तंत्रजगत

केअशु's picture
केअशु in तंत्रजगत
20 Aug 2017 - 15:11

'सोपा मराठी अभियांत्रिकीकोश'

अभियांत्रिकीतली बरीचशी सखोल माहिती ही इंग्लिश भाषेमधे आहे.अभियांत्रकीतल्या संज्ञांचा मराठीतला अर्थ सांगणारे काही शब्दकोशही आहेत.यापुढे जाऊन विविध विषयांवरील पारिभाषिक संज्ञाकोशही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहेत.पण या पारिभाषिक संज्ञाकोशांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.यातले बरेचसे शब्द हे संस्कृत भाषेचा वापर करुन बनवले आहेत.शासनाने त्यांचं काम व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
20 Aug 2017 - 00:59

डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts )

सर,

आज तुम्ही लिहिलेल्या ‘Physics in Ancient India’ या सुंदर पुस्तकाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर पहिले पान वाचले आणि त्यात आपल्या विषयी जन्म: १९३९ व मृत्यू: २००९ असे वाचले. खरं सांगतो हळहळ वाटली. मनुष्य जात्याच स्वार्थी असल्याने ही हळहळ तुम्ही जगात नाही यापेक्षा तुमच्याकडून खरंच काही ऐकायला मिळालं असतं ते आता मिळणार नाही याचं वाईट वाटलं. खरं सांगतो, डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं!

विज्ञानविषय मराठीत लिहिण्याचा किडा डोक्यात गेल्यापासून व लिहायला लागल्यापासून एक विचार राहुन राहुन मनात येत असे. इतके भारतीय ऋषी जर गणितात भारी होते, इतके खगोलशास्त्रात गुरू होते तर भौतिकशास्त्रासारखा मूलभूत विषय त्यांनी कसा सोडला? गणित कळणाऱ्या लोकांनी त्या गणिताचा भौतिकशास्त्रात वापर कसा केला नसेल? हे त्यांना का सुचलं नसेल? पण माझी इच्छा भारतीयांनी विमान आधीच बनवलं होतं हे सिद्ध करण्याची वगैरे नव्हती, म्हणजे ते खरं असेलही. पण एक सामान्य विचार करता केवळ भौतिकशास्त्राचा पाया भारतीय आद्यग्रंथात कुठे आहे हे मी शोधत होतो, तसे करता मला India'S Glorious Scientific Tradition हे सुरेश सोनी यांचं पुस्तक वाचायला मिळालं. त्या पुस्तकाच्या प्रकरण ५: Mechanics and Mechanical Science मध्ये न्यूटनने सांगितलेली गतीसूत्रे ही ऋषी कणादांनी वैशेषिक दर्शन या ग्रंथात आहे असे म्हटले आणि त्यात तुमच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. सुरेश सोनींनी दिलेले संदर्भ तपासावेत म्हणून तुमचं ‘Physics in Ancient India’ हे पुस्तक हाती घेतले आणि तुम्ही प्रत्येक विधानाला दिलेल्या संस्कृत श्लोकाच्या मूळ पुस्तकातील क्रमांकासह दिलेल्या पुराव्याला पाहून थक्कच झालो.

बरं तुमच्या पुस्तकात तुम्ही भारतीयांचा मान वाढवलात, पण आधुनिक पाश्चात्त्य शास्त्रज्ञाना जराही अवमानित केलं नाहीत. उलटपक्षी, सर्व साधने हाती असताना, ज्ञान असताना, गणित माहिती असताना ऋषींनी या तत्वांची गणितीसूत्र पद्धतीने मांडणी का केली नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला.(तो अजूनही अनुत्तरीत आहे..) पण तरीही तुम्ही आशावाद कायम ठेवत या तत्त्वांचा शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित, तंत्रज्ञ यांनी एकत्रपणे अभ्यास केल्यास नक्कीच काहीतरी वेगळं हाती लागेल असा विश्वास जपलात.

पण तुमचा विश्वास केवळ भोळा विश्वास नव्हता, तर त्याला तुम्ही शास्त्राच्या पट्टीवर तोललंत, निरीक्षणाच्या कॅलिपर मध्ये मोजलंत आणि प्रयोगाच्या भट्टीत भाजून भारतीय विज्ञानाचं नाणं खणखणित असल्याचं दाखवलंत. बनारस विश्वविद्यालयामध्ये याबाबतचे अनेक शोध प्रबंध लिहिले. एवढंच नाही तर महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या (व बोधानंद यांनी भाष्य केलेल्या ) अंशुबोधिनी या ग्रंथावरून ध्वांतप्रमापक (Spectrometer or Monochrometer) हे यंत्र Sah Industrial Research Institute, काशी येथे तयार केलंत आणि हे यंत्र भारतीयांना साधारण ७व्या शतकामध्येच माहिती होतं व त्याची रचनाही आधुनिक यंत्रापेक्षा वेगळी असल्याचं दाखवून दिलंत. म्हणजेच अतिनील(ultraviolet), दृश्य(visible) व अवरक्त(infrared) किरणांच्या तरंगलांबीचं मोजमाप त्या काळात ज्ञात होतं हे ही सिद्ध झालं.

पण डोंगरे सर हे वाचून मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही हे सर्व करताना तुम्हाला सगळं सोपं गेलं का? तुम्ही ज्या काळात हे सर्व केलंत त्या काळात US, UK ला जाऊन ‘स्वतंत्र’ वातावरणात काम करावंसं वाटलं नाही? तसं कुणी म्हटलं नाही. जुन्या ग्रंथात नवे तंत्रज्ञान शोधायच्या प्रयत्नांना कोणी नस्ती उठाठेव म्हटलं नाही? १८५७ च्या आधीचा भारताचा इतिहास वाचणे हा केवळ वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे बहुसंख्यांना वाटत असताना तुम्हाला काही असे ‘सल्ले’ मिळाले नाहीत? अशा कुत्सित टोमण्यांनी तुम्ही कधी विव्हल झाला नाहीत? शिवाय एवढे प्रयोग करताना तुम्हाला पाठिंबा देणारे कोण होते? हे प्रयोग सिद्ध होतानाचे किस्से, कहाण्या, रोमहर्षक प्रसंग, प्रलोभने काय होते? अपयश किती वेळा आले? कशी मात केली? शिवाय अश्या पुरातन पुस्तकात Spectrometer चे तत्व सापडल्यावर होणारा क्षण म्हणजे साक्षात्काराच्या क्षणा इतकाच बहुमोल असणार. तेव्हा Eureka Eureka असे म्हटलात का? आम्हाला न्यूटन च्या पडणाऱ्या सफरचंदाविषयी माहिती आहे, आर्किमिडिज ने Eureka म्हणत पळत सुटलेलं माहिती आहे..पण भारतीय शास्त्रज्ञांच्या कहाण्या काय आहेत? वाटलं होतं तुम्हाला हे सर्व विचारता येईल. डोंगरे सर तुम्हाला खरंच भेटायचं होतं.

भारतीयांना त्यांच्या पुरातन ठेव्याविषयी पुन्हा प्रेम, आपुलकी, सार्थ विश्वास वाटू लागण्याच्या काळात तुमचं असणं पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखं वाटलं असतं. तुम्ही तिकडे काशीमध्ये संशोधन करत होतात. तुमच्यानंतर आता तुमची धुरा कोण वाहतंय? त्यांना काही असं नवीन सापडलंय का? ते शास्त्रज्ञ कोण आहेत? त्यांच्या कहाण्या काय आहेत? त्यांनी काही नवीन लिहिलंय का?

शिवाय एक मराठी माणूस काशीमध्ये संशोधन करतो. नवीन गोष्टी शोधतो. प्रवाहा विरुद्ध पोहतो. यशस्वी होतो. पण मराठी लोकांना मात्र काहीच माहिती नाही. कदाचित मला माहित नसेल. म्हणजे सर्वसाधारण माझ्या आधीच्या व नंतरच्या पिढीला तुमची ओळख नाही. आम्हाला जयंत नारळीकर माहिती आहेत, वसंत गोवारीकर माहिती आहेत, डॉ. रघुनाथ माशेलकर माहिती आहेत..पण तुम्ही अनोळखी राहिलात...अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या (व मनाने अमेरिकन झालेल्या) भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाल्यावर भारतीय लोक डोक्यावर घेतात..पण तुम्ही इथेच राहून, इथल्या संस्कृतीची उज्ज्वल परंपरा पदार्थविज्ञानाच्या प्रकाशात पहिलीत. वैशेषिक दर्शन हेच प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान हे साधार सिद्ध केलंत तरीही एकंदर सामान्य जनांना, त्यातही मराठी लोकांसाठी अनोळखीच राहिलात. एका अर्थाने उपेक्षितच राहिलात..

तुमच्याविषयी कुसुमाग्रजांची हीच ओळ म्हणाविशी वाटते
“अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !”

सर या बद्दल सॉरी म्हणायला तरी तुम्हाला एकदातरी भेटायचं होतं!

N. G. Dongre यांची पुस्तके व प्रकाशने यांची यादी (अपूर्ण)
Dhvantapramapaka Yantra of Maharshi Bhardvaja
• Physics in Ancient India
• Waves and Oscillations
• Kanada’s Science of Physics

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
10 Aug 2017 - 23:04

वेगबदल आणि ‘वेग – काळ आलेखा’चे चढ-उतार (Measurement of Acceleration with graphs)

वेताळाच्या मागच्या भेटीपासून विक्रम जरा अस्वस्थच होता, विचारात होता. वेताळाने विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे धातुगोळ्याच्या वेगातील बदल मोजण्याच्या पद्धतीविषयी तो स्वत:शीच खल करण्यात मग्न होता इतका की त्या काळ्याकभिन्न अमावस्येच्या रात्री एका चिखलाच्या खड्ड्यात त्याचा पाय अडकता अडकता राहिला. पाठीवर वेताळही येऊन गनिमाप्रमाणे बसलाच होता. विक्रमाच्या अडखळण्यामुळे त्याचाही तोल जाता जाता राहिला.

“अरे विक्रमा, लक्ष कुठंय तुझं? बहुतेक मागच्याच कोड्याविषयी विचार करत असावास. सांगच आता उत्तर. या वेगबदलाचं माप तुम्ही कसं काढणार?”

“वेताळा मागील एका वेळी आपण वेग आणि काळ यांचा आलेख काढला होता. त्यात आपण वस्तूचा एकसमान वेग गृहित धरला होता. पण व्यवहारात पहायचं झालं तर वेगबदल हा असतोच असतो. म्हणून वस्तूची वाटचाल टिपण्यासाठी मागील प्रमाणे आपण वेग व काळ यांचा आलेख काढूया. (आकृती १)

त्वरणाचे मोजमाप १
१. या आकृती प्रमाणे अ ते ब मधील त्वरण मोजू.
वस्तूने कापलेले उभं अंतर (Vertical Distance) = 3 - 2 = 1
वस्तूने कापलेले आडवं अंतर (Horizontal Distance) = 1 - 0 = 1
चढ = उभं अंतर / आडवं अंतर = १/१ = (+) १
त्वरण १ इतकं आहे. +(धन) म्हणजे वेगात वाढ होते आहे.

२. या आकृती प्रमाणे क ते ड मधील त्वरण मोजू.
वस्तूने कापलेले उभं अंतर (Vertical Distance) = 2 - 3 = -1
वस्तूने कापलेले आडवं अंतर (Horizontal Distance) = 7 - 6= 1
चढ = उभं अंतर / आडवं अंतर = -१/१ = - १
त्वरण -१ इतकं आहे. –(ऋण) म्हणजेच वेगात घट होत आहे. हे मंदन आहे.
वेताळा हे उभं/आडवं अंतर वगैरे आपण आलेखाबद्दल बोलताना बोलत आहोत. केवळ वर्णन म्हणून. याचा त्या वस्तूने जमिनीवर केलेल्या विस्थापनाशी संबंध लावू नकोस..आलेखातलं आडवं अंतर म्हणजे काळ आणि उभं अंतर म्हणजे वेग

मग विस्थापन कशाने मिळतं? का या आलेखात ते मिळत नाही?
या आलेखातला भरीव निळा भाग काय माहिती आहे? अरे त्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वस्तूने केलेले विस्थापन!

आता दुसऱ्या एका गोळ्याची वाटचाल आणि प्रत्येक टप्प्यावरील त्याच्या त्वरणाची मोजमापे पहा.(आकृती २)

त्वरणाचे मोजमाप २

“म्हणजे विक्रमा, तुझं असं म्हणणं आहे का की धन त्वरण ते चांगलं आणि ऋण त्वरण ते वाईट?”

“नाही नाही, वेताळा, या धन आणि ऋण यांचा चांगल्या-वाईटाशी काही संबंध लावू शकत नाही. एखादा रथ सपाटी वरून वेगवान दौड करत निघाला, सतत वाढता वेग ठेवत पुढे जात राहिला, वेगावर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही आणि अचानक तीव्र उताराचा रस्ता, मोठा खड्डा किंवा वळण आले तर? त्याला मंदन करूनच वेग नियंत्रित करावा लागेल. खूप जास्तवेग असेल आणि वेळेत मंदन करता आले नाही तर त्याचा संवेग त्या रथाला आणि घोड्याला अपघाताकडे घेऊन जाईल. क्वचित जीवही जाईल.

याउलट खूपच कमी वेगात जाणारा रथ एखाद्या तीव्र चढावर गेला तर वेग कमी पडल्यामुळे घोड्याला कदाचित तो ओढवणार नाही. रथ पुढे जाऊ शकला नाही तर गुरुत्वाकर्षण त्याला मागे खेचेल व पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होईल. त्वरण आणि मंदनाच्या सुयोग्य संतुलनातूनच रथ सुरक्षितपणे मार्गक्रमण करू शकतो.

थोडक्यात त्वरण वा मंदनाचा संबंध त्याठिकाणी काम करणाऱ्या बाह्यबलाशी आहे. या बलाच्या सहाय्याने आपण वेगबदल साधतो व अपेक्षित वेग गाठतो.”

“विक्रमा हे संतुलन वगैरे ठिक आहे. पण घोडा किती वेगाने पळाला म्हणजे व त्याचे किती वस्तुमान असले तर तो रथ सुरक्षितपणे नेऊ शकतो? तुम्हाला याचा अंदाज आहे का? शिवाय वळणावर रथ वाचविण्यासाठी काय करशील हेही सांगितलं नाहीस. तुला माहीत नसावं. पण माझी वेळ मात्र झाली. हा मी चाललो..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

--चढावरचे वेग कमी करणारे ते मंदन, उतारावर घोड्यांना सुसाट वेग देऊन सारथ्याच्या नाकी नऊ आणणारे ते त्वरण
--त्वरण वाईट वा चांगले नाही, त्वरण-मंदनाच्या सहाय्याने इच्छित स्थळी योग्य वेळात सुरक्षित पोहोचवतो तो खरा सारथी
असे काहीसं एक घुबड दुसऱ्याला सांगत होतं!

(क्रमश:)

कुमार१'s picture
कुमार१ in तंत्रजगत
29 Jul 2017 - 12:09

BS ४ वाहने आणि त्यांचा सतत पेटलेला दिवा

१ एप्रिल पासून ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. या BS ४ निकषामागचे कारण समजेल का?

मला ही उर्जेची उधळपट्टी वाटते. भर उन्हाळ्यात अशा हजारो वाहनांचे दिवे दिवसा चालू असताना तापमान् वाढही होणार नाही का? जाणकारांनी खुलासा करावा.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
24 Jul 2017 - 21:57

वेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)

घनदाट जंगल, कीर्र अंधार, श्वापदांच्या हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या आरोळ्या, शिकार होणाऱ्यांच्या आर्त किंकाळ्या, जंगली पाणवठ्यावर पाणी पिण्याचे आवाज सारं मागं जात होतं पण विक्रमाचे मन मात्र वारा पिलेल्या घोड्याप्रमाणे विचारांच्या मागे धावत सुटले होते. हे वेताळाचे प्रश्न एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्याच ठिकाणी घेऊन जात होते.

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in तंत्रजगत
20 Jul 2017 - 02:28

‘लॉक बॉक्स’

https://photos.google.com/photo/AF1QipMhwWT_cIKlJmXrv-zVdm08FWsdSYf-f4Zyp7QBhttps://photos.google.com/photo/AF1QipOZ1xFUEsTDlMPPpBVuwIuEdGTGpgn_vyUCxIYo

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Jul 2017 - 15:40

वेग आणि विस्थापन – एकाच नाण्याच्या दोन बाजू (Relation between Velocity and Displacement)

राजा विक्रम जसा वेताळाच्या भेटीसाठी निघत असे तस तस त्याला त्याचं विकट हास्य आठवून थरकाप होई पण त्यापेक्षा जास्त त्याचे प्रश्न ऐकून तो विचारात पडे. त्याप्रश्नांचा विचार करता करता वेताळाचं थरकाप उडवणारं रूप विसरायला होई. कधी कधी हा वेताळच आहे का पूर्व जन्मी शास्त्रज्ञ असलेल्या माणसाचं भूत आहे असेही विचार चमकून जात.

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in तंत्रजगत
12 Jul 2017 - 23:49

दुबईमध्ये ड्रोन-टॅक्सी सेवा प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरू

जागतिक विक्रम आपल्या नावावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या देश-शहरांमध्ये दुबईचा फार वर... बहुदा पहिला... क्रमांक आहे. किंबहुना असे करून आपले नाव सतत चर्चेत रहावे आणि त्याचा आपल्या महत्वाचे उत्पन्न असणार्‍या पर्यटन व बांधकाम व्यवसायांना उपयोग व्हावा असा दुबई प्रशासनाचा सतत प्रयत्न असतो.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
6 Jul 2017 - 23:18

चाल आणि वेग (Speed and Velocity) - सुधारित आवृत्ती

(तपशील आणि गृहितकांमधील दुरुस्तीनंतर पुनर्प्रकाशित)
रात्रीचा, त्यातही अमावस्येच्या एका काळ्याकभिन्न रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन सर्व श्वापदांचं काळजाचा थरकाप उडवणारं आवाजी विश्व हरणापासून सश्यापर्यंत सर्वच भित्र्या प्राण्यांना लपायला भाग पाडत होतं. परंतु आज विक्रम मात्र वेगळ्याच विश्वात होता व पाठीवर मोळा असल्यागत वेताळाला घेऊन चालला होता. वेताळालाही हे लक्षात येत होतं.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
6 Jul 2017 - 10:52

वस्तुमान व वजन (Mass and Weight)

राजा विक्रम अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त साधून पुन्हा त्या पिंपळाखाली आला. मागील वेळी झालेल्या बोलण्याच काही बोल अजूनही त्याच्या मनात रुंजी घालत होते. तो त्याबद्दलच्या विचारातच होता इतक्यात ते वेताळाचं विकट हास्य त्याच्या कानी पडलं.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
2 Jul 2017 - 22:04

विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance)

फार दिवसांनी राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी आला. वेताळ नाही असे त्याला वाटते न वाटते तोच त्याच्या पाठीवर वेताळ धपकन येऊन बसलाही. “हा, हा, हा...तुला मी गेलोय असं वाटलं काय? इतक्या लवकर नाही जाणार मी..बर आज इतका वेळ का लागला तुला? पटकन सांग नाहीतर तुझ्या तलवारीने तुझे मुंडकेच उडवितो बघ.”

केदार बर्वे's picture
केदार बर्वे in तंत्रजगत
28 Jun 2017 - 16:02

नविन हायब्रिड सायकल

नविन हायब्रिड सायकल घ्यायचि आहे.

पर्याय सुचवा

जास्तित जास्त १५००० खर्च करु शकातो.

मोन्त्रा डाउन टाउन काशि आहे ?

केअशु's picture
केअशु in तंत्रजगत
18 May 2017 - 14:32

कोणता कोर्स निवडावा?

जून महिना येतोय.अॅडमिशनचा महिना.माझ्या एक मित्राला जो १२ वी झालाय,त्याला कोर्स निवडण्यासाठी थोडी मदत करा.

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in तंत्रजगत
10 May 2017 - 11:26

वॉटर purifier घेताना काय काय पाहावे?

एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे.
म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही. मग अशावेळी त्यात काय काय फीचर्स असायला हवीत?

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in तंत्रजगत
14 Apr 2017 - 19:00

BS3 ते टेस्ला

आजचे प्रेरणास्थानः हा धागा. चर्चा बी एस थ्री मधून सुरु होत ईलेट्रीक गाड्यांवर गेलेली आणि त्यावरून प्रदूषणावर घसरलेली. त्या संदर्भाने अजून काही.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in तंत्रजगत
14 Apr 2017 - 02:49

ट्रोलिंग वर कायदेशीर उपाय.

खालील इंग्रजी परिच्छेदाचे मराठी भाषांतर करून हवे आहे. कोणाला इच्छा असल्यास मदत करावी.

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in तंत्रजगत
10 Apr 2017 - 15:03

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

डिअर ऑल,

अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.

वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.

झिंगाट's picture
झिंगाट in तंत्रजगत
10 Apr 2017 - 07:30

नवीन इयर फोन बाबत सल्ला हवा आहे...

मला माझ्या MI 3S फोन साठी इयर फोन घ्यायचा आहे.
माझ्या गरजा ----
१)ट्रेन च्या गर्दीत वापरण्यासारख्या मजबूत असावे.
२)MIC हवाच.
३)आवाज चांगला आणि LOUD असावा.
एखादा ₹400-600 मध्ये चांगला इयर फोन सुचवावा.

केअशु's picture
केअशु in तंत्रजगत
26 Mar 2017 - 22:05

जिओच ठेवायचं की. . . .

या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे.

mandardk's picture
mandardk in तंत्रजगत
25 Mar 2017 - 04:51

मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस "मिसळपाव"वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे.