विडंबन

((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
26 Jun 2020 - 9:43 pm

प्रेरणा अर्थातच इथुन

मित्र घरी जायला निघतो तेव्हा,
अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो.. सवयीने
खंबा सुद्धा अगदी थेंबही न उरेल इतका साफ केलेला असतो..अगदी रिकामा
डिशमधला चकणा..चकल्या..उबले हुए शेंगदाणे..चना डाल
वेटर कडुन मागावलेला कॉम्प्लिमेंटरी पापड..विथ ग्रीन चटणी..
योल्क काढलेले बॉईल्ड एग्ज फिंगर चिप्स अन ओनिअन रिंग्ज.
मेन कोर्स मागवतच नाही.
चकण्यातच पोट कसे भरुन जाते कोण जाणे....!

विडंबन

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
26 Jun 2020 - 11:21 am

हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ??

हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..!
आता तू तयार आहेस.. आणि म्हणूनच मी GT चं परमगुह्यज्ञान तुझ्यासारख्या सगळ्या होतकरूंच्या झोळीत टाकतो आहे..ज्याच्या मदतीनं तू हा सबमिशन्सचा भवसागर तरून जाशील, अशी नितांत श्रद्धा बाळग.

अब आगे..!

# रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

*** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्‍यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.

लेखविरंगुळाविडंबनविनोद

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
24 Jun 2020 - 1:03 pm

( प्राचीताई माफ करशील ना ग? )

विडंबनgholmiss you!prayogअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीआशादायकइशारागरम पाण्याचे कुंडजिलबीपाऊसमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.

(धागा धागा.....)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
12 Jun 2020 - 9:01 pm

धागा धागा पिंजत बसुया
प्रतिसादांची चळत रचूया

अक्षांशाचे अयनांशांशी
बादरायणी सूत जुळवूया
धागा विषया फोडुनी फाटे
भरकटवुनी तो मजा बघूया

अध्यात्माच्या मागावरती
शब्दछलाचे तंतू टाकूया
वस्त्र विणूया भरडे तरिही
महावस्त्र त्यालाच म्हणूया
पडलो तोंडावरती तरीही
"जितं मया"चा घोष करूया

धागा धागा पिंजत बसुया...

(नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.)
(प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)

विडंबनगाणे

(दिवस तुझे हे फुगायचे)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
9 Jun 2020 - 11:37 pm

ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच.

कुमार1 यांच्या धाग्यावर गाणी शोधताना हे गाणे ऐकले आणि त्याचे हे विडंबन शब्द झाले मोती -2 वर लिहिले.. तेच येथे पुन्हा देतो...

Youtube -
दिवस तुझे हे फुलायचे

Gaana-

दिवस तुझे हे फुलायचे
----------------------------

दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे

विडंबनगाणे

उप्पीट मात्र बरे झाले

मनस्विता's picture
मनस्विता in जे न देखे रवी...
19 May 2020 - 6:15 pm

प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/46836

रवा होता खमंग भाजला
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

फोडणीत मोहरी तडतडली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

उडीद डाळ त्यातच परतली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

कविताविडंबन

विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
21 Apr 2020 - 8:57 pm

चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...)

चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई
कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।।
किंवा
(असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई)

लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई
दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई
लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।।

कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी
जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी
काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।।

विडंबनसमाजजीवनमान

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
5 Apr 2020 - 9:38 am

केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत.
त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.

मूळ गीत :
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे

कवी : अशोकजी परांजपे
प्रकार : कोळीगीत

विडंबन :

नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे
जटाधारी झालो आता, काप माझे केस रे

क्वारेंटीनचे दिस गेले, घरकैदेचा मास चाले, कोरोना आला
माझिया केसा गुंता होऊनि गेला,
धाव घेई तुजकडे माझे मन, नाही तुला ठाव रे

विडंबनकविता माझीमुक्त कविता

करोणागीत..

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
3 Apr 2020 - 6:45 pm

दहा दिशांनी, दहा मुखांनी. आता फोडिला टाहो,
आसवांत या भिजलेली कथा, श्रोते एका हो.....
सगळ्यांच्या आयुष्याची पार वाट लागली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

गंगेवानी गढुळला होता, असा एक देश
सुखी समाधानी नाही कोणी, करायचे द्वेष
विचित्र उद्योगांनी त्याची कीर्ती वाढली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

अशा देशाचा होता एक प्रधान पंत
कुणी शेठ म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्यांनी नवनवीन घोषणांची सवय लावली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

विडंबनआता मला वाटते भिती

(वळण)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 6:37 pm

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत

प्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss you!अदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस