राजकारण

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
14 Nov 2017 - 8:05 am

रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!

प्रकटनविरंगुळाविनोदराजकारणमौजमजाचित्रपट

बाप्टिस्ट आणि बुटलेगर : सरकारी नियमनाची एक थेअरी

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
27 Aug 2017 - 8:00 pm

बाप्टिस्ट म्हणजे पाद्री आणि बुटलेगर म्हणजे हातभट्टीवाले. ह्या थिअरीचे लेखन अमेरिकेत दारूबंदी होता तेंव्हा अभ्यासकांनी केले म्हणून हे नाव पण आपल्या देशांत किंवा कामाच्या ठिकाणी हा प्रकार आपणाला सर्रास दिसेल.

दारू शरीरास कशी अपायकारक आहे हे पाद्री आधी लोकांच्या मनावर बिंबवतो. वर्तमानपत्रातून लिहितो, राजकारणी मंडळींना सांगतो. जे लोक दारू पित नाहीत त्यांना तो जाहीर रित्या दारूबंदीचा पुरस्कार करायला सांगतो. जे लोक पितात ते सुद्धा जाहीर रित्या ह्याच्या विरोधांत बोलत नाहीत. राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनहितार्थ म्हणून दारूबंदी लावतात.

विचारराजकारण

तीन तलाक : सुप्रीम कोर्ट ने नक्की काय म्हटले

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
22 Aug 2017 - 7:39 pm

भारतीय कोर्टे म्हणजे हल्ली विनोद झाली आहेत. काही दिवस मागे हाई कोर्टचा निर्णय सुप्रीम कोर्ट ने रद्द ठरवला कारण जजमेंट मध्ये जजला नक्की काय म्हणायचे आहे हे सुप्रीम कोर्टच्या जज ना समजले नाही. त्या निवाड्यातील एक परिसच्छेद खाली दिलेला आहे . [१]

http://imgur.com/a/euxgg

तर तीन तलाक च्या निवाड्याचे सुद्धा काही तरी तसेच झाले, नक्की निवाडा काय म्हणतो हेच काही वकिलांना सुद्धा समजले नाही. ३९५ पानाची जी जजमेंट लोक इतक्या लवकर वाचतील तरी कशी ?

http://imgur.com/P6sT7QG

विचारराजकारण

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 5:16 pm

४ मुख्य पक्ष

भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही
शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय
राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला
काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे

सरकार पडणे अवघड आहे

पण

१) शिवसेना पुढे विकास पावेल का ?
२) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ?
३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

राजकारण

शिवसेना भवितव्य ?

वाल्मिकी's picture
वाल्मिकी in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 8:01 pm

तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत

१) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ?
२) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ?
३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ?
४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ?
५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

राजकारण

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 12:43 am

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?
(संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन)

लेखइतिहासराजकारण

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
11 Jul 2017 - 2:52 pm

उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . .
त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . .
त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . .
आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . .
पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . .
संपादकाला काही येईना . . येईना . . .
गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

नाट्यप्रेमकाव्यमुक्तकविडंबनमिसळव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणराजकारणअदभूतआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलबालसाहित्यरतीबाच्या कविताहास्य

चायना आणि चुंबी (३) संधी मुत्सद्देगिरीची

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Jul 2017 - 3:05 pm

डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत.

माध्यमवेधराजकारण

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 12:28 pm

डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.

वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

जय महाराष्ट्र बोला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 Jun 2017 - 7:25 pm

अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला

आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका नाहीतर
एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला

बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला

कविताभाषासमाजभूगोलराहती जागाराजकारणवीररस