टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मदत
बिडी काडी व्यसनमुक्ती
प्रेषक विकास ( गुरू, ०७/२४/२००८ - २०:३६) .मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे.
पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.
त्यांना हे काम विशेष करून भारत आणि चीन मधे करायचे आहे. त्यात त्यांना भारताकडून जास्त अपेक्षा आहेत कारण चीन मधे सरकारच सिगरेटी तयार करते
त्यामुळे किती शिकवता येईल यावर मर्यादा आहेत.
तर माझा प्रश्न असा:
ते पैसे देऊन प्रचार करायला मदत आहेत पण तुम्ही त्यात काय मदत करू शकाल?
- स्वतः ओढत असलात तर थांबवून
- स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
- पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
- का हू केअर्स!?
समाजशिक्षण महत्वाचे असते पण ते करण्याची जबाबदारी केवळ सेवाभावी संस्था आणि सरकारचीच नसते तर ती "वर्ड ऑफ माउथ"ने पण जास्त होऊ शकते.
स्वप्नविश्वाचा विरह...
प्रेषक वेदश्री ( मंगळ, ०७/०८/२००८ - १९:४०) .कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते. अख्खा दिवस मग काही मनाजोगते म्हणून घडत नाही किंवा घडले तरी त्यात मजा अशी वाटत नाही.. ते स्वप्न.. ते स्वप्न पूर्ण पहायला मिळाले असते तर मस्त झाले असते असे वाटत राहते पण ते नक्की काय होते ते मात्र आठवत नाही त्यामुळे एक वेगळीच विरहभावना मनात उभी रहाते.
असे काही होते का तुम्हासोबतही? की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?
इथे कुणी सिंगापूरकर आहे का?
प्रेषक सर्वसाक्षी ( सोम, ०७/०७/२००८ - २३:३७) .नमस्कार!
मिपा परिवारात कुणी सिंगापूरकर आहे का?
मायमराठी!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०७/०१/२००८ - २३:१२) .मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
व्याकरण आणि वृत्त
प्रेषक संदीप चित्रे ( मंगळ, ०७/०१/२००८ - २१:४३) .मराठी व्याकरण -- विशेषतः वृत्ते (भुजंगप्रयात, मंदाक्रांता इ.) ह्यांची सोपी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे का?
ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी
प्रेषक अभिरत भिरभि-या ( बुध, ०६/२५/२००८ - १४:४०) .जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली....
१
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/
२
http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/
खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते ....
Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857.
Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English. Poona: Arya-Bhushan Press, 1911.
गमतीचा भाग म्हणजे या प्रकल्पा साठी आर्थिक मदत अमेरिकेच्या शिक्षण खात्याने केली आहे ..
बघा ... अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.)
माझ्या टोपण नावामागचे कारण
प्रेषक सखाराम_गटणे™ ( मंगळ, ०६/२४/२००८ - २३:०५) .आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.
म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.
पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.
ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.
आपण आपले टोपण नाव का घेतले ?
II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.
बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?
सर्वोत्तम पाच.
प्रेषक शेणगोळा ( शुक्र, ०६/२०/२००८ - ०९:१६) .आदाब!
सर्व आदरणीय मिपा सभासदांकडून इथे लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल निम्नलिखित माहिती मागवण्यात येत आहे. सहकार्याची अपेक्षा आहे.
साहित्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
काव्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
पाकप्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
माझे येथील बरेच वाचन बाकी आहे. वरील माहिती मिळाल्यास मला प्रथम हेच साहित्य वाचायला आवडेल.
मला मिपाच्या दिवाळी अंकात लिहायचे आहे. ते लेखन कुणाला पाठवायचे?
आदाब!
आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.
तातडीची मदत हवी !!!
प्रेषक II राजे II ( सोम, ०६/०९/२००८ - १०:२६) .आपल्या पैकी कोणी विशाखापट्टम मध्ये आहे...का ??
एक अपघात झालेला शक्यतो रक्ताची गरज पडणार आहे.... ओ- निगेटीव्ह
लवकर सांगा !
अथवा फोन करा ०१२४४२६१०७७ राज.
रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?
प्रेषक ईश्वरी ( शनी, ०५/१०/२००८ - ०२:५०) .परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.
खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.

ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.
ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी


