दिवाळी अंक २०१३

Diwali Anka 2013

संपादकीय

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
1 Nov 2013 - 7:00 am

नमस्कार मंडळी,
मिसळपाव संस्थळाकडून हा सलग दुसर्‍या वर्षीचा 'दिवाळी अंक' सादर करताना मनात अभिमान अन आनंद याशिवाय कोणत्याच भावनेला थारा नाहीये. हे संपादकीय जरी मी लिहीत असले, तरी या अंकावर आपल्या सर्वांचा हक्क आहे. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून, खपून, ठरवून केलेल्या कार्यक्रमाची गोडी या दिवाळी अंकालाही आहे. संपादक मंडळाने दिवाळी अंकाची जाहिरात केल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत भरघोस लेखनाचा आशीर्वाद आम्हाला तुम्हा सदस्यांकडून लाभला, आणि या आशीर्वादाबद्दल, तुम्ही दाखवलेल्या या आत्मीयतेने आम्ही सर्वच जण अतिशय भारावून गेलो आहोत.

अभंग

सार्थबोध's picture
सार्थबोध in दिवाळी अंक
1 Nov 2013 - 6:58 am

शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो.
माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे.
चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे,
शब्द - सचिन पु. कुलकर्णी (सार्थबोध)
संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले,
ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप,
ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई.
गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित.
अभंगाची लिंक इथे देत आहे.

चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)

सोत्रि's picture
सोत्रि in दिवाळी अंक
1 Nov 2013 - 6:57 am

chawadee

“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

असू दे

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
30 Oct 2013 - 1:01 pm

दिवाळीत फार फार प्रदूषण होतं.

पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं..

धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं..

मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्‍या..

म्हणून असूदेत थोडे फटाके..!!

..

तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे..

कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच..

आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच..

पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात..

श्रीधर

mvkulkarni23's picture
mvkulkarni23 in दिवाळी अंक
29 Oct 2013 - 1:12 pm

देवांनी दिलेल्या आणि आपल्याला लाभलेल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्याला किती आणि किती तर्‍हेची माणसे भेटतात! काही जण पहिल्याच भेटीत जिवाभावाचे मित्र होऊन जातात, काही जण अकारण शत्रूसारखे वागतात. काही नीट ओळख झाल्यावर त्याच्याविना जगणे अशक्य करून टाकतात. यामध्ये वयाचा, मानाचा कसलाही मुलाहिजा नसतो. एखादा लहानगाही त्याच्या मोजक्या शब्दांनी आपल्याला विचारात पडतो, तर कधी वृद्धांचे कातरलेले शब्द काळजाला घर करून जातात. ह्या सगळ्यात कधी आपली अपंग, मतिमंद, अंध किंवा काही व्यंग असलेली व्यक्ती जर समोर आली, तर आपण सहसा टाळायचा प्रयत्न करतो.

गज़ल

स्नेहदर्शन's picture
स्नेहदर्शन in दिवाळी अंक
29 Oct 2013 - 1:10 pm

सदैव उघडे मज दुःखाचे दार नको
फक्त वेदना आयुष्याचे सार नको

कोण खेळला कैसा येथे पाहून घे,
मला कुणाची जीत नको वा हार नको!!!

का विसरावी प्रीत माणसा मनातली
जगात कोणी इतकाही लाचार नको

मला झेलता यावे इतके पदरी दे,
मला पाहिजे ते ही काही फार नको

माझा व्हावा मीच दिलासा कायमचा,
कोणाचाही खांदा वा आधार नको.

--स्नेहदर्शन

कातळ माळ

चाफा's picture
चाफा in दिवाळी अंक
28 Oct 2013 - 5:13 am

कसल्यातरी जाणिवेने `ते' जागं झालं. ही जाणीव कसली, ते `त्या'ला कळत नव्हतं. पण ती कशाने शमते, हे चांगलंच माहीत होतं. कुणीतरी त्याला ‘भूक’ अशी संज्ञा दिल्याचं `त्या'ला आठवत होतं.

बुंदीचे लाडू

रेवती's picture
रेवती in दिवाळी अंक
28 Oct 2013 - 4:36 am

साहित्य: दोन मोठ्या वाट्या हरभरा डाळीचे पीठ (बेसन), दोन टीस्पून मोहनासाठी गार तेल, दोन वाट्या साखर, कक्ष तापमानाचे पाणी, तेल अथवा तूप, वेलदोड्यांची पूड भरडसर, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे, असल्यास बुंदी पाडायचा झारा, नसल्यास नेहमीचा झारा, डाव.

जनरेशन गॅप

चाफा's picture
चाफा in दिवाळी अंक
28 Oct 2013 - 4:30 am

वेळ : अपरात्र
स्थळ : कुणाच्याही घराचा असू शकेल असा हॉल
“हाय डॅड”
“आलास? बापाला डॅड केलाच आहेस, आता उशिरापर्यंत बाहेर उनाडून त्याला डेडपण कर.”
“पण आता मी मोठा झालो बाबा, काळजी कशाला करताय?”
“आधी मला सांग, कुठे उधळला होतास इतक्या रात्री?”
“चांदण्या बघत होतो!”
“निर्लज्जपणे सांगतोयस हे?”
“का? तुम्हीच तर लहानपणी दाखवायचात की, कधी कधी मोजायचातसुद्धा.”
“त्याला नाइलाज होता. घर गर्ल्स हॉस्टेलसमोरच होतं, म्हटल्यावर..”
“काय सांगताय बाबा, ही बातमी आईला द्यायलाच हवी. आई, ए आई”