टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
औषधोपचार
हुंगायचे इन्सुलिन
प्रेषक संजय अभ्यंकर ( सोम, ०७/२८/२००८ - २३:१७) .डांबिसराव व मि.पा. वरिल मान्यवर वैद्य मंडळींस काहि प्रश्नः
१. काही काळापुर्वी फयझरने हुंगायचे इन्सुलिन अमेरिकी बाजारात आणले होते.
ते कितपत यशस्वी झाले?
२. त्याचे काही अन्य परिणाम रुग्णांवर आढळले का?
३. हे औषध खर्चाच्या दृष्टिकोनातुन भारतीयांच्या ख्शाला परवडेल का?
४. आर्थर हेलीने त्याच्या स्ट्राँग मेडीसिन ह्या कादंबरीत भाकितपर लिहिले होते कि भविष्यकाळ हुंगायच्या औषधांचा असेल.
हे भाकित कितपत खरे ठरले आहे?
नरकयातना
प्रेषक मनस्वी ( सोम, ०७/२८/२००८ - १२:०६) .तेथे डॉक्टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो. समाजाने हातभार लावला, तर तिचे जीवन पुन्हा फुलू शकेल.
सकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. लोक यथावकाश आपापल्या परीने मदतीचा हात देतीलच.
पण मनात एक प्रश्न उभा रहातो की अशा असहाय्य रुग्णांसाठी, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत का नाही होउ शकत? का निधी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहिली जाते? या ७-८ वर्षाच्या मुलीने जिला आपल्याला नक्की काय झाले आहे, निधी म्हणजे काय, तो कधी गोळा होईल, हे माहितही नसेल.
दात्यांना आवाहन करण्याचा हा मार्ग ठीक आहे, पण का असे इलाज अशा खरोखर गरजू रुग्णांवर तातडीने (/मोफत) केले जात नाहीत?
मला यातील पूर्ण ज्ञान नाही. जाणकारांनी कृपया विचार मांडावेत.
या गरमीला काय करावे बॉ?
प्रेषक वेदश्री ( सोम, ०४/२८/२००८ - १२:४१) .इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?
दिल्ले दान... घेतले दान...
प्रेषक आजानुकर्ण ( बुध, ०४/०२/२००८ - १०:२५) .
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)
डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!
चित्रपट पाहणार्या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं बेणं बियाणं, अमिताभची कीटकनाशकं यांचा खप सर्वत्र वाढणार याची खात्रीही झाली. गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.
एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.
अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!
सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.
'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’
बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!
व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com
निगेटिव्ह थिंकिंग - प्रचंड मोठा अडथळा, उपाय ?
प्रेषक यशोदेचा घनश्याम ( बुध, ०१/३०/२००८ - १९:४६) . आई वडिलांच्या छत्रछायेखाली असताना, सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक, स्पर्धा, यश - अपयश... ह्या, आणि यासारख्या संज्ञा, फक्त अभ्यास, खेळ आणि कलागुण यांतील उल्लेखनिय प्रगतिच्या भोवतिच रेंगाळत असतात. पण शिक्षण पूर्ण करून, अर्थार्जनाची सुरुवात केल्यावर या संज्ञांची अंधारातली बाजू समोर यायला लागते. कदाचित, शाळा - कॉलेजात मिळणारे यश हे, सर्टिफिकेट, मेडल आणि मार्कलिस्ट मिळवून देते, तर नंतर मिळणारे यश हे, सॅलरी इंक्रिमेंट, प्रमोशन, बिझ्नेस ग्रोथ, सुखसोयी (बंगला, गाडि, नोकर्-चाकर) मिळवून देते, त्यामूळे या संज्ञांकडे पाहण्याचा आपलाच द्रुष्टिकोण बदलतो.
आपलेच जिवाभावाचे मित्र - नातेवाईक मुद्दामहून किंवा नकळत आपल्याला त्रास होईल असे वागतात... नोकरि - व्यवसायात आपण कुठेतरि अडखळतो, आणि इतरवेळी नाहक सल्ला देणारे, अशावेळी मदत / मार्गदर्शन करायचे सोडून आपल्याकडे पाठ फिरवतात... अशा बर्याच घटना सांगता येतील, कि ज्यामुळे समाजाबद्दल एक कटुता मनात निर्माण होते. अशा परिस्थितीत दोन प्रकारे मनुष्य घडू शकतो. एक म्हणजे, या सर्वांवर उपाय काढून प्रचंड यश मिळवलेला, किंवा हतबल, निराश आणि कष्टी जीवन जगणारा. खरेतर समोर येणारे अडथळेच प्रगति करून देण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणतात ना, 'जहाज हे किनार्यावर सुरक्षित असते, पण त्याचा निर्माण किनार्यावर राहण्यासाठी झालेला नसतो!'. संदिप - सलील (वर्तमान मराठी युवांचे प्रचंड आवडते संगीतकार) या प्रसिद्ध जोडिची कविताहि हेच सांगते - "जपत किनारा शीड सोडणे... नामंजूर!". अशा अडचणींवर मात करून यश मिळवणे यातच खरी कसोटि असते. किंबहूना, ज्याला या अडचणींना सामोरे जावे लागत नाहि, तो/ ती अतिशय निरस जीवन जगतो आहे असे म्हणावे लागेल.
पण या अडचणींशी लढताना सामोर येणारी सर्वात मोठि अडचण म्हणजे, निगेटिव्ह थिंकिंग! आपण स्वतःच स्वतःशी शत्रुत्व ओढवून घेतो. आणि या शत्रुशी लढणे प्रचंड अवघड होउन बसते. निगेटिव्ह थिंकिंग हे एक जाग्रुतावस्थेत पडणारे भयस्वप्न आहे. मला यश कधीच मिळणार नाहि... माझे मित्र नातेवाईक यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहि दिसत नाहि... माझ्या वाईटातच त्यांचा आनंद आहे... असेच दु:खी जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला आहे... असे विचार करत आपण आपली स्वप्ने, ईच्छा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झगडा करणेच थांबवतो. आणि ईथे आपली खरी हार होते. आणि पेराल तसे उगवेल या नियमाप्रमाणे, जितके जास्त निगेटिव्ह विचार होत राहतात तितक्या अधिकाधिक निगेटिव्ह घटना घडतही जातात. जी नाती खरेतर ईतकी कडवी मुळिच नाहित, त्यांत आपण स्वतःच विष ओतू लागतो... जे यश सहज मिळाले असते ते घालवून बसतो.... स्वतःशीच कसे लढावे !?
यावरचे काही उपाय मी ऍकले आहेत... योगासने... साधना - ध्यान... निसर्गसानिध्य... उत्तम छंद... वगॅरे...
अँटी डिप्रेशन टॅबलेट्स हि मी ऍकल्या आहेत (या काम कशा करतात माहित नाहि). पण मी माझ्या आईने केलेल्या संस्कराप्रमाणे, असे विचार माझा कब्जा करायला लागले कि, नामस्मरण वाढवतो (कुलदॅवतेचे). माझी श्रद्धा असल्याकारणाने मला योग्य परिणामहि मिळतो.
कधीकधी नवनव्या रहस्यमय कथा कादंबर्या वाचायला घेतो (माझी आवड).
ईथे झणझणीत मिसळ खायला येणार्या सदस्यांच्यासमोर हा विचार मांड्ल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण, कसे स्वतःशी लढलात... कोणते उपाय अवलंबलेत... कसे अनुभव आले... याबद्दल ईथे लिहावे. कारण आज ना उद्या प्रत्येकाला स्वतःशी युद्ध करावे लागतेच!
समिधा: एक मनमोकळे आत्मकथन!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, १२/११/२००७ - १०:४३) .वेदशास्त्रसंपन्न घुले घराण्यातील,अतिशय सनातन वातावरणात वाढलेली एक सुंदर तरूणी आणि दाढीजटा,कफनी व दंडधारी,आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेला एक संन्यासी ह्यांच्यातील ही प्रेमकथा आहे. पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि वयात भरपूर अंतर असूनही विवाहबद्ध होतात. ह्यातील ती सुंदर तरुणी म्हणजे सौ.साधनाताई आमटे आणि तो संन्यासी म्हणजे मुरली देवीदास उर्फ बाबा आमटे हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही सत्यघटना आहे.
सुखवस्तु, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून दारिद्र्य आणि खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जाणिवपूर्वक स्वीकारणे हे एरा-गबाळाचे काम नोहे हेच खरे. बाबा आमट्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाची मर्जी सांभाळत, वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्या समाजसेवी कामात सर्वस्वी झोकून देणे म्हणजे एक प्रकारचे असिधारा व्रतच होय आणि हेच व्रत सौ. साधनाताई आजवर अखंडपणे पाळत आलेल्या आहेत. त्यातील सर्व घटनांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन "समिधा" ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहे.
लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रणयाराधनेत गेल्यानंतर हळूहळू बाबांच्या अलौकिक कार्याला साधनाताईंनी डोळसपणे वाहून घेतले. पहिला कुष्टरुग्ण पाहिल्यावर झालेली बाबांच्या मनाची अवस्था,त्याची सेवा करण्यासाठी साधनाताईंनी दिलेले अनुमोदन आणि प्रत्यक्ष सहभाग ह्याचे वर्णन वाचले की कळते की शिव-शक्तीचे मीलन म्हणजे काय असते. बाबा म्हणजे कामाचा झपाटा. त्यात चूक झालेली त्यांना अजिबात चालत नाही. अशा वेळी साक्षात जमदग्नीचा अवतार असलेल्या बाबांची मर्जी सांभाळणे आणि त्यावेळी त्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या व्यक्तिला पाठीशी घालून ती चूक आपल्यावर ओढवून घेणे; ही सगळी तारेवरची कसरत करणार्या साधनाताई म्हणजे साक्षात मायमाऊलीच होत.
जसजसा व्याप वाढत गेला तसतशी कामे वाढत गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करणे(रुग्ण आणि इतर साथीदार), भांडी घासणे ही कामे साधनाताई एकट्यानेच करत. वर चार चार गाईंचे दुध काढणे, कुणाचे दुखले-खुपले बघणे, आपापसातील वाद सोडवणे आणि बाबांची सेवा करणे वगैरे असंख्य कामे त्या न थकता, न कंटाळता सतत हसतमुख राहून करतात हे वाचले की जाणवते की श्रमासारखा खरा आनंद दुसरा कशात नाही. अर्थात हे सगळे त्याच करू जाणे. सामान्य माणसाचे ते काम नाही.
उजाड, ओसाड जागी बस्तान बसविणे, साप,विंचूंचे आगर असलेल्या ठिकाणी सहजपणे वावरणे हे आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पांढरपेशांना कसे जमेल? पण लाडकोडात आणि सुखवस्तु वातावरणात वावरलेली ही स्त्री किती धिटाईने ह्या सर्व प्रसंगात वागते हे पाहिले की मग घरातल्या पाली-झुरळांना घाबरणार्या आपल्याला आपलीच कींव करावीशी वाटते. साधनाताईंच्या आणि बाबांच्या बाबतीत मात्र जितकी परिस्थिती विपरीत तितकाच काम करण्याचा उत्साह वाढतो हे पदोपदी जाणवते.
साधनाताईंचा हा जीवनप्रवास वाचताना पदोपदी आपण थक्क होत जातो. डॉ.प्रकाश आणि डॉ.विकास ह्या मुलांचे बालपण, डॉ.प्रकाशची पत्नी डॉ. मंदा ह्यांच्याबद्दलची कृतज्ञता, प्रकाश-विकास ह्यांनी बाबांचे समर्थपणे पुढे चालवलेले कार्य, बाबांचे भारत-जोडो अभियान, मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन वगैरे वगैरे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती देखिल ह्या आत्मकथनात वाचायला मिळेल. तसेच बाबांची नियमित आजारपणं,त्यावेळची झालेली साधनाताईंची धावपळ आणि मनाची घालमेल, त्यातून बाबांचे सही सलामत वाचणे हे सगळे वाचताना आपणही नकळतपणे त्यात सामील होतो.
प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. त्यात किंचित बदल करून मी म्हणेन की "प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक ’कर्तबगार’ स्त्री असते. अशा कर्तबगार स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पुरुष उच्चपदी पोचू शकणार नाही हे मात्र नक्की.
बाबा आमटे ह्यांचे आजवरचे लोकोत्तर समाजकार्य तर जगजाहीर आहेच. ह्या कार्यात तितकीच समर्थपणे साथ देणार्या साधनाताईंची ही सगळी कहाणी साहजिकच बाबांच्या भोवतीच गुंफलेली आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार पती असलेल्या पत्नींच्या आत्मचरित्रात पतीकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिलेले आढळेल. त्या तुलनेत हे आत्मचरित्र खूपच वेगळे आहे.
प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचावे असे मी आवाहन करतो.
बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे
प्रेषक आजानुकर्ण ( शुक्र, १२/०७/२००७ - २३:२९) .कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी "ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.
१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता. अमरीश पुरीच म्हणा ना! त्यांनी तिचा हात वृषभकुमार नावाच्या बैलाच्या हाती देण्याचे ठरवले होते. मंदोदरी दिसायला फारच सुंदर. वार्यालाही तिच्या रेशमी काळेभोर कुंतलाशी खेळावे वाटे. तिच्या भ्रुकोदंडांना पाहून अर्जुनाचे गांडीवदेखील शरमेने खाली पाहू लागले असते. तिचे गाल लालबुंद सफरचंदांची आठवण करून देत असत तर डाळिंबाचे दाणे शाखेमध्ये उभ्या राहणार्या स्वयंसेवकाप्रमाणे रांगेत एकामागे एक "दक्ष" उभे होते. तिचे ओठ... हाय... तिच्या ओठांकडे पाहून प्लवंगेंद्राला मदिरेची आठवण होई तर तिची नाजूक मान पाहून त्याला सुरईची म्हणजे पुन्हा मदिरेचीच आठवण होई. बेवडा कुठला! आता वर्णनासाठी मी जास्त खाली जात नाही. काय ते तुम्ही समजून घ्या!
हा तर आपले अमरीश पुरी ऊर्फ मेंढकोबांनी मंदोदरीचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि प्लवंगेंद्राला सांगितले की त्याने जर वृषभकुमाराइतके मोठे होऊन दाखवले तर मंदोदरी त्याचीच. प्रेमात शहाणी माणसे देखील 'चड्डीत राहत' नाहीत तर बेडकाचे काय. एखाद्या पंपाने सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी तद्वत प्लवंगेंद्र फुस्स फुस्स करत स्वत:च्या शरीरामध्ये हवा भरत गेला. प्रेमात दिवाणी झालेली मंदोदरीचे मुखकमलही प्लवंगेंद्राच्या शरीरासोबत फुलत होते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. नियतीने कपाळावर जे लिहिले आहे त्याला कोणी टाळू शकतो का? फुल्ल हवा भरलेल्या टायरला पंक्चरच्या दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला ४३ खिळ्यांपैकी नेमका खिळा लागावा आणि टचकन टायर फुटावा त्याप्रमाणे प्लवंगेंद्र फुटला. वृषभकुमारासारख्या धटिंगणाला नाजूक मंदोदरी मिळाली आणि प्लवंगेंद्राच्या फोटोला हार मिळाले.कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!
२. नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.
नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!
३. भस्मासुराची कथा: ही भारतीय कथा असल्याने अभिजात नसावी. त्यामुळे कथा सर्वांनाच माहिती असावी. मोहिनीवर लाईन मारण्यात दंग झालेल्या भस्मासुराला कसलेही भान राहिले नाही आणि स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्वत:चे भस्म करून घेतले. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत.
उपसंहार:
शाळेत असताना आम्हाला व्याकरणामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होता. इयत्ता सातवीपर्यंत आमच्या वर्गात फक्त वर्गबंधू असत. सहशिक्षणाचे पुरोगामी वारे व परिणामी वर्गभगिनी वर्गात नसल्याने आम्ही मास्तरांकडेच लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेत होतो. (आठवीपासून वर्गभगिनी वर्गात आल्या नि शिक्षण बोंबलले! ते असो.) तर अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना आमचे मास्तर खूप मस्त उदाहरण देत असत.
"दिडकीचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, भावोजींची दाढी झाली, उरले तेल झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला"
सुंदरच. अगदी +१.
भविष्यकाळात मराठी भाषेचे अलंकार शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आली तर दिडकी, ओहोळ वगैरे शब्दांचे अर्थ सांगताना घाम फुटायचा ह्या विचाराने झोप येत नव्हती. तरी बरे मुले आजकाल कॅमलिन कंपनीचे साहित्य वापरतात त्यामुळे उंट म्हणजे काय हे सांगायला अडचण येणार नाही. पण आमची सर्व काळजी आता मिटली आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे अतिशय सुरेख उदाहरण आमच्यासमोर आहे.
होय , हा मराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक आहे. आजवर ऑनलाइन दिवाळी अंक अनेक झाले. पण प्रत्येकानं स्वतःच आपली कुंपणं आखून घेतली होती. आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आहे. मराठी ऑनलाइन म्हणजे फुटकळपणा , या समजाला मुळापासून गाडून टाकत , दर्जाच्या मैदानात छापील दिवाळी अंकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचा हा प्रयत्न आहे.
अधिक माहितीसाठी हे पहा.
स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक. त्यांनी राबवलेले दिवाळीअंकांसारखे सुंदर उपक्रम. अतिशय गुणी माणसांशी ऑनलाईन ओळखी, गप्पाटप्पा, काव्यशास्त्रविनोद करण्याची दिलेली संधी. हे सगळे फुटकळ.
आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का?
असो.
आम्हाला जास्त काही म्हणायचे नाही. त्या वृत्तपत्राला एकच सांगायचे आहे.
तुम्ही ओळखलेच असेल काय ते.
बरोब्बर. 'चड्डीत राहा ना भो'
आपला,
महाराष्ट्रकुमार आजानुकर्ण राऊत
हस्ताक्षरावरुन स्वभाव
प्रेषक महेन्द्र ( बुध, १२/०५/२००७ - १९:३२) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?
आपला
एक साधारण सदस्य!
रोशनी ४
प्रेषक महेन्द्र ( सोम, १२/०३/२००७ - १६:३५) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!
तात्या रौशनी.. ..... चे काय?
प्रेषक महेन्द्र ( शुक्र, ११/२३/२००७ - १९:१७) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?

