चौकशी

मीपा चे हरवलेले गावकरी

मीपा हे ऐक गाव आहे. ह्या पारावर आल्याशिवाय काही करमत नाही. आणी गावकरी मन्डळिन्ची सवय लागलि आहे. बरेच लोक या पारावर आली नाहीत,
आपण त्यान्ची चौकशी केलि पहीजे. ते का येत नाहीत, काही अडचण आहे का?
हा धागा आपण हरवलेले गावकरी शोधण्यासाठी वापरुया. ज्याला कोणाला आठवण येत असेल, त्याने त्या गावकरी चे नाव टाकावे, ज्याला कोणाला तो गावकरी म्हाहीत आहे, त्याने माहीती द्यावी.

मी बरेच दिवस 'सन्जोपराव' यांना मीपावर बघितले ना?

तुमचा पासवर्ड चेंज करा ....

सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ...

आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ...

किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी. शिवाय मागच्या १० वेळच्या पासवर्ड शी जुळल्यास पुन्हा बोंब ....

माझी तर आत्तापर्यंत माझ्य नाव, मित्रांची नावे, काही खास मैत्रीणींची नावे, जन्मतारखा, गाडीचे मॉडेल्स, आवडते खाद्य, खेळ नकोनकोते शब्द, आकडे सर्व वापरून झाले आहे, आता ह्यापुढे बुद्धी चालत नाही ....

बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्‍या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ". आली का पंचाईत आता, पुढचा प्रश्न " कौन है वो ? साले हमसे छुपाता है ... *** **** ** "

आता तुम्हीच मला मदत करा, तुम्ही काय वापरता ते सांगा म्हणजे माझा मी योग्य तो लेसन घेईन ...
जास्त अवघड सांगू नका कारण मी अल्पमती आहे असे माझे सर म्हणायचे.[ त्यांचे नाव पण मी विसरलो आहे ...]

शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..

शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)

स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्‍यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?

दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)

आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.

लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.

खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.

आजकालचे मराठी चित्रपट

मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का?

-अघळ पघळ

नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय?
असेल तर कृपया सांगावे ही विनंती.

एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल.

एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे.
त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान.
यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे.

मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे.
कोणी सांगेल का?

(वेदोपनिषदप्रेमी) सागर

उपकरणे घेताना

मला स्वयपाकघरात बर्‍याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्‍यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने. हे घेताना काय पाहून घ्यायचं आणि तुम्ही ब्रँड कुठला वापरता ते सांगाल का?

.............एक गूढ

मित्रानो.आम्हाला आता तुमच्या येउन चांगली ६ पेक्षा जास्तवर्षे झाली.
तुमच्यातलेच होउन आम्ही आलो.तुमच्या जिवनाचा एक भाग झालो. तुमचे बरेचसे कार्यक्रम आमच्या वर अवलंबुन असतात हे ठौक आहे आम्हाला.
मनोरन्जन आणि ऍडीक्षन यातली सीमा रेषा अस्पष्ट आहे हे ओळखून आम्ही सुरुवात केली.एका घरातल्या कहाणीने.
त्याला जोड मिळाली सासुबाईची. सून बाई आता सासु झाली हे ओळखुन ती वागु लागली पण आमचे कुतुहल तसेच राहीले.
तुम्ही केवळ आमचे फ्यान उरला नाही त्तर तुम्हाला आमची ऍडीक्षन झाली आहे.
हे सगळे होत असताना आमच्यावर काय काय प्रसंग आले...सासुची लग्ने झाली....आज्या नटमोगर्‍या होउन नाचु लागल्या....पोटच्या पोराचा गोळी घालुन खून करनारी आय उर्फ मदर ईंन्डीया बी भेटली.....
सख्ख्या बायकोला पत्त्याच्या डावावर लावणारा पोरगा बी भेटला........
सासुबाईचा सूड घ्यायचा म्हणुन पोरगी पटवणारा जावई पाह्यला.....
त्या जावयाला पण हाकलला
सासरा वकिलीण बायच्या प्रेमात पडला......सूनेने त्याला त्यात मदत केली
सगळे सासरे गपचिप राह्यले........
नवरा बेपत्ता झाला( त्याला काढुन टाकल्यामुळे...ईर्षाद) नवा पती हा जुन्या पतीचा खूनी आहे हे कळताच त्याचा काटा काढला
आयुष्यात हे असे घडायचेच की असे समजुन आम्ही गपचीप राह्यलो..........
बिझनेस्स च्या पार्ट्या तर न्हेमीच जोरात आण जब्बर्दस्त होतात
आम्हाला कुणी दिकुन विचारले नाय पण या सगळ्यात आमचे आमालाच एक गूढ वाटुन राह्यलय........
आमची मदत करता का जरा............
जरा आमच्या धन्यांचा बिझनेस्स नक्की काय ? ते नक्की काय करतात हे सांगता का. ( सदान कदा घरातच पडीक असतात..)
कळावे आपल्या केकता कपूरच्या सिरीयल मध्ये केकाटणार्‍या
..................तुळसाबाई ( भ्र्.मिहीर्भौ) विराणी आन पार्वतीबाय अगरवाळ

महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ...
प्रतिक्रिया ..???

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ...
चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

सरकारी परवानगीचे महत्व किती?

काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच.

२ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते. महानगरपालिकेने रहिवाशी संकुलात (की परिसरात) दुकानांना परवानगी दिली मग न्यायालयाने त्यावर आक्षेप घेऊन दुकाने बंद केली.

सरकारी नियम आणि मग त्यात कोर्टाचे हस्तक्षेप किंवा सरकारने न्यायालयात जाणे किंवा एखाद्याने सरकार विरुद्ध न्यायालयात जाणे हे गेले २/३ वर्षे जास्त वाचण्यात, ऐकण्यात येतेय. एका ठिकाणी सरकार, महानगरपालिका एखाद्या गोष्टीला परवानगी देते मग न्यायालयाच्या आदेशावरून त्या गोष्टीला अवैध मानण्यात येते.
ह्या गोष्टी आपण नेहमीच्याच धरायच्या का आता? सरकारनेच परवानगी दिली होती ना बांधकामाला? मग त्याविरोधात असा निर्णय का घेण्यात यावा?

मटामधील बातमीप्रमाणे
'सरकारच्या विविध खात्यांनी जरी या जागेवरील व्यावसायिक विकासाला परवानगी दिली असली तरी ती वैध ठरवणे वनखात्यावर बंधनकारक नाही,' असा युक्तिवाद सरकारच्या वतीने ऍडवोकेट जनरल रवी कदम यांनी केला. कोर्टाने तो मान्य केला.

म्हणजे सरकारी निर्णयाला/परवानगीला काही महत्वच नाही का? की सरकार फक्त नावापुरते आहे? अर्थात इथे एक खात्री करावी लागते की खरोखरच बिल्डर्सनी परवानगी घेतली होती का? जर नसेल तर मग एवढी घरे बांधली जाईपर्यंत सरकार काय मुहूर्त बघत होते त्याच्यावर बंदी आणण्याचा?
ह्याबाबत सामान्य नागरिकांना कोणी समजावून सांगेल का?

आणखी एक आहे, जे जाहिररित्या अनधिकृत आहे त्या झोपडपट्ट्यांना सरकार अधिकृत करत आहे, परंतु सरकारी परवानगीनंतर बांधलेली घरे/दुकाने अनधिकृत ठरवत आहे.

ह्यातून आता एक प्रकारची वेगळीच भीती वाटते. संपूर्ण देशातील घरे सरकारी/महानगरपालिका/नगरपालिकेच्या परवानगीनंतरच बांधली गेली आहेत. मग हळू हळू न्यायालय संपूर्ण देशातील जमीन परत तर नाही ना घेणार?

(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)