ही कविता फॉरवर्ड करा

Primary tabs

vcdatrange's picture
vcdatrange in जे न देखे रवी...
12 Jul 2017 - 6:53 pm

ही कविता फॉरवर्ड करा

ही कविता फॉरवर्ड करा,
नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर,
तुमच्या घरात साप येईल

पाच जणांना फॉरवर्ड करा,
हरवलेली वस्तु सापडेल
नाही केली तर,
भुत तुमच्या कानाखाली झापडेल

दहा जणांना फॉरवर्ड करा,
सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर,
पाठीवर मार बेसूमार मिळेल

पंचवीस जणांना फॉरवर्ड करा,
स्टॉक मार्केट चढेल,
नाही केली तर
कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल

पन्नास जणांना फॉरवर्ड करा,
नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर,
सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल

शंभर जणांना फॉरवर्ड करा,
लॉटरी मिळून जाईल
नाही केली तर,
बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

कलाकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदडावी बाजूमौजमजा

प्रतिक्रिया

सुज्ञ's picture

13 Jul 2017 - 1:07 pm | सुज्ञ

ही कविता वाचू नका . नाही वाचलीत तर आयुष्य उत्तम होईल

चांदणे संदीप's picture

13 Jul 2017 - 1:42 pm | चांदणे संदीप

कल्पना आवडली!

Sandy

एकुलता एक डॉन's picture

13 Jul 2017 - 6:25 pm | एकुलता एक डॉन

हि हरीश दांगट ह्यांची कविता आहे ?

आगाऊ म्हादया......'s picture

13 Jul 2017 - 8:45 pm | आगाऊ म्हादया......

तुमची आहे?? की copy paste?