टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वाङ्मय
आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे
प्रेषक सर्किट ( मंगळ, ०८/०५/२००८ - ०८:५५) .आमची प्रेरणास्थाने:
वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले
बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)
व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य क्रमांक ८०० च्या खालच्या सर्वांना व्यक्तिचित्रलेखनातली ही गोम कळलेली आहेच. नव्हे, ज्यांना समजलेली आहे, त्यांनी आपल्या मोलकरणी, मावशा, आत्या, प्राध्यापक, विद्यार्थिनी, ह्या सर्वांची व्यक्तिचित्रे लिहून आपापली खर्जनशीलता दाखवलेली आहेच. आता उरले सदस्य क्रमांक ८०० च्या पुढचे (अडाणी) सदस्य. त्यांना सदर वैविध्य आपल्या लेखनात दाखवता यावे, ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
तर, खमंग व्यक्तिचित्राची पाककृती अशी:
१. (पहिल्यांदा) एक व्यक्ती निवडावी. हे लिहायला सोपे जाते, पण व्यक्तिचित्राची खमंगता ५०% ह्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असते. ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य (किंवा क्षुद्र) नसावी. म्हणजे, ह्या व्यक्तीत काही गुण असावेत, जे हल्ली दिसत नाहीत, ते. आता समजा, तुम्हा-आम्हापैकी कुणाची निवड आपण केली, तर ह्या युगात जगणारे, म्हणजे सामान्यच, म्हणून ह्या व्यक्तीचित्राला फारसा प्रतिसाद लाभणार नाही. तुमची एखादी जुनी आत्या आहे का ? बालपणीचा काळ सुखाचा सारख्या भाजणीत तिचा एखादी डाळ म्हणून समावेश होऊ शकेल का ? नाही ? ते सोडा. तुम्ही एखाद्या चाळीत राहात होतात का ? असल्यास तिथे ह्या आत्या-मावश्यांसारखे स्पेसिमेन्स बरेच सापडतात. असे कुणी तुम्हाला माहिती आहे का ? लहानपणी जरी त्यांचा वाईट्ट राग येत असला, तरी ह्या वयात नक्कीच त्यांच्या काही तरी गुणांवर तुम्ही नक्कीच लिहू शकाल! आजकालच्या तरुण-तरुणींनी ह्या आत्या मावशा पाहिलेल्या नाहीत, हे छातीठोकपणे सांगतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली ह्या चित्रातून, तरी पुरेसे आहे. (आणि आईची आठवण म्हणजे, काय सांगू महाराजा ? प्रत्येकाकडून एक तरी प्रतिसाद नक्की! तुमचा लौकिक संवेदनशील लेखक म्हणून, किंवा पुलंनतर तुम्हीच म्हणून होणार ! जियो !)
पण तुम्ही चाळीत राहात नव्हता, कुठल्याही आत्या-मावशांशी परिचय नाही ? नो प्रॉब्लेम ! तुम्ही स्वत:ला कुठल्या कलांचे रसिक समजता ? संगीत ? मग कोपऱ्यावरचा कल्हईवाला आपल्या भसाढ्या आवाजात गातोय ना ? अहो, तोच तुमचा व्यक्तिचित्राचा क्याण्डिडेट ! (मात्र, त्याचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्याला शापित यक्ष, गंधर्व, किंवा अप्सरा म्हणायला विसरू नका.) तुम्हाला चित्रांमध्ये गती आहे का ? नाही, गती असणे आवश्यक नाही. मधुबालाचे चित्र क्रेयॉन ने ट्रेस केले आहे ना तुम्ही ? मग आहेच की तुम्हाला गती ! आता, पहिले एक काम करा. इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा "भिवया जमल्या नाही", "नाक थोडे तेढे आले आहे" असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल, आणि मग तुम्ही बाजूच्या फुटपाथवर रांगोळीने चित्र काढणाऱ्या युसुफचे व्यक्तिचित्र चितारण्यास मोकळे !
तुम्हाला हेही जमत नाही ? अरेरे ! मग सर्वात सोपा उपाय ! तुम्ही शाळेत शिकला असालच ! तिथले छड्या मारणारे शिक्षक आताही आठवत असतीलच ! मग कामच संपले. त्यांच्या छड्यांची आठवण "आमचे साने गुरुजी" ह्या नावाने लिहा. सगळ्यांना जाणीव होईल त्यांच्या हरवलेल्या बालपणाची. बालपणीचा काळ, जसा तुमचा छड्या खाऊन सुखाचा गेला, तसाच आज आमच्या मुलांचा का जात नाही, असे अनेक प्रतिसाद येतील. तुमचे व्यक्तिचित्रक म्हणून काम संपले.
असो, तर सांगायचे एवढेच, की पुढे व्यक्तिचित्रणासाठी मदत होईल म्हणून, आजच आपल्या आत्या मावश्या, कोपऱ्यावरचे कल्हईवाले, रांगोळीचे चित्रकार, आणि जुने शिक्षक, ह्यांच्यावर लक्ष ठेवून असा. वेळ काय सांगून येते ?
२. (आपल्याच ग्यासवर) आपल्या व्यक्तिमत्वाशी त्या व्यक्तीची जुळवाजुळव करावी. हे महत्वाचे. कारण मी लिहितो मुक्तके, आणि आत्या करते ओव्या. तिचे नि माझे कसे जमणार ? मी जर अभिजात, तर तीही अभिजातच असायला हवी. मी जर चित्रकार, तर तिनेही किमान रांगोळी तरी काढलेली असायला हवी. मी जर मटण खातो, तर तिलाही मटणाची गोडी लावायला हवी. नाहीतर मग मटण खाताना छायाचित्रे कशी देणार?
३. (चिमूटभर) भाईकाका. हा एकच शब्द लक्षात ठेवा. ह्यांचे पाळण्यातले नाव पुलदेशपांडे. पण हल्ली, हे भाईकाका ह्या नावाने ओळखले जातात. नव्हे, "पुलं" म्हटले की म्हणणारा भोटम ठरतो. त्याचे काय आहे, ह्या लेखकाने अनेक व्यक्तिचित्रे लिहिली असे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे, हा शब्द आला, की भलेभले नरम होतात. विशेषत:, एकदा तुमच्यामागे "भाईकाकांची शैली" असे कुणी लचांड लावले, की तुम्ही वरच्या पातळीवर पोहोचलात, असे समजा. हे सोपे नाही बरे का मंडळी. ह्यासाठी अनेक वर्षांची तपस्या लागते. काही डॉ. वगैरे लोकांचे प्रतिसाद आवश्यक असतात. परंतु, एकदा हे झाले, की मग मात्र तुम्हाला मरण नाही. हे एकदा झाले, की दुनिया फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे.
४. (चवीप्रमाणे) छायाचित्रे. व्यक्तिचित्र लिहायचे म्हटले, की मग त्याला "जेन्युईन" बनवण्यासाठी आवश्यक अशी छायाचित्रे आपल्याला मिळवून ठेवणे आवश्यक आहे. हल्ली ही नवीन पीढी छायाचित्रांशिवाय कुठल्याही व्यक्तीचित्रावर विश्वास ठेवण्यास नकार देते. अगदी कुणाच्याही पाठीवर साबण चोळले, तरी ती उघडी पाठ छायाचित्रात दाखवली नाही, तर हे तरुण आजकाल विश्वासच ठेवत नाहीत. हल्लीच्या पीढीला विश्वास ही गोष्ट कशाशी खातात ते माहिती नाही. (असो, त्याविषयी नंतर कधी तरी.)
५. (भरघोस) नर्म विनोद. आपण व्यक्तिचित्रणात जे काही अगम्य अगोचर लिहिलेले आहे, त्यावरचा अविश्वास नाहिसा करणे, ह्यासाठी अधून मधून नर्म विनोद करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व सत्यच आहे, आणि गीतेवर एक हात ठेवून आपण दुसऱ्या हातावे टंकन करीत आहोत, असे वाटेल. त्यामुळ अधेमधे नर्म विनोद आलेत, की नव्या लोकांना वाटते, की आपण विनोदी लिहितो आहे, आणि जुन्या लोकांना वाटते की ही भाईकाकांची शैली. दोन्हीकडून टाळ्या पडतात. हे खरे, की खोटे, ते बिंग आपण बिंगच ठेवावे, फोडू नये.
६. (थोडी) गुप्तता. जरी आपण एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असलो, तरी त्या व्यक्तीविषयी सर्वच काही उघड करू नये. नाही तर, ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य आहे, असे इतर सामान्य वाचकांना वाटते. आणि मग त्या व्यक्तिचित्रणाचा काय उपयोग ? श्री. भीमराव मेश्राम, ही व्यक्ती दिवसा दगड फोडते, म्हणून त्या व्यक्तीच्या कपाळावरील घर्मबिंदू कळफलकबडव्यांना आवडतात. संध्याकाळी घरी गेल्यावर इंटरनेटवरून बिपाशाची चित्रे बघताना, ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या घर्मबिंदूंविषयी कुणाला सहानुभूती वाटणार ?
७. (उकळताना) आपली एकाग्रता. आपण उगाच कधी कविता, कधी गझला. कधी वैचारिक लेख. कधी तंत्रज्ञानाविषयी. असे लेखन केले, तर व्यक्तिचित्रलेखक म्हणून आपली ख्याती विरणार. व्यक्तिचित्रांव्यतिरीक्त फारतर एखादा दुसरा विषय आपण हाताळायला हवा. दुसरे काहीही नाही. विशेषत: आपण ज्या विभागातली व्यक्तिचित्रे जास्त करून लिहितो, तोच विभाग आपण सांभाळायला हवा. इतर विभागात लेखन करण्यास आपण इतर लेखकांना उद्युक्त करायला हवे. स्वत: मात्र इतर ठिकाणी चोच देखील मारू नये. कारण असे केल्यास आपली प्रतिमा, ही "वैविध्यपूर्ण लेखक" अशी होते. ही भूमिका आपल्या व्यक्तिचित्रकाराला मारक आहे, हे लक्षात ठेवावे. जगात वैविध्यपूर्ण लेखक बरेच आहेत, त्यांना आपण "एक ना धड भाराभार चिंध्या" असे दूषण देऊ शकतो, पण आपली व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?
जालकवींच्या कविता: आवाहन
प्रेषक सर्किट ( मंगळ, ०८/०५/२००८ - ००:५८) .२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.
कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.
कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील "प्रोफेशनल" नसतील.
मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.
आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.
मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ".", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे.)
धन्यवाद !
बाजीरावांची टोलेबाजी :५: टिळक, आम्हाला क्षमा करा!
प्रेषक बाजीराव ( शुक्र, ०८/०१/२००८ - २१:२४) .टिळक, आम्हाला क्षमा करा!
आज १ ऑगस्ट. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. शाळाशाळातून वक्तृत्त्व स्पर्धा होतील. सगळे बालवक्ते टिळकांनी बालपणी निबंधात संत हा शब्द तीनप्रकारे कसा लिहिला, शिक्षकांनी एक शब्द बरोबर धरून बाकी दोन चूक धरताच सगळेच शब्द बरोबर धरण्याचा हट्ट टिळकांनी कसा धरला त्याची गोष्ट सांगतील. त्याच बरोबर वर्गात मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे तेथेच टाकली. पण चूक कुणीच कबूल करेना. मग शिक्षकांनी सगळ्या मुलांना छड्या मारायला सुरवात केली. पण टिळकांनी बाणेदारपणे 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही' असे सांगितले होते ती गोष्ट सांगतील. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. हल्ली वक्तृत्त्व स्पर्धा वगैरे तरी होतात की नाही कुणास ठाऊक. पण मुलांचं टिळकांबद्दलचं ज्ञान इथंच आणि एवढ्यावरच संपतं.
टिळक, तुमच्या वर्गातल्या काही मुलांनी पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर खूपच शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे सार्या देशभर टाकली. पण त्यांना छड्या मारण्याचे धारिष्ट्य एकाही 'सरां'ना झाले नाही. ही मुलेही भलतीच बाणेदार. त्यांनीही छड्या खायला हात कधीच पुढे केला नसता. त्यांचे हात लाच घेण्यासाठी पुढे झालेले लाखो लोकांनी टीव्हीवर पाहिले. ही मुले आता लोकसभेत, विधानसभेत दंगामस्ती करतात. घटनेचे, संसदेचे पावित्र्य नष्ट करतात. पण त्यानाही कुठलेच सर छड्या मारू शकत नाहीत. संत वगैरे शब्दांची तर आता सगळ्यांनाच ऍलर्जी आहे. कुठल्याच प्रकाराने हा शब्दच लिहिला जाणार नाही याची काळजी सगळेजण घेतात. प्रश्नपत्रिकेतून सतांच्याबद्दल वेडेवाकडे उतारे छापले जातात. यांना कुणी छड्या मारायच्या?
तुम्ही स्वातंत्र्यासाठी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगलीत. आताचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन झालेल्या शिक्षा पंचतारांकित इस्पितळातून उपभोगतात. नंतर निर्लज्जपणे समाजात वावरतात. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे समर्थक त्यांचे स्वागत करतात. सत्कार करतात. सुवासिनी त्यांना पंचारत्या ओवाळतात. त्यांचे सरकारातले स्थानही अढळ असते. कुणालाही खेद नाही, खंत नाही. यांना छड्या कुणी मारायच्या?
तुमचा 'केसरी' गर्जणारा होता. आताची सारी वृत्तपत्रे कुणा ना कुणाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. मंत्री, शिक्षणसम्राट, उद्योगपती यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्य़ा छापून जाहिरातींची साय ओरपण्यात मग्न आहेत. बातम्या छापायलाही पैसे आणि दाबायलाही पैसे. 'पाची बोटे तुपात' अशी वृत्तपत्रांची चैन, चंगळ आहे. अशा तुपाने बुळबुळीत झालेल्या संपादकीय हातांना लेखणीसुद्धा नीट धरता येत नाही. टीकेचे आसूड वगैरे कसे धरणार? अग्रलेखांची परंपरा मोडीत निघाली आहे. तेवढ्या ताकदीचे संपादकही आता दुर्मिळ झालेत. पेपर रंगीत झालेत, स्वस्त झालेत. पण जनतेचा आवाज त्यांतून उठेनासा झाला आहे. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा प्रश्न आजही पडतो. पण तो लोकांना. वृत्तपत्रांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. 'सरकारच्या जाहिराती ठिकाणावर आहेत काय?' एवढीच त्यांना काळजी.
परवा काही एका संदर्भासाठी एका प्रसिद्ध वाचनालयाच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान विभागात 'गीतारहस्य' शोधत होतो. मिळता मिळेना. मग ग्रंथपालाला विचारले. त्याने 'रहस्यकथा' विभागात शोधायला सांगितले. नेमके मिळाले. पण बर्याच वर्षात कुणीही हात न लावल्याने खूप धूळ साठली होती त्याच्यावर. ही आमच्या अनास्थेची, सांस्कृतिक-सामाजिक र्हासाची आणि धुळीला मिळत चाललेल्या नीतीमूल्यांची धूळ होती. ती झटकण्याचे धाडस मला झाले नाही. टिळक, आम्हाला क्षमा करा.
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये दि. ०१.०८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)
ऑगस्ट चा कट्टा
प्रेषक विष्णुसूत ( बुध, ०७/३०/२००८ - २२:५१) .ऑगस्ट चा महिना आला कि आमचा कॉलेज चा कट्टा भरलेला असायचा त्या साठि लोक अगदि भल्या सकाळी सकाळी येयचे... हा महिनाच असा अजब आहे. कॉलेज मधे एकदा कधि नाव घातलेले लोकं हि ऑगस्ट मधे कट्ट्या वर बसायला येयचे. हा कटटा होताच असा.
"ह्यावर्षि पाखरांचे थवे ऍडमीशन फॉर्म घेवुन गेले आहेत रे.. सकाळी लवकर ये कट्टया वर.. " इति दिन्या
हा डायलॉग दिन्या दर वर्षि टाकतो.. त्याचा उत्साह ऑगस्ट च्या महिन्यात नेहमीच असा आशावादि असतो. कट्ट्या वरच्या नेहमीच्या ( ज्याना लाइफ मेंबरस असे हि म्हणतात) लोकांना ह्याचे काहि नवल वाटत नसतं. त्यांचा धर्म कट्ट्या वर बसणे हाच असतो. समोरुन जे काहि किंवा जे कोणी जाइल त्याला ते समान नजरेने बघतात.
दिन्या हा दरवर्षि प्रत्येक "पाखरा" कडे बघुन त्याचा पुर्ण "बायोडेटा" सांगु शकतो.. माहित नसेल तर तो ते लवकरात लवकर शोधुन कट्टावासियांना "खबर" देतो. बहुतेक म्हणुनच दिन्या ला कट्टया वर एक विशेष मान आहे. त्याच्या साठि कटट्या वर मोक्या ची जागा लगेच खाली करुन दिली जाते. हे आता बरेच वर्ष चालु आहे.
कुठलं "बिचारं पाखरु" कुठल्या काटेरी झाडात अडकले आहे... कुणा पाखराची आइ तिच्या पेक्षा "यंग" आहे.. कुठलं पाखरु पुढे "बरणी" होणार... इत्यादि सर्व बातम्या दिन्या २४-७ न्युज चॅनल सारखे सांगत असतो. दर वर्षि ह्याला एक तरी "सोल मेट" सापडते हे नक्की...
दिन्या चे हे उद्दोग वर्षांनुवर्षे चालु आहेत.. कॉलेज मधे असताना मी सुध्दा त्याच्या बरोबर त्याच्या "सोल मेट्स" चा पाठलाग करण्यात घालवला आहे. दिन्या ला हातावरच्या रेषा वाचता येतात हे धक्कादायक वृत्त मला अशाच एका "पाठलागा" नंतर समजले.. नंतर अनेक वर्ष मी हि त्याला सर्व " गुढ शास्त्रां " चा अभ्यासक समजत राहिलो. दिन्या नी अनेकांचे ( अनेकिंचे) हात, कपाळं, पाय, अंगावरचे तिळ हे पुरेपुर "हाताळले" आहेत अगदि भिंग घेवुन भरपुर वेळ निरखले आहेत ! त्याच्या कडे आमच्या कॉलेज मधिल जवळ जवळ प्रत्येक "स्त्री" ची पत्रिका आहे ! अगदि नव्या नव्या आलेल्या लेक्चरर्स पासुन सुन्दर दिसणार्या वयस्कर प्रोफेसरीणी, तिच्या मुली.. ते कॉलेज मधे फक्त अडमीशन फॉर्म घेयला आलेली एखादं "पाखरु" हि वाचलं नाहिये.
दिन्या मधे असे काहितरी आहे कि सगळे पटकन त्याच्या वर भारावुन जातात ... आकर्षक व्यक्तिमत्व पण भुल घालणारा साधे पणा , चातुर्य, मराठि-संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, गुढ शास्त्रांचा आणि संगित शास्त्राचा बरया पेकि अभ्यास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक साधी गोष्ट सुध्दा मीठ मिरची लावुन सांगण्याची कसब ! कविता,गाणि, गायक, लेखक यांचे संदर्भ तर इतके.. कि कधी कधी असे वाटायचे कि हा इसम सायन्स च्या एवेजी आर्टस साइड ला जास्त चमकला असता. असं कोधीतरी त्याला मी बोलुन हि दाखवल्याचे मला आठवतं .. तेव्हा त्याने मला जे सांगितल होतं ते मला अजुन आठवतं.... " आय ऍम सर्चिंग माय सोल मेट हियर "
त्याकाळी मला त्याचा अर्थ फारसा कळाला नव्हता.. सोल , सर्च, मेट.. ह्या पेक्षा माझा इन्टरेस्ट प्रोफेशनल कॉलेज, डिग्री आणि नोकरी ह्या कडे जास्त होते ! मी पुढे "फार मोठा होणार" असे ढोबळ भकित दिन्या ने माझ्या हातावरुन, माझ्या अंगावर असलेल्या एका तिळा वरुन आणि पत्रिका बघुन सांगितले होते.. वर एक डिस्केमर हि टाकला होता... "मात्र अभ्यास भरपुर करायला लागणार बरका... यश नक्कि येणार" !!! असं भविष्य सांगितल्या वर काय भिशाद मी हि ह्या "भविष्यकारा" वर विश्वास ठेवणार नाहि ? दिन्या ला हे शास्त्र समजतं कि नाहि ? का हा नुसतं नाटक करत असतो असले क्षुल्लक सवाल मनात चुकुन सुध्दा येवु दिले नाहित मी.
पुढे डिग्री कॉलेज मधे मी गेलो.. आणि दिन्या शी रोजची भेट सुटली... कधी तरी दिसला कि थोडिफार हितगुज.. पुढे पुढे वर्षातुन एकदा.. ऑगस्ट चा कट्टा टाकायला येवढिच भेट ! आसपास चे मित्र त्याची थोडिफार टिंगल-टवाळी हि करत असत.. माझी जरी त्यांना मूकसंमती असायची तरी मला त्याच्या बद्दल एक भीती युक्त आदर होता हे खरं!
दिन्या अजुनहि ऑगस्ट चा कट्टा न चुकता "अटेन्ड" करतो. गेले काहि वर्ष तो मला येण्यासाठि फोन करत नाहिये... त्याचं तसं कारण हि आहे... मी काहि वर्षा पुर्वी त्याच्या "निमंत्रणा चा आदर" केला नव्हता.. हे त्याने बोलुन हि दाखवलं होतं.. मी त्याला टाळतो आहे हे बहुतेक त्याच्या लक्षात येत होतं...
ऑगस्ट आला आहे... ह्या वर्षी मी दिन्या ला सरप्राइज देणार आहे.. एकदम जाउन त्याला कट्टया वर भेटणार आहे.. !
.... क्रमशः
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
उन्हाळा-१ व २
प्रेषक दोयल ( बुध, ०७/३०/२००८ - ०८:५९) .होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत
आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल,
धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे. परसदारी अनेक झाडांची मांदियाळी होती, घराला खेटुन गुलमोहोर, मागच्या दारा पासुन थोडे पुढे विलायति चिंच, मोठ्ठा कडुनिंब, पायरि आणि रायवळ आंबा, दोन पेरु, काहि रामफळ, सिताफळ, डाळिंब, ए़कांडी पपइ, कारंजा आणि चार मोठी मोठी पांगार्याचि झाडे.
थोडा मोगरा, एक गुलाबाचा ताटवा आणि अजुन काहि अबोली, शेवंति, झेंडु, हजारि मोगरा, कण्हेर अशी फुलझाडे. सकाळी दात घासताना परसदारी मोगर्याच्या कळ्या मोजणे,
डाळींबाची फुले मोजणे असले उद्योग चालयाचे. आंघोळीला कढत पाणी लागत नसल्याने हिवाळ्या प्रमाणे चूल फुंकायची, त्यात सारण सारायची गरज नसे , आई गॅसवरच पटकन
पाणी काटा मोडे पर्यंत तापवायची.
हा असा सुखनैव कार्यक्रम सुरू असताना, आई बाबांकडे माझी भुणभुण सुरू होई ..बाहेर कधी पासून जायच झोपायला? चढता उन्हाळा आमच्या कौलारू घरालाही सोडत नसे.
रात्रि उकाड्याने झोपमोड होणे सुरू होत असे. पंखा जरी असला तरी त्याची हवा मच्छरदाणित फारशी शिरत नसे. नदी किनारी घर आणि आजुबाजुला रान, त्यामुळे मच्छरदाणी हि आमचि कवचकुंडलेच म्हणा, तिच्याशिवाय झोपणे हि अशक्यच. बाहेर झोपण्याविषयीच्या माझ्या भुणभुणीवर आईच एकच उत्त्तर असे.. " परि़क्षा संपल्यावर"
रात्री जेवल्यावर अंगणात शतपावली घालताना बाबांजवळ वशिला लावयाचा प्रयत्नही मी करून पहात असे. बाहेर झोपल्याने चांगली झोप येऊन मेंदु तरतरीत होईल आणि परि़क्षेत
चांगले मार्क पडतील असा युक्तिवादही मी नित्यनियमाने करीत असे. अर्थातच ते कधिच दाद देत नसत.
होता होता परिक्षा जवळ येई, सुरू होई आणि संपूनहि जाई.
दुसर्या दिवसा पासून उशीरा उठणे, थंड पाण्याने अंघोळ करणे, उन्हात वणावणा हिंडणे ( हा खास आईचा शब्द्कोश), उभ्या उभ्या माठातले पाणी ढोसणे असे हंगामी वर्तन सुरु होई.आई पहाटेच मोठ्ठा काळा माठ तिपईवर मागच्या दारी सावलीत ठेवायची आणि त्याला ओल फडक गुंडाळायची. एखाद मोगर्याच फुल त्यात टाकायची. खेळता खेळता
पाणी प्यायला घरात शिराव लागत नसे आणि बसून पाणी पी, चि़खलाचे पाय घरात का आणले, आता दुपारच उन्हात खेळायच नाही ह्या आणि अशा अनेक बोलण्यापासून सूट़का
होत असे. ह्या माठावर येणार्या मधमाशा बघत बसणे, त्यांना पकडणे आणि जबरदस्ती कुठल्या तरी फुलावर नेऊन सोडणे ह्यात मला फार रस होता. एकदा ह्या प्रयत्नात मधमाशी मला डसली देखिल होती. तुळशी जवळची काळी माती लावल्यावरच तो दाह कमी झाला. असच एखाद दिवशी बाबा स्वत:च म्हणत, आज पासून बाहेर झोपायचे.
उड्या मारतच शेजारिपाजारी जावून ही खबर मी देत असे.
शेजारची घरे आणि आमचे घर अगदी लागून, पुढच अंगण आणि मागच परसदार खेटून. घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आमच अंगण जिथे संपायच तिथे शेजारच्यांचे ओटे
सूरू व्हायचे, त्यामुळे अंगणाला आपसूकच तटबंदी मिळालेली. पुढच्या अंगणाला आम्ही फरशी घातली होती, ह्या अंगणात/ओट्यांवर भाजी निवडणे, वर्तमानपत्र वाचणे ( आपले आणि दुसर्यांचे!),वाळवणे वाळवणे ( त्या विशयी पुन्हा कधी), कपडे वाळवणे, अभ्यास करणे, गप्पा मारणे, मारामारी करणे असे अनेक उपाक्रम वेळ, काळ, वय ह्या नुसार चालू
असत. ह्या ओट्याअंगणांनी मंगल कार्य सुद्धा पाहिली. संध्याकाळचा चहा झाला, उन्ह उतरणीला लागली की बाबा बागेला पाणी घालायची नळी घरातून घेऊन पुढे अंगणात आणत. थोड्याशा उतरत्या संध्याकाळी अंगणात फरशीवर पाणी मारणे, घराच्या भिंतीवर पाणी मारणे ही कामे केली जात. दिवसभर तापलेल्या फरशा, भिंती थंड होत असत. ही रात्रि बाहेर झोपण्याची पूर्वतयारी..शेजारपाजारी ही थोड्याफार फरकाने हाच कार्यक्रम सुरू असे, एकमेकांवर पाणी टाकायला ऊत यायचा. नळी फिरवायचा कंटाळा आला किंवा ती चिखलानी माखली असल्यास बाद्ली तांब्याने पाणी मारायचो. शेवटच तांब्याभर पाणी हवेत उडवून त्याच्याखाली " पाऊस" असे ओरडून उभे राहिल्या शिवाय मला चैन पडत नसे. तिन्हिसांजेला आईची हाक येई पर्यंत मनसोक्त खेळून झाल्यावर, हात पाय धुवून, परवचा म्हणून झाल्यावर मी आईला स्वयपाकात मदत करीत असे. कोशिंबीर बनव, पापड भाज, भाजी चिर, पान घे असली शेलकी कामे झाली आणि रात्रिची जेवण आटोपली कि फडताळातली बडीशेप खावून मी सरळ बाहेर धूम ठोकी (जेवणा नंतरची आवरा आवर आणी रात्रीची भांडी घासणे हे दादाचे आणि बाबांचे काम होते..). बाहेर येवून अंगण झाडुन घेत असे, अंगण झाडून आणी सतरंजी घालून झाली कि बाहेरूनच गाद्या आणा असे ओरडत असे. येव्हाना उष्मा कमी होऊन छान वारा सुटलेला असायचा. बाबा गाद्या घेऊन बाहेर यायचे.काहि दिवसापुर्वी उन्हात तापवून, काठिने ठोकल्याने गाद्या मस्त खमंग, गुबगुबीत झालेल्या असत. मधल्या खोलीत कपाटाशेजारच्या फटीत उभ्या , हा त्यांचा नेहमीचा पत्ता. उन्हे दाखवल्यावर मात्र गाद्या काढताना आणि ठेवताना बरीच तोशीस पडे.
गाद्या बाहेर आणल्या की त्यांच्या गुंडाळ्या लाथ मारून उलगडायची मजाच काहि और होती. आमचे सख्खे शेजारिही येव्हाना गाद्या घालण्यात मग्न असत. पलीकडचे मयुरा आणि
संकेत आमच्याच वयाचे दंगा मस्तिला ऊत येत असे. गाद्या घातल्या, चादरि अंथरल्या, उश्या पांघरूण आणली की दादा आणी मी पत्ते खेळायला , शेजारीच संकेत, मयुरीच्या
गाद्यांवर जात असू. त्यांचे बाबा म्हणजेच कुलकर्णी काका पत्ते खेळायला उत्साही, त्यांनीच मेंढीकोट, झब्बू, उनो, नॅट ऍट होम, डीक्लेअर असे अनेक डाव आम्हाला शिकवले.
कुलकर्ण्यांच्या घराच्या डाव्या हाताला अंगण संपले कि मोठ्ठे आंब्याचे झाड होते.पलीकडे लगेच कुंपण सुरू व्हायचे. कुंपणाला लागून शेवग्याची काहि झाडे, काहि मोठे जुने कडुनिंब, आणि काहि सुबाभुळीची झाडे होति. उजव्या बाजूला भोसल्यांच्या अंगणात मोठा पेरु, काहि जाई जुईचे वेल, पलिकडे डिसूझांच्या बाजुला शेवगा आणी बाभळीच रान. आमच्या लागुन असलेल्या चार घरा व्यतीरिक्त अजून एक बंगला होता आमच्या कंपाऊंड मध्ये. कंपाऊंड मध्ये शिरल कि बंगलाच दिसायचा आधि, पाठिमागे आमची घरे.
कंपाउंड मध्ये शिरताच बंगल्या समोर भलापुराणा औदुंबर. वाढलेली फांदि काढली तर दोन दिवस पांणि वहात होत त्या तुटलेल्या फांदिमधून. जुन्या काळचा बंगला प्रचंड मोठा..
त्याला दोन घरात विभागल होत भिंत टाकून आणि आता त्यात दोन कुटुंब रहात.त्यातल्या एका घराची स्वयपाकघराची खिडकि आमच्या अंगणापुढे यायची
उन्हाळा-१
प्रेषक दोयल ( सोम, ०७/२८/२००८ - ०७:५८) .होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत
आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल,
धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे. परसदारी अनेक झाडांची मांदियाळी होती, घराला खेटुन गुलमोहोर, मागच्या दारा पासुन थोडे पुढे विलायति चिंच, मोठ्ठा कडुनिंब, पायरि आणि रायवळ आंबा, दोन पेरु, काहि रामफळ, सिताफळ, डाळिंब, ए़कांडी पपइ, कारंजा आणि चार मोठी मोठी पांगार्याचि झाडे.
थोडा मोगरा, एक गुलाबाचा ताटवा आणि अजुन काहि अबोली, शेवंति, झेंडु, हजारि मोगरा, कण्हेर अशी फुलझाडे. सकाळी दात घासताना परसदारी मोगर्याच्या कळ्या मोजणे,
डाळींबाची फुले मोजणे असले उद्योग चालयाचे. आंघोळीला कढत पाणी लागत नसल्याने हिवाळ्या प्रमाणे चूल फुंकायची, त्यात सारण सारायची गरज नसे , आई गॅसवरच पटकन
पाणी काटा मोडे पर्यंत तापवायची.
हा असा सुखनैव कार्यक्रम सुरू असताना, आई बाबांकडे माझी भुणभुण सुरू होई ..बाहेर कधी पासून जायच झोपायला? चढता उन्हाळा आमच्या कौलारू घरालाही सोडत नसे.
रात्रि उकाड्याने झोपमोड होणे सुरू होत असे. पंखा जरी असला तरी त्याची हवा मच्छरदाणित फारशी शिरत नसे. नदी किनारी घर आणि आजुबाजुला रान, त्यामुळे मच्छरदाणी हि आमचि कवचकुंडलेच म्हणा, तिच्याशिवाय झोपणे हि अशक्यच. बाहेर झोपण्याविषयीच्या माझ्या भुणभुणीवर आईच एकच उत्त्तर असे.. " परि़क्षा संपल्यावर"
रात्री जेवल्यावर अंगणात शतपावली घालताना बाबांजवळ वशिला लावयाचा प्रयत्नही मी करून पहात असे. बाहेर झोपल्याने चांगली झोप येऊन मेंदु तरतरीत होईल आणि परि़क्षेत
चांगले मार्क पडतील असा युक्तिवादही मी नित्यनियमाने करीत असे. अर्थातच ते कधिच दाद देत नसत.
होता होता परिक्षा जवळ येई, सुरू होई आणि संपूनहि जाई.
-क्रमशः
आमचे मधुभाई...!
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, ०७/२५/२००८ - १६:०७) .काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!
"बाजुबंद खुली खुली जाए.."
मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!
मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.
विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!
मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.
कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!
गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!
मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!
मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!
"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!
"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"
मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!
एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -

आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!
"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात! 
"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"
खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!
आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी!
मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,
"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"
हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,
"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"
"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"
"बरं चल!"
असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्यावर! 
तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत! 

"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"
थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!
"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!" 
एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!
-- तात्या अभ्यंकर.
कार्यालय
प्रेषक विनोद इन्गळे ( शुक्र, ०७/२५/२००८ - १२:३९) .कार्यालय
इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी
कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय
- विनोद इंगळे
"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)
प्रेषक विसोबा खेचर ( शनी, ०७/१९/२००८ - १८:३६) .राम राम मंडळी,
माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत. तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत, ज्याच्या साहय्याने तबलावादन आणि पर्यायाने तालवादन होते. तालाच वजन तेच राखून, मात्रांची संख्या तीच ठेवून काही वेळेला एकच ताल विविध प्रकारच्या बोलांनी, अक्षरांनी वाजवला जातो त्या ठेका असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अशी अनेक गाणी आहेत की ज्यात केरवा हा ताल वापरला गेला आहे परंतु त्याचे ठेके मात्र वेगवेगळे आहेत! विविध ठेक्यांमुळे गाण्याच्या सौंदर्यात भर पडते.
असो, ही झाली तालासंबंधी अगदीच ढोबळ व प्रथमिक चर्चा. ताल, तबल्यातील घराणी, विविध बंदिशी, कायदे, रेले ही सर्व तालाची शास्त्रीय अंगं आहेत, त्यात आपण सध्या शिरणार नाही आहोत. तो खूपच मोठा विषय आहे व त्या बाबत सवडीने कधितरी एखादी लेखमालाच लिहायचा माझा विचार आहे. अर्थात, माझाही अजून त्यात अभ्यास सुरू आहे व तो जन्मभर सुरूच ठेवावा लागेल इतका अफाट तबला आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतात आहे! आपलं तालशास्त्र अतिशय समृद्ध आहे!
या लेखात मी संगीतातल्या 'लय' या अत्यंत अवघड अश्या विषयावर प्राथमिक भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. लय ही जरी अत्यंत सूक्ष्म गोष्ट असली तरी तिचा आवाका प्रचंड आहे. लयविचार हा संबंध संगीतालाच व्यापून टाकणारा प्रकार आहे!
संगीतातली लय आपण नंतर पाहू. पण मुळात लय म्हणजे काय हो?
बरं आधी मला एक सांगा, की हे कुठलं चित्र आहे? 

हे ईसिजीचं चित्र आहे हे आपण ओळखलं असेलच! डॉक्टर कशाला काढतात हो एखाद्याचा ईसीजी? तर त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची क्रिया नियमीत आहे किंवा नाही हे बघायला! म्हणजेच त्या माणसाची 'लय' कशी आहे, तो लयीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी! हृदयाची 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं! 
प्रत्येक माणसाची अशी एक स्वतंत्र लय असते. हा लेख वाचताना एखाद्याच्या नाडीचे ठोके हे मिनिटाला ७५ असू शकतील, तर एखाद्याच्या ८० असू शकतील. परंतु प्रत्येकाचं हृदय एका लयीत सुरू असतं. सांगायचा मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे. वास्तविक हा अगदी छोटा शब्द! दोनच अक्षरी - लय! परंतु त्याची व्याप्ती अफाट आहे. डॉक्टर मंडळी हृदयाला स्टेथोस्कोप लावून हे हृदयाचं संगीत ऐकतात. 'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! आहाहा, काय सुंदर नाद असतो हा? आपण ऐकला आहे का कधी? नसेल ऐकला तर केव्हातरी आपल्या फ्यॅमिली डॉक्टरांकडे त्यांचा जाऊन त्यांचा स्टेथो घेऊन अवश्य ऐका! 
'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'!
हृदयाचं काम एका छान नादमय लयीत सुरू असतं. जीवन सुरू असल्याची ती खूण आहे! हृदयाचे हे लयदार ठोके आईच्या पोटात असल्यापासून जे सुरू होतात ते अगदी शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत! आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं! लय संपली, जीवन संपलं! बरं ही लय बिघडूनही चालत नाही. वर इसिजीचं जे चित्र लावलेलं आहे तो ईसीजी तेच तपसण्याकरता काढतात! पाहा मंडळी, आयुष्याचा आणि गाण्याचा किती जवळचा संबंध आहे तो. हृदयाची लय बिघडली की जगणं मुश्किल होतं आणि गाण्याची लय बिघडली की गाणं बिघडतं!
किती महत्व सांगावं हो लयीच? मला सांगा लय कशात नसते? इथे आपल्या मिपावर अनेक चित्रकार मंडळी आहेत. त्यांना विचारा की एखादं चित्र काढताना त्या चित्रातली लय किती सांभाळावी लागते ते! चित्रातही एक अदृष्य लय असते, अस्सल चित्रकार ती सांभाळूनच उत्तम चित्र साकार करत असतो. अर्थात, मी या विषयात काही जास्त बोलू शकत नाही कारण मला त्या कलेतलं काही कळत नाही, फक्त आस्वाद घेता येतो. परंतु इथे उत्तमोत्तम कवी आहेत, त्यांना विचारा की कवितेतली एखादी ओळ बांधताना लयीचं महत्व काय अन् ती किती सांभाळावी लागते! लय ही प्रत्येक कलेत असतेच, मी फक्त संगीतातल्या लयीविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे!
कुठलीही कला ही लयीशिवाय जन्मूच शकत नाही. लय ही स्वयंभू असते, कलेत अंतभूतच असते. कलेच्या अविष्कारात ती कलेपासून वेगळी काढताच येत नाही!
अहो, कलेचं एक वेळ राहू द्या, तुम्हीआम्ही तिची आपापल्या वकुबानुसार निर्मिती करतो, आस्वाद घेऊ शकतो. पण एखाद्या तान्ह्या बाळाचं काय? त्याला कळते का हो लय? 
एखादं अगदी तान्हं मूल जेव्हा धाय मोकलून रडत असतं तेव्हा आसपासची बरीच मंडळी त्या मुलाला जवळ घेत असतात, त्याची समजूत घालत असतात, तरीही ते गप्प होत नाही. पण जेव्हा त्या तान्हुल्याची आई त्याला हृदयाशी धरते तेव्हा ते पटकन रडायचं थांबतं, खुदकन हसतं! सांगा पाहू का बरं असं? त्या तान्ह्याला हीच आपली आई आहे, हे कसं कळतं बरं? 
९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!
एक तान्हं मूल आपल्या आईचं हृदयसंगीत ओळखू शकतं, त्यातली नादमयता ओळखू शकतं! अर्थात, हे माझे विचार नव्हेत. ते मी माझ्या गुरुजींकडून शिकलो आहे. बघा बुवा तुम्हाला पटताहेत का ते! आमचे बाबूजी नेहमी म्हणायचे की कवी हा कविता लिहितांनाच त्याची लय निश्चित करत असतो. आपण फक्त ती लय ओळखाची आणि आपल्या आवडीच्या सुरात, आवडीच्या रागात, आवडीच्या धुनेमध्ये, कवितेतल्या भावानुसार ते गाणं बांधायचं! मूळ कविताच जर लयीत नसेल तर गाणं जन्माला येणं मुश्किल आहे! असो..
खरंच मंडळी, लयीचा शोध हा अनंत आहे. आपण तिचा जितका अभ्यास करू तेवढी ती अधिक सूक्ष्म होत जाते आणि पुन्हा अभ्यास करण्याकरता मुश्किल होऊन बसते. परंतु तिचा अभ्यास, तिचा शोध कधीच संपत नाही!
असो, तर मंडळी वरील विवेचन म्हणजे लयीबद्दलचे ढोबळमानाने काही जनरल विचार आहेत. मग आता संगीतातली, गाण्यातली लय म्हणजे काय हो? तिचा अनुभव कसा घ्यायचा? तिचं सौदर्य कसं अनुभवायचं? हे आपण पुढल्या भागात पाहू!
आमचे पक्याराव, 'तात्या, लय म्हणजे काय हो?' हा प्रश्न किती सहज विचारून गेले! परंतु हा प्रश्न विचारून त्यांनी माझी किती पंचाईत करून ठेवली आहे, नक्की कुठल्या परिक्षेला मला बसवलं आहे याची त्यांना तरी कल्पना आहे की नाही, देवच जाणे! 
-- तात्या अभ्यंकर.
ने मजसि ने...
प्रेषक विसोबा खेचर ( शनी, ०७/१९/२००८ - ०१:०६) .हा लेख यापूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे. परंतु आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरुजींना आदरांजली म्हणून हा लेख मला मिपावरही टाकावासा वाटला म्हणून तो मी टाकत आहे. आपल्यापैकी काही मंडळींनी हा लेख वाचलाही असेल. असो, आजचा दिवस थोडासा बेचैनीतच गेला! बाबूजींना या लेखाद्वारे माझी विनम्र आदरांजली!
नमस्कार मंडळी,
आज गुरूपौर्णिमा. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती.
२००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते. मी बाबुजींच्या घरी फोन लावला. फोनवर सौ ललिता मावशी (बाबुजींची पत्नी) होत्या. तेव्हा मला समजलं की बाबुजींना हिंदुजा रुग्णालयांत दाखल केले आहे. मी लगेच हिंदुजाला जायला निघालो तर त्या मला म्हणाल्या की ते अत्यवस्थ आहेत, तेव्हा तू आत्ता लगेच नको येउस, बऱ्याच तपासण्या सुरू आहेत, संध्याकाळी ये.
संध्याकाळ होईपर्यंतचा काळ मी खूप अस्वस्थतेत काढला. अनेकवेळा त्यांच्याघरी मी गेलो होतो. त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडे जेवलो होतो. ते घरांत नसले की ललिता मावशींकडून त्यांच्या खूप आठवणी ऐकल्या होत्या. काही काही वेळेला बाबुजी मूड मध्ये असले की माझी चेष्टाही करायचे. म्हणायचे, "मग काय पंडितजी, आम्हाला तुमच गाणं केव्हा ऐकवणार? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडसं..!" 
संध्याकाळी हिंदुजात गेलो. पण दुर्देव! बाबुजी कोमात गेले होते. बाहेरच व्हरांड्यात श्रीधरजी भेटले. त्यांनी खुणेनंच आंत जा असं सांगीतलं. मी घाबरतच आय. सी. यू. त गेलो. मला खूप भरून आलं होतं. आंत जाऊन पाहतो तर बाबुजी जवळजवळ मरणशय्येवरच विसावले होते. तात्यारांव सावरकरांचा हा शिष्य हळूहळू शांत होत होता. आता जीवनाशी झगडा संपत आला होता. मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली.
बाहेर आलो, ललितामावशींजवळ थोडा वेळ बसलो. काही सुचेना. एकटाच बाथरूममध्ये जाऊन हमसाहमशी रडलो.
अचानक माझ्या एका मित्राची मला आठवण झाली. तो दादरलाच रहायचा. मला नेहमी म्हणायचा, "तात्या लेका इतक्यावेळा बाबुजींकडे जातोस, मला पण ने की केव्हातरी त्यांच्या घरी. पण नेहमी जाऊ जाऊ म्हणता ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून. मी त्याला फोन केला आणि बोलावून घेतले हिंदुजामध्ये. तो लगेच आला, मी त्याला सर्व कल्पना दिली. तो मला एवढंच म्हणाला, "तात्या, खूप उशीर केलास रे तू....!"
तात्या.

