जनातलं, मनातलं

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
28 Jan 2020 - 13:50

शशक-करिअरभृण हत्या

बारावीचा निकाल! 64 टक्के. खोलीत ती मलूल होऊन पडली होती.
बाहेर आईच्या डोळ्यांत पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं. हुशार आहे, ईंजिनिअरींग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही. खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही. सगळं जागेवर. तुम्हीच सांगा.'
'नशीबंच फुटकं!', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अॅडमिशन मिळेल.',एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनिअरींग!!', वडिल उद्विग्न.

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
27 Jan 2020 - 14:42

सनकी भाग ८

कायाच्या फॅशन हाऊस मध्ये कामाला सुरुवात करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे शिवीन व रिचा 11 वाजता कायाच्या ऑफिस मध्ये हजर होते. काया अजून आली नव्हती पण सुधीरने त्यांचे स्वागत केले व काया पोहचतच आहे असे तो म्हणत होता. तोच काया ऑफिसमध्ये आली.

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
27 Jan 2020 - 12:14

हिंदू अंत्यसंस्कार

नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश.

अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
26 Jan 2020 - 11:16

लवकर शहाणे व्हा!

लवकर शहाणे व्हा!
============

निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Jan 2020 - 13:27

सप्रेम निमंत्रण

नांदेड सिटी सिंहगड रस्ता , पुणे, येथे आयोजित वरील कार्क्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
सौ. नेहा पराग प्रधान

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
24 Jan 2020 - 14:54

'तंबोरा' एक जीवलग - ९

सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात.

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
24 Jan 2020 - 09:48

साडेसातीतले वास्तविक उपाय!

मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल.

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
23 Jan 2020 - 15:09

1917 : रेस अगेंस्ट टाईम

90च्या दशकातल्या तरुणांना कॉल ऑफ ड्युटी ww 1 हा गेम माहितीच असेल.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
23 Jan 2020 - 15:01

'तंबोरा' एक जीवलग - ८

आज बर्‍याच दिवसांनी आले इथं. दिवाळी अंकातील माझा लेख तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचला, आवडला, हे पाहून बरे वाटले. नंतर काही कारणाने माझी भ्रमंती सुरू होती. ती आतापर्यंत. मग लिहायला जमले नाही. तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. हवाही प्रतिकूल पडली होती त्या मुळे प्रकृतीचे आढेवेढे नेहमीचेच त्यातून आताच जरा सावरलेय पुढे लिहिण्याची थोडी उमेद वाटते आहे असो.

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
22 Jan 2020 - 21:01

सनकी भाग ७

काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती.

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
22 Jan 2020 - 14:53

बोर्डाची परीक्षा

बोर्डाची परीक्षा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jan 2020 - 08:09

दोसतार - ३४

आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगळ्यानाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले.

तेजस आठवले's picture
तेजस आठवले in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 18:00

देश

शुक्रवार.अण्णांचं सगळंच वेगळं होतं. इतकी वर्षं त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज येत नसे.
अण्णांनी दंडावर बसलेल्या डासाला शांतपणे रक्त पिऊ दिलं आणि मग उडून जाण्याच्या बेतात असताना चिरडलं. बोटाला लागलेलं रक्त संपादकाच्या हाताला पुसून टाकायला ते विसरले नाहीत.

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 11:19

सुखी झोपेचा साथी

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात.