वीररस
नाटकी बोलतात साले!
प्रेषक, गंगाधर मुटे, Thu, 25/04/2013 - 11:07कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!
राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे
रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे
त्यांचाच जीव घे तू ..
प्रेषक, गंगाधर मुटे, Sun, 21/04/2013 - 10:48त्यांचाच जीव घे तू .....
हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता
मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता
मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
नायक क्रमांक एक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 02/04/2013 - 16:17आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
शाळा
प्रेषक, अत्रुप्त आत्मा, Tue, 12/03/2013 - 15:23 कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥
नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥
शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥
नरवीर तानाजी मालुसरे "वीरगाथा"
प्रेषक, अनिल तापकीर, Wed, 26/12/2012 - 12:59गाल चोळ फक्त
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 11/12/2012 - 09:413