vidamban

नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
8 Aug 2017 - 4:58 am

मूळ कविता - आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी)

आली कुठूनशी कानी, चषकांची किन किन
नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

स्कॉच व्हिस्की ती भरली, धुंद मद्य चषकांनी
थंड बियर फेसाळती, गजर चिअर्स उंचावुनी

वारुणीच्या चषकात आईसक्यूब्ज ओले चिंब
चखना असे साथीला, काजू चिकन आणि श्रिम्प

खंबा दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
मद्य घेवुनी अंतरी, स्वागतास माझ्या उभा

चिंता संसाराची सरे, माझ्या साकियाँच्या साथीत
माझे मन झाले दंग, उमर खय्यामच्या रुबायांत

आली कुठूनशी कानी......

कविताvidamban

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य...

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
1 Jul 2017 - 6:26 pm

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य
काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य..

चाटते ती ज्या अदेने मान वेळावून
शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य.

बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी
टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य.

रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक
या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य.

विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची
जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य.

प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.

बालगीतvidambanरतीबाच्या कविता

वाघोबा वाघोबा किती वाजले

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जे न देखे रवी...
21 Jun 2017 - 3:03 pm


वाघोबा वाघोबा किती वाजले

वाघोबा वाघोबा किती वाजले,
पाऊस न येताच राजीनामे भिजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
भूकंपाच्या धमकीने हसू फुटले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
आदिलशहा* येताच शेपूट घातले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
बनियासमोर** लोटांगण घातले|

कविताविडंबनvidambanकाहीच्या काही कविता

जन पळभर करतिल हाय हाय

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
27 Apr 2017 - 11:56 am

भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_

जन पळभर करतिल हाय हाय

(एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्‍या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन)

(डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन)

जन पळभर करतिल, 'हाय हाय !'
(कुणी उद्धरतील हे आय माय)
डब्या शिरता खन्त काय ?

(डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन)
कुणी ढकलतील, कूणी सरकतिल;
सारे अपुला मार्ग आचरतिल,
तसेच सारे खडे राहतिल,
असेच पन्खे बन्द राहतिल ?

विडंबनvidamban

(नारंगीभारल्या रात्री होत्या)

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 1:50 pm

सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!

मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना...
फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते!

विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला...
तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता

मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते

घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा...
पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते

विडंबनvidamban

कुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 11:50 am

(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) . त्याचे मी माझ्या पद्धतीने सोपस्कार करून गाणे आणिक विषय तोच ठेवून, मूळ विडम्बन काराच्या प्रतिभेला अभिवादन करून हे विडम्बन लिहीत आहे )

कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी
शशीने हलविली मान, घेतले सुंदर ध्यान
अदालत म्हणाली, व्वा व्वा !
शशी म्हणाली, सोडा मला

कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
पनीरने मारली उडी, भरभर चढला शिडी
शशी म्हणाली, थान्ब थान्ब !
पनीर म्हणाला, नानाची टान्ग

विडंबनvidamban

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
16 Feb 2017 - 1:04 pm

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,
व्होटर होता सभापती मधोमध उभा.
व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट.. देवाघरची लूट !
तुम्हां अम्हां सर्वांना एक एक व्होट
या व्होटाचे कराल काय ?"

वाघ म्हणाला, "अश्शा अश्शा, व्होटाने मी काढीन नीवीदा."

ईन्जीन म्हणाले, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या व्होटाने, असेच करीन, असेच करीन,"

चक्र म्हणाले, "सत्तेत येण्यासाठी, शेपूट हलवीत राहीन."

कमळ म्हणाले, "नाही ग बाई, वाघासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप व्होट मिळतील तेन्व्हा परीवर्तन करेन परीवर्तन करेन."

विडंबनvidamban

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
3 Feb 2017 - 8:13 am

विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला! ;)

शोधतो मौनात बागा, निरखणे आता नव्याने
पेठ गल्लीबोळ फिरुनी शोधणे आता नव्याने!

कोणत्या त्या बंगली वसते परी सांगा गड्यांनो?
फाटकांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने!

'भारती' अन 'वाडिया'ही वाटती का क्षुद्र आता?
फर्ग्युसनच्या मृगजळी धुंडाळणे आता नव्याने!

'सीसिडी'ला पडिकणे मी सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने!

कविताविडंबनvidamban

शिव शिव

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 5:41 pm

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

चारोळ्याvidambanअनर्थशास्त्रशिववंदनाअद्भुतरस