प्रतिसाद

युके कट्टा....

नमस्कार मंडळी,

मागे काही दिवसांपुर्वी मिपाचे इस्ट-कोस्ट अन् जर्मनीत बॅक टु बॅक कट्टे झाले. त्याच धरतीवर युकेतही (परत एकदा) कट्टा भरवावा अशी अस्मादिकांना इच्छा झाली.
त्यातच भर म्हणुन की काय, मिपाचे 'निवृत्त' विडंबनाचार्य केशवसुमार यांचेही या महिन्यात युकेत आगमन होत आहे.
हा त्रिवेणी (का द्विवेणी) संगम साधत युकेत कट्टा भरविणे आणि उत्सुक असणार्‍या सभासदांबरोबर या कट्ट्याची पुर्वतयारी करणे या करिता हा सगळा प्रपंच!

असो, केसुशेठ दिनांक २३ ऑगस्ट रोजी 'मोकळे' असल्याने कट्टा याच दिवशी भरवण्याचा मानस आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहिती करिता मला अथवा केशवसुमारांना व्यनि करणे.....

सहभागी होणारे सभासद मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करु शकतात.
माझा भ्रमणध्वनी क्र. -> ०७९१८७२२२५६

निवेदन संपले!

- (ब्रिटिश) टिंग्या Smile
संयोजक,
युके मिपा कट्टा क्र. २

गाव आणि शहर ख्रर काय आणि खोट काय

भलतच निराळ जीवनमान, आहे शहरातलं आणी खेड्यातलं आज मी दोन वर्ष झाली सागलीतल्या एका छोट्या खेड्या तुन पुन्या ला आलो आहे, जवा इथलं जीवनमान पहिलं तेव्हा गावा विषयी फारच किव वटु लागलीय पर्याय सापडेना झालाय की ही दरी कशी बुजवायचि .मग तो प्रश्न कोणता ही असो ,

सुरेखा..

"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?"
साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.
मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो. तेव्हा तिचा मुलगा शाळेत होता. त्यामुळे तिने आईला विनंती केली की, याची वार्षिक परिक्षा होईपर्यंत मी इथे रहाते .. तो पर्यंत तुमच्या घरचं काम करते. काम म्हणजे धुणं-भांडी, केर्-फरशी, बाकी आवरा आवर आणि स्वयंपाक .. आईनेही मान्य केलं. आणि २ महिने राहते म्हणून राहिलेली ही सुरेखा आमच्या कुटुंबाचा घटक झाली. तिच्यासाठी बंगल्याच्या बाहेर एक छोटीशी खोली वजा आउट हाऊस बांधून घेतलं. सकाळी अंगण झाडून घेण्यापासून हीचं काम सुरू होई. घरातल्या प्राणीमात्रांना सुद्धा तिची पट्कन सवय झाली. कर्नाटकची असल्याने भाकरी अशा काही सुंदर करते की, वरचा आणि खालचा पापुद्रा यांची जाडी एकच असते. तिला ब्राह्मणी पद्धतीने पोळ्या आणि भाज्या करयाला आईने शिकवल्या. खूप लवकर शिकली. आमच्या घरी स्वयंपाक करता करता आणखी १-२ ठिकाणची स्वयंपाकाचि तिनम कामं धरली. काळासावला रंग, शिडशिडीत बांधा आणि डोक्यावर पदर घेऊन तो कमरेशी खोचलेला अशा अवतारात बाई साहेब निघतात.
हिचे किस्से धमाल असतात. एकदा सगळीकडचे दिवे गेले होते. घरात अंधार होता. पण आमच्या घराच्या मागे चालेल्या बांधकामावर लाईट दिसत होते. आजीने विचारलं, "अगं सुरेखा, लाईट फक्त आपल्या घरीच गेलेत का? फ्युज वगैर नाही ना उडाला? कारण मागे लाईट आहे..." " न्हाई वं... जन्ड्रटल हाय तिथं.." सुरेखा म्हणाली. आजी म्हणाली, "काय आहे तिथं?".."जन्ड्रटल वं.. ते लावत्यात की लाई गेल्यावर"... सुरेखा समजावून देऊ लागली. " अच्छा.. जनरेटर होय..! बर बरं.." आजी म्हणाली. "हां बघा ते जन्ड्रटल हाय" सुरेखाने पुस्ती जोडली. हा प्रसंग आम्ही आठवून आठवून हसत होतो.
त्यानंतर एकदा, तिचा मोठा मुलगा जो कर्नाटकात कुठेतरी नुकताच ओफिसबॉय म्हणून नोकरीला लागला. तो हिला आणि धाकट्या भावाला भेटायला म्हणून आला. पहिला पगार झाला होता. तेव्हा भावाला घेऊन सिनेमाला गेला , त्याला कपडे आणले नवे, हिला साडी घेतली. त्यावेळि हिचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप बरं वाटलं. तिच्या त्या मुलाने एका संध्याकाळी येताना कोण्या गाड्यावरून चिकन ६५ आणले घरी. ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरी आली. आईने विचारलं, " तुझा झाला का स्वयंपाक?" तर म्हणाली, " पक्या (प्रकाश .. तो मोठा मुलगा), आज येताना चिट्टीफाय घ्यून आला हाय नव्हं. ते खाल्लो आताच.. आता पक्त्(फक्त) बाकरी(भाकरी) करनार २ आणि सकाळचा बात (भात) बी हाय तसाच. काय जास्त न्हाइ करायच आज" . आईने विचारलं," काय आणलं प्रकाशनं??" तर पुन्हा म्हणाली," चिट्टीफाय".. "काय??" आईने विचारलं. "अवं चिट्टीफाय वं.. ते चिकनचं असतयं नव्हं का..." सुरेखा समजावू लागली. "अच्छा.. चिकन ६५.. बर बर" आईला समजलं.
एकदा घरातले केर काढत होती. पलंगाच्या खालून केरसूणी फिरवल्यानंतर कसलं तरी छोटं कागदी पाकिट बाहेर आलं. आई म्हणाली," ते काय आलं बघ गं जरा बाहेर.." तिने ते उघडलं. म्हणाली ," निगूटी हाय त्यात". अईचं लक्ष नव्हतं. तिनं विचारलं ," कसली गूटी?".. "आवं.. निगूटी.. निगूटी" सुरेखाने सांगितलं. आईला काही समजेना. ती च्या जवळ गेली आणि पाहिलं. "अगं... निगेटिव्ह होय.. काय सुरेखा काय बोलतिस तू?" "त्येच सांगत व्हुतो न्हवं का निगूटी हाय म्हनून" सुरेखाचं उत्तर. "हम्म .. चुकलं बाई.. निगूटीच आहे ती." आईने नाद सोडून दिला.
आमच्या घरी तेव्हा एक मांजराचं लहान पिलू आणलं होतं. अजून नविन होतं ते आमच्या घराला. त्यामुळे कधी कधी ते पलंगाखाली त्याचे सगळे कार्यक्रम आटोपायचं. अशीच सुरेखा एकदा केर काढत होती. आणि तिला पलंगाच्या खाली काहीतरी पडलेलं दिसलं. ती नीरखून बघत असतानाच तिथे बाबा आले. म्हणाले, "काय गं अशी काय बघती आहेस?" "त्ये बघा तिथं कोपर्‍यात काय हाय?" सुरेखा म्हणाली. बाबा म्हणाले ,'खाली जाऊन बघ पलंगाच्या काय आहे ते.. मांजराने घाण केली असेल तर कागदावर घेऊन काढून टाक.""बर" म्हणत ती पलंगाखाली गेली. बाबांनी विचारलं," काय आहे गं?" तर म्हणाली," बू हाय बू"..बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले. "अवं.. ते नव्हं.. बू हाय बू" सुरेखा. "अगं.. मग काढून टाक ना.. बघत काय बसली आहेस?".. इति बाबा. "आवं दादा, बू हाय ह्यो बू" असं म्हणत ती पलंगाच्या बाहेर आली. तिच्या हातात.. एका भेटवस्तूला सजावटीसाठी लावलेला सॅटीनच्या रिबिनचा बो(बू) होता. तो खाली पडला होता. तो बो बघून बाबांना हसावं की रडावं हे कळेना.. आमची मात्र हसून हसून पार वाट लागली.
हिचे किस्से फार मजेदार आहेत. आईने एकदा गाजर हलवा केला होता. तो दूधात आटवत ठेवला होता. आईला स्पॉन्डीलाटिस असल्याने तिला फार वेळ हलवता येईना. तिने सुरेखाला सांगितलं "सुरेखा, हलवा हलव जरा आणि दूध आटलं की गॅस बंद कर" ती मन लावून ते करू लागली. दूध आटलं, हलवा झाला. तिने गॅस बंद केला आणि आईला म्हणाली,"ह्ये हलवं जालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे. अतिशय प्रेमळ, माया लवणारी ही सुरेखा पूर्ण दिवस राबत असते. मोठा मुलगा आता बेंगलोरला कोणत्यातरी मोठ्या कंपनीत शिपाइ म्हणून काम करतो. धाकटा मुलगा रिक्षा चालवतो. त्याने हिला मोबाईल घेऊन दिला आहे. पण फक्त फोन घ्यायचं बटण कुठलं आणि बंद करायचं बटण कुठलं याशिवाय त्या मोबाईल बद्दल काही माहीती नाही हिला. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, बाळंतीणीला चिकनचं सूप चांगलं असतं म्हणून रोज करून द्यायची. लेकाला माझ्याही खूप माया लावली तिने. तिच्या घरी थालिपिठ केलं की आवर्जून माझ्यासाठी घेऊन येते किंवा, मला तिच्या खोलीत बोलावून खायला लावते. कोल्हापूरि चिकन करावं तर ते सुरेखाने. पांढरा - तांबडा रस्सा तिच्या हातचा खाल्ला की बस्स! कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही इतका सुंदर करते.
आईकडून, पुरणपोळ्या, गूळाच्या पोळ्या, रव्याचे लाडू, उकडीचे मोदक शिकली. मी मात्र आईकडे गेले की, "सुरेखा, मस्तपैकी चिकन , तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी कर गं उद्या." अशी फर्माइश करते आणि माझी ही फर्माइश ऐकली की तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो. आणि मग दुसरे दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान आवाज येतो ,"वयनी, आज चिकन करायची व्हवं का.. मग आनायला पैसं देता का?".. सुरेखा तयारीला लागलेली असते.
- प्राजु

हे फक्त भारतीय चित्रपटातच घडू शकत.

बाघबानः अमीताभ आणी हेमा हे होळी नंतर (आठवा होली खेले रघुवीरा...गाण) सहा महिन्या करीता एकमेंकापासुन वेगळे होतात (म्हणजेच मार्च पासुन सप्टेंबर) आणी त्या सहा महीण्याच्या कालावधीत ते वेलेंटाईन डे साजरा करतात जो १४ फेब्रुवारी ला असतो ,करवा चौथ पण (जे साधारणता ऑक्टोंबर मधे असते).

आता काही माझ्या क्रिकेट प्रेंमीसाठी ...

लगानः ते म्हणतात की ही कहाणी १९व्या शतकातील आहे (भारत ईंग्रंजाच्या पारतंत्र्यात असतांना). त्या वेळेस क्रिकेट मधील एक षटक हे ८ चेंडु च असायच परंतु पिक्चर मधे ते ६ चेंडुच दाखवलय. कदाचीत आधुनीक क्रिकेट या पिक्चर पासुन शिकलेल असाव.

अमर अकबर एन्थोनी : तीन मनुष्य एकाच वेळेस एकाच माणसाला रक्त देतात?????

खलनायक : पोलीस गुंडा चा शोध ms word document screen ने लावतात.

प्यार तो होना ही था: काजोल ट्रेन मधन पब्लीक टॉयलेट वापरायला उतरते आणी तीची ट्रेन सुट्ते(बिचारी ..तीला कोणी सांगा बर
ट्रेन मधे प्रत्येक कम्पार्टंमेंट मधे चार्-चार टॉयलेट असतात)

तेरे मेरे सपने : प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते ( हीम्मत तर बघा मुलीची)

हे झाले माझे चित्रपट बघतांना चे निरीक्षण आणी तुमचे पण असतील काही...नाही का???
मग वाट कसली बघता येऊ द्यात...........

------नितिन

एक शून्य ......

कवड्या तुझी धाव आहे
शुन्या कडून शुन्या कडे
पंच्याऐंशी वाचनांनंतरही
नि:शब्द जालाचे कडे

ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे

प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे

(माउस)

ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..!
झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..!

मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला,
मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..!

कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला.
रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..!

अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा
मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..!

नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा,
कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..!

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे
मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे
हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या
`कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे?
कसल्या प्रतिमा? कसले जाळे? मला कळेना
लिहावेस तू पुन्हा म्हणूनी धडपडतो आहे
कविता नंतर; आधी विडंबन वाचत होतो
आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे
`रवि न देखे' ते ही कवी हा पाहू शकतो
विडंबने करण्यास कशा घाबरतो आहे?
घे विश्रांती; थांबव `क्षण'भर या कोलांट्या
पण निवृत्तीचा मूड मला ना कळतो आहे
सुचेल तेव्हा लिहीत जावे, काव्य-विडंबन
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे
म्हणून म्हणतो, बदला निर्णय; आणि म्हणा की-
`आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे'

सट्टाशाही

सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?

संदर्भः महाराष्ट्र टाइम्स

युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० . ५० पैसे , २७४ मतांसाठी ० . ८० पैसे भाव सुरू आहे.

सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.

  1. रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
  2. स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा

इत्यादी...

पालकांची भाजी

गेल्या आठवड्यात पाचवी यादी लागली आणि सकाळी साडेसहा वाजता एका पालकांचा फोन आला. नाव आहे यादीत. पण एक शंका विचारायची होती. या कॉलेजचे कॅरेक्टर कसे आहे हो?
ऍडमिशन म्हटलं की पालकांच्या हुशारीला मर्यादा पडतात आणि मूर्खपणाला सिमा उरत नाहीत. मी डॉक्टर नाही , सायकॅट्रीस्ट नाही,प्रोफेसर नाही.तरीपण या सर्व संबोधनांचा मालक आहे.कंठशोष करून हे सांगीतलं तरी पालक मंडळी ऐकत नाहीत.जनसंपर्काने साधलेल्या असंख्य अनुभवाचे पोतडे पाठीवर घेऊन हिंडणारा एक सर्व सामान्य पालक आहे मी. WHOमधलादोन वर्ष काउंसेलींचा आणि त्यानंतर एशीयाच्या एका प्रख्यात हॉसपीटलचा प्री अँड पोस्ट ऑपरेटीव अँक्झायटी काउंसेलर म्हणून दिवसाला सोळा सोळा तासाचा अनुभव मला पालकांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था बघून स्वस्थ बसू देत नाही.जून जुलाई आणि ऑगस्ट बायको रोज दोन रुमाल खिशात ठेवते एक घाम पुसण्यासाठी आणि दुसरा अश्रू पुसण्यासाठी.
पुढच्या दोन वर्षाचे भाकीत आत्ताच करून ठेवतो.
नव्वद टक्के मार्कांनी पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या जागा जवळ जवळ त्याच राहणार आहेत,यावर्षी गूड कॉलेजच्या जागा अपूर्‍या पडल्या आहेत . दोन वर्षांनी पालकांचे पैसे अपूरे पडणार आहेत गूड कॉलेजच्या आयटी आणि काँप्युटरच्या इलेक्ट्रॉनीक्सच्या ऍडमिशन साठी.मला पण चिरंजीवांसाठी मनस्ताप झाला तो वेगळ्याच कारणासाठी.
ऑफीसमध्ये एक पालक भेटले .ते आत येत असतानाच त्यांच चेहेरा बघीतल्यानंतर खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले.उगाच ऑर्थोपेडीक सर्जनची धन नको म्हणून.
पहीले वाक्य. डॉक्टर माझ्या मुलाला गणिताचा डिसलेक्शीया झाला आहे.तुमचे नाव ऐकून आलो. आठवी पर्यंत सर्व ठिक होते.धरणी दुभंगल्याचा भास झाला. सर्दी खोकला मलेरीया ,काविळ हे होतात ऐकून होतो पण गणिताचा डिसलेक्षीया तो पण डायरेक्ट नववीत? शांतपणे विचारले डीसलेक्शीया चे निदान केले कुणी?
उत्तर आले शाळेच्या काऊंसेलरनी.
नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा ही मोहीम माहिती होती पण तशी मोहीम शिक्षण मंडळानी काढली आहे काय?
आमचे लव्हाटे सर असला डीसलेक्शीया दोन फटक्यात बरा करायचे त्यांना डस्टरचा फळा पुसण्याचा एकेरी उपयोग मान्य नव्हता.असे शिक्षक होणे नाहीत.
हा गणिताचा डीसलेक्शीया नसून आळ्सेक्षीया असे निदान करून मी सरावाचे प्रिस्क्रीप्शन दिले. नंतर कळले की हे सद् गृहस्थ माझ्या उत्तराने निराश होऊन मुलाला सायकॅट्रीस्ट कडे घेऊन गेले तिथे काहीतरी गोळ्या इंजेक्षनची ट्रीटमेंट चालू आहे .देवनार कत्तलखान्यात चालवत नेल्या जाणार्‍या मेंढारांना सुद्धा एव्हढे असुरक्षीतता नसावी.
तारे जमीपर्(एक सुंदर कलाकृती )नंतर जरा मार्क कमी मिळाले तर डीसलेक्शीया शोधायचे खूळ तर मूळ धरत नाही ना?
जाता जाता: वरील पेशंटला संध्या़काळी आठ वाजता नंतर कोपरी पूलाखाली अंधारात दमयंती बरोबर पाह्यला.एकदा औषध नलगे मजला चा प्रादुर्भाव झाला की कसलं गणित आणि कसला अभ्यास.

(मोरपिशी साडी)

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"अत्तर शिंपडलंय या देखाव्यात''
निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा... !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं कोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न कोमेजता!

प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द