टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
नृत्य
मी .हरवते ........त्याची कथा
प्रेषक वैशाली हसमनीस ( शुक्र, ०६/१३/२००८ - १३:१४) .मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती भाशा मला येत नव्हती.मनातून खूप भिती वाट्त होती.माझ्याकडे पासपोर्त,फोन,तिथले चलनही नव्हते.पत्त्ता माहीत नाही.सर्व धीर एकवटून मी तिथेच उभी राहून पोलीसाचा शोध घेउ लागले.तो लांबवर उतेभाहोता.आता तोच आपला तारणहार अथवा मारणहार.पण त्याच्यापर्यन्त जाणॅही अवघड होतें.कारण खूपच गर्दी होतीं.तेवध्यात मुलाचा निळा शर्ट दिसला्.हाक मारली.तो धावत आला.ती भेट अविस्मरणीय होती.परदेशवारीचा हा पहिलाच फटका.वयस्कर माणसानी आपल्याबरोबर परदेशात फिरताना कमीत कमी फोन बाळ्गावा ही विनंती.
एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...
प्रेषक भडकमकर मास्तर ( सोम, ०४/०७/२००८ - ००:१५) .आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले...
जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे...
सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील... ( इथे तर काय, सतत महागुरु आले, महागुरू गेले, महागुरु उठले , महागुरु बोलले, महागुरूंनी कौतुक केले...)हा माणूस नृत्यामधला महागुरू ?? बासच...
स्वत:च प्रोड्यूसर आणि स्वत:च डिरेक्टर असताना त्याच शो मध्ये स्वत:चे इतके कौतुक करून घेण्याचे कारण मला कळत नाही.... यांना कोणी मराठी थोर नृत्यदिग्दर्शक किंवा नर्तक मिळाला नाही काय???( आहेत , काही जूरी आहेत...असून नसल्यासारखे ... त्यांच्या कॉमेंट्स एका वाक्यात गुंडाळायला लावतात...)
आणि महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार, मग त्या कस्टमरी टाळ्या वाजणार, मग महागुरू पुन्हा ऐटीत डावीकडे उजवीकडे पाहणार, मग म्हणणार, " ..नाही , म्हणजे मला डीटेल्स कळत नाहीत, पण तू अन्तर्याच्या सुरुवातीला एक स्टेप मिस केलीस आणि विसरलीस , ऎम आय राईट?? " मग पुन्हा डावीकडे मग उजवीकडे लूक.... पुन्हा टाळ्या....
मग ..." मी जेव्हा बाईच्या वेषात डांस केला होता तेव्हा ....." ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....
ज्याची बॅट आणि बॉल असतो तो पोरगा तीन चार वेळा आउट होउनही परत बॅटिंग करतोच, तसं वाटतं हे पाहताना....
बान्देकरांचे एक कौशल्य बाकी मस्तच आहे, ते जोक करायचा प्रचंड प्रयत्न करतात....पन्धरा वीस प्रयत्नांनंतर त्यांना दीड तासांत एखादा जोक जमून जातो...काय चिकाटी आहे...!!! त्यांच्या जोक वरचे हशे एडिटिन्ग मध्ये इन्सर्ट करावे लागत असणार...बर्याचदा वाक्यरचना चुकल्यामुळे आणि टायमिंग चुकल्याने त्यांचे जोक फ़सतात, आणि स्पर्धकाला कसनुसं हसावं लागतं. ( ते तरी काय करणार बिचारे?) त्यांचे फ़सलेले जोक एडिट का करत नाहीत?? इतके जोक फ़सतात की एडिट तरी किती करणार म्हणा...( सचिन ने बान्देकरांचे कॉमेडी टायमिंग बद्दल क्लासेस घ्यावेत)...हा व्यवस्थित स्क्रिप्ट नसल्याचा परिणाम आहे... ( ऐन वेळी होते ती फक्त फजिती... पी .एल.)
पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....
कोण स्पर्धक आला आणि कोण गेला, कसा नाचला, यात आम्हाला स्वारस्य नाही परंतु या कार्यक्रमामुळे सचिन यांच्याबद्दलचा आदरभावाला धक्का निश्चित लागला....
शुभेच्छा...!
प्रेषक प्राजु ( गुरू, ०२/१४/२००८ - ०८:०६) .मिसळपाव वर प्रेम करणार्या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमामध्ये चिंब नहावे
जीवन हेच प्रेम असावे
प्रेमासाठीच जगत रहावे...
- प्राजु
रसिकतेसाठी गुणांची आवश्यकता ?
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( रवी, ०२/१०/२००८ - १२:४१) .आस्वाद हा शब्द भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामधे वापरल्याचे वाचनात आहे. खरे तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्राशी संबंधीत असावा,. चव घेणे, असा त्याचा सरळ अर्थ. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.
असो, प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? रसिकता ही जन्मजात असते ? विकसीत करावी लागते ? वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!!
फु बाई फू!
प्रेषक प्रमोद देव ( शनी, ०१/१९/२००८ - २२:१४) . बालपणी इच्छा असूनही आणि शिक्षण देण्याची बाची परिस्थिती असतानाही फक्त बाला जडलेल्या दारूच्या व्यसनापायी शिक्षण घेता आलं नाही. अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. तिथूनच सुरू झालेली जीवनाची ओढाताण शेवटपर्यंत टिकली. तरीही आयुष्यात आपण काहीतरी करायचंच, कोणीतरी मोठ्ठं बनायचं ही जिद्द ठेवली. त्यासाठी झटत राहिलो. दारूपायी घराची झालेली परवड बघितल्यामुळे आयुष्यभर दारूला शिवलो नाही.
अनेकांनी हिडीसफिडीस केले, पण परत परत खेटे मारत राहिलो. त्यात काही चांगली माणसे भेटली. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातली शाहिरी कला बहरली. कलेच्या आवडीमुळे कधी कधी गाण्याच्या कार्यक्रमात जास्त पैसे मिळत असतानाही फक्त २० रुपयांसाठी नाटकात कामं केली. घरी उपासतापास करावे लागले. बोटावर मोजण्याइतके कलाकार सुखवस्तू जीवन जगले, बाकीचे कलाकार खडतर जीवनाशी झुंजतच राहिले. खडतर जीवन जगत रहाणार्या कलाकारांपैकी मीही एक...........
मित्रहो हे मनोगत आहे सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री विठ्ठल उमप ह्यांचे. "जांभूळ आख्यान" मुळे संपूर्ण महाराष्टाला परिचित असलेले शाहीर विठ्ठल उमप ह्यांचे "फु बाई फू " हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. छोट्या छोट्या किश्शांच्या स्वरूपात लिहिलेले हे आत्मचरित्र आपल्याला शाहीरांच्या समग्र जीवनाचे दर्शन घडवते. गरिबी, अपमान, कौतुक,मानसन्मान वगैरे गोष्टींनी भरलेले प्रसंग वाचतांना शाहीरांच्या मोठेपणाची आणि त्याचवेळी अंगी असलेल्या विनम्रपणाची साक्ष पटते. लहान-थोर साहित्यिक, संगीतकार,गायक, नाट्य-चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, मंत्री वगैरे मोठ्या लोकांकडून भरपूर कौतुक होऊनही ह्या माणसाचे पाय जमिनीवरच आहेत.
लोकगीत गायक म्हणून ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्यांच्या काही मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत पण त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातील " फु बाई फू फुगडी फू, ये दादा आवार ये,बाजीराव नाना तुमडीभर देना,माझी मैना गावाकडे राहिली, हे खरंच आहे खरं श्री भीमराव आंबेडकर, फाटकी नोट मना घेवाची नाय, प्रथम नमू गौतमा चला हो प्रथम नमू गौतमा " ही गाणी विशेषत्वाने सांगता येतील.
लोककला सादर करून आपल्या सारख्या रसिकांना रिझवणार्या एका सच्चा कलाकाराचे वास्तवातले जीवन किती हलाखीचे असते हे कळण्यासाठी तरी प्रत्येकाने हे चरित्र वाचलेच पाहिजे.
ह्या छोटेखानी आत्मचरित्राला सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंत श्री निळू फुले ह्यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
प्रकाशक आहेत : शिवा घुगे, प्रभात प्रकाशन, वरळी, मुंबई
किंमतः १००रुपये.
थोडक्यात जांभूळ आख्यान शाहीरांच्याच शब्दात
एकदा कर्ण द्रौपदीच्या रंगमहाली आला. त्याला पाहून द्रौपदी मोहीत झाली. तिच्या मनी पाप आलं. द्रौपदीने कर्णाला भोजनासाठी बोलावलं. हे द्रौपदीचे वागणं कृष्णदेवानं अंतरमनानं ओळखलं. द्रौपदीचे हे पाप उघड करण्यासाठी कृष्ण द्रौपदीसह पांडवांना घेऊन वनभोजनाकरिता जांभूळ वनात जातो. भोजन झाल्यावर कृष्णाला फळं खायची इच्छा होते. कृष्ण फळं आणण्यासाठी भीमाला जांभूळ वनात पाठवतो, पण त्या जांभूळ वनातल्या सर्व झाडांची फळं कृष्णदेव आपल्या मायावी शक्तिनं गडप करतो आणि एकाच झाडाला एकच जांभूळ ठेवतो. भीम जांभूळ वनात गेल्यावर त्याच्या दृष्टीला एका झाडाला एकच जांभूळ दिसतं. भीम ते जांभूळ तोडून आणतो. मोठ्या आनंदानं कृष्णाला सांगतो, "देवा वनात हे एकच जांभूळ होतं तेच तोडून आणलं."
कृष्ण भीमाला म्हणतो, " अरे भीमा हे तू काय केलंस? अरे! या जांभूळ वनात एक महान ऋषी तपाला बसलाय. तो रोज सकाळी हे जांभूळ खाऊन दिवस काढतो. भीमा आता तो महाकोपिष्ट ऋषी येईल, त्याला जांभूळ तोडल्याचे कळेलच. तो आपल्या सर्वांना शाप देईल. आपण सगळे मरून जाऊ."
"देवा-देवा! आता याला काही उपाय सांगा" अशी प्रत्येक जण कृष्णाची विनवणी करतो. द्रौपदीही विनवणी करते.
"आपण हे जांभूळ जसं तोडलं तसंच ते त्या झाडाला लावून द्यावं" असे कृष्णदेव सगळ्यांना सांगतो.
मग धर्म,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव हे सर्वजण जांभूळ झाडाला लावण्याचा प्रयत्न करतात, पण काही केल्या ते जांभूळ झाडाच्या देठी लागत नाही. शेवटी कृष्ण द्रौपदीला म्हणतो, " द्रौपदी, हे पाच पांडव तुझे भ्रतार. तुझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ लाव देठी."
तिच्या हातूनही ते जांभूळ देठी लागत नाही. द्रौपदी खिन्न मनानं लज्जीत होऊन उभी रहाते.
द्रौपदी म्हणते, " भगवंत असं का अघटीत झालं? माझ्या मनी तर कसलंबी पाप आलं नाही. माझं पाच भ्रतार हे पाच पांडव सोडून इतर समदे पुरूष मला पित्याप्रमाणे आहेत."
कृष्ण म्हणतो, " पण मनी खळबळ झालीच ना?"
द्रौपदी म्हणते, " काय सांगू देवा, रूप त्याचं आनंदाहून इशेस दिसं, लागला नजरेचा बाण त्याचा, काळजाला लागलं पिसं. पाच पुरूषोत्तम भ्रतार पांडव माझं सहावा असता कर्ण, सहा वार झाले असते पूर्ण. सहाव्या वारी भोग घेतला असता त्याच्या प्रितीचा."
झाडाची उडविली फळं,केली देवगत
एका झाडाला एक फळ लईच निर्मळ
देठी गाभुळलं
कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं
हे जांभूळ आख्यान मधील मी गायलेलं गाणं रसिकांच्या मनात घर करून राहिलं.
गाण्यांशी निगडीत आठवणी
प्रेषक देवदत्त ( सोम, १२/३१/२००७ - ०१:०४) .आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...
ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते 
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे
)
घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.
ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.
फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.
यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. 
अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.
ॐकार स्वरूपा..
कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.
मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. 
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.
ताक धिना धिन ताक धिना धिन...
रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती
इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.
अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया..
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.
छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.
आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.
तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?
बम भोले बम
प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, १२/०६/२००७ - १९:०३) .मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.
दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो.
गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.
आम्ही १२०-३०० हातात घेऊन बोटावर चुना घेतला आणि शाहरुखला दोन्ही हात वर करून प्रणाम केला.
"नमो नम:"
"वालेकुम अस्सलाम!", शाहरूख बाकी संस्कारांचा पक्का.
"कॉम मॉम मम माअयं?" आम्ही पान खाऊन चुन्याचे बोट तोंडात खुपसले?
शाहरूखने फक्त भुवई वर करून प्रश्नार्थक चेहरा केला.
"काय मग कसं चाललंय?", आम्ही.
"एएएएएए... काही नाही. निवांतच आहे.अम्म अम्म" धुराचा झुरका तोंडातून सोडत शाहरूख.
"बाकी पिक्चर मस्तच चाललंय. विशेषत: शर्ट वगैरे नाही म्हणजे खासच. पण हे शर्टाचं काय काढलंय मध्येच?" नसत्या काड्या घालायची आमची सवय जाणार नाही.
"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही.
"हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते.
"थोडीशी कॉम्पीटिशन आहे पण बाकी धोधो चाललाय की!", इति आम्ही.
"कॉम्पीटिशन? कसली कॉम्पीटिशन?" शाहरूख थोडा चिडला.
"अहो 'चक दे' ची. गैरसमज नको.", बाजू सावरणे आम्हाला बरोब्बर जमते.
"एएएएएए... तो होय. घ्या मेन्टॉस घ्या." शाहरुख अपेक्षेप्रमाणे पाघळला.
पटकन हात पुढे करून मेन्टॉस खिशात घातली आणि आम्ही एक काडी सारली.
"हा आता पुढे काय नवे प्रोजेक्ट्स वगैरे?"
"एक पिक्चर काढतोय. ऑस्कर नक्की मिळणार बघा. पिक्चरला नाही तर मला नक्कीच.", शाहरूख
"ते तर आहेच. तुम्ही असल्यावर काय अशक्य आहे. तुम है तो क्या गम है? आणि तुम्हाला ऑस्करची काय गरज? खर्या हिर्याला तळपण्यासाठी कोंदणाची गरज थोडीच असते." नको त्या वेळी आमच्यातला लेखक बाहेर येऊ पाहतो. खरे म्हणजे मलाही ज्ञानपीठ मिळायला हवा. ते असो.
"काय नाव काय आहे पिक्चरचं. कॅची पाहिजे बुवा. ओएसओ, के३जी सारखं.", आम्ही.
"एएएएएए... . बास बास. आपले विचार जुळतात. नाव तर जबरदस्तच आहे. बम-भोले-बम. ३बी म्हणता येईल. किंवा बी३. बघूया आकडेतज्ज्ञ काय सांगतात ते."
"राग मानणार नसाल तर एक विचारू का?" आता मेन्टॉस मिळाल्यामुळे आमचा कार्यभाग साधला होता.
"एएएएएए... असं काय? विचारा ना.शरमाओ मत. आम्ही तुम्हाला परके थोडेच मानतो. "
"ओएसओ मध्ये शर्ट काढला. आता या चित्रपटात तुम्ही प्यांट काढणार का?"
- (शाहरुखप्रेमी) आजानुकर्ण खान
हस्ताक्षरावरुन स्वभाव
प्रेषक महेन्द्र ( बुध, १२/०५/२००७ - १९:३२) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?
आपला
एक साधारण सदस्य!
रोशनी ४
प्रेषक महेन्द्र ( सोम, १२/०३/२००७ - १६:३५) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!
तात्या रौशनी.. ..... चे काय?
प्रेषक महेन्द्र ( शुक्र, ११/२३/२००७ - १९:१७) .- अर्थव्यवहार
- उखाणे
- औषधोपचार
- कथा
- कला
- चारोळ्या
- नृत्य
- संगीत
- हे ठिकाण
- गुंतवणूक
- धोरण
- नाट्य
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रेमकाव्य
- बालकथा
- मांडणी
- संस्कृती
- कविता
- म्हणी
- वावर
- देशांतर
- धर्म
- गझल
- पाकक्रिया
- बालगीत
- भाषा
- राहती जागा
- वाक्प्रचार
- विनोद
- इतिहास
- मुक्तक
- वाङ्मय
- व्याकरण
- विडंबन
- व्युत्पत्ती
- शब्दक्रीडा
- साहित्यिक
- नोकरी
- शब्दार्थ
- शुद्धलेखन
- समाज
- जीवनमान
- सुभाषिते
- तंत्र
- भूगोल
- राहणी
- विज्ञान
- क्रीडा
- अर्थकारण
- राजकारण
- शिक्षण
- मौजमजा
- चित्रपट
- प्रकटन
- मत
- लेख
- विचार
- शुभेच्छा
- संदर्भ
- सद्भावना
- अभिनंदन
- चौकशी
- प्रतिसाद
- बातमी
- शिफारस
- माध्यमवेध
- सल्ला
- अनुभव
- प्रश्नोत्तरे
- मदत
- माहिती
- प्रतिक्रिया
- वाद
- आस्वाद
- प्रतिभा
- समीक्षा
- भाषांतर
- विरंगुळा
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
तात्या रौशनी.. ..... चे काय?
