मानवतेचं कलेवर
आतंकवादी बेलगाम
पुलवामा,पहलगाम.......
होतच रहाणार
कुठवर मानवतेचं कलेवर
ॐ शांती म्हणत ओढत रहाणार
रोज रोज कुठवर मरायचं
XXX की औलाद,
तोंडाला लागलयं रक्त
भ्याड हल्ले बघत रहायचं
कुठवर आसवं गाळायची
कुठवर मेणबत्ती जाळायची
एकजुट होणार,का?
फक्त राजकिय पोळी भाजणार
भळभळतीय जखम
नकोय आता रकम,हवा
डोळ्याला डोळा,गोळीला गोळी
आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी
नको अश्वासने नको वल्गना
हवी गुरूवाणी,शिवगर्जना
पुरे आता दया,क्षमा,शांती
मिटवा एकदाची खाज त्यांची