मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

मार्गी ·

मार्गी 23/08/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा 25/08/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी 04/02/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस 04/02/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी 12/02/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.

सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

मार्गी ·

कंजूस 03/03/2025 - 15:06
उपक्रम आवडला. तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.

In reply to by मनो

मनो 14/03/2025 - 07:08
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते. https://theskylive.com/planetarium

चौथा कोनाडा 10/03/2025 - 19:34
सुंदर ! सुदिशा उपक्रम भारीय ! आपण अशा उपक्रमांसाठी आपला बहुमुल्य वेळ देत आहात हे कौतुकास्पद आहे ! || पु उ शु ||

चेतन 13/03/2025 - 12:40
सुंदर उपक्रम नवशिक्यांसाठी छंद म्हणुन काहि टेलिस्कोप सुचवाल. खालच्या लिंक मधिल टेलिस्कोप ठिक आहे का? href="https://www.amazon.in/Artnery-Telescope-Astronomical-Telescope-Magnification/dp/B0D7CX816X">

In reply to by चेतन

मार्गी 13/03/2025 - 14:38
@ चेतनजी, धन्यवाद! :) हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो. पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.

विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic

चामुंडराय ·

काळाच्या पडद्याआड चालले आहेत. जसे, टिपकागद,बोरू,दौत,टाक,निब, पुस्ती,कित्ता,,शाई,पाटी,फळा , आणी बरेच काही. छान लेख खुप सार्‍या आठवणी जागवून गेला. पाटी वर प्रथम श्री लिहून आयुष्य सुरू झाले ते आता व्हाईस कमांड वर येवून पोहचले आहे. कधीकाळी निळ्या तांबड्या शाईने बरबटलेले हात आता भ्रमणध्वनीवर टंकाळत असताना दुखतात,बोटं, कडा कडा मोडावी लागतात. फ्रोजन शोल्डर सारखे नवीन शब्द कानावर पडतात. असो ,लिहीत बसलो तर एकावर एक फ्रि सारखे लेखावर लेख पडेल. छान, आवडले.

गवि 27/01/2025 - 09:15
हे अगदीच सत्य आहे की लिहीणे हळुहळू मागे पडत आहे. माझ्या बाबतीत खुद्द सांगायचे तर सलग काही हाताने लिहायची वेळ आलीच तर एकसारखे अक्षर काढून एक ओळ देखील लिहीणे अत्यंत कठीण जाते कारण पंधरा वीस वर्षात पेन पेन्सिलीने काही लिहायची वेळ आलेलीच नाही. नोट्स सुद्धा आवश्यक झाल्यास टाईप करूनच ठेवल्या जातात. सर्व लिखाण मेंदूतून थेट कीबोर्डद्वारेच बाहेर पडते. आपण शाळा कॉलेजात, परीक्षेत, अभ्यास करताना वगैरे वेळी जे रिमे भरभरून लिखाण करत होतो ते आठवले की आता एक ओळ देखील लिहीताना बोटे वाकडी होतात ते पाहून अपंगत्वाचा भास होतो. हे धक्कादायक आहेच. पण स्वीकारले आहे. टायपिंग करणे हे कौशल्य मात्र नव्याने डेव्हलप झाले आहे आणि काही कोर्स वगैरे न करता आपोआप वेगवान सफाईदार टायपिंग करता येते याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मला वाटते आयुधे बदलत आहेत. लिहीतो हे महत्वाचे. लिहिता मेंदू तोच आहे. मग ते लेखन पेनाने असो अथवा बटणांनी.

लेख उत्तम. हस्ताक्षर दिनाच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. मला मात्र वही, कागद, पेन यांचा नाद सुरुवातीपासून आहे. हस्ताक्षरही चांगलं आहे. आता वयपरत्वे जरा घोळ व्हायला लागले आहे पण अधुन-मधून लिहिते असतो. सुंदर हस्ताक्षर आवडतं. >>> तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? होय. >>>पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? होय. >>>> एखादे पत्र लिहून पाठवता का ? आता पत्राचे दिवस कुठें राहिले राव. पूर्वी नातेवाईकांना पत्र लिहिली आहेत, त्यांचीही यायची. तरुणपणात मैत्रीणीला लै म्हणजे लै पत्र लिहिली आहेत. पत्रांचा चांगला प्रवास होता. इकडून तिकडे, तिकडून इकडे. भरपूर सांभाळुनही ठेवली होती. पण घर संसारात हळुहळु कोणीतरी हितचिंतकांनी नष्ट केली असावीत असा दाट संशय आहे, आमचंही अक्षर बरं आणि त्यांचं तर, मोत्यासारखं सुंदर. चांगले दिवस होते साले ते. कोणी काढला यार हा पत्राचा विषय. माणूस हळवा होतो ना. ः( खरीखुरी रोजनिशी लिहिता का ? काही महत्वाच्या नोंदी, काही मन की बात, आवडलेल्या पुस्तकातल्या ओळी. कधी डायरीवर नाव, गाव, स्वाक्ष-या, आपलं बरं चाललेलं असतं. लेखनाच्या बाबतीत. -दिलीप बिरुटे

Bhakti 27/01/2025 - 11:33
"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात. होय मी कायम पेनाने कागदावर लिहिते.खरतर मला त्याशिवाय करमतच नाही.टाईप करायचा उलट खुप कंटाळा येतो.मी नोट्स पण आधी लिहून काढणे.गुगल लेन्सने लिहून काढलेला मजकूर आपोआप टाईप करून मिळतो हे माझ्यासाठी वरदान ठरले आहे.कारण टाईप करताना भावना क्षणिक भडक वरवर वाटतं राहतात(वैयक्तिक मत).पण मी जेव्हा डायरीत खूप विषयांवर लिहिते तेव्हा खरे समाधान मिळते. रच्यकाने माझा अक्षर खुप सुंदर आहे.यासाठी शाळेत असतांना माझ्या पालकांनी मला स्वतंत्र हस्ताक्षराचा वर्ग लावला होता.अजूनही मला ते सर्व आठवते.खरोखर आयुष्यातली एक सुखद कला मी मनापासून शिकले.माझ्या लेकीला पण असा हस्ताक्षर वर्ग लावणार आहे.

In reply to by Bhakti

स्वधर्म 27/01/2025 - 21:44
नवीन माहिती दिल्याबद्दल. करून पाहिले. ८०% तरी मजकूर येतोय. 'अक्षर' सुधारलं तर आणखी जास्त फायदा होईल असे वाटते.

लेख आवडला पण पटला नाही.
हस्तलिखित लिखाण कमी होत आहे आणि दुर्दैवाने त्याचे महत्व देखील कमी होत आहे. धुळपाटीवर अक्षरे गिरवण्यापासून झालेली सुरवात पुढे पाटी-पेन्सिल, दौत-टाक, बोरू, शाईचे फाऊंटन पेन, बॉल-पॉईंट पेन, फेल्ट टीप पेन, स्टायलस् पेन इत्यादी पर्यंत येऊन पोहोचली आहे.
असे फरक सगळ्याच क्षेत्रांमध्ये झाले आहेत. उदाहरणार्थ पूर्वी सगळीकडे पायी जायचे, मग घोडे- घोडागाडी, बैलगाडी असे करत करत गाड्या/ट्रेन/ विमाने इत्यादी. पूर्वीच्या काळी बैलगाडीने मुंबईहून पुण्याला जायला एखादा दिवस लागत असावा. तो प्रवास आता कितीतरी अधिक वेगवान झाला आहे ते चांगले की बैलगाडीच्या प्रवासात जी मजा होती ती एक्सप्रेसवेवरून जाताना नाही असे म्हणत उसासे टाकायचे? पूर्वीच्या काळी घोडा किंवा बैलाबरोबर कसे एक जवळचे नाते तयार व्हायचे ते आता शक्य नाही म्हणून उसासे टाकायचे का?
कार्यालयीन कामकाजात टंकलेखन यंत्र वापरणे सुरु झाल्यावर हस्तलिखित लिखाणापासून दूर जाणे सुरु झाले आणि आता तर सर्वत्र संगणकाचा, भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून लिखाण केले जात आहे, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल.
हा काळाचाच महिमा आहे. जे लोक काळाबरोबर पुढे जात नाहीत त्यांचे नुकसान होते हे अनेकविध क्षेत्रांमध्ये अनेकविध वेळा बघायला मिळाले असावे.
डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता.
खरं सांगायचं तर मला विज्ञानाची आवड नाही. विज्ञान महत्वाचे आहे हे नक्कीच मान्य आहे पण मला स्वतःला विज्ञानाची आवड नाही आणि त्यात गतीही नाही. त्यामुळे असा प्रयोग केला गेला असेल तर त्याला आव्हान वगैरे देत नाहीये. पण एक गोष्ट समजत नाही. लिहिताना डोळे, बोट आणि हात यांच्या हालचालींचा समन्वय असतो हे अगदी १००% मान्य. पण तसा समन्वय टाईप करताना नसतो हे मात्र पटले नाही. QUERTY हा जगन्मान्य कीबोर्ड वापरून एखादा शब्द टाईप करायचा असेल तर आता आपल्याला ते कीबोर्डकडे न बघताही बर्‍यापैकी अचूकपणे टाईप करता येते. पूर्वी आपण काय लिहित आहोत ते कागदावर दिसायचे त्याप्रमाणे आपण काही बोटांनी टाईप करत आहोत ते आता स्क्रीनवर दिसत असते. मग डोळे, बोटे आणि हात यांच्या हालचालींचा समन्वय कसा नाही म्हणता येईल? फार पूर्वी म्हणजे अगदी वेदकाळात प्राचीन भारतात सगळे काही मुखोद्गत करायची परंपरा होती. अशा गोष्टी मुखोद्गत केल्या की मग मेंदू अधिक तरतरीत होईल, बुद्धी अधिक तल्लख होईल हे अगदी १००% मान्य. पण अशा किती गोष्टी एक माणूस मुखोद्गत करू शकेल? ज्या गोष्टी अगदी थोड्या लोकांना माहित असतील ते लोक गेल्यानंतर ते ज्ञान नाहिसे व्हायला नको म्हणून त्यांच्या हयातीतच ते ज्ञान पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायची प्रक्रीया सुरू करायला लागत असेल. कागद आणि मुद्रणकलेचा शोध लागल्यावर ते कष्ट वाचले आणि परत त्याच त्याच गोष्टी करत राहायची गरजही संपली. आता मुद्रणकलेचा आणि कागदाचा शोध लागल्याने पूर्वी कशी बुद्धी तल्लख होती असे उसासे टाकायचे की नव्या नव्या गोष्टी शिकायच्या/ समजावून घ्यायच्या मागे लागायचे? माझा दावा आहे की मुद्रणकलेचा शोध लागला नसता तर मनुष्यजमातीला आता ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्या फारच थोड्या, एखाद्या वेळेस एखाद टक्काच गोष्टी माहित असत्या. कारण सगळ्यांचा वेळ आणि उर्जा त्याच त्याच गोष्टी पाठ करण्यात गेली असती. समोर त्या क्षेत्रातील माहिती असलेला कोणी नसेल तर मला ती गोष्ट कळणे अशक्य. एक उदाहरण द्यायचे झाले तर मला समजा अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे विचार माहिती करून घ्यायचे असतील तर मी स्वतः त्यांच्यासमोर पाहिजे किंवा त्यांचे विचार कळलेला कोणी माणूस माझ्यासमोर पाहिजे. आणि कानगोष्टींमध्ये होते त्याप्रमाणे एकाने दुसर्‍याला मिल्टन फ्रीडमन नक्की काय म्हणाले हे सांगताना स्वतः फ्रीडमन काय म्हणाले हे बाजूला राहून जेव्हा ते ९९९ वा माणूस १००० व्या माणसाला सांगेल तेव्हा त्या विचारांचे रूपांतर फ्रीडमनच्या विचारांमधून कार्ल मार्क्सच्या विचारात झालेले असेल हा धोका पण आहेच की. तेव्हा पाठांतर करून बुद्धी तल्लख ठेवण्यापेक्षा पुस्तके हातात असणे हे कधीही चांगले नाही का? भले नाही बुद्धी तितकी तल्लख राहिली तरी चालेल पण पाहिजे त्या विषयांवरील माहिती माझ्या हाताशी हवी. नुसती बुद्धी तल्लख ठेवायची पण पाहिजे त्या विषयावरील मटेरिअल समोर नसेल तर उपयोग काय त्या तल्लख बुद्धीचा? आता हेच म्हणणे पुढे इंटरनेट आणि सगळे काही टाईप करायच्या बाबतीत पुढे नेता येईल. जुन्या पुस्तकाची जगात अगदी एक प्रत शिल्लक राहिलेली असेल तरी ते डिजिटाईझ करता येऊन त्याचा वापर जगभरातून कुठूनही करता येईल. हे सगळे करताना सुंदर हस्ताक्षर वगैरे गोष्टी गमावल्या का? नक्कीच. जशा पूर्वी पाठांतर करून बुद्धी तल्लख असायची तो भाग गमावला त्याप्रमाणेच. त्याचा विषाद करायचा का? वाटत नाही. आता आपण हस्ताक्षर ते टायपिंग या 'ट्रान्झिशन' काळात आहोत म्हणून आपल्याला त्या गोष्टींचे दु:ख कदाचित होईल. पण पुढील पिढ्या त्याच वातावरणात जन्मतील आणि लहानाच्या मोठ्या होतील त्यांना त्याचे काहीही वाटणे कठीण आहे. पाचशे वर्षांपूर्वी माझे खापर खापर खापर खापर पणजोबा कसले तल्लख होते- कशी चार पुस्तके त्यांनी तोंडपाठ केली होती तसे मला आता येत नाही याचा विषाद २०२५ मध्ये किती जणांना होतो/होत असेल? त्याप्रमाणेच आणखी काही वर्षांनी माझ्या वडिलांचे/आजोबांचे हस्ताक्षर किती सुंदर होते तसे माझे नाही याचा विषाद वाटणेच बंद होईल.
हस्तलिखित लिखाणामुळे शिकण्याची क्षमता सुधारते, स्मरणशक्ती, सर्जनशीलता, स्व-अभिव्यक्ती वाढते, ज्ञान-वृद्धी होते, भाषा-प्रभुत्वात वाढ होऊन संज्ञानात्मक कौशल्यांमध्ये (cognitive skills) वाढ होते, संवादातील वैयक्तिक आणि भावनिक संबंध वाढतात असे अनेक फायदे दिसून आले आहेत.
पाठांतर करायचे असेच कोणते कोणते फायदे होते असे पाठांतर- ते मुद्रण या ट्रान्झिशन काळात काही लोक म्हणत असतीलच.
हस्तलिखित लिखाण न करणे म्हणजे केवळ वैयक्तिक कौशल्याचा ऱ्हास नव्हे तर आपले व्यक्तिमत्व, आपल्या माणूसपणाचा काही भाग हरवण्यासारखे आहे.
का? पटले नाही.
हस्तलिखित पत्रातून आपल्याला आपले विचार, भावना जास्त सक्षमपणे व्यक्त करता येतात.
हे पण पटले नाही. शेवटी आपल्याला काय लिहायचे आहे हे मेंदू ठरवितो. तुम्ही ते कागदावर जेल पेन वापरून लिहा की दौत आणि पेन वापरून कागदावर किंवा झाडाच्या पानावर लिहा की टाईप करून लिहा त्याने काय फरक पडणार आहे? शेवटी कागद/झाडाचे पान किंवा टाईप करणे हे साधन आहे साध्य नाही.
कित्येक पत्रे “मर्मबंधातली ठेव” असल्यासारखी जपून ठेवली जातात.
सहमत पण आताच्या काळात अशा इतर गोष्टी मर्मबंधातील ठेव असल्यासारख्या जपून ठेवल्या जात नाहीत का? जाऊ शकत नाहीत का? माझ्या आईचे साधारण १४ महिन्यांपूर्वी निधन झाले. मी अजूनही मधूनमधून तिने पाठविलेले व्हॉट्सअ‍ॅप वरील टाईप केलेले मेसेज वाचतो, व्हॉईस मेसेज ऐकतो. त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी मर्मबंधातील ठेव नाहीत का?
इतिहास काळात लिहिलेली पत्रे इतिहासकारांना इतिहासात डोकावण्यास मदत करतात.
आताचा वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो. भविष्यात आताच्या काळात लिहिलेली पत्रे नसतील पण ई-मेल असतील किंवा केलेली भाषणे आणि ती युट्यूब किंवा अन्यत्र कुठे अपलोड केली असतील तर ती पण इतिहासात डोकावायला मदत करणार नाहीत का? जॉन केनेडींनी आणि रॉनाल्ड रेगननी अध्यक्षपदाची शपथ घेताना केलेली भाषणे किंवा स्टिव्ह जॉब्सने स्टॅनफर्डमधील दीक्षांत समारंभात केलेले भाषण मी आतापर्यंत शंभरेक वेळा नक्कीच ऐकले असेल. मी काही इतिहास संशोधक वगैरे नक्कीच नाही. मी एक सामान्य माणूस आहे. पण ज्यांना असे संशोधन करायचे आहे त्यांना पूर्वीच्या काळच्या पत्राप्रमाणेच आताच्या काळात ई-मेल किंवा भाषणे इतिहासात डोकावायला का मदत करणार नाहीत?
SMS आणि सोशल मीडिया नव्हते त्याकाळी कित्येक प्रेमी युगुलांना संपर्कासाठी "प्रेमपत्राचा" आधार असायचा.
आता तसा आधार व्हिडिओ कॉलचा असतो.
हस्तलिखित लिखाण हरवणे, कमी होणे हे सद्य काळात अपरिहार्य आहे.
अरेच्चा. मग जे अपरिहार्य आहे ते मान्य करून पुढे जाणे श्रेयस्कर नाही का?
"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात.
या दोन्ही गोष्टी करत असतो पण कागदावर नाही तर ऑनलाईन. रामदासांनीही दररोज काहीतरी लिहा आणि वाचा असे म्हटले होते. कागदावरच लिहा ऑनलाईन लिहू नका असे कुठे म्हटले होते? :) :)
हाताने लिहिण्याची कला लोप पावत आहे ह्या बद्दलचा हा लेख मी हस्ताक्षरात न लिहिता बोटाक्षरात, थम्बाक्षरात किंवा कळफलकाक्षरात (कीबोर्डाक्षरात) लिहिला आहे, हा मोठा विरोधाभास आहे, नाही का?
व्हॉट्सअ‍ॅपवर असेच विरोधाभास अनेकदा फिरत असतात. पत्रे लिहायची कला लोप पावली म्हणून उसासे टाकणारे फॉरवर्ड येतात कुठे? तर व्हॉट्सअ‍ॅपवर :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संपूर्ण प्रतिसाद आवडला. तेव्हा पाठांतर करून बुद्धी तल्लख ठेवण्यापेक्षा पुस्तके हातात असणे हे कधीही चांगले नाही का? ह्यावरून आठवले. मुहम्मद पैगंबरांच्या निर्वाणनंतरा ९० वर्षांनी कुराण लिखाणबद्ध केले गेले. कुराण लिखाणबद्ध करायची गरज का पडली तर कुराण पाठ असलेले अनेक लोक युद्धात मारले जायचे, एकदा तर कुराण पाठ असलेले ४०० लोक एकाच युद्धात मेले. मग कुराण लिहून ठेवण्याचा निर्णय झाला. बाकी मी डेन्मार्कला गेलो होतो, तेव्हा मला चित्रगुप्त काकानी तिथे रोजनीशी लिही असा बहुमुल्य सल्ला दिला होता! त्या प्रमाणे मी लिहिले. ते आता १ वर्षानेही वाचले की पुन्हा मी तिथे फिरून येतो. :) त्या नंतर मी भारतात आल्यावर रोजनीशी लिहायचे ठरवले जी रोज लिहू लागलो. पण लिहायला रोज अर्धा तास लागायचा नि हात प्रचंड दुखू लागायचा. त्यामुळे थांबवले!

स्वधर्म 27/01/2025 - 17:29
लेख आवडला. हाताने लिहिलेले जास्त थेटपणे उतरते असे वाटते. ते अधिक आनंददायकही आहे, याबरोबर सहमत. इंग्रजी टायपिंग तरी सोप वाटतं, मराठी अवघड. आपण लिहिलेल्या खालील माहितीचा संदर्भ मिळू शकेल का? वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली. नंतर या मुलांना एमआरआय स्कॅनिंग करून तपासले. जी मुलं हस्तलिखित पद्धतीने शिकली त्यांचा लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये जास्त सहभाग होता. डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता.

लहानपणी मला हाताने लिहिताना त्रास व्हायचा. शाळेतल्या बेंचवर बसुन कधीही नीट लिहिता आले नाही. नेहेमी मांडीवरच पॅड घेऊन लिहायचो.काही वेळाने हात आखडायचा आणि वेगाने लिहीता यायचे नाही. मराठी विषयाचा पूर्ण पेपर सोडवणे नेहेमी आव्हानात्मक व्हायचे. पुढे कॉम्प्युटर आल्यानंतर व त्यावर लिहिण्याची सवय झाल्यानंतर ह्या समस्येतुन सुटका झाली.

बाकी हस्तलिखिताचा मला एक फायदा झाला होता. इंजि. चे माझे ३ पेपर बाकी होते. अभ्यास करायची इच्छा नव्हती. पाठांतर लक्षात राहत नव्हते. मग मी प्रत्येक विषयाचे ६ प्रश्न घेतले. (त्यातले ४ प्रश्न जरी लिहिले तरी विषय पास) नी १०० पानांच्या वहीत भरभर त्या सहा प्रश्नांचे उत्तर लिहीत सुटलो! पूर्ण १०० पाने अस करून भरली. दुसऱ्या दिवशी पेपरला मी तेच प्रश्न आले होते निदान ६ पैकी ४ तरी यायचे. मी काय लिहितोय हे मला कळत नव्हते पण हात भरभर चालत होता! असे करून तिन्ही विषय काढले! ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म 28/01/2025 - 16:18
एक किस्सा म्हणून ठीक, पण अशा प्रकारे पास होता येणे ही आपली शिक्षणव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, हेच दाखवतो. नवल नाही की आपली लक्षावधी मुले भारत सोडून परदेशात का शिकायला जातात, याचे कारणही हेच आहे.

वामन देशमुख 28/01/2025 - 16:51
स्मरणरंजण आवडले.
हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic
कालानुरूप असे स्थित्यंतर होणे, होत राहणे स्वाभाविक आहे. काहीजणांना विषाद वाटणे हेही स्वाभाविक आहे. तथापि अशी स्थित्यंतरे ही अपरिहार्य आहेत. जे त्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत ते मागे पडतात. त्याशी जुळवून घेणारे टिकून राहतात. त्यात प्राविण्य मिळवणारे प्रगती करतात. स्थित्यंतर हे संकट की संधी हे ज्याचे त्याने ठरवायचे.
वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली.
GitHub वर दररोज कोट्यवधी ओळींचा कोड ढकलला जातो. तो कीबोर्ड वर टंकूनच लिहिलेला असतो. वही-पेनचा तिथे काहीही संबंध नसतो. तो कोड लिहिणारे लोक बुद्धीमंत नसतात का? आणि त्या तुलनेत वही-पेन घेऊन असे किती जण असे किती लिखाण दररोज करत असतील? --- "कथा, कादंबऱ्या, ललित, गद्य, माहितीपर इत्यादी लिखाण करणे" आणि "सॉफ्टवेअर लिहिणे" यांपैकी कोणत्या कामाला अधिक बुद्धी लागते या मोहोळावर मी दगड मारणार नाही! ;-)

In reply to by वामन देशमुख

गवि 28/01/2025 - 19:46
आता मात्र AI ने कोड लिहून देणे आणि आपण फक्त बारीकसारीक बदल करणे असे हळुहळू रूढ होत चालले आहे. तोंडाने बोलून टेक्स्ट बनणे हेही बरेच प्रगत होत चालले आहे. मुळात हाताने, आवाजाने किंवा प्रॉम्प्ट देऊन कसे का असेना, मुळात मनुष्याने काहीतरी लेखी नोंदवणे याची गरजच कमी होत जाऊ शकते. त्यावेळी मात्र स्नायू, फाईन मोटर स्किल्स वगैरे चर्चा पुन्हा होतील.

कथा, कादंबऱ्या, ललित, गद्य, माहितीपर इत्यादी लिखाण करणे" आणि "सॉफ्टवेअर लिहिणे" यांपैकी कोणत्या कामाला अधिक बुद्धी लागते या मोहोळावर मी दगड मारणार नाही!
तुम्ही पाच सॉफ्टवेअर लिहिणार्‍या आणि प्रसिद्ध असणार्‍या व्यक्तींची नावे सांगा बर पटापट. इथल्या किमान ५-१० व्यक्तींना तरी त्यांची नावे माहित असली पाहिजे एवढीच पुर्वअट आहे.

चौथा कोनाडा 01/02/2025 - 18:48
अगदी खरंय ... हळूहळू हस्ताक्षर लुप्त होत चालली आहेत... काळ किती ही बदलला तरी पण मला वाटतं ही कला आपण आप्ल्या पुरती तरी टिक्वावी ... मला हातानं लिहायलं खुप आवडतं ... संधी मिळेल तशी अक्षरं खरडत बसतो, अनेक कॅलीग्राफर कलाकारांचा मी फॉलोअर आहे ! एवढ्या. कॅसेट्स, सीडी, अशी अनेक माध्यमं आली पण प्रत्यक्ष गायकांचं गाणं वेगळंच सुख देऊन जात तसं हस्ताक्षर !

चामुंडराय 02/02/2025 - 23:50
प्रतिसाद देऊन आपापली भूमिका आणि ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आभार. वैयक्तिकरित्या मला स्वतःला पेन वापरून हाताने लिहायला आवडते. जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा हाताने लिहिण्याचा प्रयत्न करतो. गेले काही दिवस डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. अक्षर कसे लिहायचे ते मेंदूला माहीत आहे परंतु हात आणि बोटांच्या स्नायूंना सराव नाही त्यामुळे लिहिताना मजेशीर वाटते. मेंदूत न्यूरॉनच्या नवीन जोडण्या तयार होण्यासाठी मदत होते असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते.

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ... तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का? आजकालच्या डिजिटल युगात ह्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश 'नाही' अशीच असतील. पेन वापरून कागदावर लिहिण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. फार तर थोडे scribbling करत असाल. एव्हढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी स्वाक्षरीची देखील गरज उरलेली नाही. PIN आणि OTP किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत वापरून सर्वत्र व्यवहार होत असताना धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची वेळ फारशी येत नसेल.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

मार्गी ·

परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही. सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही. मला माझ्या परिक्षेची आठवण झाली. As per my understanding examination is in three stages. Identification of material, -is anyone suitable or otherwise. Testing Quality of material Confirmation- Yes he real material . However, it is big subject and cannot be covered in few words. What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise. How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.

NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती. NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.

"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?

In reply to by अनामिक सदस्य

नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते. आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम. प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही. सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे. वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे. सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत. हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल. सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना? असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची. त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे. बाकी, वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते. नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.

In reply to by मुक्त विहारि

होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल. आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..

In reply to by कर्नलतपस्वी

नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता. "खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही. तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?

मार्गी 14/01/2025 - 15:10
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत. @ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं. धन्यवाद.

नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

मार्गी ·

श्रीगुरुजी 22/12/2024 - 20:45
१५३, ३७०, ३७१ व ४०७ ह्या संख्यांमध्ये एक गणिती गंमत आहे, ती कोणती? सर्व संख्या या त्या संख्येतील तीनही अंकांच्या घनाची बेरीज आहे. मी स्वतः एका आय आय टी जे ई ई प्रशिक्षण संस्थेत गणित शिकवितो. तसेही अंकांची आकडेमोड मला थोडी लवकर जमते. त्यामुळे उत्तर सुचलं.

✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)