श्रीगणेश लेखमाला २०१३

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

पैसा's picture
पैसा in विशेष
18 Sep 2013 - 7:33 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.
विनायकाची देवळे, रावळे.
मनचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यावा?
श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत.
सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे.
अल्प दान, महा पुण्य
असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे.
ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

**********

गेले ते दिन गेले...!!

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
17 Sep 2013 - 6:06 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्‍यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा.

डिजिटल

अभ्या..'s picture
अभ्या.. in विशेष
16 Sep 2013 - 8:39 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

डीजीटल
.................................................................................

"नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी?
शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची."

पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता.
अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता.
चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला.

हिवाळ्यातला स्वित्झर्लंड

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in विशेष
15 Sep 2013 - 2:30 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

स्वित्झर्लंड या देशात भर उन्हाळ्यात बर्फाच्छादित हिमशिखरे असणार्‍या जगातल्या फार थोड्या पर्वतराजींपैकी आल्प्स पर्वत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही या देशात बर्फ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदर्‍या यांचा संगम असलेले निसर्गाचे रूप पाहायला मिळते.शिवाय कडक हिवाळ्याचा धसका असलेल्या बहुसंख्य प्रवासी मंडळींनाही स्वित्झर्लंड म्हटले की उन्हाळ्याची सफरच बरी वाटते.

सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार

प्यारे१'s picture
प्यारे१ in विशेष
14 Sep 2013 - 1:09 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

सर्वप्रथम सर्व मिपाकरांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in विशेष
13 Sep 2013 - 8:45 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां

मी आज दवाखाना उघडा ठेवला होता

आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन त्यामुळे आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर ठणाणा बोंबलणारे कर्णे आणि धडा धडा वाजणारे ढोल ताशे याच्या आवाजाची कटकट होणार होती ती टळली. मी थोड्या विचारात होतो संपादक मंडळाने व्यनि करून एक लेख लिहिण्यास सांगितले होते. मुळात मी काही सिद्ध हस्त लेखक नाही तेंव्हा असा मनात आला की लेख लिहिणे माझ्याच्याने जमणारे नव्हते. चार पाच मिनिटे विचार करून डोके शिणले तेंव्हा म्हटले कि गाणी लावावी. तलत महमूद ची सी डी लावली आणि पहिले गाणे लागले "तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां"

मोरया!

दशानन's picture
दशानन in विशेष
12 Sep 2013 - 8:46 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

त्यावेळी आम्ही कोल्हापूरात नागराज गल्लीमध्ये राह्त होतो, मंडळाचा सुकाळ व माझा नवीन पोपट हा इत्यादी गाणी अजून तयार झाली नव्हती त्याच्या आधीची गोष्ट.

गणेशशिल्पे

प्रचेतस's picture
प्रचेतस in विशेष
9 Sep 2013 - 12:39 pm
श्रीगणेश लेखमाला २०१३

गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे.

ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये.