फलज्योतिष

गुरूपुष्यामृत योग

लोकहो,

गुरूपुष्यामृत योग दिनांक ३१ जुलै रोजी येत आहे. यालाच गुरू पुष्य अमृतसिद्धीयोग असेही म्हणतात.

हा योग सायंकाळी ०७ वाजून २६ मिनिटांपासून ते शुक्रवारी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे.

आपला,
(पंचांगी) धोंडोपंत

पावसाची परी

काल मिपा वर पावसाची परी नावाने नवीन सदस्य आले. काही सदस्याना मीच पावसाची परी या नावाने लिहितो आहे असा संशय येउन
त्यानी परीला काही प्रश्न विचारले.
(सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला)
त्या परी साठी ही कविता

परीला एका छाळीत होते
दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक
परी बिचारी घाबरली पाहुन प्रत्येक
बावरली हिरमुसली ती..
उत्तरे देउन एकेक.
मग हांक मारली तीने देवांस.
देव ही नाही आला सोडवावयास
म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा
मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक


(अवांतरः प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय:)] )

शनी मंगळ युती

लोकहो,

ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत.

ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील.

दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल. त्यानंतर मंगळ पुढे निघून जाईल व दिनांक ३१ जुलै रोजी ही युती पूर्णपणे तुटेल.

Mars- Saturn conjunction हा सर्व पद्धतीच्या ज्योतिर्विदांनी एक जबरदस्त कुयोग मानलेला आहे. अत्यंत वाईट फळे देणारी ही युती आहे. या फळात मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात.

तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते.

सध्या कर्क, सिंह आणि कन्या या राशी साडेसातीत आहेत. त्या राशीच्या लोकांनी फार सावध रहावे. खरे तर सर्वांनीच सतर्क रहावे.

मागील वेळी जेव्हा ही युती झाली होती तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तेव्हा गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले होते. १२ जुलै २००६.

त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही गुहागरला होतो. दुपारी गुहागरहून गुरूपौर्णिमेनिमीत्त चिपळूणला आलो. आमच्या गुरूंच्या घरी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या तेव्हा त्या भीषण बॉम्बस्फोटाची दृष्ये पाहून हबकलो.

जसजसा मंगळ शनीच्या जवळ येतो तसतसा वातावरणात फरक पडतो. ब्रह्मदेशात येऊ घातलेले चक्रीवादळ याचीच सूचना देते आहे काय?

या दिवसांत सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा कोणी संशयास्पद रितीने वावरतांना दिसल्यास संबंधित शासकीय अधिकार्‍यांना त्याची त्वरीत सूचना द्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये. रात्रीचे प्रवास शक्य असल्यास टाळावेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, बगीचे, चित्रपटगृहे येथे वावरतांना आजूबाजूस बारीक लक्ष ठेवावे व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे.

आपला,
(सावध) धोंडोपंत

हे कधी तरी होणारंच होते.

सचीन कधी खेळायचे बंद करणार? किती खेळावे एखाद्या माणसाने?
मला तर वाटते आता पुरे. तुम्हाला काय वाटते?
तज्ञांची मते इथे पाहा.