अभिनंदन
डोंबिवली कट्टा....
प्रेषक, मुक्त विहारि, Wed, 08/05/2013 - 22:30प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो,
दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे.
नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे.
ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल.
प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.
ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे...
मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.
मिपाची काळी बाजू!
प्रेषक, परिकथेतील राजकुमार, Thu, 28/03/2013 - 12:04काही तासांपूर्वी अग्नेयैशान्येतील कुठल्या तरी संस्थळावर संपादकीय लिहिण्यास भाग पडलेल्या निवाशावर लेख होता. आज तसाच एक लेख मिपावर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारे हे संस्थळ खरे तर नवोदित सदस्यांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेले आहे. ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का मिपावर उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपले संस्थळ आणि तिथली कंपुबाजी परवडली अशी त्यांची परवड होते.
गाथा 'टायटन' ची - Heritage Collection
प्रेषक, मोदक, Sun, 24/03/2013 - 22:04
टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.
ही व्यक्ती होती अभिजीत बनसोड.
गाथा 'टायटन' ची - टायटन एज्
प्रेषक, मोदक, Sat, 09/03/2013 - 12:49गाथा टायटनची - टायटन एज्

टायटन.
हे नांव ऐकले की ती सुप्रसिद्ध ट्यून डोक्यात वाजू लागते. ती प्रेमळ आजीबाई आणि तो मुलगा...
आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनगटावर 'टायटन' मानाने विराजमान झालेले असेल. सोनाटा, फास्टट्रॅक, रागा, रिगालिया, नेब्युला ही याचीच भावंडे!
वर्तुळ-कोन सिद्धांत
प्रेषक, श्रावण मोडक, Fri, 08/03/2013 - 17:57"
उंटांची चालच तिरकी!
प्रेषक, चतुरंग, Sun, 10/02/2013 - 23:21सचिनला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ब्रेटलीचे अस्त्र काढले तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियातच धू धू धुवून सचिनने वाळत घातला होता! गेल्या तीन आठवड्यांखाली विक अॅन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळस्पर्धेत आनंदने लेवॉन अरोनियनला ज्या जीवघेण्या पद्धतीने पिसला ते बघून मला सचिन-ब्रेटली सामन्याची आठवण न होती तरच नवल. ह्या विजयाने आनंदने भल्याभल्यांची तोंडे बंद केली. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मॅग्नुस कार्लसनने देखील 'माईंड ब्लोइंग' असं या डावाचं वर्णन केलं.
खल्लास
प्रेषक, श्री गावसेना प्रमुख, Sat, 09/02/2013 - 10:12एकदाचा खेळ खल्लास झाला अफजल गुरु चा,आज सकाळी ५.३० ला तीहार जेल मध्ये ह्या दहशतवाद्यास फाशी देण्यात आली
ह्याची माहीती गृह सचीव आर के सिंह यांनी दिली,पण एक समजत नाही की ह्याला फाशी दिल्याने काश्मीर मध्ये हाय अलर्ट, कॉलेजेस चे सगळे कार्यक्रम रद्द्,हा काश्मीरी नागरींकाचा देव वैगरे होता की काय .(कसाब च्या बाबतीत काही हिंसा झाली नाही)
आता भाजप काय म्हणनार ह्या विषयावर्,बाकी बाळासाहेबांनी दुसर काम केलय स्वर्गात गेल्यावर.
जय हिंद

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
प्रेषक, अविनाशकुलकर्णी, Tue, 05/02/2013 - 22:35
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .