टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
अर्थकारण
नाणेपुराण
प्रेषक देवदत्त ( रवी, ०५/११/२००८ - १६:३९) .नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.
नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.
कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की , बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो 
बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.
तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.
इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.
अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले.
तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले 
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही 
गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.
असो, माझे नाणेपुराण एवढेच.
रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?
शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?
प्रेषक देवदत्त ( रवी, ०४/२०/२००८ - १३:४३) .मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..
शेतकर्यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)
स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?
दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)
आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.
लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.
खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.
१६००० ......?
प्रेषक नाना चेंगट ( गुरू, ०२/२१/२००८ - १३:२४) .आज २०० अंकानी वरती उघडलेला बाजार आत्ता -१० आहे. वरती जायला लागला की त्ञाचे पाय परत जमीनीवर दाणकन येत आहेत.
बाजार १६००० स्पर्श करुन १५५०० ते १६५०० च्या दरम्यान कन्सोलिडेट ( याला मराठी शब्द काय?) होईल. बजेट रैली फार काही चांगली निष्पन्न होइल असे वाटत नाही
बाजारात फार मरगळ आहे. तेजीचा फायदा घेवुन जुने जाणते बाजारातुन बाहेर पडत आहेत. बाजार पुन्हा एकदा विक्रीच्या मा-यात गोता खाणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उत्पादकांशी येत असलेल्या नेहमीच्या संबंधातुन एक गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे बाजारात मागणी घटत चालली आहे व पैशाचे रोलिंग नीट होत नाहीये.
दोलर चढल्यामुळे आय टी आज जोरात आहे पण आयटीला सध्या फारसे चांगले भवितव्य नाही. कालपर्यत आय टी शेअर वर उड्या मारणारा गुजराती समाज आज आयटी चे नाव काढताच तोंडातला गुटखा पचकन थुंकुन दुर रहाण्याचा सल्ला देतो. मराठी माणुस त्याचा कुणी आयटीतला नातेवाइक सांगतो म्हणुन आयटी शेअर घेतो व फसतो. २२००-२३०० वर इन्फोसिस घेवुन उर बडवणारे मराठी व २३०० चा २१५० झाल्याबरोबर विकणारे गुजराथी मला माहित आहेत. अहो माझे एक परिचीत त्यांचा मुलगा याच कंपनीत... पोरानेच सांगितले म्हणुन २०००-२१०० चे १५० शेअर्स घेवुन कुरवाळत बसले. आता बोलाः)
मिसळपावकरांना सावध करावे म्हणुन लेखन.
नाना
सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
प्रेषक सागर ( गुरू, ०२/०७/२००८ - २०:००) .सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
सेझ बद्दल अलिकडेच काहिसे वाचले होते. पण कळाले नव्हते...म्हणून उत्सुकता चाळवली गेली आणि वाटले की सेझ म्हणजे काय हे माहित करुन घ्यावे.....
माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी एकत्र येऊन टाऊनशिप बांधली की त्याला सेझ असे म्हणतात का?
सेझ म्हणजे नक्की काय?
त्याचा नक्की फायदा कोणाला होतो?
याची आवश्यकता किती आणि का?
इ. अनेक प्रश्न उभे रहात होते...
मनात विचार आला.... मिसळपावव्यतिरिक्त चांगले ठिकाण दुसरे नाही.... तेव्हा येथील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की सेझबद्दल माहीती द्यावी....
धन्यवाद
सागर
In god we trust
प्रेषक नाना चेंगट ( मंगळ, ०२/०५/२००८ - १३:१५) .In God We Trust, In Gold We Invest
सरसर वर चढणारा सोन्याचा भाव या मे महिन्यापर्यंत १४-१५००० होणार
तुम्हाला काय वाटते?
(मला वरच्या आंग्ल ओळीचे तितकेसे चांगले मराठीत भाषांतर करता आले नाही, म्हणून ती ओळ तशीच ठेवली. क्षमस्व )
नाना
रिलायन्स ग्रुप सावधपणे गुंतवा
प्रेषक नाना चेंगट ( शुक्र, ०२/०१/२००८ - १४:१८) .राम राम मंडळी
दर ८ वर्षांनी येणारा शेअर बाजारातील मंदीचा नुकताच एक तडाखा आपण अनुभवला असेल
१९९२ मधे सेन्सेकला उचलुन धरणारे एसीसी वगैरे शेअर्स नतर चांगलेच लुडकले तर २००० मधे सेन्सेकला उचलणारे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे २००३ पर्यंत काय झाले हे तुम्हाला माहित आहे
२००७ मधे सेन्सेकला उचलणारा रिलायन्स (इंडस्ट्री, एनर्जी. पेट्रो, कम्यु व केपिटल) आता उतरणार हि आमची अटकळ आहे
तरी या सर्व कंपन्यात डोळसपणे पैसे गुंतवा
नाना
वाणी व मोल्स
प्रेषक नाना चेंगट ( शनी, ०१/१९/२००८ - ११:५०) .Sprint Nextel to Cut 4,000 Jobs, Close 8 Percent of Retail Shops
वाचा
मोठमोठे मौल्स वगैरे जर अपेक्षीत धंदा झाला नाही तर खाडकन बंद करतात
नोकरांना वा-यावर सोडतात
गि-हाइकांविषयी बेपर्वा असतात
कोप-यावरचा वाणी कळकट असतो
त्याचे दुकान पोश नसते
त्याच्या कडे जावुन आपल्याच खिशातील पैशानी आपला इगो सुखावल्याचे समाधान मिळत नाही
पण.......
तो खाडकन दुकान बंद करण्याची शक्यता खुप कमी असते ( नाही असे नाही)
पिढिजात असल्यामुळे बेपर्वा वृत्ती कमी असते
वाणी व मोल्स यांच्या युदधात वाणी च विजयी ठरणार
फार मागे मिसळपाव वरच कुणीतरी मोल्स हि आजची गरज आहे असे विधान केले होते.
दिवसाला शंभर रुपये कसेबसे मिळवुन त्यातल्या ३० रुपयात तांदुळ, डाळ, तेल, पीठ, मीठ, पोराला चोकलेट, हे प्याकेज कोप-यावरच्या वाण्याकडुन मिळवुन, ४० रुपयाची संत्रा किंवा नारींगी मारुन , तीस रुपये खोलीचे भाडे म्हणुन लावुन ठेवुन, बायकोला बदडुन () शांतपणे झोपुन पुन्हा दुस-या दिवशी राबणा-या पन्नास कोटी भारतीयांची मोल्स ही गरज अजिबात नाही
येथील भुमीशी संबध नसलेल्या इंडीयन लोकांना ती आईवडीलांपेक्षा जास्त गरजेजी वाटत असेल. दुर्देव त्यांचे
तुम्हाला काय वाटते?
नाना
