परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
21 May 2017 - 12:09 pm

सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते.
आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता.
तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते.
खुप वेळ झाला तरी त्यांना संदेश कुठुन आला ते ठिकाण किंवा ग्रह अजुन दिसत नव्हता...
अभी तबकडी तीव्र गतीने पुढे नेत होता. मयुर सुपर कंम्प्युटर वर स्कँन करक होता..
अचानक अभी ला दुरवर एक निळसर रंगाचा ग्रह दिसला त्याने आच्छर्याने डोळे विस्फारले..
त्याने मयुर ला आवाज दिला.
मयुरसुद्धा तो ग्रह बघुन चकित झाला कारण तो ग्रह हूबेहुब पृथ्वी सारखा च दिसत होता.
हळु हळु अभी ने यान त्या ग्रहाच्या दिशेने वळवले..
पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे..
अभी ने यान अलगद त्या ग्रहावर ऊतरवले.
दोघांनी ऑक्सिजन मास्क च्या बँग्स घेतल्या व खाली ऊतरले.
आजुबाजुला निराळ्याच जातीची झाडे दिसत होती.
पानांचा रंग मात्र हिरवाच होता.पन एकही प्राणी त्यांना तिथे दिसत नव्हता..
अचानक सोसाट्याचा वारा सुटला अभी ने मयुरला एकमेकांचे हात पकडायला सांगितले.
अभी आणि मयुर ने ऑक्सिजन मास्क काढले कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार .
आणि खरोखरच ते सहजपने श्वास घेऊ शकत होते.
पन अजुनही संदेश कुनी पाठवला हे गुढ कायम होते..

पन नियतीने पुढे वेगळेच वाढुन ठेवले होते..
पुन्हा जोरात हवा वाहु लागली आणि एका यांत्रिक यानाचा आवाज येऊ लागला. दोघांनीही वर ती बघितले
एक चौकोनी आकाराचे
यान अवकाशातुन त्यांच्या दिशेने येत होते.
दोघांनीही आपल्या जवळ च्या सुपर गन्स हातात घेतल्या.
ते यान त्यांच्या समोर येऊन ऊतरले आणि यानाचा दरवाजा ऊघडला गेला. एक वेगळ्याच पोशाखातील व्यक्ती खाली ऊतरली
पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले
कोण असेल ती व्यक्ती ...?
हे दोघे त्या व्यक्तीला ओळखत असतील... ? बघुया पुढील भागात.
क्रमश:

कलाविचारलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

21 May 2017 - 12:34 pm | अभ्या..

कोण असेल ती व्यक्ती ...?

ओप्पो किंवा विवोचा सेल्समन

लॉरी टांगटूंगकर's picture

21 May 2017 - 12:46 pm | लॉरी टांगटूंगकर

ढिंच्याक पुजा किंवा ताहेर शहा.

दशानन's picture

21 May 2017 - 12:49 pm | दशानन

किंवा जिओवाला ;)

किसन शिंदे's picture

21 May 2017 - 5:32 pm | किसन शिंदे

स्वामी ओम बाबा

अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती.

हे एक बरं झालं. एरवी अंतराळातले आवाज फार कान किटवतात बुवा.

दशानन's picture

21 May 2017 - 1:12 pm | दशानन

खरं हाय!

हाहा! सूर्याच्या जवळ गेल्यावर ओम असा काही आवाज ऐकू येतो म्हणे. . नासावाल्यानी शोधलय.

अभ्या..'s picture

21 May 2017 - 1:05 pm | अभ्या..

पण कथा भारीय, नुसत्या डोळ्यांनी अभिला ग्रह दिसला, सुपर कंप्यूटर च्या स्कैनर वर मयूरला दिसला नाही म्हणजे भरिच. कमी खर्चात बनवला की असे होते बघा.

अभी काय आणि अभ्या.. काय सगळेच सुपर!

अभ्या..'s picture

21 May 2017 - 1:15 pm | अभ्या..

रॉयल्टीचा दावा टाकू काय?

दशानन's picture

21 May 2017 - 1:23 pm | दशानन

तेवढे 1-2% बघा आमचे बुवा! नाही तर सुपर 'बघ' टाकेन!

amit१२३'s picture

27 May 2017 - 1:39 pm | amit१२३

खरंय तुमचं बजेट कमी असलं कि सिरीयस गोष्ट पण फनी वाटते

चिनार's picture

21 May 2017 - 1:10 pm | चिनार

लय भारी
त्या दुसऱ्या यानात अभी आणि मयूरच्या बायका असनारे...नवरे कुठे शेन खायला जातात ते बघायला...
आमचा एक अंदाज

सगल्यानीच गबब्या बनले तर कसे चालाचे चिनारभो.

गब्ब्याले आता सीझन २ मध्ये परग्रहावरच पाठवतो थांब..

जव्हेरगंज's picture

21 May 2017 - 2:33 pm | जव्हेरगंज

कोण असेल ती व्यक्ती ...?
बघुया पुढील भागात.

He

स्पा's picture

21 May 2017 - 2:42 pm | स्पा

लोल कथा

निमिष सोणार, मंदार कात्रे इ इ लेखकांची आठोण आली

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2017 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

सदर प्रतिसादामुळे मला प. रा. कालीन पांडूची आठवण झाली. ;)

ते बिचारं उचक्या लागून जीव देईल एक दिवस.
कीती ते पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू.
.
पूर्ण पांडूरंग तरी म्हणा, हरीनामस्मरणाचे पुण्यतरी लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2017 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

=)) ना.......ही! =))

पांडू नाहितर पां....डुब्बा च! =))

स्वलेकर's picture

22 May 2017 - 4:34 pm | स्वलेकर

णिषेध... जिवण मोहिते (मोजी) यांचे नाव न घेतल्या बद्द्ल...

कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार ...आणि पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे.. शास्त्रज्ञ अश्या प्रकारे विचार करत असल्याने जपानी शास्त्रज्ञांनी वैतागून त्यांचा गेम केला...दिलं पाठवून दोघांनाच!

चित्रगुप्त's picture

21 May 2017 - 3:25 pm | चित्रगुप्त

पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले....कोण असेल ती व्यक्ती ...?
.

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 5:47 pm | टवाळ कार्टा

हिच्या चेहर्याकडे कोण बघत बसतयं ;)

प्रमिलाताई आंदळकर आहेत ना?

प्रमिलाताई आंदळकर लि(मये)

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 7:24 pm | टवाळ कार्टा

नाही....सरोज खोटे ;)

लौल! हा उच्च विनोद समजल्याची एक पोच.

अभ्या..'s picture

22 May 2017 - 7:46 pm | अभ्या..

टका तू सिलिकॉन व्हॅलीत पाहीजेलास खरे तर. ;)

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 8:37 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मज्या नै त्यात ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2017 - 1:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) =)) =)) =)) =)) =))!!!!

समजल्याची पोचं.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

21 May 2017 - 4:48 pm | अॅस्ट्रोनाट विनय

लेट मी थिंक

अत्रे's picture

22 May 2017 - 4:53 am | अत्रे

पुढचा भाग लवकर टाका :)

'सुपर' या शब्दाचा अतिवापर टाळला तर बरे होईल.

परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

मेले मेले !!
प्रेमाचीपण रहस्यकथा असते ??

नसतेच. पण म्हणून तर त्यांनी शीर्षकात लिहीलेय.
तुम्ही एक मिनिमम टेनसन घेऊन वाचा..नैतर लगेच कश्याचं विडंबन_.. म्हणून प्रेरणा शोधायला धावाल...!

एकुलता एक डॉन's picture

26 May 2017 - 8:37 pm | एकुलता एक डॉन

गदर एक प्रेम कथा

स्वलेकर's picture

22 May 2017 - 4:35 pm | स्वलेकर

मस्त!!! पुलेशु

सिरुसेरि's picture

27 May 2017 - 11:25 am | सिरुसेरि

अवतार भाग २ ची आठवण झाली . पुभाप्र .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण असेल ती व्यक्ती ...?

मला वाटतं आणखी कोणत्या तरी ग्रहावरची माधुरी दिक्षित असेल.
मोठ्या कष्टाने तिही या ग्रहावर पोहोचली असेल ? :)

"उसने पुछा, मुहब्बत क्या है ?
हमने भी कह दिया,
शौक तुम्हारा, जुनून हमारा..!"

-दिलीप बिरुटे
(पृथ्वीवरचा एक वेडा) :)

अद्द्या's picture

27 May 2017 - 12:31 pm | अद्द्या

यांत्रिक तबकडी = पिवळे पितांबर , मेलेलं मडं , आणि वाकडं वळण .. हाहाहाहाहा

सुपर कथा आहे .. अगदीच सुपर .. सुपर म्हणजे.. सुपरच सुपर .. पुढचा भाग सुपर लवकर टाका

amit१२३'s picture

27 May 2017 - 1:41 pm | amit१२३

गोष्टी पेक्षा प्रतिसाद वाचायलाच जास्त मजा येतेय

सतिश गावडे's picture

27 May 2017 - 1:50 pm | सतिश गावडे

तो टकल्या हैवान असेल.