प्रकटन

माझी दिवाळी

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 7:21 pm

नमस्कार मिपाकरहो,

दिपावली अभिष्टचिंतन!

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादअनुभवप्रतिभाविरंगुळाहे ठिकाणसंस्कृतीकलापाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रण

चेलिया

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 11:18 pm

चेलिया
परवा रात्री माझी मुलगी बँकॉक वरून आपल्या मामा कडून परत येत होती तिला आणायला मी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेलो होतो. विमान पोहोचे पर्यंत तेथे काय करायचे म्हणून सहारला वळायच्या रस्त्यावर गाडी उभी केली आणि समोर असलेल्या हॉटेलात कॉफी प्यावी म्हणून गेलो. तेथे असलेल्या पेनिन्सुला आणि पर्शियन दरबार या तारांकित हॉटेलच्या शेजारी असलेले एक छोटेसे हॉटेल म्हणजे हॉटेल न्यू एअरपोर्ट.
सौ. बरोबर होती तिला घेऊन या हॉटेलात शिरलो. गल्ल्यावर एक मुसलमान मालक होता त्याने हसून स्वागत केले.

प्रकटनसमाज

मटणवाला

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 8:46 pm

चाळीच्या समोरचा रस्ता ओलांडला की मटणवाल्याचे दुकान दिसायचे. मटणवाल्याला आम्ही अमजद खानच म्हणायचो. कोंबडी आधी की अंडं आधी ह्या यक्षप्रश्नाप्रमाणे अमजद खान आधी की मटणवाला आधी या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळायचेच नाही. मी लहान असल्यापासून त्याला उभा किंवा चालताना किंवा इतर क्रिया करतांना बघीतलेलं नव्हतं. जेव्हा बघावं तेव्हा तो मटणाचे तुकडे करण्याच्या लाकडी ओंडक्यासमोर बसलेला असायचा. अंगात बोकडाच्या रक्ताने लाल झालेलं आणि कधी काळी विकत घेतलं तेव्हा सफेद असावं असा संशय येण्याजोगं बनियान आणि खाली लाल चौकडयाची लुंगी असा त्याचा अवतार असे.

प्रकटनसमाज

जोसेफिना आणि जेनचे किडनॅप

सत्या सुर्वे's picture
सत्या सुर्वे in जनातलं, मनातलं
11 Aug 2017 - 3:08 am

गोष्ट १९८७ सालची आहे. आम्ही एक नवीन बिल्डिंग बांधायला घेतली होती. पोलीस ठाण्याच्या पुढेच होती. कंत्राटदार केरळी नायर होता आणि बहुतेक कामगार ओरिसा मधील होते. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच जोसेफिना ह्या ख्रिस्ती महिलेचे घर होते आणि तिला जेन नावाची एक सुमारे १५ वर्षांची मुलगी होती. जोसेफिनाचा पती दुबई मध्ये कमला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. जोसेफिना अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि जेन वर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणून सर्वाना ठाऊक होती.

प्रकटनधर्म