सल्ला

हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका

लेखनविषय:: 

आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल!

ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर
अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड,
(मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

कळी जपताना....

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय....
आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला....
रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल.....
कसं सहन करायचं ते तिनं.....

चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन....
माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....?

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा.

तीन गोष्टींवर चर्चा व्हावी

(१) नीतीमूल्ये व संस्कार.

(२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती.

(३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

शेजारचा फँड्री !!!

फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

मदत हवी आहे...

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

मित्रानो मला एक मदत हवी आहे.

तुम्हाला scythe कुठे मिळेल किंवा कुठे बनवून मिळतील याची काही माहिती आहे का ?

https://lh4.googleusercontent.com/-9qKODmP4ZFw/UwoECz1G9ZI/AAAAAAAACRc/q...

https://lh4.googleusercontent.com/-BDfeFz1Ay68/UwoEHjs_0aI/AAAAAAAACRg/t...

सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक

पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्‍यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात.

सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे

मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला !

फायदा घ्या बजेटचा

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत.

या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Pages