user

शब्दार्थ

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

वाचकमित्रहो,

वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!

ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.

வைரமுத்து

ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...

---

தமிழெழுத்தில் देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये शब्दार्थ
யாக்கை திரி
காதல் சுடர்
याक्कै तिरि
कादल् सुडर्
देह वात
प्रेम ज्योत
ஜீவன் நதி
காதல் கடல்
जीवऩ् नदि
कादल् कडल्
जीवन नदी
प्रेम समुद्र
பிறவி பிழை
காதல் திருத்தம்
पिऱवि पिऴै
कादल् तिरुत्तम्
जन्म चूक
प्रेम शुद्धीपत्र
இருதயம் கல்
காதல் சிற்பம்
इरुदयम् कल्
कादल् सिऱ्पम्
हृदय दगड
प्रेम शिल्प
சென்மம் விதை
காதல் பழம்
सॆऩ्मम् विदै
कादल् पऴम्
जन्म बीज
प्रेम फळ
உலகம் துவைதம்
காதல் அத்வைதம்
उलहम् तुवैदम्
कादल् अत्वैदम्
विश्व द्वैत
प्रेम अद्वैत
சருவம் சூன்யம்
காதல் பிண்டம்
सरुवम् सूऩ्यम्
कादल् पिण्डम्
सर्व शून्य
प्रेम पिण्ड
மானுட மாயம்
காதல் அமரம்
माऩुड मायम्
कादल् अमरम्
मनुष्यजात माया
प्रेम अमर

---

व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]

अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!

उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!

व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

चाफेकळी नाक

मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे

अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे

आपल्याला एकादी गोष्ट अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वाटत असते, पण इतराना वाटत नाही...आपल्याला स्वतःलाच त्याच गोष्टी कालान्तराने तश्या वाटेनाश्या होतात.....
तर हे अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे वाटणे म्हणजे काय गौडबन्गाल आहे बुवा?

खालील वाक्ये बघा :

१. पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय...
२. मी पुष्कळ पैसा कमावला, पण त्याला काही अर्थ नाही......
३. तब्येत ठणठणीत असणे महत्वाचे.....
४. बाबारे, त्या पोरीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा .....
५. मला त्यावेळी त्या गोष्टीच महत्व कळल नाही, पण आता पस्तावा होतो.....
६. या पुस्तकातला ( वा सिनेमातला वगैरे ) अमूक भाग महत्वाचा अहे........
७. आपल्या आयुष्यात खरोखर महत्वाचे काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे, त्यातूनच जीवन अर्थपूर्ण करता येइल.....
८. पैसा महत्वाचा, असे मानून त्याने एवढा पैसा मिळवला, पण आता तो अन्थरुणाला खिळून आहे, मग त्या पैश्याला काय अर्थ राहिला?......
९. आपल्याला सगळीकडे महत्व मिळावे, असे त्याला वाटत असते, त्याशिवाय त्याला कशातच अर्थ वाटत नही....
.........असो.......तर यावर काय म्हणता मण्डळी?

अनुरानन

काल टीव्ही वर सर्फिंग करतांना एक सुरेख चित्रपट बघायला मिळाला. मूळ बंगाली भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला. राहुल बोस, रितुपर्णा घोष, आणि रिमा सेन. “अनुरानन” हे नाव त्या सिनेमाचं. मला ते नाव खूपच आवडलं. सुरवातीला अर्थ माहित नव्हता. पण सिनेमातच राहुल बोस त्याचा अर्थ सांगतो. बंगालीत तो इतकं छान उच्चारतो…ऑनुरॉनॉन. ”अनुरानन” म्हणजे एकमेकांच्या सुरात सूर मिसळणे. ”अनुरानन” ह्या शब्दातच इतकी गोड लय आहे ना….!! अर्थ कळल्यावर तर हा शब्द आणखीनच आवडला.

एकमेकांच्या सुरात सूर मिसळायचा…ही कल्पनाच किती छान आहे !! हे असं सूर मिसळणं कितीजणांना शक्य होतं ? प्रत्येक नात्याचाच एक सूर असतो. तो सूर जर दुस-याच्या सुरात मिसळला तर जगण्याची गंमत अजूनच वाढते. सहजीवनाचा दुसरा अर्थच “अनुरानन” असावा असं वाटून गेलं. ज्यांना असे सूर जुळवता येत नाहीत त्यांचा साथीदार त्याच्याही नकळत अनुरानन करणारा दुसरा कुणीतरी शोधायला लागतो. तिकडे सूर जुळायला लागले की पहिल्या नात्याचे सूर बेसूर व्हायला लागतात. हे टाळणं खरं तर सहज शक्य असतं. प्रयत्न केला की आपल्या जोडीदाराच्या सुरात नक्कीच गाता येतं. त्याचे सूर कुठले हे फक्त समजून घ्यायला हवेत. त्याला कुठले स्वर वर्ज्य आहेत हे कळल्यावर ते सूर आपल्या सरगम मधे येणार नाहीत ही काळजी घेतली की बास. संसाराचं गाणं सुरेल होणारच Smile .

सध्याच्या परिस्थितीत जर सगळ्यांनी एकमेकांचे सूर सांभाळले तर किती सुंदर होईल हे जग! दहशतवादाच्या मूळालाच सुरुंग लागेल. प्रत्येकाने प्रयत्न केला तर नक्कीच होईल हे जग सुरेल! म्हणूनच म्हणतात ना……मिले सूर “मेरा”, “तुम्हारा”….तो सूर बने “हमारा” ….. Smile

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

वाचकमित्रहो,

नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.

तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.

---

’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -

अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!

बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!

क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्‍यांना छुणार्‍या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्‍या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!

कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्‍या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्‍यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!

---

मूळ तमिऴ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये भावार्थ
சின்ன சின்ன ஆசை चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै छोटी छोटी इच्छा
சிறகடிக்கும் ஆசை सिऱगडिक्कुम् आसै पंख फडफडविण्याची इच्छा
முத்து முத்து ஆசை मुत्तु मुत्तु आसै (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा
முடிந்துவைத்த ஆசை मुडिन्दुवैत्त आसै (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा
வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा
என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै मोगर्‍याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा
தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा
மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै सार्‍या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा
சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै सार्‍या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा
கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै केशरचनेमध्ये सार्‍या जगतास बांधून घेण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]] [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...
சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा
மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा
வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा
பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा
சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा
[[சின்ன சின்ன ஆசை]]... [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... [[छोटी छोटी इच्छा]]...

---

तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.

उदा.

१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.

वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.

थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्‍याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!

---

कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्‍या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्‍यास परत मिळवितेच नां? असो.

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

शब्दार्थ हवा आहे.

नमस्कार.

मला कोणी "वितांशक" या शब्दाचा अर्थ सांगू शकेल का? जमल्यास व्युत्पत्तीसुद्धा द्यावी.

प्रकाटाआ म्हणजे काय?

आमच्यासारख्या नववापरकर्त्याला पडणारा आणखी एक प्रश्नः

हे 'प्रकाटाआ' म्हणजे काय?

निराकरणाबद्दल अग्रिम धन्यवाद!

- चिंतातुर जंतू :S

इलिनॉईच्या दुगाण्या

किंचित झरणी बोधित करणी
मेलामेली भर्तृहरी
अमर्त्य सेना वसंतसेना
सेनासमथिंग कलहारी

तूच सहारा...
तूच सहारा रखरखीत या
गूगल संकटनेवारी
संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी
उपग्रहाचा त्वरितध्वनी

शरीरबांधणी भेटीगाठी
रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी

ओहो राहुल
आहा राहुल

ब्रायन लारा दत्ता भट
ब्रायन लारा दत्ता भट

"कूटलिपी - एक विचार" आणि "स्याद्वादा" या लेखांवरील विवेचनातून नाडी ग्रंथांवर प्रकाश

मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,

मिसळपाव आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले. नाडी ग्रंथाच्या कूटलिपी बाबत याठिकाणी काही लेखन झाल्याने येथे चर्चेला ते लावत आहे.
श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या स्याद्वादा वरच्या लेखाला मी प्रतिक्रिया लिहिली होती. - त्याप्रमाणे नाडीग्रंथांच्या पुर्ण अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधाराने निष्कर्ष काढण्याची गरज मी माझ्या लेखनातून वेळोवेळी अधोरेखित करत आलो आहे. विचारवंतांनी यावर नाडी ग्रंथांची फक्त टिंगलटवाळीने दुर्लक्ष न करता विचार करावा ही नम्र विनंती मी केली होती. त्यावर विविध उदाहरणे देत शेवटी "प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो" असे लिहून धनंजयांनी अनुभवाचे श्रेष्ठत्व हेच प्रमाण असल्याचे मान्य केले आहे.

एक अभ्यासक म्हणून धनंजय ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतुहल आहे. त्यांनी व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका- टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात. हे सर्व विदित आहे. श्री. हैयो ह्यांच्या लेखाच्या संबंधी त्यांनी नाडी ग्रंथांच्या पट्टयांची छायाचित्रे देता आली असती तर... असे म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हैयोंनी माझा (ओकांचा) उल्लेख करून नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांचे फोटो किंवा स्कॅन त्यांना वा अन्य कोणालाही सहजासहजी मिळवणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

श्री. हैयोहैयैयो यांच्या विविध लिपिशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून नाडी ग्रंथांच्या लिपीचा, मजकुराचा शोध घेता आला तर किती बहार येईल. असे वाटून मी त्यांना विनंती करतो की मी माझ्या बाजूने जी काही शोध साहित्याची मदत करता येणे शक्य असेल ती आनंदाने करीन. त्यांनी त्या शोधसाहित्याची फोड करून त्याचा अर्थ व माहिती वाचकांना प्रस्तूत करावी.

श्री. धनंजयांना विनंती, की त्यांनी नाडी ग्रंथलेखनावर अधिक प्रकाश पाडण्यासाठी मदत करावी तसेच ह्याबाबत अधिक काय करता येईल त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण मते सुचवावीत.

या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
नाडी ग्रंथ प्रेमी - शशिकांत ओक

चला मजेमजेत संस्कृत शिकूया :)

साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय!

पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय! Smile

आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो की लागलो. मंग माघार नाय! तात्या अभ्यंकर म्हनतात आपल्याला!

भास्करचा भास्करबुवा होईन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवीन असं आमचे भास्करबुवा एकदा सौताला लै शाणा समजणार्‍या एकाला बोल्ले होते. त्याच चालीवर आपण पण बोलतो -

"तात्याचा 'तात्याशास्त्री' होईन तेव्हाच दम खाईन!" Smile

आपण मदत घेत असलेली संस्थळं -

http://www.sanskritdeepika.org/
http://spokensanskrit.de/

इतरही काही संस्थळे असल्यास कळवा -

आधी वरजिनल मराठी वाक्य अन् मग आपण केलेलं भाषांतर -

१) तात्या संस्कृत शिकतो.

"तात्या गीर्वाण भाषा पठति"

२) तात्याने आंबा खाल्ला.

"तात्या आम्रफल अखादत्"

की,

"तात्या आम्रफलं अखादत्" ? (तसे असल्यास 'ल'वर अनुस्वार का द्यायचा?)

३) तात्या आळशी आहे.

"तात्या कार्यहीन:"

४) तात्या लिहीत आहे.

"तात्या लेखन वर्तते"

५) तात्या मरेल.

"तात्या मृतश्यति"

ओक्के..

अरे चूक का बरोबर ते कुणीतरी सांगा रे. चुकल तर काय चुकलं ते पण सांगा...

आपला,
(विद्यार्थी) तात्या.

सूचना - येथे फक्त विषयाला अनुसरूनच चर्चा होईल. अवांतर प्रतिसाद त्वरीत उडवले जातील. त्याकरता खरडवह्या वापराव्या.

Syndicate content
Scroll to Top