भटकंती

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 May 2024 - 10:55

सह्याद्रीच्या बाजूबाजूने एक रोडट्रिप

बर्‍याच महिन्यात आम्हा तिघा मित्रांची निखळ अशी रोडट्रिप केली नव्हती, तो योग अचानक आला. मित्राने नवी कोरी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड घेतली होती, पण त्यातून आमचं फिरणं झालं नव्हतं. सरता पावसाळा होता. १६ सप्टेंबरची रात्र. मित्राचा रात्री साडेअकराला फोन आला. मी नेहमीप्रमाणेच लवकर झोपत असल्याने झोपेतच फोन घेतला.

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
11 Mar 2024 - 13:56

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग १

जानेवारीत बातमी आली की महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च दरम्यान MTDC च्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये बुकिंग कारणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट दिली जाईल. निश्चित कोणा कोणाला सूट मिळेल ते बातमीतून समजत नव्हते. मंडळाकडे चौकशी केली असता कळले कि ज्या महिलेच्या नावावर बुकिंग आहे तिच्या सोबत पुरुष व्यक्तीही येऊ शकतात.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
27 Feb 2024 - 10:38

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.
.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
20 Feb 2024 - 18:46

कोपनहेगन पॅरीस भटकंती- ४

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनिंगला गेलो. ट्रेनर ने आज खाण्यासाठी सँडविच मागवले होते त्यात काही वेज होते तर काहीत पोर्क होतं. ह्या एकाच कारणामूळे रिझवानने आणी आमच्या बाॅसने वेज सॅंडवीचही खाण्यास नकार दिला. मी आणी विकासने ते वेज सँडविच खाल्ले. रिजवानने एका इराकी दुकानातून चिकन शोरमा आणलं होतं मी त्यातून एक घास खाल्ला, आवडलं.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
11 Feb 2024 - 21:11

कोपनहेगन- पॅरीस भटकंती-३

कोपनहेगनच्या रॅडीसन कलेक्शन समोर दिसलेली एक अलिशान गाडी.
.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
2 Feb 2024 - 02:17

कोपनहेगन - पॅरिस भटकंती -२

अर्बन हाऊस
.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
22 Jan 2024 - 23:59

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)

संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो...
आधीचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
19 Jan 2024 - 23:44

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १

अधिक श्रावण मास संपायला ८-९ दिवस शिल्लक राहिले असताना वडिलांनी निज श्रावणी सोमवारी पशुपतिनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा आपल्या 'रावण' बाळाकडे व्यक्त केली.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
18 Jan 2024 - 15:43

कोपनहेगन - पॅरिस भटकंती -१

युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November”

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
25 Dec 2023 - 10:03

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1

बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
20 Dec 2023 - 19:27

लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?

नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे.

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 Jul 2023 - 20:47

पाऊस: २

पाऊस: १

ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या.

सावि's picture
सावि in भटकंती
14 Jul 2023 - 16:06

हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक

"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात !