एक संजिव कपुरकर काका आहेत त्यांना विचार. ( मनातच म्हण्लं हा बहुतेक चायनीज पुरणाची सोडे घालुन केलेली मिसळीची कृती लिहणार बघं )
मग मीच म्हणलं तुझे प्रयत्न चालु ठेव अजुन काही विचारचय का? अरे अजुन बरच प्रकार लाइनीत आहेत. एक क्रमशः लिहायचं म्हणतोय . आणि माझ्या डोळ्यापुढे सहाशे पेक्शा जास्त चालणार्या चार दिवसकडून प्रेरणा घेउन एलियनवर एप्रिलमध्ये शूट केलेला बांगड्या नावाचा चित्रपट उभा राहिला. आता मला हा आणखि कितीवेळा दिवास्वप्नात प्रवास घडवणारे कोण जाणे. पुढे तोच म्हणाला एक भैयाकथा क्रमशः लिहाय्ची म्हणतो. माझ्या भैयाकथेची सुरवात कंदिल घेउन जाणार्या गबाळ्यापासुन करणारे. मग माझ्या डोळ्यासुमार ती शहारे आणणारी कथा आणि तो कंदिलधारी शार्पशूटर जसेच्या तसे उभे राहिले. आत्ता फार वेळ मी जर याच्याबरोबर राहिलो तर हा मलादेखिल छताला चिकटवायला कमी करणार नव्हता. पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. अबे भो...डिच्या आता बंद करशील का तुझ्या फाट्यावर कट्टा मारु माझी सहनशक्ती आता संपली होती. आता खर तर मला इनोची गरज होती. जाताजाता त्याने मला एक फोटो दाखवला त्यात यात्रीप्रमाणे त्याचाही डोक्यावर हात असलेला साक्षीदेवाने फोटोशॉपमध्ये बनवलेला संसदभवानासमोरचा लकीटाइप फोटु होता. त्याखाली शुद्द संस्कृतात लिहलेलं सातारवी भाउंची कुठलतरी सुभाषित होतं. आंणित्यामागे शुद्दलेखनाचा फायदा या सदरात लिहलेले वेल्यांट्या बद्लुन तयार केलेले प्रा. साहेबांच्या आयडि सारखेच दिसणारे मगधी भषेतील तीन आय.डी. होते.
शेवटि त्याचं हे एव्हढ मिपा ज्ञान आणि करामती बघुन आपल्याला मिपा बद्दल किति ज्ञान आहे, अमुक अमुक लेखात किति ओळी होत्या. किंवा या गझलेतील व्रुत्तात कोणती चुक आहे असे बरेच चर्चाप्रस्ताव , किंवा एखादी लघुकथा स्पर्धा आयोजित करण्याच मनात ठरवुन मी झोपी गेलो.
(समाप्त)
धोंडोपंतांचे हार्दिक अभिनंदन
प्रेषक नाना चेंगट ( सोम, 08/11/2008 - 12:27) .वरुणराजाच्या कृपेने महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट आले होते ते आता बरेचसे दुर झाले असुन धरणे, तळी, विहीरी भरु लागले आहेत. बळीराजा केलेली पेरणी वाया जाणार नाही या आशेने सुखावला असुन काही ठिकाणी खरिपाला जरी नुकसान सोसावे लागत असेल तरी रब्बी हंगाम मात्र चांगला असेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मध्यंतरी शेतक=याप्रमाणेच शहरी लोक सुद्धा हवालदिल झाले होते कारण पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करत होती.
नेहमी वेळेवर येणारा पाउस अचानक रुसला होता. त्याचे कारण समजत नव्हते.
अशावेळी धोंडोपंतानी त्यांच्या पाशी असलेले गुढ ज्ञान त्याचा योग्य वापर करुन कारण मिमांसा करुन दिलासा दिला की पाउस येणार. विवक्षित काल खंडानंतर पाउस नक्कीच येणार.
आम्ही धोंडोपंतानी सांगितल्यावर निश्चिंत झालो कारण आमचा जेवढा धोंडोपंतांवर विश्वास त्याहुन अधिक त्या गुढ ज्ञानावर .....
काही जणांनी नेहमी प्रमाणे पिचका-या मारल्या पण त्यांचे देव भले करो. ते समजत नाहीत की कोणत्या काळी काय करणे गरजेचे असते. असो.
धोंडोपंताना शुभेच्छा व असेच देवकार्य करण्या साठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना
(के पी तज्ञ) नाना
आली गौराई अंगणी....
प्रेषक धोंडोपंत ( बुध, 07/02/2008 - 00:53) .ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके १९३० - मंगळवार, १ जुलै २००८
सकाळी नेहमीप्रमाणे कन्सलटेशन सुरू होते. तेवढ्यात मोबाईल खणाणला. ऍड्रेस बुकातला नंबर दिसत नव्हता म्हणजे नेहमीच्या संपर्कातील व्यक्ती नसावी. आमची महत्वाच्या समस्येबद्दल जातकांबरोबर चर्चा चालू होती म्हणून कट केला. लगेच पुन्हा फोन. पुन्हा कट. तिसर्यांदा फोन आल्यावर पर्याय नव्हता. कोणीतरी भयंकर संकटात असेल तरच असे दोनदा फोन कट केल्यावर तिसर्यांदा फोन करतं. फोन उचलला. समोरून ते गृहस्थ किंचाळले,
"अहो पंत, फोन काय कट करताय सारखा. मी कितीवेळ ट्राय करतोय. एक तर इथे पावसामुळे पाणी साचलाय. घरचा फोन बंद आहे. मोबाईल कालच्या गडबडीत चार्ज करायचा राहिला म्हणून बाजारपेठेतून तुम्हाला फोन लावतोय."
या सर्व प्रस्तावनेत आपण कोण बोलतोय हेच सांगायचं ते विसरले. आम्ही विचारल्यावर ते घाईघाईत म्हणाले , " अहो मी प्रकाश सावंत बोलतोय चिपळूणवरून. "
प्रकाश सावंतचे नाव ऐकल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांची आणि त्यांच्या सौभाग्यवतींची पत्रिका पाहिली होती.
लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी संतती नाही. अनेक उपचार झाले. अनेक ज्योतिषांना कुंडली दाखवून झाली. वहिनींच्या कुंडलीत पंचमस्थान बिघडलेले आहे. संततीसुखाला कुंडली पोषक नाही असे बहुतेकांचे निदान होते. काहींनी पंचमातील गुरूचे भ्रमण पाहून त्या काळात संततीची शक्यता वर्तवली होती. पण गोचर गुरूने पंचमातून मुक्काम हलवला तरी काहीच झाले नाही.
अत्यंत हवालदिल होऊन हे जोडपे आमच्याकडे आले ते आमचे चिपळूणधील स्नेही श्री. जाधव यांच्या ओळखीने. त्यानंतर प्रकाशरावांचा आणि आमचा स्नेह वाढला. चिपळूणवरून जातांना काण्यांच्या हॉटेलात जेवल्यावर, ज्या स्नेह्यांना भेटून आम्ही पुढे मार्गस्थ होतो, त्या मंडळीत प्रकाशराव सामील झाले.
पत्रिका पाहण्याच्या वेळेस जाधव म्हणाले, " पंत, जे काही असेल ते स्पष्ट सांगा. काहीही ऐकण्याची तयारी करून आलो आहोत."
आम्ही पत्रिका पाहिल्या. प्रकाशरावांची पत्रिका संततीयोग उत्तम दाखवत होती. त्यात काहीच समस्या नव्हती. वहिनींच्या पत्रिकेतील पंचमाबद्दल मात्र बरीच चर्चा झाली होती. प्रकाशरावांच्या आईंनी "सुनेला मूल होत नाही" हा मुद्दा फार मोठा करून तिची पत्रिका अनेक ज्योतिषांच्या नजरेखालून घालून घेतली होती आणि "तुझ्या पत्रिकेत संततीयोग नाही, त्यामुळे माझ्या मुलाचे हाल होत आहेत" हे वारंवार तिला सुनावून तिची मनस्थिती पार बिघडवली होती.
एवढेच नव्हे तर " काय करणार हो? प्रकाशला काही समस्या नाही पण सुनबाईंच्या पत्रिकेत संततीसुख असले पाहिजे ना? नुसते प्रकाशच्या कुंडलीत असून काय होणार आहे?" असे येणार्या जाणार्या नातेवाईकांना सुनेसमोर वारंवार ऐकवून तिची बिचारीची मानसिकता उद्ध्वस्त करून टाकली होती.
आम्ही काळजी पूर्वक कुंडलीचे निरीक्षण सुरू केले. संततीबाबत सांगायचे तर, पंचमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर दोन, पाच, अकरा यापैकी भावांचा जर बलवान कार्येश असेल तर संतती होते. यापैकी एकाही भावाचा जर तो कार्येश नसेल तर संतती होत नाही. त्याचप्रमाणे पंचमाचा उपनक्षत्र स्वामी जर एक, चार, आठ, दहा, बारा या संततीविरोधी स्थानांचा जर कार्येश असेल तर संततीसंबंधी चिंता, गर्भपात, संतती होऊन जाणे अशा घटना घडतात.
वहिनींच्या कुंडलीवर विचार केल्यावर आम्ही जाधवांना म्ह्टले,
" जाधव, तुम्ही म्हणालात की काहीही ऐकण्याची तयारी करून तुम्ही मंडळी आमच्याकडे आला आहात."
वातावरण मुळातच तणावपूर्ण होते त्यातील तणाव वाढला. वहिनींनी मान खाली घातली. प्रकाशरावांनी खिशातून रुमाल काढला. जाधव सुन्न झाले.
" तर आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकण्याची तुमची तयारी आहे असे गृहीत धरून आम्ही सांगतो की..... वहिनींना लवकरच म्हणजे सव्वा वर्षांनी संतती होणार आहे".
सुरूवातीला त्या तिघांचाही आमच्या बोलण्यावर विश्वास बसला नसावा. ते सहाजिक आहे. ते सर्व इतक्या दडपणाखाली होते की त्या मानसिकतेतून त्यांना काही क्षणात बाहेर पडणे शक्य नव्हते. सर्वांच्या चेहर्यावरील प्रश्नचिन्ह पाहून आम्ही प्रकाशरावांना सांगितले की,
" तुम्हाला मूल होणार आहे. अजून सव्वा वर्षांनी. समजले?"
मग एकेकाचा चेहरा खुलला. पण प्रत्येकाच्या चेहर्यावर साशंकता होती. वहिनींनी मान वर केली. काय बोलावे हे कुणालाच सुचत नव्हते. जाधवांनी विषय सुरू केला. आडवळणांनी बोलायला लागले.
"म्हणजे .... पंत..... तुम्ही म्हणताय खरे.... पण तसे होईल ना? ...... नाही म्हणजे काय आहे..... आजपर्यंत इतरांनी जे काही सांगितलाय...... त्यात तुम्ही म्हणताय तसे काही नव्हते...... म्हणून आपली एक...... खात्री करण्यासाठी.... म्हणून विचारतोय" इति जाधव.
आम्ही त्यांना म्हटले " जाधव.... वहिनींच्या कुंडलीबाबत आम्ही जे काही सांगतोय ते गुरूवर्य कृष्णमूर्तीच्या व्यासंग आणि संशोधनातून निर्माण झालेल्या मूलभूत सिद्धांतांना धरुन सांगतोय. वहिनींच्या कुंडलीतील पंचमाचा सबलॉर्ड दोन पाच आणि अकरा यापैकी दोन व पाच ही स्थाने देतो आहे. त्यांना संतती होणार. पण त्याच बरोबर हा सबलॉर्ड अष्टमही देतो आहे. अष्टमाने दिलेला मनस्ताप तुम्ही भोगला आहेच. तो मंगळाशी संबंधीत आहे. त्यामुळे सिझेरियन करावे लागेल. नैसर्गिक प्रसुती संभवत नाही. सध्या त्यांना बुधाची महादशा आहे आणि राहुची अंतर्दशा आहे. महादशा आणि अंतर्दशा स्वामी संतती स्थानांचे कार्येश आहेत. गर्भधारणेचा काळ नऊ महिन्यांचा असतो. त्यामुळे प्रसुतीसंबंधी कालनिर्णयासाठी नऊ महिने सोडावे लागतात. त्यानंतर महादशा स्वामीच्या राशीतून आणि अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातून जेव्हा रविचे भ्रमण होईल तेव्हा वहिनींना संतती होईल. महादशा स्वामी बुधाच्या मिथुन राशीत राहुचे आर्द्रा नक्षत्र आहे. रवि साधारणपणे २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रात जातो. तो ४ जुलै पर्यंत आर्द्रामध्ये असतो. त्यामुळे २२ जून २००८ ते ४ जुलै २००८ या काळात वहिनींना संतती होईल".
एवढे तारखेनिशी सांगितल्यावर मग काय विचारता? ही सर्व गुरूवर्य कृष्णमूर्तींची कृपा. मग प्रकाशराव उगाचच काहीतरी नको त्या शंका काढायला लागले.
" पण ते सिझेरियन नीट होईल ना? त्याचा काही त्रास होणार नाही ना?"
आम्ही त्यांना म्हटले की, " हल्ली अर्ध्याहून अधिक स्त्रियांची प्रसुती सिझेरियननेच होते. ज्यांना गरज नसते त्यांचे पण सिझेरियन केले जाते. कारण नॉर्मल डिलिव्हरीत डॉक्टरच्या करिअरला जास्त स्कोप नसतो. हे आता उघडं सत्य आहे. त्यामुळे ते काही फार भयावह आहे असे समजण्याची गरज नाही. काळजी करू नका. सर्व व्यवस्थित होईल."
ते सर्व खुशीत चिपळूणला परतले . राहु अंतर्दशा सुरू झाली. वहिनींना दिवस गेल्याची बातमी प्रकाशरावांनी फोन करून दिली. अधूनमधून फोन सुरू होते.
आठव्या महिन्यात डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून आले. आम्हाला फोन केला. म्हणाले,
"पंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व घडत आहे. पण तुमचे एक भविष्य चुकणार आहे असे वाटते."
म्हटलं " ते कोणते?"
" तुम्ही म्हणालात की सिझेरियन होईल. पण डॉक्टरांनी सोनोग्राफी पाहून डिलिव्हरी नॉर्मल होईल असे सांगितले आहे. मी त्यांना दोनदा विचारलं. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरीच होईल. ते ऐकून बरं वाटलं. तुम्ही ते सिझेरियनच उगाचच टेन्शन देऊन ठेवलं होततं".
म्हटलं, "चांगलं आहे ना? तुमचे पैसे वाचतील."
आज सकाळी फोनवर समजले.....
वहिनींना काल सायंकाळी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलात भरती केले. प्रसुतीची वाट पाहिली. पण नंतर कळा कमी होत गेल्या. ब्लिडिंग सुरू झाले. पण कळाच नव्हत्या. पुन्हा सोनोग्राफी केली. नाळेची लांबी कमी आहे असे समजले.
"अजून वाट पाहू नका. धोका वाढेल. उगीच रिस्क घेण्यात अर्थ नाही. सिझेरियन करणे उत्तम", असे डॉक्टरांनी सांगितले. आज सकाळी सिझेरियन झाले. सर्व काही सुरळीत पार पडले. कन्यारत्न प्राप्त झाले. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत असे समजले. आनंद वाटला.
प्रसुतीच्या वेळेस म्हणजे आज रवी बुधाच्या मिथुन राशीत १६ अंशांवर म्हणजेच राहुच्या आर्द्रा नक्षत्राच्या तिसर्या चरणात आहे.
चला....गौराई अंगणी आली.
आठ वर्ष ज्या क्षणाची प्रकाशराव आणि वहिनींनी जागून वाट पाहिली तो क्षण आला.......
" जागून ज्याची वाट पाहिली..... ते सुख आले दारी"
ही गोड बातमी सांगण्यासाठी प्रकाशरावांची धडपड चालली होती. आम्ही दोनदा फोन कट केल्यावर तर त्यांचा संयमच सुटला होता. स्वाभाविक आहे. तिसर्या वेळेस फोन उचलल्यावर भरभरून बोलले. ज्यांचे कन्सलटेशन चालू होते त्या वेलणकरांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिली. वेलणकर समजुतदार माणूस. म्हणाले, " घ्या बोलून आरामात. आम्ही आहोतच ऑनलाईन."
प्रकाशरावांना आम्हाला भेटायचे आहे.
"बर्फीचा मोठ्ठा बॉक्स घेऊन येतो", म्हणाले.
म्हटलं, " नको. तोंड गोड करण्यापुरतीच आणा. कारण दहावी बारावीचे रिझल्ट लागल्यापासून त्यांचे पेढे खाऊन आम्ही कंटाळलो आहोत. त्यापेक्षा चिपळूणला आलो की झकास कोंबडीवडे खाऊ. वहिनींच्या हातचे बरेच महिन्यात खाल्लेले नाही. पुढील महिन्यात गुहागरला खेप होणारच आहे. तो पर्यंत वहिनी आरामात स्वयंपाकाला लागतील. मुसाभाई कडून चांगल्या कोंबड्या घेऊन ठेवा त्या सुमारास, म्हणजे झाले".
आपला,
(हर्षभरीत) धोंडोपंत
