मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नंदनवनात सिद्धू भाग २

भागो ·

भागो 28/08/2025 - 13:09
“ time to say goodbye“ ओरिजिनल इथे आहे https://www.youtube.com/watch?v=TdWEhMOrRpQ&list=RDTdWEhMOrRpQ&start_rad... Time to say goodbye sax https://www.youtube.com/watch?v=aSzEPAhpneo&list=RDaSzEPAhpneo&start_rad... मुद्दाम वेळ काढून ऐकावे असे काही. ऐकले तर एक गोष्ट नोट करा तो गायक Andrea Bocelli आंधळा आहे.

लेखनविषय:
“बाबा, आपण सिद्धूच्या घरी जाउया, त्याच्या बाबांची बदली झाली आहे. उद्या तो निघून जाईल, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया. “ मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण आरुने हट्ट धरला. बायकोला बोललो, “जायचे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाणे चांगले दिसणार नाही. आपल्या खिशाला परवडेल अशी काहीतरी. तुला ह्या गोष्टी बरोबर समजतात, विचार करून सांग.” शेवटी हजार एक रुपये टाकून ड्राय फ्रुट बॉक्स घेतली. सिद्धूचा फ्लॅट म्हणजे काहीच्या काही होता, मी असा फ्लॅट आयुष्यात प्रथमच बधत होतो. एकेक गोष्ट नजरेत सामावून नोट करत होतो. विचार केला वेळ आली तर एखाद्या कथेत टाकता येईल. माझ्या धुवाधारला मी असा फ्लॅट देईन.

नंदनवनात सिद्धू भाग १

भागो ·

नेहमीप्रमाणेच मस्त. एका श्वासात वाचली. पुढे काय होणार याची उत्सुकता वाक्यागणिक वाढत होती पण...... पुढील भागाची वाट बघतोय.

नेहमीप्रमाणेच मस्त. एका श्वासात वाचली. पुढे काय होणार याची उत्सुकता वाक्यागणिक वाढत होती पण...... पुढील भागाची वाट बघतोय.
लेखनविषय:
माझं नाव अच्युत भिडे. माझं नाव तुम्हाला माहित असणार नाही म्हणून थोडी ओळख करून देतो. मी रहस्य कथा लिहितो. तुम्ही अर्थात छावा, स्वामी ययाति आणि काय ते रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सध्याचे विद्रोही साहित्य असे मर्मभेदी वाचणारे लोक, तुम्हाला माझे नाव माहित नसणार ह्यात नवल ते काय. पण एकदा कधी तुम्ही रिक्षात बसलात तर रिक्षावाल्याला विचारा की अच्युत भिडेची ताजी कथा वाचलीत काय हो? म्हणजे तुम्हाला समजेल. मी आहे ना, धुवाधार नावाचा , सॉर्ट ऑफ सुपर हिरो निर्माण केला आहे. माझ्या वाचक वर्गाला तो प्रचंड भावला आहे. आता ह्या क्षणी मी त्याचीच एक कथा लिहिण्यात गर्क आहे.

मूक चित्रपट

भागो ·
लेखनविषय:
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले. १ A Trip To The Moon. 2 The Last Laugh 3 The Cabinet of Dr. Caligari (1920) 4 Metropolis प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल. आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत.

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·

खेडूत 07/03/2025 - 21:37
छान! अशी कथा लिहायला जिपट्याला कितीतरी अभ्यास करावा लागेल.

खेडूत 07/03/2025 - 21:37
छान! अशी कथा लिहायला जिपट्याला कितीतरी अभ्यास करावा लागेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली. काय नाहीये माझ्या पाच शशकांत? माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल.

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

स्वीट टॉकर ·

तुमचे अनुभवकथनपर लेखन कायमच आवडले आहे. ते लेखन आता इंग्रजीमधे पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध आहे ही खूपच आनंदाची बाब आहे. यासाठी हार्दिक अभिनंदन. 'We are the Quarry, Fate is the Hunter' हे पुस्तक या प्रकारचे लेखन वाचायला आवडणार्‍या व्यक्तिंना आवर्जून सुचवीन.

माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

प्रारब्ध - ४

साहना ·
लेखनविषय:
हयग्रीव ला जाग आली तेंव्हा कदाचित अंधार होता किंवा त्याच्या डोळ्यांना काळोख दिसत असावा. पण नाही, आकाशांत चांदणे दिसत होते. सर्वांग ठणकत होते. कुठेतरी बाजूला आग असावी कारण त्यातून उडालेल्या ठिणग्या हवेतून जात होत्या. तो जमिनीवर पडला असावा. इतक्यांत त्याला एक चेहेरा दिसला. नाही, त्याची छकुली नव्हती, पोरगा नव्हता. कुणीतरी दुसराच. काळे कपडे घातलेला थोडासा उग्र. हयग्रीव ने उठायचा प्रयत्न कला पण त्याला जमले नाही. आधी त्याला वाटले कि मेलो असावो आणि नरकांत असू पण अचानक त्याची छकुली पळत आली आणि तिचा चेहेरा समोर येताच त्याला समजले कि हा नरक असणे शक्यच नाही. त्याचा मुलगा सुद्धा जवळ आला.

माझी आवडती पुस्तके भाग: १

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय. तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते.

अमू- OTT सिनेमा

Bhakti ·

वामन देशमुख 04/11/2022 - 14:30
परीक्षण वाचून कदाचित सिनेमा पाहण्याची प्रेरणा मिळेल. कोणत्या OTT वर आहे? मी शोधलं तर https://en.wikipedia.org/wiki/Amu_(film) हा सिनेमा दिसला. पण सदर धाग्यातील सिनेमा वेगळा दिसतो.

In reply to by वामन देशमुख

Bhakti 04/11/2022 - 15:06
Q फोटो द्यायचा राहिला.प्राईमवर आहे. ऐश्वर्यालक्ष्मी नायिकेने अप्रतिम काम केले आहे. प्रभूची एन्ट्री होईपर्यंत चित्रपट अतिच संवेदनशील आहे याची नोंद घ्यावी :(

अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्

दिंडी (गूढकथा)

vaibhav deshmukh ·

वातावरण निर्मीती,शब्दांकन,प्रवाह उत्तम जमलाय. घाईघाईत वाचल्याने शेवट लक्षात नाही आला. पण तो सुद्धा गुढच असणार आहे. उद्या परत एकदा निट लक्ष देऊन वाचणार आहे. खुप आवडली.

अप्रतिम गूढ. कथा आवडूनसुद्धा समजली असं म्हणायला धजावत नाही. आता आम्ही अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती. शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.

In reply to by श्वेता व्यास

vaibhav deshmukh 20/09/2022 - 16:35
शेवट योग्य पकडलात तुम्ही. 'शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.' हे वाचकांवर सोडले आहे.

आता पुढच्या वेळी वारीला जायचे तर ही गोष्ट डोक्यात घोळवत जावे लागणार दिंडीतले अस्सल वारकरी असेच देहभान हरपुन चालत असतात, त्यांच्या बरोबर नुसते चालणे हा देखिल अनुभव असतो. त्यांच्या भोवती आमच्या सारख्या अनेक काळ्या आकृत्या चालत असतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 21/09/2022 - 16:58
हाssss! एका मित्राने वारीचा असा अनुभव सांगितला होता. त्यालाच कथेत रूपांतरित केलं. वारीमध्ये तन - मन हरवते हे मात्र खरे.

तर्कवादी 21/09/2022 - 22:13
गूढकथेतील भूतं ही शक्यतो एकट्या दुकट्याला गाठतात.. गर्दीतही दिसणार्‍या भुतांचे वर्णन आवडले.

nutanm 22/09/2022 - 04:45
ते त्यांच्यच नादात पुढे जात होते व आम्ही पाठमोरे त्यांच्यापासून दूर जात होतौ अगदी रिकाम्या हाताने. वैभवजी नेहमीप्रमाणे ही अजून एक आपली गूढ कथा. शेवट अर्थात कळला नाही. कधीकधी खूपच गूढ शेवट असतो. रिकाम्या हाताने म्हणजे ? ते कोण व काय देणार होते. इथे मला आरती प्रभूंची एक कविता व गाणेही चाल दिलेले आहे आशाताईने किंवा लता ताईने गायले असावे नक्की आठवत नाही ,"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे"फारच गूढ कथा !!

In reply to by nutanm

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:42
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नायकाचा अर्थातच मृत्यू होतो. शेवटी तोही त्या काळ्या आकृत्या बनतो. आणि दिंडीतील एखाद्याला वश करण्याचा प्रयत्न करतो. पण आता दिंडीत कोणीच वश होण्यासारखं नसतं. सगळे आपापल्या नामस्मरणात असतात.आणि शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते.

एकदम मस्त!! मला असं वाटतंय की, शेवटी जो कथेचा नायक आहे तो स्वतः ती काळी आकृती बनतो जी आपण भूत आहे असं म्हणू. म्हणजे त्याला जाग येते वगैरे हे सगळे त्या भुताच्या मनाचे खेळ आहेत किंवा नायकाचा मृत्यू होऊन देखील त्याचं मन हे मानायला तयार नाहीये की आपण त्या भुतांमधले एक झालोय(अतार्किक आहे पण भुताच्या गोष्टींमध्ये सगळं चालतं :D). आणि तोच नायक नंतर त्या भूतांबरोबर दिंडीमधल्या वारकऱ्यांना मारायला जातो पण सगळे त्या प्रसंगातून निभावून जातात. @नागनिका: मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण विचार केला की,पांडुरंग असता तर भीती नसती वाटली नायकाला!

In reply to by नचिकेत जवखेडकर

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:43
एकदम बरोबर शेवट ओळखलात. थोडा तर्क लावला की कळतो लगेच शेवट. मुद्दाम शेवट जरा गूढ आणि क्लिष्ट ठेवला.कथा जास्त गूढ वाटते. मनापासून आभार आपले.

दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

vaibhav deshmukh ·

बोलघेवडा 13/09/2022 - 12:32
फारच छान. एकदम अनपेक्षित शेवट. "..फोन गळून पडला" या वाक्यानंतर गोष्ट संपवली असती कदाचित अजून भारी परिणाम झाला असता. पुढचं स्पष्टीकरण न देता वाचकांवर सोडली असती तरी चालेल असतं. असो. अजून येऊ देत साहेब अश्या कथा

सौन्दर्य 13/09/2022 - 22:46
गोष्ट छानच. अनेकदा अशा भयकथांमध्ये दरवाजे, भिंतीचे वगैरे अडथळे वर्णिले जातात. जर असे अतृप्त आत्मे घरात एखाद्या व्यक्तीपर्यंत येऊ इच्छित असतील तर त्यांना हे अडथळे पार करण्यासाठी ते उघडण्याची गरजच भासता कामा नये असं मला नेहेमीच वाटत आले आहे.

बर्‍याच दिवसांच्या गॅप नंतर लिहिलेत? पण मजा आली वाचताना, तुमची गोष्ट म्हणुन मुद्दाम निवांत वेळीच वाचायची असे ठरवले होते. छान आहे आवडली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 14/09/2022 - 14:23
मध्यंतरी कामाचा व्याप जरा वाढला होता.त्यामुळे लिखाण कमी झालं होतं.पण आता लिहीत आहे. तुमचा लोभ असाच कायम ठेवा.हुरूप येतो लिहिण्याचा.

ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.