शिफारस

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.

'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).

साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?

पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!

मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..

बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..

अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!

अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!

लेखनविषय:: 

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:

खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.

बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).

या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.

अलि अँड द बॉल: कुंपणाआडचं आभाळ

मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे. कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्‍या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत. हात उंच करून तो चेंडू त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.

ब्राउजर एक्स्टेंशन्स

लेखनविषय:: 

नमस्कार मंडळी,सुझेच्या अ‍ॅन्ड्रॉइड धाग्यात अ‍ॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे.

तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे.

***************************************************

ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते.

राग दरबारी

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.
'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.

लेखनविषय:: 

गुंडा

क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर
गायन = लता / आशा / किशोर / रफी
संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन
अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी
सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर
लेखक = पु ल / व पु / सावंत
कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे
पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ
ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.

श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.

अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.

संपादक मंडळास नम्र विनंती.

वर्तुळ-कोन सिद्धांत

"

Pages