काथ्याकूट
भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात.
छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत ? (एप्रिल २०२१)
मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही.
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
आय पी एल - २०२१
आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय.
गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी
मला गुंतवणूक / कर्ज आणि आयकर या संबंधी काहीतरी विचार मांडायचे आहेत पण त्याआधी भारतातील काही माहिती हवी आहे
अ ) व्याज दर
१) सध्याचा सर्वसाधारण गृहकर्जाच्या व्याजाचा दर
२) धोका नसलेल्या म्हणजे राष्ट्रीय बँकेतील मुदत ठेवीचे दर ( १ वर्ष आणि जेष्ठ नागरिक नसलेल्यांसाठीचे )
नक्षलवाद्यांनी कमांडो मानस ला सोडले
नक्षलवाद्यांनी हल्ला करून साधारण २० जवानांना ठार मारले होते आणि एकाला बंदी बनविण्यात आले होते. आता त्या जवानांची सुटका केली आहे.
ह्या बातमीत लक्षवेधी गोष्टी खालील आहेत
चालू घडामोडी एप्रिल भाग २
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
भारतीय राजकारणाची सत्यता
सध्या काँग्रेसचे माजी आणि आभासी अध्यक्ष राहुल गांधी विदेशातील अनेक प्राध्यापक आणि विद्वान व्यक्तींसोबत भारताच्या विविध प्रश्नांवर आपले मत मांडतांना दिसतात. त्यातील काही भाग मी पाहिले आहेत. मुळात मला त्यात रागां भारताची कोणतीही सबळ बाजु मांडतांना दिसत नाही. बहुतांश वेळ भाजपा ला दोष देण्यात जातो. पण काल परवाच्या या भाषणात रागां म्हणतात
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
चालू घडामोडी - मार्च २०२१ ( भाग ९)
- इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष श्री जयालाल हे प्रेतपूजक असून, इस्पितळे वापरून अधिकाधिक लोकांना प्रेतपूजक बनवण्याचे त्यांचे विचार उघडकीस आले आहेत. आपल्या पदाचा गैरफायदा घेत ह्या व्यक्तीने IMA द्वारे आयुर्वेद, योग आणि विशेष करून पतंजलीवर मोठा हल्ला माध्यमांतून केला होता. त्याला सडेतोड उत्तर सुद्दा पतंजली ने दिले होते.
खर्चाची बाराखडी
गुंतवणूक ह्या विषयावरील माझे सर्व ज्ञान स्वानुभवाचे ज्ञान आहे. MBA फायनान्स ची मी सुरुवात केली होती पण २ महिन्यात सोडून दिली. ह्यांत टिप्स आणि ट्रिक्स नसून गुंतवणुकीचे तत्वज्ञान मांडले आहे आणि स्वानुभवाने ते मी कसे प्राप्त केले ह्यांचे किस्से लिहिले आहेत. सिरियसली घेऊ नये.
नव्या को-या लिखाणावर प्रामाणिक अभिप्राय
मी साधारण एक एकशे तीस पानांची कथा लिहिली आहे, सध्या मी अश्या व्यक्तींच्या शोधात आहे जे मला ही कथा वाचून त्यावर प्रामाणिक अभिप्राय देतील, तर तुमच्या ओळखीत असे कोणी आहे का? किंवा असं लिखाण हातावेगळं केल्यानंतर अश्यावेळी काय करायचं जेणेकरुन आपल्याला योग्य अभिप्राय मिळतील. या शिवाय कोणी प्रकाशक जो नव्या लिखाणाच्या शोधात असेल तर त्यांच्याशी कसा संपर्क करायचा.
सामान्य माणूस काय करु शकतो?
मित्रहो आपण बर्याचदा समाज माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा करतो. काहीवेळा या चर्चा समाजात घडणार्या काही चुकीच्या किंवा दांडगाईने केल्या जाणार्या गोष्टींबद्दल असतात.
शेअर ट्रेडिंग मध्ये मार्जिनचा वापर - दुधारी तलवार कि विन-विन?
गणेशा यांच्या शेअर मार्केटची बाराखडी भाग ० या धाग्यावर मार्जिन या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगानुसार हा मार्जिन प्रकार जरा विस्ताराने उदाहरणासह पाहू म्हणजे मग ठरवता येईल ती दुधारी तलवार आहे की (माझ्या मतानुसार) विन-विन आणि त्यामानाने अतिशय कमी धोकादायक परिस्थिती आहे. मार्जिन समजण्यासाठी त्याबाबतीत वापरल्या जाणाऱ्या अजून काही व्याख्या समजणे आवश्यक आहे.
कौशल्यमापन कसे करावे?
हा धागा श्रीमंतीचे नियम या धाग्याला पुरक असा आहे. चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे.
चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ९)
- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या दलालांनी काल भारत बंद करण्याचे आवाहन केले होते. ते पूर्णपणे फसले. पंजाब व हरयाणात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उर्वरीत राज्यात शून्य प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन केव्हाच मृत झाले आहे.
- आसाम व बंगाल मध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.
- सचिन तेंडुलकरला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने तो घरीच क्वारंटाईन झाला आहे.
लॉकडाऊन: वर्षपूर्ती
मागच्या वर्षी याच दिवशी रात्री ८ वाजता एका तेज:पुंज व्यक्तिमत्वाकडून एक सुप्रसिद्ध घोषणा झाली..."आज रात १२ बजहसे......."
चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- 1 of 343
- next ›