कला
CE मार्कची वांगी!!!!?????
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो)


त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो. बहिणीने तिच्या छोट्याशा बागेतली वांगी दिली भरीत करायला. पण मग या वांग्यावर CE मार्क कसा आला? हे तपासण्याकरीता मी माझी पिशवीही तपासली. मग या मागचे कोडे उलगडले. बहिणीच्या डेस्कटॉपच्या किबोर्डचा प्रॉब्लेम होता. तो किबोर्ड बदलण्यासाठी मी पुण्यात आणला येताना निघण्याची घाई झाल्याने तो वांगी असलेल्या पिशवीतच भरला. त्यावरचा CE मार्क मग वांग्यांनी प्रवासादरम्यानच उचलला असावा. असो भाव खाऊन गेली हो ही वांगी. पण नंतर त्याचं भरीत करुन उट्ट काढलं.
कलात्म
योग्य विभाग न लक्षात आल्यामुळे जनातलं मनातलं मधे हे टाकतेय.
-------------------------------
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अॅण्ड मिडीया या संस्थेने.
एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत.
रवी परांजपे, डॉ. द भि कुलकर्णी, प्रभा अत्रे, शांता गोखले, सुरेश तळवलकर, मीना कर्णिक, श्यामला वनारसे, शमा भाटे, सुधीर गाडगीळ, विठ्ठल उमप, माधव वझे, वामन केंद्रे, प्रवीण भोळे, कमलेश वालावलकर, दासू वैद्य, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, राजन खान, चंद्रकांत कुलकर्णी, रंगनाथ पाठारे, नागराज मंजुळे, मंगेश हाडवळे, समीर विद्वांस, वैभव आरेकर, चैतन्य कुंटे, हिमांशू स्मार्त अश्या अनेक विविध कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या लेख/ मुलाखतींबरोबरच कलाकारण या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अश्या काही राजकारणी लोकांशी केलेली कलाविषयक बातचीत हे ही आहे.
संग्रही ठेवावेत असे अंक आहेत.
हे दोन अंक आणि संजय आवटे यांचं कला कल्पतरूंचे आरव - आनंदाचे झरे जपायचे कसे? हे पुस्तक असा संच सध्या सवलतीच्या दरात (रू. ३००) उपलब्धही आहे. त्यासाठी 08975969338 - ऋतुजा मुळे या क्रमांकावर संपर्क करा. तसेच मायबोली या संकेतस्थळाच्या खरेदी विभागातही हा अंक उपलब्ध आहे.
जाता जाता माझाही एक लेख यात आहे. :)
पण माझ्या लेखापेक्षा काही खरंच खूप महत्वाचे लेख आहेत म्हणून हे इथे सांगतेय.
-नी
आज गुरुपोर्णिमा....
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा :
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्रीगुरुवे नम: ॥

हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानकी ll छोटे न हो हम बुद्धी से , हे विश्वमय से ईशमय , हो राममय और कृष्णमय् , जगदेवमे जगदीशमे हर ईंद्रियोंपर ताप कर , हम वीर हो अतिधीर हो , उज्ज्वल रहे सरसे सदा , निजधर्मरत खंबीर हो ll अतिशुद्ध हो आचारसे , तन-मन हमारा सर्वदा ,अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नही करदे जुदा , इस अमर आत्मा का हमे हर श्वास भरमे गम रहे , अगर मौत भी आ गई , सुख दु:ख हमसे सम रहे l हे गुरुदेव हम सबको सदबुद्धी दे l सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे l सच बोलनेका अभ्यास दे l सत स्वरुप का ग्यान दे l
llशिष्यादिच्छत्पराजयम..ll
विवेकानंदांना घडवणारे...

जेव्हा नवीन कळी उमलते तेंव्हा त्याचा आनंद कोणत्या शब्दांत वर्णावा ! तीच कळी अस्तित्वात येउन तिच फलांत रुपांतर करण्यासाठी त्याला लागणारं पोषक वातावरण उपलब्ध करण्यास सहाय्य ठरणारे गुरु.. जन्माला आल्यापासुन त्यावर संस्कार करण्याचे कार्य पार पाडत असलेले माता-पिता हे प्रथम गुरु..
शिक्षण हा कधीही न संपणारा शोधच असतो. विद्यार्थ्याची रुची- कल जाणुन त्याना योग्य मार्गदर्शन देणारा हाच गुरु..खरे तर अशीही म्हण प्रचलीत आहे की 'अनुभवासारखा श्रेष्ठ दुसरा गुरु नाही' ,'ग्रंथ हेच गुरु', पण सर्जनशीलता, स्वयंविचार,स्वयंअनुभव, निरिक्षणशक्तीचे एकत्रिकरण कर्ण्यास गरज भासते ती मानवी गुरुची...
आपल्याला असलेले अनुभव वाचायला उत्सुक....
हरिहरेश्वर...!!
हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान
एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..












- अस्मिता
हे फोटो मी स्वतः काढलेले नाहीयेत...माझ्या भावाने काढलेले आहेत
एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )
मित्रहो,
आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.
सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक ! मन हलके करा जरा आणि आपल्या प्रेयसीला/हिला वाचून दाखवा ही गज़ल !:-)
मा रा ब-घम्ज़ा् कुश्त्-ओ-कज़ा रा बहान साख़्त्
खुद सू-ए-मा ना दीद्-ओ-हया रा बहान साख्त्
तिने आमच्यावर स्वत:च्या अदाने नजरेचे खंजीर चालवले आणि मी मरायला टेकल्यावर गरीब बिचार्या म्रृत्यूवर आळ घेतला.
माझ्याकडे बघितलेही नाही पण आव तर असा आणला की “मी लाजून बघितले नाही तुझ्याकडे”
रफ्तम् ब मस्जिदे के ब-बीनम् ज़माल-ए-दोस्त्
द्स्ते ब-रूख् कशीद-ओ-दुआ रा बहान साख़्त्
आता हिचा चेहेरा ज्याने आम्हाला वेड लावले आहे त्याचे दर्शन घ्यायचे कसे? मग आम्ही एक क्लुप्ती लढवली.
आमच्या या प्रेयसीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला मशिदी सारखी जागा कुठे असणार ? ती प्रार्थना करेल आणि आम्ही तिच्या मुखाचं दर्शन घेत राहू. पण एवढे कुठले आमचे नशिब ? हाय ! तिने तर आपले मुखकमल आपल्या हाताच्या ओंजळीत झाकून घेतले आणि दुआ मागण्याचा बहाणा केला.
द्स्ते ब दोश्-ए-गैर निहाद अ़ज् सर्-ए-करम्
मा रा चूं दिद् ओ लघ्ज़िश्-ए-पा रा बहान साख़्त्
आता मात्र कमाल झाली. बघा कसा तिने माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. माझ्याकडे नजरही न टाकणारी ती, त्याच्यावर एवढी कृपादृष्टी कशी काय बुवा ?
तेवढ्यात आमची नजरानजर झाली आणि बघा आता - तिचा तोल गेल्यामुळे कोणाचातरी आधार घेतल्याचा बहाणा.
जाहद् न दाश्त् ताब्-ए-जमाल्-ए-परी रूखान्
कुन्जे गिरफ्त्-ओ-याद-ए-ख़ुदा रा बहान साख़्त्
या आमच्या धर्मगुरूंबद्दल माझा आदर हे पाहून अधिकच वाढला की या एवढ्या सुंदरी इथे हजर असताना हे आपल्या मनावर कसा काय ताबा ठेऊ शकतात ? अरेरे! अरे देवा काय बघतोय मी हे ? त्यांनी आपली जागा सोडून मशिदीचा कोपरा गाठला आणि प्रार्थनेचा बहाणा केला.
पण डोळे किलकिले करून ते तिच्याकडेच पहात होते.
ख़ून-ए-कातील-ए-बे सर्-ओ-पा रा बहा-ए-खीश
मलेदान-ए-निगार-हिना रा बहाना साख़्त्
खरंतर मला रक्तबंबाळ करून तिने ते तिच्या पुस्तकातल्या पानांना फासलंय,
पण बहाणा मात्र सगळ्यांच्या समोर असा करते आहे की त्या पानांना ती प्रेमाने हिना लावत आहे.
हाही बहाणा !
शायर : मिर्झा महम्मद हसन ( कातिल )
१७५७ ते १८१८.
आणि ही गज़ल इथे ऐका.
जयंत कुलकर्णी.
संमोहन------ संदर्भः माइंडफ्रीक-क्रिस एंजल
काल टीव्ही चाळतांना AXN वर 'माइंडफ्रीक-क्रिस एंजल' असा कार्यक्रम शेवटची ५ मिनिटे बघायला मिळाला. त्यात क्रिस एंजल एका रेस्तरॉ मधे जेवत असलेल्या लोकांना फक्त ४-५ वाक्ये बोलून संमोहित करतो आणि झोपण्यास सांगतो. अचंबित होण्याचि गोष्ट म्हणजे ४०-५० लोक त्याच्या एका चुटकीसरशी झोपी जातात. अगदी हातात ट्रे घेवुन चालणारा वेटर देखील चुटकी वाजताच झोपतो आणि धाड्कन जमिनीवर कोसळतो. अशी २ मिनिटे गेल्यावर क्रिस एंजल त्यांना जागे व्हा असा आदेश देतो आणि सारेजण जागे व आश्चर्यचकीत होतात. (ह्याचे विडिओ तुनळीवर आहेत)
संमोहन ह्या प्रकाराबद्दल मिपावर कोणी माहितगार आहेत का? हे सर्व खरे आहे की बनावट? कोणी असा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे का? सामान्य / सश्रध्द/ विवेकवादी / विज्ञानवादी लोकांचे ह्याबाबत काय मत आहे? (ज्याने त्याने आपापली क्याटेगरी ठरवावी ) ;)
Caricature:Johny Lever

प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत .....




