टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मौजमजा
लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण
प्रेषक भडकमकर मास्तर ( मंगळ, ०५/१३/२००८ - १६:०६) .आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.
तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.
ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.
१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....
पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...
२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?
३. मग एखाद्या बलात्कार्याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.
४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?
५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...
या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..
खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )
नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...
रंगपंचमी (उत्तरार्ध)
प्रेषक बट्ट्याबोळ ( मंगळ, ०५/१३/२००८ - ०२:३४) .(पात्र व घटना काल्पनीक)
रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.
इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून. आज कसेरंग खेळयचे हे त्याने आधीच ठरवलेल होत. तसे खीशात ३०-३५ रुपयांचे रंग आणले होते.२ दिवसापुर्वीच त्याने कटींग केली होती. केसं कलर पण केली होती थोडी. २ महिन्यांपुर्वी इशल्या बरोबर जिम स्टार्ट करून थोडी बॉडीबिल्डिंग केली होती. गेल्या वेळी पोरांनी उचलून हौदात टाकला होता त्याला ... य धूतला होता !! यंदा तो सावध होता. आजचे कपडे पन आधीच ठरवलेले होते.बॉडी दिसेल याची काळजी त्याने घेतली होती. फ़ुल्ल आवरून आला होता तो.(पावडर पण लावली होती थोडी).
तेवढ्यात मागून त्याची आई आली आणि आपल्या निरमा आणि नारळाच्या काथ्यांनी भांडी घासून खरखरीत झालेल्या हाताने र्हावल्याला फाडदिशी ओढली. त्याचे कान गरम झाले.
"पयला घरी चल ह्यंद्र्या .... इचकट कार्ट .... सणावारी भांडण करतय"
"हात्तीच्यायला कसली वोढली ... लय बेक्कार .. ह्यॆ ह्यॆ ह्यॆ" .. कोणीतरी आपले reflexes दाखवले.आणखी ४-५ पोट्टी हसली. र्हावल्या ला आयशी चा लय राग आला.
"दद्या ला सांग ... आईवरून शिवी दिली त्याने मला" .... दादा .. सख्खा भाऊ !!
इतक्यात इकडे रंगपंचमीचा एकच गलका उडाला. धडाक्यात सगळ्यांनी एकमेकांना रंगवायला सुरुवातकेली. सर्वांच्या मनात "मी पन आन्नाला लावनार ... आ !" अशी प्रेमभावना दाटली. प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" .. अस तर त्या मायेला वाटल नसेलना !! सत्या ने रंग लावल्यावर अन्ना ने त्याला मिठी मारली. सत्या पुन्हा लाडात. पिच्या ला खुपलं हे, पण त्यानेदु:ख गिळून टाकल. आन्ना नंतर दोन काची ची दोन बोट त्याने Mercedes (बरं एस्टीम ... खूश ??)ला पण लावली. इशल्या-गन्या गॆंग ने नेहेमी प्रमाणे अक्रस्ताळेपणा आणि अगाचोरपणा सुरू केला. शेट्टी रंगल्यावर फ़ार ओंगळ दिसत होता (च्ययला आपण बरे दिऊन काय दिवे लावले ... किमान त्याची .. असो.)
... तर रंगपंचमी थाटात साजरी झाली.
(समाप्त)
रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)
प्रेषक बट्ट्याबोळ ( सोम, ०५/१२/२००८ - १७:००) .(पात्र आणि घटना काल्पनीक.)
योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली.
मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता. आई शप्पथ !!) मधुन जणू त्यांच्या स्वागतासाठी १०० पत्रकार camera घेउन वाट बघत आहेत अशा थाटात अवतरले. एकदम रिन सफ़ेदी वाल्या कुर्त्या पायजम्यात. पन स्वागतासठी पिच्या शिवाय कोनीच नस्ल्याने थोडे हिरमुसले. त्यांचा हा चेहेरा पिच्याच्याने बघवला नाही. पिच्याने शिट्टीमारली आनि नव-तरून मंडलाचे कार्यकर्ते जे रंगपंचमी च्या तयारीत गुंतले होते ते हजर झाले. आन्नाचा चेहेरा खुलला. थोडा लाल पन झाला.आन्नाने अपुलकी ने पिचु आनि विकि ला मिठी मारली. त्यांना पन थ्वडा भाव वाढल्या सारखं वाटल. मग चालताना त्यांची कोपरं मागे गेली आणिछाती २ इंच पुढे आली आणि ती झुलवत ते रंगपंचमीच्या set वर गेले. चालतानी आन्ना ने खांद्यावर हात ठेवल्याने सत्या पन थ्वडा लाडातआला.
हळु हळु गर्दी वाढू लागली. "ऒ अंत्या .... हिकड कसा काय !!! अ गन्या ... यड्या ... हा हा हा ... लय भारी यड्याआ.... फ़ुल्ल खेळ्नार यड्या .... आयला ह्यो बघ .... ह्या ह्या ह्या" अशा संवादांनी गल्ली गजबजू लागली. पांडरा शर्ट-प्यांट, काळे चकचकीत बूट,लठ्ठ बोटांमधे जाड अंगठ्या, गळ्यात "पच्चास तोला" माळा, काळा ग्वागल, भारदस्त काळ्या जाड मिशा अशा वेशात राजू शेट्टी (काळा कभिन्न रंग, ४'९" उंची, पोट पुढे, बायको मात्र त्यामनाने ... असो ... ) हे व्यक्तिमत्व फोन वर बोलत प्रकट झालं. गर्दितुन मग तो मुद्दाम गर्दिपासून लांब गेला. फोन वर कोनाला तरी ४ शब्द (!@@#%#**$@) सुनावले आनि गर्दित परत आला. त्याचे ४ शब्द ऐकून सत्या आनी आंत्या ला ल्हई कवतीक वाटलं.
तेवढ्यात रफ़ीक शेख आले आनि लोकांना सर्व-धर्म-समभावाच्या ओका-या होऊ लागल्या. क्वांग्रेस मधून मनसेत जाणार होते पन अन्ना ने ओढून आनलं त्यांना हिकडं. काही दिवसांपुर्वीच शिवसेनेतुन switch मारलेल्यांना काही हे पटल नाही. पन पक्शशिस्तिपरमाने त्यांने शेखांना मिठी मारली आनी रंगपंचमी + ईद च्या शुभेच्छा दिल्या. शेखांनी पेशल मटन बिर्यानी चं अश्वासन दिल्यावर मात्र त्यन्च्या तोंडाला पानी सुटलं आनि त्यांनी एक आवंढा गिळला.
(क्रमशः)
हा लेख/या पुढील लेख आमच्या अनुदिनी वर देखील वाचू शकता.
http://koustubhkulkarni.blogspot.com/
(पुढील आणि इतर लेख लवकरच इथे देखील प्रसिद्ध केले जातील.)
मी जर हा असतो तर : भाग २
प्रेषक छोटा डॉन ( शनी, ०५/१०/२००८ - १५:३८) .ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...
मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो ....
मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता.
झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते.
मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...
मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती.
मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेता येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....
मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते.
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते.
मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता. कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.
मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता येईल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते.
मी जर देवेगौडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले असते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.
मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.
मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...
लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....
प्रेषक कलंत्री ( शुक्र, ०५/०९/२००८ - १९:३४) .(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.)
ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते. अनेक विषयावर चर्चा होत असताना आम्ही लहान मुले अवतींभोवती खेळत होतो आणि अधेमध्ये मोठ्यांच्या गप्पाही ऐकत होतो.
अनेक विषयाच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यातच मामाच्या मुलीच्या वरसंशोधनाचा विषय निघाला. मामाने सध्या काय अडचणी आहेत आणि तुमचे लग्न कसे लवकर जमले इत्यादी इत्यादी सांगितले. बोलता बोलता मामा म्हटला, की आता मुलाकडचे लोकं पूर्वीसारखे फक्त घरदारच बघत नाही. सध्या मुली बघण्याचे वेड चालू आहेना! आपल्या रंजनाला मी सांगितले आहे की मुलाकडचे काही प्रश्न विचारतात ना, तेव्हा एखादा इंग्रजी शब्द नक्कीच वापरत जा. इंग्रजी शब्द वापरला ना, की मुलगी एकदम शिकल्यासारखी वाटते. ते वाक्य ऐकून सर्व मावश्यांनी आणि आईने मान डोलावली आणि खरेच सांगतो आहे हा असा आविर्भाव व्यक्त केला.मी तर लहानच होतो पण माझे आईकडे लक्ष गेले. आईनेही मान डोलावली आणि माझे लक्ष नकळतच तिच्या डोळ्याकडे गेले त्यात मी एक काहीतरी पराभवाची, न्यूनगंडांची आणि कसल्यातरी भीतीची भावना बघितल्यासारखी जाणीव मला झाली. इतक्या वर्षानतरही मला माझ्या आईचे ते डोळे आठवतात.
आजपर्यंत मला कधी कधी मामाचा राग यायचा पण आज हा लेख लिहिताना मला मामाचे खरेच कौतुक वाटते. मामा खरेच द्रष्टा होता हे निर्विवाद पणे मान्य करावेसे वाटते. कालाच्या ओघात काय बदल होणार आहे आणि त्याचा आपल्या लाभासाठी कसा जास्तीत जास्त फायदा उचलायचा यात वाईट ते काय? शेवटी आपल्या मुलांचे भले व्हावे असे कोणत्या पालकांना वाटणार नाही? लग्न ही खरोखरच आपला स्तर बदलवण्याची सूवर्णसंधीच आहे असे समजा हवे तर.
माझ्या मामाला ३०/३५ वर्षापूर्वी एखाद्याला अल्पभेटीत परकीय भाषेचे साह्य घेऊन कसे प्रभावित करायचे हे समजले होते.
आज मी बघत असतो अनेक मराठी भाषक इंग्रजीमध्ये लग्नपत्रिका घेऊन येतात. अनेक लग्नामध्ये अमुक अमुक वेडस् अमुक अमुक असे फुलांनी सजवलेलेच असते, लग्नाच्या गाडीवर सर्रास बदामाचे चित्र आणि लोव्ह असे लिहिले असते.
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना?
पुढच्या महिन्यात मी मामाला ( वय ८३) भेटणार आणि त्याच्या द्रष्टत्वाबद्दल कौतुक किंवा काय असेल त्या माझ्या भावनाही सांगणार आहे. शेवटी तो काळाच्या खरेच पुढे होता हे मान्य करायला काय हरकत आहे?
अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....
प्रेषक कलंत्री ( शुक्र, ०५/०९/२००८ - १२:५०) .अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे.
रुपरेखा खालील प्रमाणे,
०९.०० सकाळी शांतेचं कार्ट.
१२.३० ला मोरुची मावशी
०४.०० वाजता औपचारिक समारंभ
०५.०० वा तो मी नव्हेच
०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क
एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्या सत्रात,
तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.
नमस्कार !!
प्रेषक पल्लवी ( शुक्र, ०५/०९/२००८ - ११:३३) .नमस्कार मंडळी ! मी पल्लवी..
मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. 
म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा..
खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. 
आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (
) लोकांबद्दल.
सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. :< पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही..
) जाउ द्या झालं .. धमुदादा, ही "तैलबुद्धी "कुठुन मिळवलीस बुवा !? इथे आम्ही तुझ्या जोक्स वर फिदीफिदी हसतो आणि लोक आम्हावर हसतात. इथे लांबट चेहरे बघुन काव आलेला असताना तुझे एक-एक विनोद ऐकुन लै लै फरेश वाटतं बघ !
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो !
काय सुरेख लिहिता तुम्ही. विशेष करुन "अब्दुल खान्"..अप्रतिम ! केवळ अप्रतिम !! तुमच्याकडून अजुन खुप खुप वाचायला मिळेल ही आशा.. पण खर सांगा, अब्दुल खान काल्पनिक वगैरे नाहिये ना??:>
पेठेकर काका-तुमच्या पाककृती आणि वन लायनर्स. व्वा.. सगळंच लै भारी.
मला खरंतर इनोबा म्हने, प्राजुताई,चतुरंग, छोटा डॉन,केशवसुमार,विजुभाउ,आनंदयात्री इ.इ. बद्दल लिहायचं होतं. पण माझा म्यानेजर बघतोय मेला डोम्-कावळ्यासारखा. आता जरा काम करत असल्याचं नाटक करत बसावं लागणार..

असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !!
मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !!
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे.
:)
ता.क. : काही आदरणीय अपवाद सोडता,मी इथे 'डायरेक' अरे-तुरे केलंय. चालेल ना ?
मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....
प्रेषक कलंत्री ( गुरू, ०५/०८/२००८ - १६:४६) .(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. )
आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील. मी त्यावर उत्तर दिले की अर्थातच आपले गाव छोटे आहे आणि त्यामुळे कोणी मदत करणार नाही असा विचारही माझ्या मनात येत नाही.
मग त्याने एक उसासा घेतला आणि सांगितले," अरे, ती मुलगी फारच अगोचर आहे. तिला आम्ही काही स्थळे दाखविली, परंतु तिने काही चांगल्या स्थळांना तिने सरळ सरळ नकार दिला, कारण माहीत आहे, की मुलगा मराठी माध्यमात शिकलेला आहे. आता मला सांग तिच्या साठी आम्ही काय इंग्लंडहून नवरा शोधायचा का?, मराठी माध्यमाच्या मुलांना काय धाड भरली आहे? दुर्दैवाने तिची आई पण तिला भरीस टाकत असते." मी जास्त न बोलता अल्पोपहार आणि चहा घेऊन गाशा गुंडाळला.
घरी आलो आणि खरेच मी विचारमग्न झालो. लग्नाच्या मुली शक्यतो खेडे टाळतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच, पण आता मराठी शिकलेला नवरा नको असे म्हणणे म्हणजे फारच झाले, बरे इंग्रजीमध्ये शिकलेला नवरा काय आणि मराठीमध्ये शिकलेला नवरा काय? शेवटी संसार करताना तडजोडीची भाषाच शिकावे लागते.
कदाचित त्या मुलीला आणि त्याही पलिकडे तिच्या आईला आयुष्याच्या शाळेत बरेच शिकायचे आहे हेच खरे.
पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)
प्रेषक मन ( बुध, ०५/०७/२००८ - ०५:०९) ."आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही .
आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?"
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होइल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळुन,मोठ्ठे डोळे करुन बसलो चटिंगला.
" सुधीर वैतागुन सांगत होता.
पण चेहर्यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी.,राष्ट्रिय पातळीवर ऍथलीट म्हणुन मान्यता पावलेली.
वर्गात मुलिंशी बोलायला कधिच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं,सहज मिक्स्-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बर्याचदा वर्तमान पत्रातुन बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणशिही बोलताना ती लागलिच बोलतं व्हायची, बोलतं कराय्ची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीहि द्याय्ची.(म्हणुन मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले.)
आता नाही म्हटलं तरी ,तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता.एच आर चा,अगदि नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणही अजुन चालुच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा.वेब कॅम तर सगळेच वापरतात्,पण ही अगदि मॉडेर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची,त्यावरच चॅटींग करायची.उगिच "काकु"बाईं सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणी अंग काठी निव्वळ शिड शिडित्,ऍथलीटची,स्वभावात मोकळेपणा.तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला ,तिच्या टवटवीत पणावरुन.
बर्रेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदि "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासुन ते अगदि कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा..काय सही आहे ही जोडीदार म्हणुन्.किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा,मन मोकळेपणा
आणी शिवाय कुठलीही फालतु बंधनं नाहित. " ही मिळाली तर काय होइल्,मी स्वप्नातच इमले बांधुन पाहिले,
त्या "काकु" स्टाइल वाल्या नवर्या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर.ही असेल तर
गळ्यात गळे घालुन हिंडेन.पण आता कुणास ठाउक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी."
एवढ्यात आईचा फोन आला.तिकडुन आवाजः- "अरे ऐकतोस का ,मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी . तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट,फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तु असं कर की.."
आई एवढ बोलेपर्यंत मोबाइल झाला डिसचार्ज्,फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट्,माझ्याच कॉलेजची...म्हण्जे..स्पृहा तर नै?"
डोक्यात शंका आली आणि लगेच जाउन मेल पाहिला.
तो...तोच फोटो.स्पृहाच ती.
म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर रहाय्ला मिळणार तर.
आणि तीनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलच नाव तिला""स्थळ" म्हणुन आलय्,
गम्मत करायची,फिरकी घ्यायची म्हणुन असं केल तिनं?
"
पण ..पण ..एक मिनिट्..हे काय होतय?
मी तिला होकार कसा देइन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधि पासुन ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडुन बसते वेब कॅम समोर.
म्हण्जे, ही शहाणी,ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पुर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणार्या लोकांसमोर कशी असेल?
छे ..हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगिच डोक्यावर बसु नये.
मी देइन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच.अस दुसर्या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"
सुधीर "नकार" कळवायला जाउ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणार्याचे)हे " सु विचार " ऐकुन मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरुन ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगल आहे -नाही मी काहिच म्हणणार नाही.ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की,की तु नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील."
तु आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलस तरी हे लग्न होणार नाही.एखाद -दोन दिवसात होकार येइलच इतर
ठिकाणंहुन तिला,मग चालेल का तुला?"
सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला . "मला लग्न नाहिच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहिसं पुट्पुट्ला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!
बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.
प्रेषक अबब ( मंगळ, ०५/०६/२००८ - १९:३५) .बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.
येत्या शुक्रवारी,दि.९ मे २००८ रोजी, संध्याकाळी ७ वा.
आयोजित करीत आहोत.
स्थळ-डेनीज रेस्टॉरंट,जयदेवा उड्डाणपुलाजवळ,जे.पी.नगर,बंगलोर.
सर्व रसिक आणि उत्साहि मि.पा.करांना तीर्थ प्रसादाचे जाहिर निमंत्रण.
ओसरी वर होणा-या कार्यक्रमांची रुपरेषा छोटा डॉन हे लवकरच जाहीर करतील.
(स्वागतोत्सुक) अबब
अवांतर-
कार्यक्रमाला येणा-या मि.पा.करांनि "कार्यक्रम" झाल्यावर जाताना स्वतः वाहन चालवायचा धोका पत्करु नये.
पहा मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.रिक्षा वा टॅक्सी....अर्थातच स्वखर्चाने,हयाचि नोंद घावी
मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर.
अध्यक्ष- छोटा डॉन. यांच्या हुकुमावरून
(स्वगत -महाराष्ट्र ते बंगलोर अंतर व प्रवासखर्च पाहता,पुण्या/मुंबईत "बसणे "स्वस्तात होइल हे सांगणे न लगे
)
