मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वृत्तबद्ध कविता

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

गाव सोडले होते

किरण कुमार ·

अगबी, अगदी. ज्या वडा खाली चोरले आबे त्या तरूतळी आता कुणी न थांबे तो थंडगार उनाड वारा झोंबत होता तो आता हाय वे वरूनी जातो

बिनधास्त उभा तो वाडा हळहळणारा वर पिंपळ थकला तेथे सळसळणारा ते जळमट काही प्रवेशद्वारापाशी तृण उंच वाढले बिलगे तरु पर्णांशी पोपडे जरासे भिंतीवरती ओले अन धाप टाकुनी उदास खिडकी बोले निखळले कसे हे अलगद वासे काही ते वैभव सारे जिथे द्यायचे ग्वाही ती विहीर जेथे जमायचे बघ खेडे वाजायाचे ते रहाट करकर वेडे देव्हारा तिथला कसा पोरका झाला चढविली कशी ना कुणी फुलांची माला मी धावत सुटलो स्वप्नांच्या त्या पाठी ना मिटली तरिही चिंतेची ती आठी बैसतो स्मृतीच्या त्याच नदीच्या काठी मी बालपणाला पुन्हा जगायासाठी का आता कोणी तेथे फिरकत नाही थांबला काळ जो पुढती सरकत नाही ते काळ स्मृतींचे किती लो

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

वासंतिक

मी-दिपाली ·
सुरांबरोबरच कुंचल्यातून उतरलेली माझी कविता...

लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे

धष्टपुष्ट ·

चित्रगुप्त 24/08/2020 - 17:27
@धष्टपुष्ट साहेब, आधुनिक काळात मागे पडलेले, पण अतिशय मौल्यवान, अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध काव्य हे मराठी भाषेचे अपूर्व वैभव आहे. यात रुचि असणार्‍या, परंतु जेमतेमच माहिती असणार्‍या मजसारख्या वाचकांसाठी ही लेखमाला चालवत रहा. (प्रतिसाद कमी मिळत असले तरी-) असे लेख हे भाषेचे गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

कंजूस 24/08/2020 - 20:13
लेख आवडला. लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं. सुधीर फडकेंचं ' ला--जून हा--सणे ' त्यातलंच असावं.

In reply to by कंजूस

धष्टपुष्ट 26/11/2021 - 23:54
लाजून हासणे अन, हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे (गागालगालगागा, गागालगालगागा)
लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं.
म्हणजे काव्यस्वातंत्र्य असतंच, पण मोकाट सुटलं तर गेयता घटते. आता काव्य गेय असावंच का यावर विद्वान लोकांनी बरीच चर्चा केली आहे. शुभांगी पातुरकरांचा मुक्तछंदावरचा प्रबंध चघळतोय. Ruth Padel चं Free Verse वरचं पुस्तकही वाचतोय. वाचून झालं, पुरलं, पटलं, मुरलं, की लिहीन इथे.

सिरुसेरि 24/08/2020 - 20:27
मराठी व्याकरण शास्त्राची छान माहिती . या खालील ओळी लक्षात आहेत . "मना सज्जना तु कडेनेच जावे , न स्वतःहुन कोणासही दुखवावे , कुणी दुष्ट लावील अंगास हात , तरी दाखवावा भुजंग प्रयात ."

चौकटराजा 25/08/2020 - 12:38
वृत्तांची लक्षणे लक्षात राहावीत म्हणून चारॊळी करीत असत पण एक गद्यात केलेले लक्षण असे ननमयय गणांनी मालिनी: वृत्त होते !!!

In reply to by चौकटराजा

Gk 25/08/2020 - 17:02
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये

In reply to by Gk

Gk 25/08/2020 - 17:58
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये

Gk 25/08/2020 - 20:39
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये हिंदी मधील की , पे वगैरेंच्या मात्रा उच्चारा नुसार बदलतात , ब्बत दोन्ही मिळून 2 मात्रा होतात की असा लिहिला तरी उच्चर थोडा र्हस्व आहे म्हणून 1 मात्रा पे देखील तसेच , 1 मात्रा भुजंग प्रयातात हिंदीत कितीतरी गाणी आहेत ( मराठी संस्कृतात हे अक्षरगण वृत्त आहे , उर्दूत काही ठिकाणी 2 ऐवजी 1,1 घेऊन मात्रा तितक्याच ठेवून वापरतात) ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला पढा है मेरी जा नजर से पढा है बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है

पुष्कर 25/11/2021 - 05:29
मराठीत जसं जोडाक्षरात आधीच्या अक्षरावर आघात देऊन आणि न देता एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात (सृष्टी-लावण्याची शोभा आणि शेपूट लावण्याची स्पर्धा, शहर पुण्याची आणि पाप-पुण्याची इत्यादी) तसे इतर कुठल्या भाषेत असल्यास वाचायला आवडेल.

कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु. . पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय. . १) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात. मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु. मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

कौस्तुभ भोसले ·
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद

हसण्या उसंत नाही

कौस्तुभ भोसले ·

नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत. वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू पण मी सारख्याच कविता लिहीत नाही मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच कविता जुन्या आहेत

हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

कौस्तुभ भोसले ·

निनाद 18/05/2020 - 08:20
मुक्तछंद नावाच्या आळशी कचर्‍यात वृत्तबद्ध कवितेचे हे फुल उगवलेले पाहून अतिशय आनंद वाटला. वृत्ताचे नाव आनंदकंद असले तरी कविता मात्र दु:खी आहे. असो, आता आनंदकंद वृत्ताची लघु-गुरु क्रम लगावली पण द्या. या वृत्तातले एखादे गाणे कुणाला माहित आहे का?

In reply to by निनाद

गागालगा लगागा गागालगा लगागा -आनंदकंद वृत्त उदाहरणेः १. केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट २. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार ३. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन ४. आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे ५. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । - ग.दि.माडगुळकर ६. गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे ७. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सचिन 21/05/2020 - 13:52
वृत्तबद्ध कविता दुर्मिळ झालेल्या असतांना हा अत्यंत सुखद धक्का .. कविता जरा दु:खद वाटत असली तरी ... वृत्तबद्ध कवितेला आपोआपच गेयता प्राप्त होते आणि त्या लयीत छान झोके घेता येतात.

पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा

कौस्तुभ भोसले ·
असा एक शत्रूच खुद्दार व्हावा. पुरावा परंतू न गद्दार व्हावा. अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची. उभ्या आसमंतात उद्धार व्हावा. कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा. उभा श्वास माझा ग मंदार व्हावा . कशाला कुणाची करावी अपेक्षा. स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा. तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी . नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा . -कौस्तुभ वृत्त - भुजंगप्रयास

देवघर

शिव कन्या ·

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की

देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या