प्रवास
प्रवास
कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा
प्रवासाकडे लक्ष होते कुठे
अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची
कशाला फुका वेळ दवडा कुठे
आता पोहचल्यावर असे वाटते की
कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ?
कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ?
अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ?
इथे नित्य होतो अनादी अनंतीं
इथे जन्मलो, वाढलोही इथे
इथे जागलो तुझिया कृपेने
इथे बध्द अन् मुक्त झालो इथे
निघालो जिथुनि तिथेची पोहचलो
जिथे चालली वाट ती ही तिथे
आताशा गवसला प्रवासा मला तू
आता जायचे ना , यायचे ही कुठे.