(सहजच..)
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो
झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो
रुजताना उन्मळलो...
का मी किडलो होतो?
छप्पर उडून गेल्यानंतर
पाऊस घरात येतो
तोंडचा घास नाहीसा होतो
भणाणता आलेले वादळ
सारं उध्वस्त करीत जातं
वाटेत येईल ते पाडत जातं
मग ते काहीही असो
घर खांब छप्पर झाड माड
आणि मनही.
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
खालील फोटो पाहून सुचलेली कविता:फोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune
ढासळला वाडा
ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती
त्या रात्री त्याला
चंद्रावरचा डाग
स्पष्ट दिसला.
आणि मग त्यानं
घट्ट मिटून घेतली
खिडक्यांची दार...
सताड उघडी ठेवली
भयाण काळोखात
नयनांची कवाडं...
त्या स्मशान शांततेत
निर्दयीपणे ओढल्या त्याने
रक्ताळलेल्या रेघा
आपल्याच हातावर
आणि मग पुन्हा
पहाटच झाली नाही...
-कौस्तुभ
असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.
रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?
कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.
-कौस्तुभ
आठवांच्या काळवेळा पाहिल्या.
हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या.
मालवेणा चंद्र भोळा कालचा.
कालच्या या चांदण्याही राहिल्या.
सोसली मी ही तमांची अंतरे.
रात्र काळी झाडपाने मंतरे.
गारव्याने जाग आली या फुला.
पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या.
प्राण झाले कातिलांचे सोबती.
सांग हे का माणसाला शोभती ?
वाचण्याचे मार्ग सारे संपले.
शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या.
-कौस्तुभ
वृत्त - मालीबाला
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही
गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही
शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली
नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही
अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता
संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना?
हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती
झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती?
देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी
अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ?
भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती
मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिवकन्या