टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
बालगीत
मी नाही अभ्यास केला
प्रेषक देवदत्त ( मंगळ, ०३/२५/२००८ - २१:०७) .लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल.
)
दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
लेखक/कवी: अनामिक
(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
मिसळपाव- एक कुरण..
प्रेषक प्राजु ( सोम, ०२/२५/२००८ - ०२:०२) .इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..
मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..
ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..
ऐतिहासिक झाली प्रियाली, सहज्-सर्किट इथे रमती,
जर्मनीच्या गमती जमती, सुगरण होई दोन्ही स्वाती..
सुर्याला ठेऊन सर्वसाक्षी, कोलबेरही फोटो काढतो,
बेसना सारखी लाडवी गझल सुमार म्हणत केशव फाडतो..
स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..
सागर, चतुरंग, धनंजय काळा, व्यक्त होऊ पाहणार अव्यक्त,
चारोळ्या गुंफत यांच्या समवेत सुनितही होई मुक्त..
भडकम्कर तो नदिपरी संथ, 'राज' साठी इनोबा तडफडे
आनंदाचे यात्री अन् घन, 'सकाळा'त अभिजीतच्या आनंदीआनंद गडे..
काम नको टाईमपास करा, सदान्कदा सांगे वरदा..
प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
चित्रमुद्रिता राजमुद्रा, सृष्टीचे लावण्या घाली पसारा,
वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा..
आठवणींत भिजतो सतिश, गोडबोलत अशोक लिहितो,
मनिष, धृव, मानस अधे मधे, झकासही कोल्हापूरला नेतो...
धोंडोपंतांचे ग्रहतारे, गुंडोपंतांना नौशिया भरे,
राजे निघाले सफरीवरी, प्रमोदांना मात्र देव स्मरे..
पुष्कर, किशोरी नित्याचेच, लंबूटांग, गंधार नेवेही या
सुनिल, हर्षल, मदनबाण, माहिती प्रसारण माझी दुनिया..
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.
- (कुरणातली शेळी)प्राजु
परीचे पशुधन
प्रेषक धनंजय ( शनी, ०२/०९/२००८ - ०९:४०) .*****************
परीच्या गोठ्यात गोगलगाय
तिच्या दुधाची चंदेरी साय
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
***
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा
बाबड्याला लागतो खुराक थोडा
लगाम न लागे, कधी न ओढा
उधळे तेव्हा, कधी न झोडा
*****************
कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला
प्रेषक धनंजय ( मंगळ, ०२/०५/२००८ - २१:०२) .कोल्हापूरचा कोल्हे वाणी
पोलादपूरला सोले आणी!
सल्ला सच्चा सोळा आणे
सोलापूरला पोलाद नेणे
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र
प्रेषक धनंजय ( मंगळ, ०२/०५/२००८ - ०७:४९) .लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र
अ अ अनशापोटी
आ आ आवळा खाल्ला
इ ई इथे बसलाय्?
उ ऊ उड्या मारतोय्?
ए ए एकदा सांगून
ऐ ऐ ऐकत नाही!
ओ ओ ओरडतोय्
औ औ औषध द्याला -
अं आं आंबटशोक
अ: आहा आंगलट आला!
छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
(नाठाळ मुलांसाठी) बालकविता
प्रेषक धनंजय ( शुक्र, १२/२८/२००७ - ०२:४०) .अरे अरे शेंबड्या गंपा
तुझ्याकडे रुमाल नाही?
तो कशासाठी बाप्पा -
शर्टाला जर आहे बाही.
गाल फुगवून बसली आहे
कोपर्यामध्ये रुसूबाई
रडून कहर केल्यापेक्षा
परवडले हे रुसू बाई
लवकर लवकर उठायाचे
शाळेत जायचे झटपट आटपून
कशाला या उठाठेवी -
मास्तर रोजच काढणार झोडपून
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
हस्ताक्षरावरुन स्वभाव
प्रेषक महेन्द्र ( बुध, १२/०५/२००७ - १९:३२) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?
आपला
एक साधारण सदस्य!
रोशनी ४
प्रेषक महेन्द्र ( सोम, १२/०३/२००७ - १६:३५) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!
तात्या रौशनी.. ..... चे काय?
प्रेषक महेन्द्र ( शुक्र, ११/२३/२००७ - १९:१७) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)
प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, ११/१५/२००७ - ०९:५४) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?
नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."
असो.
आपला,
(स्वर्गवासी नारदमुनी) आजानुकर्ण
