दिवाळी अंक २०१४

संपादकीय

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:00 am

नमस्कार मंडळी!

मिपाचा तिसरा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना अर्थातच प्रचंड आनंद होतो आहे. गेल्या २ वर्षात चालू राहिलेली परंपरा अशीच पुढे चलू राहिली पाहिजे म्हणून या वर्षीही दिवाळी अंकाच्या कामाला सुरुवात केली, नेहमीपेक्षा जरा लौकरच! त्यातच छायाचित्रणकलेच्या १७५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रांची स्पर्धा सुरू केली तिलाही उदंड प्रतिसाद मिळाला! आतापर्यंत ३ स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या त्यातल्या दुसर्‍या स्पर्धेतील विजेत्या चित्रांचा समावेश या दिवाळी अंकात केला आहे. तुम्हा सर्वांच्या सहभागातून या स्पर्धा यशस्वी होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद!

खिद्रापूरच्या कोप्पेश्वरालयाची यात्रा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:25 pm

मित्रांनो,

खिद्रापुरचे कोप्पेश्वर शिवमंदिर आपल्याला नवे नाही. अनेकांनी तेथे जाऊन त्या शिल्पांचा विविधांगानी आस्वाद घेतला आहे. अभ्यासपूर्ण माहितीतून त्या मंदिराचा पूर्वेइतिहास सुंदर सुंदर छायाचित्रातून रसग्रहणासह सादर केला आहे.
त्याच्या लिंक्स नवीन वाचकांना इथे मिळतील.

जयंत कुलकर्णी एप्रिल 2013
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 1
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 2
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 3

रंगासेठ डिसेंबर 2012
खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर
.....

मला त्या वास्तूला भेट द्यायचा योग यायला 65 वर्षे लागली! एक उत्सुक यात्री म्हणून मी तिथे गेलो होतो. ख्यातनाम वास्तू आलयांना शोधक नजरेनेे न्याहाळणारा अभ्यासक म्हणून या भेट देण्याच्या उद्देश नव्हता म्हणून आधुनिक कॅमेरे व अन्य तांत्रिक व यांत्रिक फोटोग्राफीचे सामान जवळ न बाळगता माझे तिथे जाणे झाले.
मला काही काळापुर्वी मातृशोक झाला. त्याच्या निमित्ताने अस्थिविसर्जनास मी न. वाडीला गेलो होतो. त्यानंतर अनेक वर्षांपासून या वास्तूविशेषाला भेट द्यायची राहून गेली होती, त्याची हुरहुर कमी व्हावी म्हणून मी कुरूंदवाडवरून बस तात्काळ नसल्याने, एक वडाप - 6 सीटर - खास ठरवून परतीच्या बोलीवर धक्के खात खात पोहोचलो होतो.
मंदिरातील शिवलिंगापाशी पोहोचेपर्यंत चिटपाखरू नव्हते! गाभाऱ्यात बसून मी जपसाधना केली. समोरच्या शिवपिंडीची रचना, दिशा व त्या सोबत आणखी एक उभंटाकार पिंड पाहून, बेपत्ता नंदी यामुळे गोंधळून गेलो होतो! 15 मिनिटात मंदिरातून परतताना 4-5 फोटो काढून खट्टू होऊन निघालो. मंदिराच्या बाहेरील चहा टपरीपाशी आलो. वडापवाल्याला हाताने ‘चला’ म्हणून बोलावले. अन तोवर चहावाल्याला ऑर्डर दिली. ‘बनवून देतो, थांबावे लागेल’ म्हणून तो कामाला लागला. इतक्यात एक व्यक्ती, ‘काहो तुम्ही मंदिर पाहिलेत काय?’ असे आपणहून मला विचारत पुढे आला. बुशकोट-पँट मधील त्याचा एक हात प्लॅस्टरमधे बांधल्याने गळ्यातील पटट्यात अडकवलेला होता.
‘नाही. निराशा झाली. इथे तर कोणीच नाही. आल्यासरशी 4-5 फोटो काढले इतकेच.’ म्हणून मी मन मोकळे केले.
‘या, मी दाखवतो’ म्हणत त्यांने मला परत मंदिरात नेले! कोण हा माणूस? एकदम कुठून आला? असा विचार करे पर्यंत आम्ही मंदिराच्या मुख्य परिसरात परतलो होतो. पुढील दीड तास त्याच्या समावेत कसा गेला मला कळले नाही!!
वडापवाला मला, ‘चला, चला माझी गिऱ्हाईकं जातायत’ म्हणून मागे लागला. तर त्याला ‘उगीच टिवटिव करू नकोस. गप बसून सोड’ असे कानडी हेलात मराठीतून व नंतर वेळोवेळी कानडीतून काही बोलून असे गप्पगार गेलेन की शेवटपर्यंत गुमान झाला. माझा ताबा घेत त्यांनी मंदिराच्या कानाकोपऱ्यातील मुर्तींची व त्यातील बारकाव्यांची माहिती देताना रंगून जात होता. ‘मला तुमच्या सारखे लोक आवडतात. उगीच आटपा लवकर, लवकर म्हणणाऱ्यांच्या मी नादी लागत नाही! म्हणून त्यांनी आपली आवड सुनावली. मी सैन्यात होतो असे साभिमान सांगत वर डॉ. गो. बं. देगलूरकर कोण माहित तरी आहेत का?’ असा खडा सवाल करून माझी कसोटी घेतली. ‘नाही बुवा’ म्हटल्यावर त्याला त्यांच्या बाबत सांगायला हुरूप आला. ‘ते सर आले की संजय जोशीच्या घरात राहातात’ म्हणत आपली खास ओळख करून दिली.
‘आपण कोण? नाव काय?’ वगैरे मला विचारले तेंव्हा तुम्हाला ते शेवटी सांगेन म्हटल्याने त्याची उत्सुकता ताणली गेली. अगदी निघायच्या वेळी मी माझे ओळखपत्र त्याच्या हाती दिले. मी हवाईदलातून निवृत्त झालो हे कळताच त्यांना विशेष आनंद वाटला.
‘मी काही गाईड नाही, आपला मंदिर शास्त्राचा अभ्यास जाणकारांना सांगावा म्हणून मी अशा लोकांशी संपर्क करतो. मला पैसे वगैरे नकोत’ म्हटल्यावर मी त्यांना सहज म्हणालो, ‘अहो, या मंदिर निर्मितीला ज्या हजारो लोकांचे हातभार लागले. छिन्नी हातोड्यांचे, सुंदर कलाकारांचे, तज्ज्ञ वास्तुशास्त्रींचे, राजे-महाराजांचे त्यांना आता भेटणे शक्य नाही परंतु, तुम्ही या वास्तूचा आस्वाद करून दिलात त्यामुळे तुम्ही त्या कलाकरांपैकीच झालात. त्यांच्या महत्प्रयासांची आठवण म्हणून आदराची भेट आपल्याला दिल्याने मला ती त्यांना दिल्याचे समाधान मिळेल.’ म्हणून ही छोटीशी भेट नाकारू नये म्हणत हजाराच्या नोटा खिशात सरकवल्या व निघालो... असो.
तर अशा संजय जोशींच्या समावेत मिळालेल्या माहितीचा व छायाचित्रातून धावता आढावा सादर करत आहे. आधी पुर्वसुरींनी जी छायाचित्रे सादर केली आहेत, त्यांच्या कलाकौशल्याची व साधनसामुग्रीची माझ्या सारख्या सामान्य वकूबाच्या व मोबाईल कॅमेऱ्यातील चित्रांची बरोबरी करता येणार नाही. मला ज्या काही बाबी भावल्या व आधीच्या लेखातून पुसटशा उल्लेखिल्या गेल्या किंवा दिसण्यात आल् नाहीत त्यांना सादर करायचे धाडस करत आहे. त्यातील तपशीलाची माहिती ही जोशींनी सांगितलेली आहे. इतक्या देवी-देवतांच्या, यक्ष-किन्नरांच्या व अन्य जनांच्या मूर्तीं, डिझाईन्स ऐकून लक्षात ठेवणे शक्य नाही म्हणून मी सादर केलेल्या तपशीलात चुका आढळल्यास ती माझ्या आठवणींची गफलत मानावे ही विनंती...
काही खुलासे -
1. मंदिरात नंदी का दिसत नाही? ... दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही.
2. शिव कोपल्याने त्यांचे मुख दक्षिणेला झाले आहे. त्या कोपेश्वर पिंडीच्या शेजारी आणखी दिसणारी पिंडवजा मूर्ती धोपेश्वराची म्हणजे श्री विष्णूंची आहे. आडवे व उभे गंध यामुळे ते स्पष्ट होते.
3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य.
4. जोशींच्या मते हे मंदिर 13-14 शे वर्षांपुर्वीपासून आहे. देवनागरी शिलालेखातील ओळ अन ओळ त्यांनी पाठ म्हटल्याप्रमाणे वाचून दाखवली. कदाचित ती वास्तू त्या आधीही अस्तित्वात असावी. असे मला वाटले.
5. डॉ. गो. बं. देगलूरकरांच्या निर्देशनाखाली या वास्तूवर एक डॉक्यूमेंटरी 2005 च्या सुमारास बनवली गेल्याचे त्यांच्या कथनातून आले.
6. एका जाळीदार कलाकुसरीच्या शिळेतून बोट घालून त्यांनी त्याच्या कारागिरीतील बारकावे दाखवले.
7. मान वाकडी करून करून 15-20 फूट उंचीवरील मूर्तीतील सौदर्य न्याहाळताना-पाहताना ते नीट न पाहिल्याचे जाणवते. त्यासाठी उंच मचाणांची सोय करून मग एच डी कॅमेऱ्यातून दिवसाच्या विविध वेळी व रात्री फोकस टाकून त्यावर माहितीपट तयार केला जावा असे प्रकर्षाने वाटले.
8. श्री स्वामी नारायण संस्थेतर्फे अक्षरधाम या मंदिर रचनाकारांच्या मदतीने आधुनिक भारतीय इतिहासात मंदिर निर्माणाचा नवा अध्याय रचला गेला आहे. अशा संस्थांनी यात पुढाकार घेतला तर अशा अनेक दुर्लक्षित मंदिर वास्तूंचे मूळ सौदर्य निखरायला सुरवात होईल.
9. स्वर्गमंडपातील गोलाकार मोकळ्या शिरो भागाचे वैशिष्ठ्य दर्शवताना संजय जोशींनी माझी फिरकी घेतली. म्हणाले, ‘आपल्या मोबाईलला जमिनीवर ठेऊन सेल्फी क्लिक करा. पहा कसा पूर्णाकार चंद्रात तुम्ही दिसाल!’ मी तसे केले पण वरील अवकाशाचा फोटो येण्याऐवजी माझे शिर त्यात दिसले, ते पाहून तुमचे ते डोस्केचे फोटो पहायचे नाही हो, आणा मी दाखिवतो बघा... मग त्या फोटोत पुर्णचंद्राकार पांढऱ्या गोलावर माझ्या डोस्क्याचे सावट टिपले!!
10. मंदिराच्या कलशाच्यापर्यंतचा भागाचे छाया चित्र सहसा काढलेले दिसत नाही.

...

आपल्याला यंदाची दीपावली सुखा समाधानाची व मंगलमय जावो...
...

छायाचित्र पट

1
Figure 1 हत्तींच्या विविध आभूषण विलसित 92 मूर्तींचा दगडी चौथरा
2
Figure 2 मंदिर कळसावर फारच कमी कलाकुसर दिसते
3
Figure 3 मंदिर परिसर
4
Figure 4 पंचतंत्रातील कथा -गतीमंद कासवाला भुलवून सिहाला खाऊ घालणारे धूर्त बगळे
3
Figure 5 चलाख मर्कट- दुष्ट सुसर संवाद कथा
6
Figure 6 हत्तीवर आरूढ ध्यानस्थ बुद्ध
6
Figure 7 चुकून काढला गेलेला स्वर्गमंटपाकाशाचा फोटो
7
Figure 8 जो असा काढला पाहिजे होता !
1
Figure 9मूर्ती भंजकांच्या तावडीतून सुटलेला पूर्णसोंडेचा हत्ती
पोकळ खोबणीतील सुबकता
Figure 10 पोकळ करून केलेल्या खोबणीतील सुबकता
दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
Figure 11 दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
मैथुन आकृती
Figure 12 मैथुन आकृती
12
Figure 13 दक्षिण मुखीशिवांचे आडवे व विष्णूंचे उभे गंध अर्चित दोन लिंग समान आकृतीबंध
12
Figure 14 जोडवी अन पैंजण पावलाचे सांगाती
15
Figure 15 अंब्याच्या डहाळ्या व कैऱ्या चैत्र महिना दर्शवतात
16
Figure 16 संदर्भ न आठवणारे शिल्प कदाचित चोरून भेटणारे तरुण जोडपे?
17
Figure 17 गाल फुगवलेला वादक शिवगण
18
Figure 18 अष्ट कोनी कुंड त्याला जोडून असलेले सांड पाण्यासाठीचे मकरमुख
19
Figure 19 अस्थिपंजर कलिका
20
Figure 20 डाव्या बाजूचा अरबी व उजव्या बाजूचा बसक्या नाकाच्या वंशाचा

शिवाय अनेक फोटो आहेत पण त्याचे संदर्भ आठवत नाहीत...

--- Wing Commander Shashikant Oak. Pune. India.
: 09881901049

निरागस बालक व्हा

विश्वजीत दीपक गुडधे's picture
विश्वजीत दीपक गुडधे in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:24 pm

निरागस बालक व्हा.....निराशेला पळवा

मानवी भावना म्हटले की त्यामध्ये आनंद, राग, लोभ, मत्सर, द्वेष, भीती, निराशा या मनोवस्थांचा अंतर्भाव होतो. भावना म्हणजे मनाची निर्मिती. आपल्या परिसरात घडणार्‍या घटनांवर आपलं मन कसं प्रतिसाद देतंयावर ही भावना अवलंबून असते. खरं म्हणजे मनाला कोणत्याच सीमा मान्य नसतात. कधी मन उनाडपाखराप्रमाणे सैरावैरा उडत राहतं, कधी गटांगळ्या खातं, कधी अश्रूंच्या आड लपतं तर कधी क्षणार्धात दूरवर जाऊन येतं. अशीच एक मनोवस्था म्हणजे निराशा.

पणती

क्रान्ति's picture
क्रान्ति in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:24 pm

एक चिमुरडी पणती दिसली
रस्त्यावर पणत्या विकणारी
पाटी-पुस्तक-शाळेवाचुन
व्यवहारी गणिते शिकणारी

नऊ-दहा वर्षांची इवली
चंद्रकोरशी नाजुक, सुंदर
चतुर, कुशल संभाषण हसरे
व्यवहाराला परखड, कणखर

'ताई, काकू घ्या ना पणत्या
हलक्या, सुंदर, सुबक, टिकाऊ
शोभिवंत रांगोळीसाठी
दीपमाळ ही नवीन देऊ?

या पानांच्या आणि फुलांच्या
शंख-शिंपल्यांच्या, मोरांच्या
सोनेरी, रंगीत मण्यांच्या
वेगवेगळ्या आकारांच्या

माझ्या पुष्पसख्या

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:22 pm

(प्रसिद्ध बंगाली लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांचे ’अरण्यक’ हे (मूळ बंगाली भाषेतील ) पुस्तक वाचनात आले.य़ा पुस्तकात कथानकाच्या अनुषंगाने, भागलपूर,बिहार येथील मोहनपूरा रिझर्व्ह फौरेस्ट मधील वनश्रीचे नितांतसुंदर वर्णन केले आहे. ते वाचून मला माझ्या शाळकरी वयातील झाडाझुडपांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.)

कणकीचे लाडू

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:21 pm

नमस्कार मंडळी,

आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
यंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.

साहित्य:

  • २ वाटी कणीक
  • ३/४ वाटी तूप
  • ३/४ वाटी पिठी साखर
  • २ टीस्पून पोहे (जाडे किंवा बारीक)
  • ७-८ बदाम बी (सजावटीकरिता)

साहित्य

कृती:

संवाद एका नटासोबतचा - मंदार पुरंदरे

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:20 pm

(श्री मंदार पुरंदरे सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री पुरंदरे यांना धन्यवाद!)

*****************

मूळ पोलिश कविता : Rozmowa z Aktorem ( रोझमोवा झ आक्तोरेम )
मूळ पोलिश कवि: Ildefons Gałczyński ( इल्देफोंस गौचीनस्की )

संवाद : एका नटासोबतचा !

नुकताच तो इथून गेला ,

अजूनही या खोलीत त्याचा वावर जाणवतो आहे
त्याची अर्धी सिगारेट मंद धूर सोडते आहे.

संवादिका : रोड टू विन (जिंकण्यासाठी कायपण...)

प्रास's picture
प्रास in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:19 pm

----------------------------------------
"बर्गोमी, काय करायचं बोल! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?"
"ए माल्डिनी, काय बोलतोयस? कसला धंदा? आणि हे फॅमिली, फॅमिली काय प्रकार आहे?"
"अरे दोनादोनी, सांग रे याला! लक्ष्य कधी नव्हे ते येवढं जवळ दिसतंय आणि हा मात्र.... ए, घुसळ रे याला, तू चेंडू घुसळतोस तसं."
"बर्गोमी, सध्या माल्डिनी पुझो वाचतोय रे..."
"हो का रे, मग काय आता पाब्लो माल्डिनीच्या ऐवजी डॉन कॉर्लिओनी म्हणायचं का तुला?"
"अरे नाय रे! मी पुढच्या मॅचबद्दल विचारतोय. काय करायचंय?"