क्रीडा

अखेर दुसरी कसोटी भारताने जिंकली

अखेर दुसरी कसोटी भारताने जिंकली

अभिनंदन

http://imsports.rediff.com/score/in_match8914.html

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...

ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे जेव्हा सर्वांना समजेल तो सुदिन.)..

मग चांगली कामगिरी म्हणजे काय ? माझ्या मते स्वत:च्याच उत्तम कामगिरीवर मात करत राहणं आणि ऒलिंपिकसारख्या मोठ्या मंचावरती स्वत:चा बेस्ट परफ़ॊर्मन्स देत राहणं , निदान भारतीय विक्रम मोडत राहणं.. ही अपेक्षा मी करतो....आणि इतपत अपेक्षाच योग्य आहे.

क्षमता :
१९९८ मध्ये इंडिया टुडेमध्ये भारतीय खेळाडूंच्या जागतिक कामगिरीविषयक एक तुलनात्मक लेख आला होता...त्यात बर्याच क्रीडाप्रकारातली भारतीय विक्रम आणि जागतिक विक्रम अशी तुलना केलेली होती...


http://www.india-today.com/itoday/29061998/cover.html

या लेखात कोणताही ब्लेम गेम नव्हता तर केवळ वस्तुस्थिती दर्शवली होती.... मी हा लेख वाचून खचलोच... म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
Throwers eat the same food runners do at the sai centres, only they're allowed a larger quantity. Sports drinks too, unlike water which often merely quenches thirst, reintroduce vital supplements in the body. In the US, Leander would undergo tests merely to measure his sodium loss. Then Dr Michael Bergeron of the Department of Exercise Science, University of Massachussetts, instructed him on his sweat rate (litres/hour) and therefore how much he must replenish. In India, hockey players drink from a tap in the field.
आता काही लोक म्हणतील ध्यानचंद हेच टॆप वॊटर पिऊन खेळायचा ना ? पण अहो असा अद्भुत माणूस शतकात एखादा होतो... सगळ्यांकडून तीच अपेक्षा कशी ठेवता येईल?

टीव्हीवाले वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काहीही बोलत,दाखवत असतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात मतलब नाही पण वृत्तपत्रांचे पत्रकार तरी निदान तारतम्याने लिहितील असं मला वाटत असे.... पण तसे नाही...

काही क्रीडावृत्तपत्रकार भारतातले रेकॊर्ड होल्डर जगात पस्तिसाव्या, चोपन्नाव्या , विसाव्या वगैरे क्रमांकावर आहेत तरी त्यांच्याकडून पद्क अपेक्षतात... मग ती अंजली भागवत असो, अंजू जॊर्ज असो, साईना नेहवाल असो किंवा वीरधवल खाडे....( वर हे आणि की " मग? आम्ही अपेक्षा करणारच.. आमच्या कराच्या पैशातून स्पोर्ट्स मिनिस्ट्री त्यांचा खर्च करते ..." )....आता याला ऒप्टिमिस्टिक राहणं असं ते समजत असावेत.... अशांना ऒलिम्पिक झालं की अपेक्षाभंगाचा मोठा धक्का वगैरे बसतो.... मग हेच पत्रकार "... एक सव्वा अब्ज लोकसंख्येच्या खंडप्राय देशामध्ये दोन तीन पदके मिळू नयेत ? ..." वगैरे लेख पाडण्यात मग्न होतात...
आता या पॆटर्नचाच कंटाळा आलाय अगदी...

आता पहा, वीरधवल पदक मिळवणार पदक मिळवणार , त्याला कशी जनतेने मदत केली म्हणून तो इथवर येऊ शकला... तोच एक ऒलिम्पिकची आशा असले लेख वर्तमानपत्रातून पडायला लागतील, तो मेहेनतीने खेळेल.... चांगली कामगिरीही करेल पण पदक मिळाले नाही म्हणून सामान्य नागरिक त्याला शिव्याही घालेल....पण म्हणून ऒलिम्पिकनंतर त्यातूनच वीरधवल आणि साईना सारख्या खेळाडूंना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच किती वैफ़ल्य येत असेल...

आपल्या खेळाडूंचे जगातले क्रमांक ( रॆंकिंग या अर्थाने ) पाहिले तर पदक मिळवणे ( म्हणजेच पहिल्या तीनात क्रमांक पटकावणे ) जवळजवळ अशक्यच आहे असे कोणीही म्हणेल.... तरीही ९६ ला पेस, २००० ला मल्लेश्वरी आणि २००४ ला राजवर्धन राठोड यांनी पदके मिळवलीच ना... ही अत्यंत अद्भुत कामगिरी आहे आणि मला त्याबद्दल अत्यंत आदर आणि अभिमान आहे.... पण म्हणून मी आता रोज वर्तमानपत्रात लेख वाचतो की बॊक्सिंगकडून पदकाची अपेक्षा, कुस्तीत पदकाची अपेक्षा, बॆडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा हे सारं अंमळ भंपकपणाकडं झुकणारं... म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...

जाताजाता : काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणून माझेच दात माझ्याच घशात घातले तर मला आनंदच होईल हे वे सां न ल.... Smile

सांघिक खेळ

हे असे कां व्हावे? कर्मधर्मसंयोगाने विंबल्डनची अंतीम फेरी तीन ठिकाणी बसून बघितली. ज्याला त्याला फ़ेडरर जिंकावा असेच वाटत होते. नादालचे परतावे जबरदस्त दिसत असतानाही सहानुभूती त्या फ़ेडररलाच दिसत होती. तीसया सेटला नादालचा पाय दुखावला तेव्हा त्याची लंगडी चाल पाहून ’पुरे झाली तुझी नाटकं’ अशी टिपण्णी देणारे देखील होतेच. एकूण केबलचा पैसा वसूल करणारी मॆच होती हे नक्की.

आणि हो, प्रेक्षकांत बसलेल्या बोर्गला हसताना पहिल्य़ांदाच पाहिले.

आता सायकल शर्यत सुरु आहे. मला ही स्पर्धा जास्त शैक्षणिक वाटते. खरी संघभावना या स्पर्धकांमध्ये दिसून येते. तीन आठवडे चालणाया या स्पर्धेत बयाच strategic गोष्टी बघायला मिळतात. आपल्य़ा संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथम यावा म्हणून बाकी सदस्यांनी केलेल्या व्यूहरचना व त्याग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुकरणीय असू शकतात.

आपल्या इतिहासात सांघिक खेळाचे एकही उदाहरण मिळू नये हे आपल्या संस्कृतीबद्दल बरेच काही सांगून जाते कां?

१६

१६
हे काय आहे?

हा सरकारला टिकून राहण्यासाठी हवा असलेला कोणताही आकडा नाही किंवा गझलांमधली "बाली उमर" नाही.

तर आजपासून १६दिवसांनी चीन मध्ये ऑलिंपिक सुरू होणार आहे. चीन मध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
चीन १९८४ मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिक सामील झाला. त्यावेळी चीनने ३२ पदके मिळवली. तर मागच्या २००४च्या ऑलिंपिक मध्ये, ६३ पदके मिळवून दुसरे स्थान पटकावले. २० वर्षातली ही चीनची कामगिरी.

या उलट भारताची स्थिती आहे. २००४ मध्ये १, २००० मध्ये १ पदक.
याचे कारण काय आपल्याला काय वाटते?
समाजात क्रिकेट शिवायच्या खेळाबद्दलची असलेली अनास्था? खेळांमध्ये ही राजकारणी लोकांची ढवळाढवळ?

दुवा: उत्तर शोधायचे असेल तर google मध्ये "Indian Olympic Association" शोधून पहा

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

सेकंड इनिंग - ( रवि शास्त्री )

सेकंड इनिंग -

आज काल बरेच क्रिकेटर, क्रिकेटची आपली पहिली इनिंग संपल्यावर समालोचन करणे चालु करतात. बर्‍याच खेळाडुंचे समालोचन ऐकताना( काही अपवाद वगळता ) वाटते की हा जो आत्ता सल्ले देत आहे ते, तो स्वतः खेळत असताना का नाही आचरणात अणायचा? म्हणजे 'दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' असे काहीसे.

असो. या लेखनमालेतुन क्रिकेट खेळत असताना जितकी प्रसिध्दि मिळाली नाही त्यापेक्षा जास्त प्रसिध्दि इतर गोष्टीत ( समालोचन/ राजकारण) मिळाली अशा काही माझ्या आवडत्या खेळाडुंची माहिती संग्रह करण्याचा प्रयत्न.

सुरुवात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पासुन--

--------------------------------------------------------------------------

रवीशंकर शास्त्री. - २७ मे १९६२ ला मुंबईत जन्म.

आजचा सर्वात आघाडिचा ( आणी इतरांपेक्षा जास्त भाव खाऊन जाणारा) समालोचक. आधी म्हणल्याप्रमाणे सेकंड इनिंग एकदम यशस्वी ठरलेला खेळाडु. उत्तम संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. उत्तम व्यक्तिमत्व विशेषतः बॉडी लैंग्वेज, खेळासंबंधी सखोल महिती / अभ्यास, योग्य विश्लेषण करण्याची कला, हजरजबाबीपणा, सामना ज्या शहरात खेळला जात आहे ते शहर/ संस्कृती याबाबत माहिती , हे सर्व गुण रवी शास्त्रीला इतर समालोचकां पेक्षा नक्किच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. खेळणार्‍या सर्व खेळाडुंची अक्षरशः कुंडलीच शास्त्रीला पाठ असते. त्याची कॉमेंट्री ऐकत सामना बघायला एक वेगळीच मजा येते.
प्रत्यक्ष मैदानावर साधारणपणे ८० कसोटी व १५० पेक्षा जास्त एक दिवसीय सामने खेळलेला शास्त्री लक्षात राह्तो ते मुख्यत्वे १९८५ मधील "बेन्सन अन्ड हेजेस" मधील अंतीम सामन्यातील ( बहुतेक पाकिस्तान विरुध्द) खेळीने , त्याने मिळवलेल्या ओडी कारमुळे ( अन् गमवलेल्या अमृता सिंगमुळे).

आजच्या धोनी -युवराज -दिपिका प्रमाणे रवी शास्त्रीच्या ऐन उमेदीत रवी - अमृता प्रकरण ही चांगलेच गाजले होते.

उजव्या हाताने फलंदाजी करणारा शास्त्री स्पिन गोलंदाजी मात्र डावखुरा करायचा. मनिंदरसिंग बरोबर त्याची चांगली जोडी जमली होती. संघातील आणी संघाबाहेरील खेळाडुंशी चांगली मैत्री होती. मुंबई संघाचा खेळाडु/ संघनायक, भारतीय संघ खेळाडु/ संघनायक, कौंटी क्रिकेट्,संघ व्यवस्थापक ते यशस्वी समालोचक रवी शास्त्री याने क्रिकेट रसिकांच्या मनात त्याच्या सेकंड इनिंग मधे का होईना मानाचे स्थान नक्कीच मिळवले आहे यात शंका नाही.

----------------------------------------------------------------------------------------

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. Smile

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! Wink )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले.)

रूबिक्स क्यूब

कोणी solve केला आहे का? मी आत्ताच पूर्ण केला. Algorithm आणि video इथे आहे. कितीतरी वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिले तर video बघून पण गोंधळ घातला होता. पण आत्ताच solve केला.

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल.
बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले! (घोडा अडीच घरे चालविण्या ऐवजी बहुदा साडेतीन घरे चालवण्याचा दीड शहाणे पणा त्यांना भोवला असावा! Wink )
लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!!

वडील त्याला हवानाच्या चेस क्लबमधे खेळायला घेऊन गेले. तिथल्या नामवंत खेळाडूला त्याने क्वीन ऑड्स (म्हणजे त्या खेळाडूकडे वजीर नाही आणि कापाकडे आहे) अशा अवस्थेत जरी हरवले तरिही चार वर्षाच्या कापाचा खेळ त्याच्या वयाच्या मानाने विलक्षण प्रतिभावान होता.
१९०१ मधे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कापाने जुआन कॉर्झो ह्या स्पॅनिश्-क्यूबन खेळाडूला हरवून सनसनाटी विजय मिळवला. ह्याच कॉर्झोने पुढे कापाच्या साथीत 'नॅशनल चेस फेडरेशन' स्थापन केले आणि तो कित्येक वर्षे 'कापाब्लांकाज चेस मॅगझीन' चा संपादकही होता.

नंतरच्या काही वर्षात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून होजेने रसायन अभियांत्रिकीतली पदवी घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे तिथे काही जमले नाही त्याने व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडूच होणे पसंत केले. (बरे झाले म्हणायचे नाहीतर कदाचित आपण बुद्धिबळातले एक चांगले रसायन गमावले असते! Smile )
१९०९ मधे त्याने अमेरिकन चँपियन फ्रँक मार्शलला (+८, -१ = १४) असे हरवले. त्यानंतर लगेचच १९१० मधे तो न्यू यॉर्क राज्याचा विजेता ठरला. पाठोपाठ आलेल्या १९११ च्या दुसर्‍या एका स्पर्धेत तो मार्शलच्या पाठोपाठ दुसरा आला. त्याची खेळातली विलक्षण चमक बघून त्याने सॅन सेबॅस्टियन, स्पेन येथे होणार्‍या जागतिक स्पर्धेत भाग घ्यावा असा आग्रह खुद्द मार्शलने धरला. तत्कालिन जगज्जेता एमॅन्यूएल लास्कर वगळता सर्व अतिरथी-महारथी त्या स्पर्धेला झाडून हजर होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच ऑसिप बर्नस्टीन आणि ग्रँडमास्टर ऍरॉन निम्झोविच (तोच तो निम्झो-इंडियन डिफेन्स वाला) ह्या दोन दिग्गजांनी कापाच्या स्पर्धेतील सहभागाला आक्षेप घेतला कारण त्यांच्या मते तो एकही मोठी स्पर्धा जिंकला नव्हता! (मोठ्या स्पर्धेत खेळल्याशिवाय जिंकणार कसा?! प्रस्थापित विरुद्ध नवखे हा वाद तसा सार्वकालिक आणि सर्वक्षेत्रीयच म्हणायला हवा! Wink ) कापाने त्याच्या पहिल्याच डावात बर्नस्टीनला लोळवून आपल्या कृतीनेच ह्याचे उत्तर दिले. त्याच्या ह्या डावाला सामन्यातले सर्वोत्कृष्ट डावाचे बक्षीसही मिळाले. बर्नस्टीन तसा शहाणे बाळ होता -कापाचे श्रेष्ठत्व मान्य करत तो लगेच म्हणाला की "ही स्पर्धा कापाने जिंकली तरी आश्चर्य वाटायला नको!"
आता पाळी निम्झोविचची होती. त्याचा अहं दुखावला! त्यातच निम्झोच्या एका अतिजलद सामन्यात प्रेक्षक असलेला कापा काहीतरी बोलला. "नवख्या खेळाडूंनी अनुभवी लोकांमधे तोंड घालू नये" ही निम्झोची टीका ऐकून घेणार्‍यातला कापा अर्थातच नव्हता. त्याने लगेच निम्झोला जलद स्पर्धेचे आव्हान दिले! ह्या जलद स्पर्धेत त्याने निम्झोला चक्क धुतले!! त्याचा तो पराक्रम पाहून अतिजलद स्पर्धेचा बादशहा असा किताब त्याला बहाल केला गेला तो त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होता!
त्याच स्पर्धेतल्या नेहेमीच्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या कापाने निम्झोला हरवले. हा डाव कापाच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मोहोर्‍यांना राजापासून वेगळे काढून लांब नेऊन गुंतवून ठेवणे आणि आपल्या इतर मोहर्‍यांनी त्याच्या राजाची कोंडी करणे हे तंत्र ह्यात दिसून येते. किमान ८ ते १० चाली पुढचा पक्का विचार असल्याखेरीज हे शक्य नाही!
सॅन सॅबास्टियनच्या त्या स्पर्धेत कापानं अव्वल क्रमांक पटकावताना अकिबा रुबेनस्टाईन, कार्ल श्लेचर आणि सिगबर्ट ताराश सारख्या भल्याभल्यांना मागे टाकले होते! ह्या स्पर्धेत तो एकमेव डाव हरला तो रुबेनस्टाईन विरुद्धचा. त्या डावात कापाने काही मोठ्या चुका केल्या आणि नंतर त्याचे विश्लेषणही केले!
त्याच वर्षी, १९११ साली, कापाने लास्करला जगज्जेतेपदासाठी आव्हान दिले. लास्करने १७ अटी घालून ते मान्य केले. त्यातल्या काही अटी कापाला मान्य नसल्याने सामना होऊ शकला नाही.
पोटापाण्याचा उद्योग म्हणून कापानं क्यूबाच्या फॉरेन ऑफिसमधे नोकरी पत्करली, ती तशी नाममात्रच होती, कारण त्याचा सगळा वेळ बुद्धीबळ खेळण्यात जाई! किंबहुना तो तसा जावा ह्याचीच काळजी जणू त्याच्या ऑफिसला होती. एक महान खेळाडू आमच्या पदरी आहे ह्याचा त्यांना अभिमान असावा! Wink
ऑक्टोबर १९१३ ते मार्च १९१४ ह्या काळात तो यूरोपात काही प्रदर्शनी सामने खेळला. त्यात प्रथितयश खेळाडूंबरोबर त्याने दैदीप्यमान यश मिळवले (+१९, -१, = ४).
तसाच पुढे रशियात सेंट पीटर्सबर्गला तो अलेखिन आणि इतर दोघांशी खेळला. अलेखिनशी त्याची ही पहिलीच गाठ होती त्याने दोन्ही डावात अलेखिनला पाणी पाजले!
त्यातला हा एक डाव बघण्याजोगा आहे. दोघांकडे समसमान बल असूनही केवळ मोहोर्‍यांमधली सुसूत्रता आणि एकमेकांशी संपर्क करु शकण्याची लवचिकता ह्या दोन्हीतून डाव कसा जिंकता येतो हे थक्क करणारे आहे. अलेखिनच्या डावातले हत्ती, उंट आणि घोडा हे पटावर अशा ठिकाणी अडकून पडले आहेत की ते केवळ चारा खात बसण्यापलीकडे काही करु शकले नाहीत!!
त्यानंतर पुन्हा एकदा त्याची गाठ पडली ती निम्झोविचशी. हा सामना झाला तो 'रिगा' ह्या मिखाइल तालच्या जन्मगावी! ह्याही वेळी त्याने निम्झोला हरवले. ह्या डावाचे वैशिष्ठ्य म्हणजे विरुद्ध रंगाचे उंट राहिलेले असताना हा डाव कापाने जिंकला! असे डाव जिंकणे फार कठिण समजले जाते कारण केवळ प्यादी आणि राजा ह्यांच्या विचारी हालचालींनीच डाव जिंकता येऊ शकतो, ते कापाने करुन दाखवले.

सेंट पीटर्सबर्ग इथल्या १९१४ सालच्या मोठ्या सामन्यात अखेर कापाची गाठ लास्करशी पडली! लास्करने जिंकण्याचा प्रयत्न केला पण कापाने शर्थीची झुंज देऊन बरोबरीत डाव सोडवला! स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यातल्या डावात मात्र लास्करने आपला अनुभव पणाला लावत कापाला निष्प्रभ केले. १३ गुण मिळवून कापा दुसरा आला आणि लास्कर १३.५ गुणांसह पहिला!

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले आणि आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ थंडावलेच जणू. कापा अमेरिकेत खेळत राहिला पण ते सामने एवढे मोठे नव्हते. ह्यातल्याच एका स्पर्धेदरम्यान फ्रॅंक मार्शलने कापाविरुद्ध डावाच्या ओपनिंग मधल्या 'रॉय लोपेझ' ह्या प्रकारातला 'मार्शल ऍटॅक' (जो त्याने शोधून काढला होता) पहिल्यांदाच खेळला! कापाने तो गँबिट स्वीकारला आणि डाव जिंकला. आज ९० वर्षांनंतरही हे व्हेरिएशन खेळाडूंमधे अतिशय प्रिय आहे.
कापा अधिकाधिक समर्थ होत चाललेला बघून लास्करने १९२० साली स्वतःहून आपले जागतिक अजिंक्यपद त्याला बहाल करण्याची तयारी दर्शविली! तो म्हणाला "तू तुझ्या खेळाच्या कौशल्याने हे जेतेपद खेचून आणले आहेस तुला सामना खेळण्याची गरज नाही!" कापाला मात्र स्पर्धेत खेळून हे जिंकायचे होते. लगेच पुढच्याच वर्षी १९२१ मधे लास्करने त्याला आव्हान दिले आणि कापाने त्याचा +४, -०, =१० असा पराभव केला व जगज्जेतेपद स्वतःकडेच राखले!
जगज्जेतेपदाचा सामना एकही डाव न गमावता जिंकण्याची ही कोणाही खेळाडूची पहिलीच वेळ होती. (हा विक्रम पुढे ८० वर्षे अबाधित होता. शेवटी २००० साली व्लादिमीर क्रामनिकने कास्पारोवला +२, -०, =१३ असे हरवले तेव्हा ह्याची बरोबरी झाली!)

उत्तमोत्तम खेळाडूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना बघून १९२२ साली लंडन इथे झालेल्या सामन्यात पुढच्या जागतिक स्पर्धेचे नियम आखले गेले त्यात कापा, अलेखिन, रुबेनस्टिन, रिचर्ड रेटी, सॅविली तार्ताकोर अशा दिग्गजांचा समावेश होता. त्यातली एक अट अशी होती की आव्हानवीराने कमितकमी $१०,००० चा फंड उभा करायला हवा! कापाने घातलेली हीच अट त्याला पुढे जाऊन भोवणार होती हा दैवदुर्विलास!
त्याच सुमारास कापाने एकाच वेळी १०३ खेळाडूंशी खेळण्याचा विक्रम केला. त्यातले १०२ सामने त्याने जिंकले आणि एक बरोबरीत सुटला!!

दरम्यानच्या काळात, १९२१ मधे, कापाने विवाह केला. त्याला एक मुलगा व एक मुलगी झाली पण हा विवाह टिकला नाही, घटस्फोट झाला. त्याच काळात त्याचे आई-वडीलही गेले. हा संपूर्ण कालावधी कापाच्या आयुष्यात तसा वादळीच ठरला. एकाच वेळी खेळाच्या आघाडीवर सर्वोत्तम आणि त्याचवेळी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथीचा.

१९१६ ते १९२४ पर्यंत सलग आठ वर्षे कापा अपराजित होता! ह्यामधे एकूण ६३ डावांचा समावेश होता ज्यात लंडनची जागतिक स्पर्धा आणी लास्कर विरुद्धचा जगज्जेतेपदाचा सामना अंतर्भूत आहे!
शेवटी १९२७ मधे अलेखिनने त्याला आव्हान दिले. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनोस आयर्स इथे हा तब्बल ३३ डावांचा मॅरॅथॉन सामना खेळला गेला. ह्या वेळी मात्र अलेखिन पूर्ण तयारीनिशी आलेला होता. कापाने जंग-जंग पछाडले पण शेवटी +६, -३, = २५ अशी हार पत्करली. कापाने प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न केला पण ग्रेट डिप्रेशनच्या उंबरठ्यावर असलेल्या आर्थिक वातावरणात त्याला $१०,००० ची रक्कम द्यायला कोणी तयार नव्हते! चडफडत राहण्याशिवाय कापाच्या हातात काही नव्हते.
पुढची आठ वर्षे १९२७ ते १९३५ अलेखिनने कापाला तो खेळत असलेल्या स्पर्धेतून बाजूला ठेवण्याची चलाखी केली आणि कापा जिथे खेळतो आहे तिथे आपण जाणार नाही हाही डाव साधला! (वैयक्तिकदृष्ट्या हा मात्र मला नामर्दानगीचा प्रकार वाटतो! पळपुटेपणा वाटतो. पण असो. असेही असणारच, शेवटी मानवी स्वभावाचे पैलू!)
पण झटपट बुद्धिबळात कापाला स्पर्धक नव्हता. तो प्रतिस्पर्ध्याची अक्षरशः धुलाई करीत असे आणि हा त्याचा दरारा शेवटपर्यंत कायम होता!

१९३६ च्या नॉटिंगहॅम स्पर्धेत त्याची गाठ अलेखिनशी पडली. त्यावेळेपर्यंत दोघांमधे बरीच कटुता आली होती. डावात दोघे काही सेकंदापेक्षा जास्त एकत्र थांबत नसत. एकाने खेळी केली की उठून जाणे आणि दुसर्‍याची खेळी झाली की परत येऊन बसणे असे अखंड सुरु होते. कापा अतिशय वाईट परिस्थितीत डावात अडकला पण त्याने जान पणाला लावून अलेखिनला सापळ्यात पकडले. दोन हत्तींच्या बदल्यात तीन मोहोरी मारुन शेवटी त्याने हा डाव जिंकलाच! डावाच्या शेवटी अलेखिनचे दोन्ही हत्ती पिलखान्यात कसे बंदिस्त आहेत हे बघून आपण थक्क होतो!! Smile

१९३८ साली कापाला पहिला हार्टऍटॅक आला. त्याची तब्येत ढासळली असूनही त्याने उत्तम खेळ केला. अलेखिन, पॉल केरेस सारख्या उच्च खेळाडूंच्या स्पर्धेत १९३९ च्या चेस ऑलिंपियाडमधे त्याने क्यूबाला सुवर्णपदक मिळवून दिले!
७ मार्च १९४२ रोजी न्यूयॉर्कच्या मॅनहटन चेस क्लबमधे एका अनौपचारिक डावावर रंजक टिप्पणी करत असतानाच तो कोसळला. माऊंट सिनाई हॉस्पिटलमधे दुसर्‍या दिवशी सकाळी तो मरण पावला. त्याचे वय फक्त ५३ वर्षांचे होते.
त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी अलेखिनने सुद्धा म्हणून ठेवले आहे "कापाच्या अकाली निधनाने एका महान खेळाडूला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्याच्यासारखा दिग्गज पुन्हा होईल असे वाटत नाही!"

कापाच्या खेळाविषयी -
असामान्य प्रतिभवान असलेल्या ह्या खेळाडूला बुद्धिबळ पंडितांनी 'चेसचा मोझार्ट' अशी पदवी आदराने दिली होती. प्रसिद्ध खेळाडू रीचर्ड रेटी तर म्हणाला होता की "बुद्धीबळ ही कापाची मातृभाषा आहे!"
समकालीन खेळाडू मार्शल, लास्कर, अलेखिन आणि रुडॉल्फ स्पिलमन हेच काय ते त्याला कधीतरी हरवू शकले होते आणि ह्या सर्वांविरुद्ध त्याची एकूण कारकीर्द ही त्यांच्यापेक्षा सरसच आहे. आणखी एक अपवाद म्हणजे सुलतान खान, ह्याने कापाला हरवण्याचा भीमपराक्रम केला होता.
फक्त एकटा पॉल केरेसच त्याच्याकडून हरला नव्हता पण तेव्हा कापाचं वय होतं ५० आणि केरेस होता २२ वर्षांचा!
१९१९ ते १९२१ अशा तीन वर्षातल्या त्याच्या डावांची इलो रेटिंग सरासरी २८५७ अशी अफाट आहे (त्याच्यापुढे फक्त दोघेच राहतात एक गॅरी कास्पारोव आणि दुसरा बॉबी फिशर!)
पटावरच्या स्थितीची त्याची समज एवढी उच्च दर्जाची होती की त्याच्या विरुद्ध केलेले बहुतेक हल्ले हे त्याने फारसा प्रतिकार न करताच मोडून पडत!
तो टॅक्टिकल खेळ करण्यातही अतिशय कुशल होता. अत्यंत सूक्ष्म अशा पोझिशनल ऍडव्हांटेजचा लाभ जास्त मोहोरी जिंकण्याकडे कसा नेता येईल ह्याबद्दलचे त्याचे आडाखे पहाण्याजोगे असत.
त्याने चेस स्कूल किंवा 'बुद्धीबळ घराणे' सुरु केले नसले तरी त्याच्या खेळाचा विलक्षण प्रभाव पुढच्या दोन जगज्जेत्यांवर दिसून येतो - बॉबी फिशर आणि अनातोली कारपॉव. इतकेच नव्हे तर त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकणार्‍या मिखाइल बॉट्विनिकने लिहून ठेवले आहे की अलेखिनने त्याच्या सुरुवातीच्या काळात कापाकडून बर्‍याच गोष्टी घेतल्या. निदान त्यांच्यात कडवटपणा येईपर्यंत.
२००६ मधे आइसलँडिक रेडिओवरच्या मुलाखतीत बॉबी फिशर म्हणतो, "मॉर्फी आणि कापा हे असामान्य होते. अलेखिनसुद्धा महान होता पण कापाकडे एकप्रकारची तरलता होती. त्याच्या खेळात एक लालित्य होते पांडित्याचा बोजडपणा नव्हता. त्याला कोणतीही स्थिती दाखवा तो नंतरची खेळी अचूक सांगे! मी जेव्हा जेव्हा मॅनहटन चेस क्लबला भेट दिली तेव्हा कापाबद्दल लोक आदराने बोललेलेच बघितले आहेत. त्यावेळी कापाला जाऊन १० वर्षे होऊन गेली होती. एवढा मान कोणत्याही खेळाडूला त्याच्या हयातीतदेखील मिळणे अवघड आहे. पश्चात मिळणे तर दूरचीच गोष्ट"

कॅपाब्लांकाला अशी भीती वाटत असे की मोठेमोठे खेळाडू जर सतत बरोबरी करण्याच्या मागे लागले तर आक्रमक आणि नैसर्गिक खेळाचे नुकसान होईल. तसे होऊ नये म्हणून त्याने १०*८ च्या पटावर खेळता येईल असा कॅपाब्लँका चेस असा चेसचा एक आगळाच प्रकार शोधून काढला होता! Smile आणि हा त्याने जगज्जेता असतानाच लावलेला शोध होता, त्याचा जगज्जेतेपदाचा मुकुट हरल्यावर लावलेला नव्हे! Wink लास्करबरोबर तो ह्या नवीन पटाचे काही डाव खेळला होता आणि सहाजिकच त्यात जिंकलाही होता!

चतुरंग

अनभिषिक्त जगज्जेता!

"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.
६-७ वर्षांच्या पॉलला डावपेच तर सोडाच पण मोहोर्‍यांच्या हालचाली तरी नीट माहीत असतील की नाही अशी शंका येऊन त्यांनी आव्हान दिले, "सांग बघू कधी ते?"
त्यासरशी पॉलने संपलेल्या डावातली मोहोरी काही खेळ्या मागच्या स्थितीत मांडून चक्क विश्लेषण करुन सांगितले की त्याचे काका कसे जिंकू शकत होते!!
१९ व्या शतकात जगात जे काही मोजके महान बुद्धीबळपटू होऊन गेले त्यातला हा 'पॉल मॉर्फी'!

अमेरिकेच्या दक्षिणेकडल्या लुईझियाना प्रांतातल्या न्यू ऑर्लीन्स (न्यू.ऑ.) ह्या शहरात एका श्रीमंत उमराव घराण्यात पॉलचा जन्म झाला ते साल होतं १८३७ (म्हणजे अमेरिकन सिव्हिल वॉरच्या आधी ३४ वर्षे!).
त्याचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. तसेच ते लुईझियानाचे लोकनियुक्त सभासद होते (एम्.एल्.ए.) आणि शिवाय त्यांनी ऍटर्नी जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशीही पदे भूषविली होती. त्याची आई संगीताची जाणकार होती आणि तिला तिच्या फ्रेंच क्रिओल वंशाची असण्याचा अभिमान होता!
अशा उच्चपदस्थांच्या घरातला रविवारचा मोकळा वेळ हा संगीत मैफिली आणि बुद्धीबळात व्यतीत होत असे.
पॉलला खेळाची गोडी लागली ती अशीच लोकांचा खेळ बघत बघत. वर दिलेल्या अनुभवानंतर मात्र त्याच्या आवडीकडे थोडे गांभीर्याने बघितले गेले आणि त्याच्या खेळाला पोषक वातावरण मिळेल ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाऊ लागले. ह्याचा परिपाक म्हणून वयाच्या ९ व्या वर्षी तो न्यू. ऑ. मधला सर्वोत्तम खेळाडू बनला.

१८४६मधे अमेरिकेचे सरनेनानी, दस्तुरखुद्द विनफील्ड स्कॉटने न्यू.ऑ.ला भेट दिली.
हा माणूस अमेरिकन इतिहासातला सर्वात प्रदीर्घ अनुभव असलेला सेनापती आजही समजला जातो. त्याला बुद्धीबळाचा नाद होता, एवढेच नव्हे तर तो स्वतःला एक कसलेला खेळाडू मानीत असे.
भेटीदरम्यान विरंगुळा म्हणून त्याची गाठ उत्तम खेळाडूशी करून द्यायची ह्या हेतूने एके रात्रीच्या जेवणानंतर पॉलला त्याच्यासमोर नेले. ९ वर्षाच्या पॉलकडे बघताच ही मस्करी आहे असे समजून स्कॉट रागावला पण कसेतरी बाबापुता करुन त्याचे मन वळवले.
आणि पॉलने एकदा नव्हे तर चक्क दोनदा स्कॉटला धुतले! दुसर्‍या डावात तर केवळ सहा चालीत जबरदस्तीने मात केली (बिचारा स्कॉट Sad). साहजीकच अपमान सहन न होऊन स्कॉटने खेळातून माघार घेतली आणि तो पॉलशी आयुष्यात पुन्हा कधीही खेळला नाही! (शहाणा होता. आपण होऊन पुन्हा लाथा कोण खाणार!! Tongue )

हंगेरियन व्यावसायिक बुद्धिबळपटू जोहान लोवेंथल हा १८५० मधे न्यू.ऑ.ला भेट द्यायला आलेला असताना पॉल बरोबर खेळण्याचा प्रस्ताव नाकारणार होता. कारण तो अनौपचारिक सामना होता आणि त्याला असे वेळ वाया घालवणारे सामने पसंत नसत! बर्‍याच आढेवेढ्यांनंतर तो खेळायला आला आणि त्याने पॉलच्या डोक्यावर सहानुभूतीने हात फिरवला (कदाचित त्याच्या मनात असे असेल "की हरलास तरी रडू नकोस हो बाळा, मी सांभाळून घेईन!"त्याला अंदाज नव्हता की हे बेनं डावात त्याच्या डोक्यावरुन हात फिरवणार आहे Smile )
पहिल्याच सामन्यात बाराव्या खेळीला पॉलने अशी काही खेळी केली की जोहान समजून चुकला की हे प्रकरण काही तरी वेगळेच आहे!
न्यू.ऑ.च्या त्याच्या मुक्कामात तो १२ वर्षाच्या पॉलशी एकूण तीन डाव खेळला आणि तीनही हरला!!

वयाच्या २० व्या वर्षी पॉल कायद्याची पदवी वगैरे मिळवून उच्चशिक्षित झाला पण त्याचे वय अजून वकिलीची सनद मिळण्याएवढे नव्हते. फावल्या वेळात काय करायचे म्हणून त्याने १८५७ च्या 'अमेरिकन चेस काँग्रेस्'मधे भाग घेतला. त्यावर्षी न्यूयॉर्कला झालेल्या स्पर्धेत त्याने त्याच्या एकूणएक प्रतिस्पर्ध्याना खडे चारले. त्यात शेवटल्या फेरीत त्याने प्रसिद्ध जर्मन खेळाडू लुई पोल्सेनला देखील हरवले. त्याचा तो डाव इथे खेळून बघता येईल. चेसमधली ओपनिंग्ज, विशिष्ठ मोहर्‍यांच्या ठराविक हालचाली वगैरे त्याकाळात अजून विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे हा खेळ बघायला अनवट वाटतो. १७ व्या खेळीत पॉलने त्याच्या वजिराचा बळी देताना १२ मिनिटे विचार केला अशी टिप्पणी सापडते. असे धाडसी बलिदान करताना पुढल्या डझनभर खेळ्यात आपण जिंकणारच ह्याची खात्री त्याने त्या १२ मिनिटात केलेली असणार. पोझिशनल प्रेशर हे राजाविरुद्धच्या निर्णायक हल्ल्यात कसे परिवर्तित करायचे ह्याचा सुंदर वस्तुपाठ हा डाव देतो!

पॉलने १८५८ मधे यूरोपला भेट दिली. खरेतर इंग्लंडमधल्या स्पर्धेत तो खेळायला गेला होता पण त्याऐवजी वेगवेगळ्या इंग्लिश मास्टर्सना अनौपचारिक सामने खेळून पराभूत करण्याचे सत्र त्याने सुरु ठेवले. त्याच्या प्रवासा दरम्यान त्याला आतड्याच्या संसर्गाने घेरले आणि खूप रक्तस्राव होऊन तो आजारी पडला. उभेही राहता न येण्याच्या स्थितीत त्याने दुसरा प्रसिद्ध जर्मन खेळाडू ऍडॉल्फ अँडरसन ह्याच्याशी ११ सामन्यांची मालिका खेळली आणि ७-२-२ (७ विजय, २ बरोबरी, २ हार) अशी जिंकली!
ह्याच प्रवासात त्याने त्याचा आणखी एक अविस्मरणीय सामना खेळला. तो आजही 'ऑपेरा गेम' म्हणून प्रसिद्ध आहे. कारण तो फ्रान्समधल्या एका इटालियन ऑपेरा हाऊसमधे खेळला गेला होता. ह्या खेळाचं वैशिष्ठ्य असं की पॉल मॉर्फी विरुद्ध एकाचवेळी दोन खेळाडू खेळत होते! एक होता जर्मन ड्यूक ऑफ ब्रुन्सविक आणि दुसरा होता फ्रेंच अमीर आसामी काऊंट इसोअर्ड. आजही हा सामना अनेक बुध्दिबळ शिक्षक उदाहरण देऊन सांगतात कारण मोहर्‍यांचा वेगाने विकास कसा करावा, एकामागून एक धमक्या देत राहून प्रतिस्पर्धी मोहोर्‍यांना खिळवून कसे ठेवावे ह्याचा उत्तम नमुना बघायला मिळतो. ह्या खेळात त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चुकाही भरपूर आहेत, त्याचा फायदा पॉलला झालाच पण त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या शैलीचे महत्त्व कमी होत नाही!
यूरोपातल्या वास्तव्यात एकाच वेळी आठ खेळाडूंशी ब्लाईंडफोल्ड खेळून त्याने सर्वांना पराभूत करण्याचा पराक्रम अनेक प्रदर्शनीय सामन्यात केला होता!
त्यावेळी जागतिक विजेता ठरवण्यासाठी कोणतीही औपचारिक स्पर्धा नव्हती पण पॉलने जवळजवळ सर्व नामांकित खेळाडूंना हरवले होते त्यामुळे १८५९ साली पॅरिस आणि लंडन येथे त्याचा जगज्जेता म्हणून सत्कारही करण्यात आला. व्हिक्टोरिया राणीच्या खाश्या मेहेमानांमधे समावेश करुन त्याला बोलावले होते.
अमेरिकेत परतल्यावरही त्याचा न्यूयॉर्क आणि बॉस्टन येथे सत्कार करण्यात आला. हेन्री लाँगफेलो हा कवीही त्याच्या बॉस्टनमधल्या सत्काराला उपस्थित असल्याचा मनोरंजक उल्लेख आहे.

सर्व जगात कोणीही तुल्यबल खेळाडू नाही असे नक्की झाल्यावर पॉलने बुद्धीबळ खेळणे सोडले! एक चाल आणि एक प्यादे कमी घेऊन (ऑड्स ऑफ पॉन अँड अ मूव्ह) मगच मी खेळेन अशी विचित्र प्रतिज्ञा त्याने केली. त्यात तसा गर्विष्ठपणा नव्हता कारण ती वस्तुस्थितीच होती!
१८६१ मधे अमेरिकन सिव्हिल वॉरला तोंड फुटले आणि पॉलचे वकिली करण्याचे स्वप्न तसेच राहिले. तो दक्षिणेकडच्या राज्यातला असूनही त्याने युद्धात भाग घेतला नाही. युद्धादरम्यान काही काळ तो न्यू.ऑ.ला राहिला आणि उरलेला काळ त्याने पॅरिस आणि हवाना, क्यूबा येथे व्यतीत केला.
विरोधी भूमिका घेतल्याने युद्धानंतरही त्याची वकिली म्हणावी तशी चालली नाही.
बुद्धीबळ ह्या खेळाला व्यावसायिक स्वरुप अजून आलेले नसल्याने त्याने पूर्णवेळ तो खेळ व्यावसायिकपणे खेळण्याचे नाकारले. (व्यावसायिक पणे खेळणार्‍यांचा खेळ जुगार्‍यांचा म्हणून ओळखला जाई! Wink )

१८८७ मधल्या एका दुपारी आपल्या प्रासादतुल्य घरात टबबाथ घेण्यासाठी म्हणून पाण्यात उतरलेल्या पॉलला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचे निधन झाले. त्याच्या उत्तरीय तपासणीत गरम हवेत भरपूर चालून एकदम थंड पाण्यात उतरल्याने त्याला झटका आल्याचे निदान झाले. अशा रीतीने एका प्रतिभावान खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला.
पुढे पॉलचे राहते घर "द मॉर्फी मॅन्शन" हे १८९१ मध्ये विकून टाकले गेले. आजचे न्यू ऑर्लिन्स मधले प्रसिद्ध 'ब्रेन्नान्स' रेस्टॉरंट ती हीच इमारत!

पॉलच्या खेळाबद्दल - त्याचा खेळ हा मुख्यत्वे 'ओपन पोझिशन' तत्वावर आधारलेला होता. मोहर्‍यांची फार गर्दी आणि कोंडी करुन खेळत राहण्यापेक्षा चटकन मारामारी करुन डाव सुटसुटीत करुन घेण्याकडे त्याचा कल असे. वजिराचा बळी देऊन पुढच्या काही खेळ्यात मात करणे ह्यात त्याचा हातखंडा होता. पण तसा तो इतर किचकट डावातही चांगला खेळ करीत असे. विशेषतः परिस्थितीचे अत्यंत वेगाने विश्लेषण करुन त्यातला कच्चा दुवा हुडकून योग्य खेळी शोधणे ह्यात तो वाकबगार होता. त्याकाळच्या बुध्दिबळ खेळातला एकूण विकास पाहता ही त्याची झेप कितीतरी काळाच्या पुढे होती. त्याने स्पर्धेत ऑफिशियली खेळलेल्या ५९ डावांपैकी ४२ जिंकले, ९ बरोबरी आणि ८ हरला! बॉबी फिशरच्या मते तो जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याच्या आणि कॅपाब्लांकाच्या खेळात काही साम्य आपल्याला आढळून येते. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

चतुरंग