माझी कविता

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक's picture
भम्पक in जे न देखे रवी...
23 Aug 2024 - 4:58 pm

न करीशी व्यर्थ चिंता तू
ठाऊक मज सामर्थ्य माझे !

कुणाशी कसे वदावे कसे वागावे
काय केल्याने काय होईल....
हि चिंता तयास
ज्याने क्रमिला पथ दुहेरी
माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ
कण भारही किंतु तयात नाही !
नकोत सला-मशवरा मजला
ठाऊक मज मार्गक्रमण माझे !
मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !
का कशाचीही बाळगावी मी भीती
ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

माझी कविताकविता

हाक

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
10 Sep 2023 - 12:30 am

रानात आली कुणाची हाक
डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक

वळूनी बघता दिसे न कोणी
पाखरांच्या मुखी आली कशी गाणी

कसा होतो कळेना हा भास
प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस

दूर-दूर मी भांबावूनी पाहते
नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते

आला शिवारी दरवळत रानगंध
वेडावले मी झाली ही काया धुंद

माझी कविताकविता

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
7 May 2023 - 12:30 pm

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी.

वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू
दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी.

दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती
नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.

पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे
आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी.

हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.

माझी कविताकविता

एकदाच काय ते बोलून टाकू

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
7 Apr 2023 - 9:02 am

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत.

खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसे
ते कॉफीत झुरन आणि मनात बोलणं
गुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणं
सारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणं
सार आता संपवून टाकू
तू हिंजवाडीला येते की मी कोथरुडला येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सारं बोलून टाकू

जिलबीमाझी कवितामुक्त कविताकविता

शहरी माणूस.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
23 Feb 2023 - 8:40 pm

सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो
पण...
आता रुळू लागलोय या वस्तीत.

किती दिवसात नाही पाहिलं चांदणं
काजव्यांच लुकलुकणं
चंद्राच्या अस्तित्वाचीच आता
येऊ लागलेय शंका
सूर्याचं उगवणं, मावळणं देखील
किती दिवसात अनुभवलेलं नाही.
इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर
त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य
सरकत असतं पुढं पुढं
माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा
आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा
कळत नाही आतासं.
किंवा...
तशी गरजच भासत नाही कुणाला.

माझी कविताकविता

दिस सरतो असा...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
25 Dec 2022 - 8:48 pm

दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.

दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.

दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.

दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.

दीपक पवार.

जीवनमाझी कविताकविता

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
6 Nov 2022 - 8:30 pm

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव
भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव.

कुणी म्हणे देतो वोट
द्यावी एक नोट
कुणी इथं दारूसाठी
फिरे पाठी पाठी
इमान हे होई थिटे जिथे वसे हाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.

आपलीच भरी झोळी
खुंटला विकास
अंधाराचं राज आलं
लोपला प्रकाश
हपापल्या वादळाने गिळली हि नाव.
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.

सत्तेची ही चढे नशा
उफाळला माज
गावच्या या डोईवर
विनाशाचा ताज
विकासाच्या मुळावर घालुनिया घाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.

माझी कविताकविता

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
12 Sep 2022 - 10:17 pm

न्यायाधीशांनी निकाल वाचला.
'त्या' पाच महिला नाचल्या.

मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग.
म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग

ओवैसी ने केला थयथयाट.
1991 चा कायदा त्याला पाठ

'औवैसी, तू कितनी भी पटक ले'
आताआहे हिंदू जनमत सटकले

औरंग ने काढले होते फर्मान
त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण

एक मंदिर-भिंत तशीच ठेवली
हिंदू-जखम धगधगत ठेवली

कसले दाखले अन कसले पुरावे
उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे

शतकातून मग एक लोकोत्तर नेता
370, राममंदिर,आता काशी घेता

माझी कविताधर्मइतिहास

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
2 Sep 2022 - 9:21 pm

चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्‍या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.

Nisargगजेंद्रनिसर्गमाझी कवितामुक्त कविताविठोबाशिववंदनाश्रीगणेशवीररसरौद्ररसशांतरसचारोळ्यामुक्तकव्यक्तिचित्र