भूगोल

मिसळ

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)

सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:

या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-

काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः

याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्‍या या बाजारात बर्‍याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.

समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.

थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्‍या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.

या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.

रटरटते चिकनः

लोटी तयार करणार्‍या थाई महिलेची हातोटी:

फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:

बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:

निद्रिस्थ बुद्धराजः



रात्री सवास !(good night!)

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.

धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्‍या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजीत संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठिशी ही भोजशाळा आहे.

शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कब्रस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्‍या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.

या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तु आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्‍या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पहाताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.

त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्‍या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.

हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्‍या अनेकांना भोजपूर माहित नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्हांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.

प्रकाश चित्रे

मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे.
त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते.
चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्‍या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता. असु दे तरी देखील
काढुच परत पुर्ण आकाश काळ्या ढगानी भरउन गेल्यावर कुठुन काढणार म्हणून एक फोटो काढला तो खास मिपाकरांसाठी देतोय. Smile

काश मी ४-५ आधीच काढला असता फोटो तर.....

खालील फोटो माझ्या पत्नीने काढला आहे. तो मला चांगला वाटला म्हणून येथे देत आहे.
ह्या झाडाच नाव आहे रेन ट्री (पर्जन्य वृक्ष). हा एप्रिल पासुनच बहरतो.

अरून सवास, सायं सवास! भाग - २

अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...

भाऊगर्दी!

आधी पोटोबा

गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!

खाऊन तर पहा!

जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!

मा फलेषु... ?

सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....

साखरेचे खाणार !


फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!

याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.

मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!

जपानचे खानपान

थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)

२)

३)

४)

५)

अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.

तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.

अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.

कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत Wink )

तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.

थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.

पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...

सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली. या सहलीतील काही चित्रे मिपाकर रसिकांसाठी देत आहे.
शामू१
शामू - द किलर वेल
शामू२
आणखी एकदा शामू
शामू३
शामूचे कुटुंब
शामू हा किलर वेल (देवमासा) दिवसाला साधारण सरासरी १५० ते २५० पौंड अन्न (मासे) खातो Smile सी वर्ल्ड मध्ये दररोज त्याचे विविध खेळ बघायला मिळतात. शामू व त्याचे प्रशिक्षक यांच्यातल्या प्रेमाचे, त्याच्या प्रशिक्षणाचे नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य, अप्रूप वाटत राहते.
समुद्रशार्दुल
सी लायन (समुद्रशार्दुल) आणि त्याचा एक मित्र Smile
सी लायन, ऑटर आणि वॉलरस यांच्यातला फरक मला बरेचदा चटकन कळत नाही. वॉलरसला हत्तीसारखे (हत्तीएवढे नाही) सुळे असतात, त्यामुळे तो जरा ओळखता तरी येतो. ऑटर हा तुलनेने सगळ्यात लहान असावा. खालच्या चित्रात (बहुदा) ऑटरच आहे Smile
ऑटर
रोहित१
हे आहेत फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे Smile मुंबईला शिवडीच्या खाडीवर हे पक्षी दिसतात व त्यांच्यासंबंधीच्या 'मोसमी' बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये वाचावयास मिळतात.
रोहित२

माझी प्रकाशचित्रे

Diwali

अरून सवास! भाग १

"अरून सवास!" - थाई भाषेतलं सकाळचं अभिवादन कानी पडलं आणि कुठेतरी शब्दांची जत्रा लागल्याची चाहूल लागली. थायलंडच्या एका महिन्याच्या वास्तव्यात थाई लोक, काही ठिकाणे, थाई खाणे-पिणे, थाई संस्कृती आणि थाई भाषा यांची थोडीशी ओळख झाली आणि भारताबाहेर पहिल्यांदा घरोब्याचा अनुभव आला. थायलंडला जायच्य आधीच काही नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग शिकलो होतो आणि भाषासाधर्म्याचे कुतूहल जागे झाले. थायलंडच्या विमानतळाचे नाव - सुवर्णभूमी ! पहिले पाऊल जिथे टाकणार त्या अनोळखी प्रदेशाचे नाव इतके ओळखीचे असेल असा अंदाजच नव्हता. थायलंडला उतरल्यावर मात्र कुतूहल आणि अंदाजाची जागा उत्साह आणि आनंदाने घेतली. थायलंड बद्दल माझे काही अनुभव इथे मांडावेत असे कधीपासून मनात होते , आज योग आला.
ग्रँड पॅलेस

थायलंडमधले पर्यटनासाठी विषेश प्रसिद्ध असलेले हे ठिकाण. बँकॉक - राजधानीपासून जवळ आहे. डोळ्यांसाठी वैभवाची मेजवानीच!

सुवर्णकळस

सोनेरी खांब

गरूड

शेषनाग

भिंतीवर चितारलेला रामायणातील एक प्रसंग

भालदार चोपदार (?)

अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ. हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते. इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप, प्रार्थना/निवास स्थळे होती. बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले.




आज केवळ अवषेश उरले आहेत. तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते. त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम (प्रथम) याने राजधानी बँकॉकला हलवली.

जुने थाई लाकडी घर.


हे घर जमिनीपासून थोडे उंचावर बांधले जाते. यामुळे घरात हवा खेळती राहते. घराची रचना सर्वसाधारणपणे अशी - मध्ये मोकळी जागा, चार बाजूंनी स्वयंपाकघर, पाहुण्यांकरता खोल्या, अभ्यासिका, शयनकक्ष. प्रत्येक बाजूंना उतरती छपरे. मध्ये मोठे छप्पर.

थायलंडमध्ये जिथे जिथे फिरलो तिथे आदरातिथ्याने भारावून गेलो. प्रगतीशील अशा या देशात आधुनिकतेबरोबरच लोकांची आपुलकीही तग धरून आहे. सवात्दी खा /क्रब (खा - स्त्री म्हणते तेव्हा, क्रब - पुरूष म्हणतो तेव्हा) असे म्हणत थाई व्यक्ती तुमचं स्वागत करेल. कॉब खुन् खा/क्रब म्हणून तुम्ही धन्यवाद द्याल आणि ह्यापुढे तुम्हाला थाई येत नसेल तर मात्र पंचाईत! थाई भाषेतील पाली-संस्कृत मधून आलेले शब्द जरी ओळखीचे वाटले तरी आज वापरात असलेले थाई शब्द मात्र तितकेसे पटकन कळतीलच असे नाही. त्यासोबतच ख्मेर मधूनही थाई भाषेत शब्द आले आहेत. थायलंडमध्ये सगळ्यांना इंग्रजी येतेच असं नाही आणि येत असली तरी आपली इंग्रजी आणि थाई इंग्रजी यांतून कोण काय बोलतो ते समजणे आपल्याला आणि थाई माणसालाही कठीणच! थाई टोनल भाषा आहे त्यामुळे शब्दांच्या उच्चारांतील बारकावे शिकायला, समजून घ्यायला मेहनत घ्यावी लागते. पण बरेचदा थाई व्यक्ती स्मितहास्यानेच तुम्हाला अर्धेअधिक जिंकून घेतात.
काही ठिकाणांची नावे पहा -
समुत् संख्रोम (समुद्र संग्राम)
रचतापिसेक (रजताभिषेक)
कांचनबुरी (कांचनपूरी)
राचाबुरी (राजापूरी)
सुवर्नापिसेक (सुवर्णाभिषेक)
अयुत्थया (अयोद्ध्या)
काही साधारण नावे -
तलेय (तळे ) थाई भाषेतला सद्ध्याचा अर्थ डबके , गरूड, शेषनाग

असेच काही संदर्भ सण, कालगणना याबाबतही मिळतात -
मकबुचा - (मकपूर्निमाबुचा) - माघी पौर्णिमा (बुचा - पूजा )
विसाखाबुचा - वैशाखपूजा - वैशाख पौर्णिमा - बुद्धपौर्णिमा

भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे काही धागेदोरे जुळतात. पण ह्या फंदात जास्त न पडता तुम्ही जर थायलंडमध्ये लोकांत मिसळलात तर तो आनंद काही निराळाच.

पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...

जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्‍या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्‍या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली.

२९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे. काहींना निसर्गापुढे नमते घेऊन हातातोंडाशी आलेली मोहीम अर्धवट सोडून परतीच रस्ता पकडावा लागला आहे. पण एवरेस्टने घातलेली भुरळ काही कमी होत नाही. दरवर्षी नव्या जोमाने गिर्यारोहकांचे तांडे चढाई करुन जातात आणि हे आव्हान आपल्या छातीवर घेतात.

गिर्यारोहण तंत्रात जसजशी प्रगती होत गेली, नवनवीन साधनांनी चढाई सुकर होत गेली तसतशी यशस्वी गिर्यारोहकांची संख्या वाढू लागली. आव्हान सोपे वाटू लागले त्यामुळेच की काय अजूनही त्या पहिल्या चढाईचे महत्त्व कायम आहे. नेपाळने हिलरीला एवढे वेड लावले की त्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा भाग हा त्या भागाची प्रगती करण्यात सर्वस्वी खर्ची घातला. 'हिमालयन ट्रस्ट' स्थापून हॉस्पिटल्स, शाळा ह्यांची उभारणी करणे असे उपक्रम त्याने आयुष्यभर राबवले. ११ जानेवारी २००८ रोजी अखेरचा श्वास घेईपर्यंत एवरेस्ट हे त्याचे वेड कायम होते!

शेर्पा तेनझिंग हा तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद आहेत (सर्व थोरांना कोणत्या ना कोणत्या वादात अडकवणे हे कार्य उरलेले सगळे निर्विवादपणे पार पाडतात हेच खरे! Wink ). पण हा भला माणूस होता ह्यात वाद नसावा! तो आणि हिलरी ह्यात 'आधी' शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत. शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!"
एवरेस्टवर उभा असलेल्या तेनझिंगचा फोटो सगळ्यांनी पाहिला पण हिलरीचा फोटो नव्हता त्याबद्दल त्याला छेडले असता तो मिश्किलपणे म्हणाला "त्याला कॅमेरा कसा चालवायचा ह्याची माहीती नव्हती आणि एवरेस्टवरच्या मरणाच्या गारठ्यातल्या ठिकाणापेक्षा कितीतरी चांगली ठिकाणे आहेत जिथे मी त्याला हे शिक्षण देऊ शकेन!" Smile
तेनझिंग हा दार्जीलिंगमधल्या 'हिमालयन माऊंटेनिअरिंग इंस्टिट्यूट्चा' डायरेक्टर होता. १९७८ मधे 'तेनझिंग नोर्गे ऍडवेंचर्स' ही गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी कंपनीही त्याने स्थापन केली. १९५९ रोजी पद्मभूषण देऊन आणि १९७८ साली 'तेनझिंग नोर्गे सन्मान पदक' निर्मून भारताने त्याचा गौरव केला.
तो एकदा म्हणाला होता की "कारकीर्दीला ओझीवाहू हमालापासून सुरुवात करुन ते अनेक पदके लटकवलेला कोट घालून विमानातून ठिकठिकाणचा प्रवास करणारा आणि शेवटी उत्पनावर प्राप्तीकर भरण्याची चिंता करणारा मी पहिलाच शेर्पा असेन! Smile

तर अशा एवरेस्टवर ऑक्सिजनची नळकांडी न घेता प्रथम चढाईचा मान मिळवला तो इटालियन गिर्यारोहक रेनहोल्ड मेसनर आणि ऑस्ट्रियन पीटर हेबलर यांनी १९७८ मधे. त्यानंतर पुन्हा १९८० मधे मेसनरने एकट्याने कोणाच्याही मदतीशिवाय एवरेस्ट सर केले! शेवटचे तीन दिवस त्याने एकट्याने बेसकँपपासूनची २००० मीटरची चढाई केली!

एवरेस्टवर पाऊल ठेवण्याची स्पर्धा ही गळेकापू ठरेल की काय अशी शक्यता गेल्या काही वर्षात सर्वांनाच भेडसावू लागली. ह्याला कारण झाले ते ब्रिटिश गिर्यारोहक डेविड शार्प ह्याचा २००६ मधे झालेला मृत्यू. एवरेस्ट्माथ्यापासून अवघ्या ४५० मीटर (अर्थात हे 'अवघे' ४५०मी. सरळ रस्त्यावर असतात तिथे ८००० मी. वर 'अवघे ब्रम्हांड' आठवत असणार. मी स्वतः १९४५० फुटाचा हनुमान तिब्बाचा ट्रेक केलाय त्यामुळे 'वाट लागणे' म्हणजे काय असते ह्याचा साक्षात अनुभव आहे!) अंतरावर एका कपारीखाली अडकून त्याचा मृत्यू झाला. त्यातली सर्वात विदारक गोष्ट अशी होती की त्याला तिथे पाहून जाणारे ४० गिर्यारोहक होते पण त्याला एकदोघांशिवाय मदत करण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही! Sad एवढ्या उंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमधे स्वतःचेच शरीर स्वतःला ओझे वाटत असताना दुसर्‍याकोणाला तेही अशा अडचणीतल्या जागी सापडलेल्या अर्धवट शुद्धीतल्या गिर्यारोहकाला कोण मदत करणार असे प्रश्नांचे वाद्ळ उठले. एडमंड हिलरी स्वतः ह्या प्रकारावर फार नाराज आणि दु:खी झाले. ते म्हणाले "आजकाल माणुसकीपेक्षा एवरेस्टवर पाय रोवण्याची वेडी खुमखुमी लोकांना जास्त महत्त्वाची वाटते". त्यांचे म्हणणे काही अंशी खरे आहेही. माणुसकीला लाजवणारे असे 'पराक्रम' पाहून साक्षात एवरेस्टचीही मान खाली झाली!

असा हा चित्तथरारक पर्वत येणार्‍या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेत राहील, तिथे माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना घडणार नाहीत ही आपणामधल्या गिर्यारोहकांची जबाबदारी आहे असे मला वाटते. तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

चतुरंग

गावांची नावं

काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती. तो अधिकारी त्यांना 'डिग बॉय, डिग बॉय' (खण अशा अर्थी) असे म्हणायचा. त्याचेच पुढे डिग्बॉय व दिग्बोई असे पडले. अशी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा.