टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
शुभेच्छा
शुभेच्छा!!
प्रेषक प्राजु ( शनी, ०८/०२/२००८ - २३:४४) .माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!!

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु
सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! :)
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, ०८/०१/२००८ - ०१:१३) .सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! 
आपला नम्र,
तात्या.

'वाढदिवसाच्या शुभेच्छा '
प्रेषक अमोल केळकर ( मंगळ, ०७/२९/२००८ - ११:५४) .आपले सर्वांचे आदरणीय जेष्ठ सभासद श्री. धोंडोपंत यांना त्यांच्या जन्मदिवसा बद्दल मनापासुन शुभेच्छा
( संदर्भ : त्यांचा स्वतःचा ब्लॉग )
यापुढील त्यांचे जीवन, सुखा-समाधानात, आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
(शुभेच्छुक ) अमोल केळकर

एक शून्य ......
प्रेषक अरुण मनोहर ( सोम, ०७/२८/२००८ - ०७:२४) .कवड्या तुझी धाव आहे
शुन्या कडून शुन्या कडे
पंच्याऐंशी वाचनांनंतरही
नि:शब्द जालाचे कडे
ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे
प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे
इलाहींचा आशीर्वाद...
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०७/२३/२००८ - १६:४८) .जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
मंडळी, या ओळी आहेत सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या!
मिपाचे एक सन्माननीय सभासद धोंडोपंत हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. पंतांमुळेच आमचाही जमादारसाहेबांशी परिचय झाला, बातचित झाली. आम्ही आमच्या बोलण्यातून त्यांना आपल्या मिसळपाव या संकेतस्थळाविषयी सर्व माहिती पुरवली. हे ऐकून त्यांना मनापासून आनंद वाटला व त्यांनी मिपाला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या!
त्यांच्यासारखी असामान्य प्रतिभा लाभलेल्या कलाकारचा आशीर्वाद हा मिसळपावकरता मोलाचा वाटतो!
असो,
आपला,
तात्या.
स्वेच्छानिवॄती
प्रेषक चेतन ( सोम, ०७/२१/२००८ - २०:१९) .आदरणिय गुरु केशवसुमारांची निवॄती हे प्रकटन वाचले. ते वाचल्यावर म्हणलं चला आपणही प्रयत्न करावा
हा एक प्रयत्न...
टाळले मी ज्या सर्व कवितांना स्मरतो आहे
विडंबकाचे आज मी विडंबन करतो आहे
खर्या कवित्वाच्या त्या खोट्या वेटोळ्यातं
आत कुठेतरी विडंबक गुदमरतो आहे
अट्टाहास प्रतिमेतून सुटण्याचा का कळेना
खरच का मी विडंबनाला विटलो आहे
विडंबनातली ती मजाच् सारी निराळि
आठवुन हे सारे कवितेत कुढतो आहे
वॄत्तानुसार गझल विडंबकही करु शकतो
विडंबनाला मात्र मी का डावलतो आहे
मात्रेत कोलांट्याउडया पुर्वी मी ही मारल्या
विडंबनाचा मात्र आज उपहास करतो आहे
प्रतिमेचा पिंजरानव्हे ही खरीखुरी प्रतिभा
नको ते मागणे, नको ती भलावणी का करतो आहे
साद घालते मला खुले आभाळ कवींचे
आज सोनेरी पिंजर्यात मी अडकतो आहे
(खिन्नसुमार) चेतन
अवांतरः ह. न. घ्या.
मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)
प्रेषक विसोबा खेचर ( शनी, ०७/०५/२००८ - १८:३८) .राम राम मंडळी,
आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! 
अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे. लवकरच ते नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेत पोलिस उपनिरिक्षकाच्या पदाकरता प्रशिक्षण घेण्याकरता दाखल होतील!
मी संपूर्ण मिसळपाव परिवाराच्यावतीने नीलकांतचे हार्दिक अभिनंदन करतो व त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो!
एक अतिशय प्रामाणिक, सच्चा व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवावे हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना!
तात्या.
मिपाकरांना नमस्कार.
प्रेषक आसावरी जोशी ( शनी, ०६/०७/२००८ - २२:२०) .नमस्कार,
माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले. मला सवय नाही पण आज प्रथमच मी मराठी टायपिंग करत आहे. (खूप वेळ लागतो आहे) इथे फार चांगले मराठी वाचायला मिळते पण माझे सर्व शिक्षण दिल्ली, कलकत्ता येथे कॉन्व्हेन्टमधेच झाले. माझे मराठी बरेच कच्चे आहे पण तुम्ही मला हसू नका.
मला चतुरंग, रामदास, तात्या, मुक्तसुनीत आणि अनेकान्चे लेखन फार आवडते. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का?
रेसिपिज पण खूप छान असतात. मलाही येथे काही लिहायला आवडेल नक्की. तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येत नाही कारण मला नीट मराठी येत नाही.
आपली सर्वांची मैत्रिण,
आसावरी.
वीश
प्रेषक भारती ( शनी, ०६/०७/२००८ - ०९:५०) .तू तर माझी स्पेशल डीश
द्यायच्याय तुला भरपूर वीश
दिसली नाहीस एक दोन वीक
बरी नव्हतीस, होतीस का सीक?
स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट
आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'
(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव )
प्रेषक अमोल केळकर ( शुक्र, ०६/०६/२००८ - ०९:५२) .मिसळपाव ला सादर अर्पण -
( चाल- अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एकमुखान बोला बोला जयजय हनुमान)
-----------------------------------------------------------------------------
हे मराठीच्या दुता, तुला तात्यांचे वरदान
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम
नुकताची पार केला अकडा हजार
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
विडंबन, पाककृती काव्य आणी चर्चा
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
तुझ्यापरी नावाचा रे राहील दरारा
पाहुणेही येती, गाती तुझे गुणगान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
धन्य तुझी वेबसाईट, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे, तुच आमचा ठेवा
घे उंचावुनी आता, या महाराष्ट्राची शान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
कांदा, लिंबु अन् पापडी जय बोला मिसळपाव की !!
कांदा, लिंबु अन् पापडी जय बोला मिसळपाव की !!

